The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्या काळात बॉक्सिंगमध्ये जगभरात फक्त हवा सिंहची हवा होती

by द पोस्टमन टीम
15 December 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


आज भारतात बॉक्सिंग जरी प्रसिद्ध असली तरी एक असा काळ होता जेव्हा बॉक्सिंगला म्हणावी तितकी प्रसिद्धी नव्हती. अशातच १९५० च्या दशकात एक बॉक्सर भारतीय क्रीडाक्षेत्रात आला आणि त्याने बॉक्सिंगला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. त्या बॉक्सरचे नाव आहे हवा सिंग.

हवा सिंग एक असा बॉक्सर होता ज्याच्या एक फटक्यात समोरचा बॉक्सर खाली पडायचा. सामना राष्ट्रीय असो की आंतरराष्ट्रीय हवा सिंगच्या नावाचा एक वेगळाच दरारा होता. असं म्हणतात की त्याकाळात संपूर्ण आशिया खंडात त्यांच्यासारखा दुसरा बॉक्सर नव्हता.

१६ डिसेंबर १९३६ ला हरियाणाच्या एका छोट्या गावात जन्माला आलेल्या हवा सिंग यांना कधी वाटलं देखील नव्हतं की ते पुढे जाऊन भारतीय बॉक्सिंगच्या क्षेत्रात एक क्रांती घडवून आणणार आहेत. त्यांच्या बालपणी बॉक्सिंग त्यांच्या ध्यानी मनी देखील नव्हती.

एखाद्या गावातील सामान्य मुलाप्रमाणेच ते शेती संबंधित कामात आपला वेळ घालवत. शेती जरी त्यांच्या कुटुंबाचा प्राथमिक व्यवसाय होता परंतु त्यांच्या परिवाराला यातून काहीच फायदा होत नव्हता. त्यांचे बालपण एकदम गरिबीत गेले.



१९५६ साली, वयाच्या १९ व्या वर्षी हवा सिंग लष्करात भरती झाले. लष्करात गेल्यावर त्यांना वेगवेगळ्या खेळात भाग घेण्याच्या विविध संधी मिळाली. तिथेच त्यांनी सर्वप्रथम बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली आणि नंतर बॉक्सिंगच्या सामन्यात भाग घ्यायला सुरुवात केली.

हवा सिंग हे शरीराने उंच आणि धिप्पाड होते ज्यामुळे त्यांना बॉक्सिंगमध्ये लगेच खेळण्याची संधी मिळाली. बॉक्सिंगने हवा सिंग यांच्यात एक वेगळीच प्रेरणा निर्माण केली आणि त्यांनी बॉक्सिंगला बराच वेळ देण्यास सुरुवात केली. काही काळातच ते एक यशस्वी बॉक्सर म्हणून सैन्यात नाव कमावू लागले.

त्याकाळी सैन्यात मोहब्बत सिंह नावाच्या बॉक्सरचा बोलबाला होता. तो एक स्टार होता. हवा सिंगला जशी त्याची माहिती मिळाल त्यांनी मोहब्बत सिंहला लढायला आमंत्रण दिले.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

मोहब्बत हा हवा सिंगपेक्षा दीर्घ काळापासून बॉक्सिंग खेळत होता, त्याचं सर्वत्र नाव झालं होतं. तो एक चॅम्पियन होता. त्यामानाने हवा सिंग हा फारच नवखा होता. असं असून देखील १९६० साली दोघांमध्ये एक जंगी बॉक्सिंगचा सामना झाला, ज्यात हवा सिंग यांनी एक ऐतिहासिक विजय संपादन केला. या विजयानंतर सर्वत्र हवा सिंग यांचे कौतुक होऊ लागले. या एका विजयामुळे त्यांचे थेट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी करण्यात आले. त्यांनी त्या स्पर्धेत देखील आपले वर्चस्व कायम ठेवले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांनी १९६२ ते १९७२ पर्यंत आपली विजयी परंपरा कायम ठेवली. अनेक वर्ष असा कुठला बॉक्सर आला नाही जो त्यांचा पराभव करू शकेल. याचदरम्यान त्यांची आशियाई स्पर्धांसाठी निवड करण्यात आली.

राष्ट्रीय विजेता झालेल्या हवा सिंह यांच्यासमोर आता जगातल्या मोठमोठ्या खेळाडूंचे आव्हान होते. त्यांना स्वतःसाठी नाहीतर देशासाठी लढायचे होते. संपूर्ण देश त्यांच्याकडे डोळे लावून बसला होता. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी हेविवेट बॉक्सिंग ह्या क्रीडाप्रकारात भाग घेण्याचा निर्धार केला होता.

परंतु त्यावेळी भारताचा चीनसोबत सुरू असलेला सीमावाद बराच पेटला होता. या कारणामुळे १९६२ साली हवा सिंग यांना भाग घेता आला नाही. पुढे १९६६ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुन्हा निवडून, त्यांना देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवण्यात आले.

परदेशी भूमीवर हवा सिंह यांनी आपल्या बॉक्सिंगचा असा काही पराक्रम गाजवला की भारतीयच नव्हे तर विदेशी लोकांनीसुद्धा त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. या स्पर्धेत हवा सिंह यांनी स्वर्णपदकाची कमाई केली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्याच नावाच्या चर्चा सुरू झाल्या. १९७० साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी पुन्हा स्वर्णपदकाची कमाई केली. यानंतर मात्र हवा सिंह यांची प्रसिद्धी गगनाला भिडली होती.

अनेक वर्षे देशासाठी बॉक्सिंग खेळल्यानंतर हवा सिंग बॉक्सिंगमधून निवृत्त झाले. १९८० साली ते सैन्यदलातून त्यांना निवृत्त व्हायचे होते म्हणून त्यांनी बॉक्सिंग खेळणे थांबवण्याचा निर्णय घेतला. इतकं असून देखील त्यांनी ना बॉक्सिंग सोडली, ना बॉक्सिंगची साथ सोडली.

निवृत्ती नंतर ते हरियाणाच्या भिवानी येथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी क्रीडा प्रशासनाला भिवानी येथे एका बॉक्सिंग क्लबची निर्मिती करण्यास सांगितली. हवा सिंग यांची इच्छा होती की अधिक तरुणांनी बॉक्सिंग क्षेत्राकडे यावं आणि देशाचं नाव या खेळात मजबूत करावं. क्रीडा प्रशासननाने त्यांच्या विनंतीला मान देऊन भिवानी येथे एक बॉक्सिंग क्लब उघडले. येथे हवा सिंग स्वतः कोच म्हणून तरुणांना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देऊ लागले. या क्लबमधून अनेक चांगले बॉक्सर्स देशाला मिळाले.

राजकुमार सांगवान, विजेंदर सिंह सारखे गौरवशाली बॉक्सर्स या क्लबमधून देशाला प्राप्त झाले.

२००० साली सरकारने हवा सिंह यांना द्रोणाचार्य अवॉर्ड देऊन सन्मानित केले. परंतु हा पुरस्कार घेण्याच्या १५ दिवस आधीच त्यांचे दुर्दैवी निधन झाले आणि भारतीय क्रीडा क्षेत्राचा इतिहासातील हा महान बॉक्सर अनंतात विलीन झाला.

हवा सिंह यांच्यामुळे देशभरात बॉक्सिंगला प्रसिद्धी मिळाली. त्यांची प्रेरणा घेऊन अनेक तरुण या क्षेत्राकडे आले. त्यांनी प्रशिक्षित केलेले काही तरुण आज जगभरात भारताचा गौरव वाढवत आहेत. एखाद्या तरुण बॉक्सरसाठी हवा सिंह हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हिरो ऑफ सोविएत युनियन किताब पटकावणारे राकेश शर्मा हे एकमेव भारतीय आहेत

Next Post

दादाभाई नौरोजी ब्रिटीशांच्या कनिष्ठ सभागृहात निवडून जाणारे पहिले आशियाई व्यक्ती होते

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

दादाभाई नौरोजी ब्रिटीशांच्या कनिष्ठ सभागृहात निवडून जाणारे पहिले आशियाई व्यक्ती होते

कुठल्याही गोष्टीकडे पाहण्यासाठी विचारधारेचा चष्मा का?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.