The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवाने या हिंदू राजाच्या पराक्रमाचा इतिहास आज आपल्याला माहिती नाही

by द पोस्टमन टीम
4 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मध्ययुगीन काळात भारतावर मुघालांचेच वर्चस्व राहिले आहे. भारतातून या परकीय सत्ताधीशांना हाकलवून लावण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण म्हणावे तसे यश कोणालाच मिळाले नाही. पण, याच काळात एक यो*द्धा असा होता ज्याने अफ*गाणी बंडखोरांना हाताशी धरून मुघलांना दिल्लीतून हाकलवून लावले. ३५० वर्षांचे मुघल साम्राज्य दिल्लीतून उखडून टाकले आणि दिल्लीच्या गादीवर स्वतःचा एका हिंदू सम्राट म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.

पण, या काळात एका हिंदू राजाने दिल्लीवर राज्य केले होते हा इतिहास आज फार कमी लोकांना माहित आहे. हा राजा होता हेमचंद्र विक्रमादित्य! ज्याने मुघल, अफगाण, आणि इतर बंडखोर सरदारांसोबत २२ लढाया केल्या आणि यातील प्रत्येक लढाईत त्याने विजय मिळवला.

तब्बल ३५० वर्षांच्या मुघल साम्राज्याला धूळ चारून दिल्लीच्या तख्तावर स्वतःच्या राज्याभिषेक करून घेतलेल्या या महान राजाला आज फारसे कुणी ओळखत नाही हीच खरी शोकांतिका आहे!

राजा अकबराविरुद्ध पानिपतचे यु*द्ध हरल्यानंतर पुन्हा एकदा भारतात मुघल सम्राटांचे राज्य सुरु झाले. पण, त्या आधी या एका यो*द्ध्याने मुघलांना सळो की पळो करून सोडले होते.

मुघलांना पाणी पाजणाऱ्या राजा हेमचंद्र यांचा जन्म एका सामान्य व्यापारी कुटुंबात झाला होता. एका व्यापाऱ्यापासून दिल्लीचा सम्राट बनण्याचा हा राजा हेमचंद्र विक्रमादित्यांनी कसा पूर्ण केला? वाचूया या लेखात.



हेमचंद्र विक्रमादित्य यांना इतिहासात हेमू या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म १५०१ साली दिल्लीजवळील रेवाडी या गावात झाला. त्यांचे वडील व्यापार करत होते. लहानपणीच वडिलांकडून त्यांनी व्यापारातील सर्व बारकावे शिकून घेतले.

यावेळी आजूबाजूच्या प्रदेशावर शेरशाह सुरीचा प्रभाव वाढत होता. त्याला यु*द्धासाठी ह*त्या*रे आणि दारू*गो*ळ्याची गरज होती. वडिलांसोबत मिळून हेमू यांनी शेरशाहला अन्नधान्य व पोटॅशियम नायट्रेटचा पुरवठा केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

मुघल सम्राट हुमायून आणि शेरशाह सुरी यांच्यात १५४० साली यु*द्ध झाले. बिलग्राम जवळील कनौज येथे झालेल्या या यु*द्धात शेरशाहने हुमायूनचा प्रभाव केला. या पराभवाने घाबरून हुमायूनने भारत सोडले आणि काबुल गाठले. त्यानंतर दिल्लीवर सुरी वंशाची सत्ता प्रस्थापित झाली.

१५४५ साली शेरशाह सुरीच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा सलीम शाह दिल्लीच्या गादीवर बसला. सलीम शाह सुरीने हेमू यांना बाजारपेठेच्या अधीक्षकपदी नेमले आणि हेमू यांनी प्रशासनात आणि दरबारात प्रवेश मिळवला. बाजारपेठ अधीक्षकानंतर त्यांना गुप्तहेर खात्याचे प्रमुखपद देण्यात आले.

सलीम शाहच्या निधनानंतर त्याचा मुलगा फिरोज खान गादीवर आला. पण, सलीम शाहचा भाचा आदिलशाहने फिरोज खानचा काटा काढला आणि स्वतः सम्राट बनला.

आदिलशाहने सत्ता तर मिळवली. पण, राज्यकारभार करण्याची अक्कल त्याच्या जवळ नव्हती. तो सतत आपल्या ऐषारामात व्यस्त असे. त्याने हेमू यांना आपल्या राज्याचे वजीर बनवले. आता राज्यातील सगळे निर्णय स्वतः हेमूच घेत असत.

सम्राटाने हेमू यांना दिलेल्या स्वातंत्र्याचा आणि दाखवलेल्या विश्वासाचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांनी राज्याचा गाडा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाकला. राज्यावर आलेली संकटेही यशस्वीरीत्या परतवून लावली.

इकडे हुमायूनच्या मार्गदर्शनाखाली मुघलांची ताकद वाढत चालली होती. हुमायून काबुलमधून परत आला आणि त्याने शेरशाह सुरीचा भाऊ सिकंदर सुरी याचा पंजाबजवळ पराभव करून पुन्हा दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. आदिलशाहाचा शत्रू इब्राहीम खानाने कलापीमधून बंड पुकारले होते. त्यावेळी हेमू भल्या मोठ्या सेनेसह आग्रा आणि दिल्लीकडे रवाना झाले. कलापीमधे पोहचल्यानंतर त्यांनी इब्राहीम खानशी यु*द्ध केले. यात हेमचंद्र यांचा विजय झाला.

इब्राहीम यु*द्धभूमीवरून पळून गेला. हेमचंद्र यांनी त्याचा पाठलाग केला आणि बयानजवळ त्याला वेढा घातला. तब्बल तीन महिने त्यांनी हा वेढा लढवला. इतक्यात आदिलशाहने हेमचंद्र यांना बंगालचा सुभेदार मोहम्मद खान याचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. तेव्हा ते बंगालकडे रवाना झाले. त्यांनी मोहम्मद खानशी यु*द्ध केले आणि या यु*द्धात मोहम्मद खानचा अंत झाला. यानंतर शाहबाज खान याच्याकडे बंगालची सूत्रे सोपवून त्यांनी पुन्हा दिल्ली गाठायचे ठरवले. याच दरम्यान हुमायूनचा अपघाताने मृत्यू झाला. हुमायूननंतर मुघल साम्राज्याची सूत्रे त्याचा मुलगा अकबराकडे आली.

हुमायून मरण पावल्याची वार्ता कळताच हेमचंद्र यांनी मुघालांवर आणि दिल्लीवर ह*ल्ला करण्याची हीच खरी वेळ असल्याचे जाणले. त्यांनी अफगाण सरदारांना मुघलांच्या विरोधात भडकावले आणि त्यांच्यात फुट पाडली. ग्वाल्हेरमार्गे जाता जाता त्यांनी सध्याच्या बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधली छोटी छोटी संस्थाने काबीज केली. आग्र्याचा मुघल सुभेदार इस्कंदर खान उजबेकने तर लढण्याआधीच हार मानली. त्यामुळे हेमचंद्र यांना आग्र्यावर सहज विजय मिळाला.

इटावा, कलापी आणि आग्रा हे प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांचे लक्ष्य होते, दिल्ली!

दिल्लीचा सुभेदार तार्गी बेग खान याने हेमचंद्र यांच्याशी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्यालाही जीव मुठीत घेऊन पळावे लागले. या यु*द्धात मुघलांचे ३००० सैनिक मारले गेले. या सगळ्या मोहिमेत हेमचंद्र यांना अमाप संपत्ती, सैन्य आणि हत्यारे मिळाली होती. यातील काही धन त्यांनी अफगाण सरदारांत वाटले आणि त्यांना आपल्या बाजूने वळवले.

आदिलशाह एक ऐषारामी राजा होता. दिल्लीची गादी त्याच्यासारख्या नालायक राजाकडे देणे शहाणपणाचे ठरले नसते. म्हणून ७ ऑक्टोबर १५५६ रोजी त्यांनी स्वतःचा हिंदू रीतीरीवाजाप्रमाणे राज्याभिषेक करवून घेतला.

३५० वर्षांच्या कालावधी नंतर पहिल्यांदा मुघल साम्राज्याला दिल्लीतून नेस्तनाबूत करण्यात राजा हेमचंद्र विक्रमादित्य यांनी यश मिळवले. आणि ते दिल्लीचे सम्राट झाले. पण, हे सम्राटपद त्यांना जास्त काळ लाभू शकले नाही.

हेमचंद्र विक्रमादित्य यांच्याकडे भरपूर संपत्ती, सेना होती. त्यामुळे संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल स्थापन करणे त्यांना शक्य होते. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

तिकडे अकबर आणि त्याचा रक्षक बैरम खान यांनी पुन्हा दिल्ली काबीज करण्याची मोहीम आखली आणि त्यांनी पानिपतजवळ छावणी टाकली. हेमचंद्र यांच्यापासून अकबराला धोका असल्याचे लक्षात घेऊन अकबर आणि बैरम खान प्रत्यक्ष यु*द्धभूमीपासून दूरच्या अंतरावर थांबले होते आणि यु*द्धभूमीत त्यांचे सैन्य होते.

राजा हेमचंद्र विक्रमादित्य आणि अकबर यांच्यात लढलेले गेलेले हेच ते यु*द्ध ज्याला इतिहासात पानिपतचे दुसरे यु*द्ध म्हणून ओळखले जाते.

राजा हेमचंद्र मात्र स्वतः आपल्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर उपस्थित होते. आपल्या हत्तीवर बसून ते सैन्याला मार्गदर्शन करत होते, त्यांना सूचना देत होते. मुघल सैन्याचा पाडाव होत होता आणि जवळजवळ आता हेमचंद्र यांचा विजय निश्चित झाला होता. इतक्यात कुठून तरी एक बाण येऊन हेमचंद्र यांच्या डोळ्यात घुसला. बाण इतका जोरात घुसला होता की, राजा हेमचंद्र यांनी जेंव्हा तो बाण डोळ्यातून काढला तेव्हा त्यांचा संपूर्ण डोळाच बाहेर आला. तरीही ते आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत राहिले.

पण, आपला राजाच असा जखमी झाल्याचे पाहून सैन्याचे अवसानच गाळले आणि सैन्याने आपला धीर गमावला. हीच गोष्ट राजा हेमचंद्र यांना महागात पडली. राजा हेमचंद्र यांच्या सैन्याचे अवसान गळाल्याचे पाहून मुघल सैनिकांनी राजा हेमचंद्र यांना कैद केले आणि त्यांना अकबराजवळ नेण्यात आले.

अकबराचा रक्षक बैरम खान याने अकबराला राजा हेमचंद्रला जिवंत न ठेवता त्याचे शीर छाटण्याचे सुचवले. पण अकबराला राजाचे शीर छाटण्याचे धाडस झाले नाही. तेव्हा स्वतः बैरम खानने राजा हेमचंद्र यांचे शीर धडावेगळे केले आणि इथेच एका संघर्षरत यो*द्ध्याचा अंत झाला.

आणि  पुन्हा एकदा दिल्लीवर मुघल शासकांचा झेंडा फडकू लागला.

पण, मुघल शासकांना सुद्धा पाणी पाजणारा, एक महापराक्रमी हिंदू राजा होऊन गेला ज्याने ३५० वर्षाच्या मुघल सत्तेला जोराचा दणका दिला होता. अखेरच्या वेळी नियतीनेच साथ सोडल्याने या राजाचा दुर्दैवी अंत झाला.

एका सामान्य व्यापाराचा मुलगा ते दिल्लीचा सम्राट हा प्रवास पार करणे म्हणजे निव्वळ दिवास्वप्न ठरावे अशा काळात त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले. पण, दुर्दैवाने एका हिंदू राजाच्या पराक्रमाचा हा इतिहास आज लोकांना फारसा माहिती नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पाकिस्तानने या मंदिरावर ३००० बॉ*म्बगोळे फेकले होते, पण एकही बॉ*म्ब फुटला नव्हता !

Next Post

आपण वापरतोय त्या कागदाचा शोध कोणी लावला..? जाणून घ्या..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आपण वापरतोय त्या कागदाचा शोध कोणी लावला..? जाणून घ्या..!

फक्त इस्रोच नाही तर दूरदर्शनच्या उभारणीत देखील डॉ साराभाईंचं योगदान आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.