The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ग्रीन टी’चे चाहते असाल तर तुम्हाला या महिलेबद्दल माहिती असायलाच हवं..!

by द पोस्टमन टीम
13 October 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


चहापत्ती, साखर, पाणी आणि दूध घातलेला चहा तर सर्वांनाच माहिती आहे. आपल्यापैकी बहुतांशी लोक दररोज दिवसातून किमान दोनदा चहा पितात. काही तर इतके चहावेडे आहेत की, त्यांना दिवसभरात कितीही कप चहा दिला तरी ते नको म्हणणार नाहीत. मात्र, सध्या अनेक लोक चांगल्या फिटनेससाठी ग्रीन टी पित असल्याचं दिसतं.

विशेषत: महिलांची ग्रीन टीला जास्त पसंती मिळते आहे. ग्रीन टीची लोकप्रियता वाढल्यानं बाजार देखील विविध ब्रँडच्या ग्रीन टी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? महिलांना वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायद्याचा ठरू शकतो याचा शोध देखील एका महिलेनंच लावला आहे. मिशियो सुजीमुरा, असं या महिलेचं नाव आहे. २०२१ साली गुगलंनं आपल्या डुडलच्या माध्यमातून सुजीमुरा यांना आदरांजली दिली. त्यानिमित्त त्या आणि त्यांचं काम पहिल्यांदाचं प्रकाशझोतात आलं. अशा या मिशियो सुजीमुरा नेमक्या कोण होत्या हे आपण पाहूया..

२०२१ साली गुगलने मिशियो सुजीमुरा यांच्या स्मरणार्थ तयार केलेले डुडल

जपानी कृषी शास्त्रज्ञ आणि बायोकेमिस्ट असलेल्या मिशियो सुजीमुरा यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८८ रोजी झाला होता. शेती क्षेत्रातील संसोधनामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या जपानमधील त्या पहिल्या महिला होत्या. त्यांचं बालपण सैतामा प्रांतातील ओकेगावा याठिकाणी गेलं. टोकियोतील एका मुलींच्या शाळेत सुजीमुराचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं.

१९०९ साली ‘टोकियो वुमन्स हायर नॉरमल स्कूल’च्या जैवरासायनिक विज्ञान विभागातून त्यांनी पदवी घेतली. त्याठिकाणी सुजीमुराला जीवशास्त्रज्ञ कोनो यासुई यांचं मार्गदर्शन मिळालं. या मार्गदर्शनामुळंच सुजीमुराच्या मनात वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर कानागावा प्रांतातील योकोहामा हायस्कूल फॉर वुमनमध्ये त्या शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. १९१७ साली त्या आपलं जन्मस्थान असलेल्या सैतामा प्रांतात परतल्या आणि तेथील शाळेत शिकवण्यास सुरुवात केली.

विज्ञान शिक्षिका म्हणून त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत्या. मात्र, मुळात संसोधनामध्ये आवड असणाऱ्या मिशियो सुजीमुरा यांचं शिक्षक म्हणून काम करण्यात विशेष मन रमत नव्हतं. १९२० साली त्यांनी आपली नोकरी सोडून दिली आणि वैज्ञानिक संशोधक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागल्या.



त्यासाठी त्यांनी होक्काइडो इम्पीरियल युनिव्हर्सिटीचा रस्ता धरला. त्यावेळी विद्यापीठात पूर्णवेळ संसोधक म्हणून महिला विद्यार्थ्यांना स्वीकारलं जात नव्हतं. म्हणून सुजीमुरा यांनी विद्यापीठाच्या कृषी रसायनशास्त्र विभागाच्या अन्न व पोषण प्रयोगशाळेत मदतनीस म्हणून काम सुरू केलं. होक्काइडो इम्पीरियल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जपानी रेशीम कीटकांमध्ये असणाऱ्या पौष्टिक गुणधर्मांचं विश्लेषण करण्यास सुरुवात केली.

१९२२ साली सुजीमुराला त्यांच्या वरिष्ठांनी टोकियो इम्पीरियल युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या केमिकल लॅबोरेटरीमध्ये पाठवलं. त्याठिकाणी त्यांनी आपलं पुढील संशोधन सुरू केलं. मात्र, १९२३ च्या सप्टेंबर महिन्यात आलेल्या ग्रेट काँटो भूकंपात ही प्रयोगशाळा नष्ट झाली. परिणामी ऑक्टोबर महिन्यात एक संशोधन विद्यार्थी म्हणून सुजीमुराला रायकेन (RIKEN) या संशोधन संस्थेमध्ये पाठवलं गेलं. तिथे त्यांनी उमेतारो सुझुकी या कृषी संशोधकाच्या प्रयोगशाळेत काम केलं आणि पौष्टिक घटकाच्या रसायनशास्त्रावर संशोधन केलं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

सुजीमुरा आणि तिचा सहकारी सेतारो मिउरा यांनी १९२४ साली ग्रीन टीवर संसोधनकरून व्हिटॅमिन सी शोधलं. त्यानंतर त्यांनी बायोसायन्स या ‘बायोटेक्नॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री जर्नल’मध्ये ‘ऑन व्हिटॅमिन सी इन ग्रीन टी’ नावाचा एक लेख प्रकाशित केला. जपानमधील या शोधामुळं उत्तर अमेरिकेत ग्रीन टीच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

१९२९ साली ग्रीन टीपासून फ्लेव्होनॉइड कॅटेचिन वेगळे केलं. त्यांनी १९३० साली ग्रीन टीमधून क्रिस्टल स्वरूपात टॅनिन देखील वेगळं काढलं. ग्रीन टीच्या घटकांतील संशोधनासाठी ‘ऑन द केमिकल कॉम्पोनेंट्स ऑफ ग्रीन टी’ नावाचा एक प्रबंध १९३२ साली त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांच्या या संशोधन कार्यामुळं टोकियो इम्पीरियल युनिव्हर्सिटीमधून शेती संशोधनासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली.

शेती क्षेत्रातील संशोधनासाठी डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या जपानमधील प्रथम महिला ठरल्या होत्या. त्यानंतर देखील त्यांनी आपलं ग्रीन टीवरील संसोधन सुरू ठेवलं. १९३४ साली ग्रीन टी वरील संसोधनासाठी त्यांनी पेटंट देखील नोंदवलं. १९४२ साली ‘रायकेन’मध्ये सुजीमुरांना संशोधकाच्या भूमिकेत पदोन्नती देण्यात आली. तिथे १९४९पर्यंत त्याठिकाणी त्यांनी संशोधक म्हणून काम सुरू ठेवलं. १९४९ साली Ochanomizu विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्याठिकाणी त्यांना प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात आलं.

त्यांनी प्राध्यपकाची नोकरी स्विकारली आणि यासोबत शाळकरी विद्यार्थ्यांना शिकवण्यास देखील प्राधान्य दिलं. १९५० पासून त्यांनी टोकियो वुमन्स हायर नॉर्मल स्कूलमध्ये पुन्हा शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. मुलींच्या शाळेतील गृह अर्थशास्त्र विद्याशाखेच्या पहिल्या डीन होत्या.

१९५५ साली सुजीमुरा Ochanomizu विद्यापीठातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. परंतु १९६१ पर्यंत त्यांनी त्याठिकाणी लेक्चर्स सुरू ठेवली. याशिवाय १९५५ ते १९६३ पर्यंत टोकियोमधील जिसेन महिला विद्यापीठात देखील गेस्ट लेक्चरर म्हणून काम केलं. ग्रीन टीवरील संशोधनासाठी १९५६ साली जपान कृषी विज्ञान पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. १ जून १९६९ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचा तोयोहाशी येथे मृत्यू झाला.

जपानी संस्कृतीचा विचार केला तर तेखील स्त्रिया बालपणात वडील, तारुण्यात पती आणि वृद्धापकाळात मुलांवर विसंबून असल्याचं दिसतात. ज्याकाळात मिशियो सुजीमुराचा जन्म झाला त्याकाळात तर जपानमधील महिला फक्त घरकाम करत असत आणि मुलांचं संगोपन करत असत.

नंतर हळूहळू या परिस्थितीमध्ये सुधारणा होत गेली, महिला कामासाठी बाहेर पडू लागल्या. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे मापदंड झुगारून मिशियो सुजीमुरा यांनी संशोधन क्षेत्रात काम केलं. फक्त कामच नाही केलं तर आपला एक अमीट ठसा देखील उमटवला. त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून गुगुलनं त्यांचं डुडल तयार केलं होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

शोएब अख्तरने मैदानावरच हरभजन सिंगला घरात घुसून मारायची धमकी दिली होती

Next Post

स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा संस्थापक ‘लेलँड स्टॅनफोर्ड’ हा माणूस आजही अनेकांना पडलेलं कोडं आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा संस्थापक 'लेलँड स्टॅनफोर्ड' हा माणूस आजही अनेकांना पडलेलं कोडं आहे

भारतातील ब्रिटिश राज संपवण्यासाठी प्रेसिडेंट रुझवेल्ट चर्चिलच्या विरोधात गेले होते..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.