आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आधुनिक कार पहिल्यांदाच १८८५ मध्ये जर्मनीच्या कार्ल बेंझ यांनी बनविल्या गेल्या आणि स्प्रिंगफील्ड, मॅसेच्युसेट्समध्ये १८९३ साली चार्ल्स आणि फ्रॅंक दुरिये यांनी अगदी पहिल्याच टप्प्यातल्या अमेरिकन कार बनवल्या. भले या गाड्या बाजारात उपलब्ध होत्या तरी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशी त्यांची किंमत नव्हती.
फोर्ड कंपनीने १९०८ ते १९२७ या दरम्यान बाजारात आणलेली ‘मॉडेल T’ ही पहिली अशी मोटार गाडी होती जी खऱ्या अर्थाने सामान्य जनता विकत घेऊ शकेल. अशी गाडी बनवण्याचा फोर्डचा पहिलाच प्रयत्न होता.
बहुतांशी अमेरिकनांच्या दारात ‘मॉडेल T’ उभी राहिली ज्यातून ग्रामीण अमेरिकन नागरिक बाकी अमेरिकन प्रांतांना महामार्गाद्वारे जोडला गेला. फोर्डने आधुनिकीकरण झाले तसे ‘मॉडेल-T’मध्ये गरजेनुसार बदल केले.
हेन्री फोर्डने बनवलं मॉडेल-Tचं इंजिन
डेट्रॉईटमधल्या एडिसन इल्युमिनेटिंग कंपनीत तो दिवसा मुख्य अभियंता म्हणून काम करत होता. परंतु रात्रीच्या वेळी हेन्री फोर्डने पेट्रोल इंजिनावर बरंच काम केलं. १८९३ मधील नाताळच्या संध्याकाळी, बायको ‘क्लारा’ला साथीला घेऊन एका इंजिनाची यशस्वी चाचणीही घेतली.
ते इंजिन ३० सेकंद चाललंही आणि त्यातून फोर्डला तो योग्य मार्गावर आहे एवढंच समजलं.
त्यानंतर तिसऱ्या वर्षी त्याने स्वयंचलित चारचाकी सायकल बनवली. त्यानंतर केले गेलेले व्यवसायाचे २ प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर अखेर १६ जून १९०३ रोजी ‘फोर्ड मोटर कंपनी’ जन्माला आली.
काही आठ वेगवेगळी गाड्यांचे मॉडेल्स तयार करून, त्यात विविध प्रकारे बदल करून, शेवटी त्याचा परिपाक म्हणून तयार झालेली गाडी म्हणजे ‘मॉडेल T’. अधिकृतरीत्या ‘मॉडेल T’मध्ये सुधारणा सुरू झाल्या, त्या १९०७ साली जेव्हा फोर्डने नवी टीम बनवली तेव्हा.
‘मॉडेल-T’ची विक्री
१ ऑक्टोबर १९०८ साली ही गाडी प्रकाशझोतात आली. डाव्या बाजूच्या सीटकडे स्टीअरिंग असलेली आणि चार सिलेंडरचं इंजिन (ज्याला सोबत जोडलेलं सिलिंडर विलग करण्याची व्यवस्थाही होती) अशी ही गाडी! व्हॅनडियम स्टील धातूच्या मिश्रणातून बनवलेली होती. अतिशय खराब रस्त्यांवरूनही चालू शकेल अशी रचनात्मकपणे गाडी बनवली गेली होती, ज्यामुळे ग्रामीण अमेरिकनही या गाडीकडे आकर्षित झाले.
मॉडेल-T ही फोर्डची पहिली गाडी होती आणि त्यातले सगळे भाग स्वतः फोर्ड कंपनीद्वारे बनवले गेले होते. सर्वसामान्य अमेरिकन व्यक्तीच्या सरासरी पगारापेक्षा जरा जास्त असली तरी ८५० डॉलर किंमतीची ही गाडी त्या काळात अगदीच वाजवी दरात उपलब्ध केली गेली होती.
पण काही काळाने मॉडेल-T चा विक्रमी खप झाल्यानंतर फोर्ड कंपनीने जाहीर करून टाकलं की, ‘बाकीच्या मॉडेल R, मॉडेल S गाड्यांची विक्री आम्ही थांबवत आहोत, सोबतच सर्व ग्राहकांना त्यांना हव्या त्या रंगाची गाडी उपलब्ध करून देण्यात येईल’.
स्कॉटिश पर्वताच्या कड्यावर केलेला ‘पब्लिसिटी स्टंट’
ब्रिटीश वर्तमानपत्रात आपली जाहिरात झळकावी यासाठी फोर्डने एक पब्लिसिटी स्टंट रंगवला.
१९११ साली एका स्कॉटिश मोटर गाडी विक्रेत्याने बेन नेविसच्या पर्वतरंगांमधल्या एका सर्वात उंच म्हणजे सुमारे ४४११ फूट उंचीच्या शिखरावर ‘मॉडेल-T’ चालवण्यासाठी फोर्डचा मुलगा हेन्री अलेक्झांडर जूनियरला आव्हान देण्याचा प्रस्ताव दिला.
पैज अशी होती की जर तो कळस गाठण्यात अयशस्वी ठरला तर अलेक्झांडर, त्याला मिळणारा भत्ता गमावणार. फोर्ट विल्यमपासून प्रारंभ केल्यानंतर, पाच दिवसात ‘मॉडेल-T’ खडकांमधून, खड्ड्यांमधून, काट्याकुट्यांमधून आणि बर्फातून चालवली.
सरतेशेवटी कार पर्वताच्या शिखरावर चढली. पर्वतावरून उतरल्यानंतर, शेकडो लोकांनी जयघोषात अलेक्झांडरचे स्वागत केले. त्यानंतर अलेक्झांडरने गाडीच्या ‘ब्रेक’मध्ये काही बदल केले आणि गाडी थेट वडिलांच्या एडिनबर्गमधल्या विक्री केंद्राकडे नेली.
या पब्लिसिटी स्टंटचा परिणाम असा झाला की, ब्रिटनमध्ये १४,००० हुन अधिक ‘मॉडेल-T’ विकल्या होत्या. आपण पब्लिसिटी स्टंट करून गाड्या विकायला हव्यात असं फोर्डला वाटण्याची ती तशी खरं म्हणजे शेवटचीच वेळ ठरली, त्यानंतर अशी वेळ त्यावर कधी आली नाही.
पण १९१३ साली ‘मॉडेल-T’ त्या उत्पादनासाठी हायलँड पार्कच्या अंतर्गत ६० एकरात एक मोठा कारखाना उभा राहिला. त्या काळात फोर्ड चा हा कारखाना जगातला सर्वात मोठा ‘गाडी कारखाना’ गणला जात होता आणि त्यात कर्मचाऱ्यांची संख्याही दुपटीने वाढली.
१९१३ ते १९२७ या काळात फोर्डच्या कारखान्यांमधून जवळपास दीड लाख ‘मॉडेल-T’चं उत्पादन करण्यात आलं.
हा जो उत्पादनासाठीचा कारखाना उभारला तेव्हा, फोर्डने उत्पादन प्रक्रियेची रचनात्मक बांधणी सुधारण्याचे काम केले. १ एप्रिलला सुधारित ‘मॉडेल-T’च्या चाचण्या घेतल्या गेल्या. कारखान्यात केलेली ही सुधारणा म्हणजे ही तोपर्यंतची सर्वात प्रथम ‘असेंब्ली लाइन’ होती. शिकागोमध्ये असलेल्या मांस पॅक करण्याच्या करखान्यातल्या ‘कन्व्हेयर बेल्ट’ वरून प्रेरित होऊन फोर्डने ही हलती असेंब्ली लाईन बनवली होती.
या कारखान्यातल्या स्थिर असलेल्या असेंब्लीचा प्रत्येक पैलू बदलून हलत्या असेंब्लीमध्ये त्याचं रूपांतर झालं, ज्यातून कारखान्याची उत्पादनक्षमताही वाढली आणि उत्पादनाचा वेळही कमी झाला. अगदी ६ महिन्यात याच कारखान्यातला गाडीतली एक मोटर बनवण्याचा वेळ ९ तास ५४ मिनिटांवरून कमी होऊन ५ तास ५६ मिनिटांवर आला.
कारखान्यात वेगवेगळे विभाग केले गेले होते. प्रत्येक विभागात गाडीचा वेगवेगळा भाग बनवला जात होता. हायलँड पार्क कारखान्यात अखेरीस त्याच्या ‘असेंब्ली लाइनमध्ये’ ५०० हुन अधिक विभाग जोडले गेले होते.
टिन लिझीचा जन्म
‘मॉडेल-T’साठी बऱ्याचदा टिन लिझी हे नाव वापरलं गेलं पण हेच नाव का आणि कसं आलं हे मात्र समजलं नाही. काही ठिकाणी सांगितलं जातं की हे नाव रेसच्या घोड्याला दिलं गेलं आणि पुढे तेच या गाडीला मिळालं होतं.
‘सॅन अँटोनियो’मधल्या एका गाडी विक्रेत्याने एकदा कारखान्याकडे तक्रार केली. गाडीच्या नीट फिटिंग नसणाऱ्या दरवाज्यांबद्दल ही तक्रार होती. त्यावर त्या अशीही सूचना आणि पर्याय पर्याय दिला की गाड्या पाठवतानाच विनादरवाजा पाठवा, सोबत फिट न केलेले दरवाजे आणि ते फिट करण्यासाठीची एक पाकिटबंद सामग्रीही पाठवून द्या (टिनकॅन ऑपनरसारखे दिसणारे) ज्याद्वारे ग्राहकाला किंवा गाडी विकणाऱ्याला त्याच्या सोयीने दरवाजे सोयीनुसार फिट करता येतील.
या नावाबाबत आणखीही एक कथा आहे. १९२२ साली कोलोरॅडोमधल्या एका ‘कार रेस’मध्ये नोएल बुलक नावाच्या एका स्पर्धकाने त्याच्या ‘मॉडेल T’ला “ओल्ड लिझी” असं नाव दिलं.
त्या गाडीच्या विचित्रावस्थेमुळे लोकांनी त्या वेळी तिची तुलना ‘टिन कॅन’ शी केली आणि कदाचित त्यातूनच गाडीला ‘टिन लिझी’ हे नाव लागलं. आणि अनपेक्षितपणे नोएल बुलकची गाडी जिंकली आणि त्यानिमित्ताने ‘मॉडेल-T’ला ‘ओल्ड लिझी’ हे नाव चिकटलं.
‘मॉडेल-T’सोबत विकली गेली ज्यूविरोधी वृत्तपत्रं
ज्यूविरोधी वृत्तपत्रांची मतं फोर्डने जाणून घेतली आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी ‘मॉडेल-T’चा वापर सुरू केला. फोर्डची ज्यूविरोधी मतं खऱ्या अर्थाने पुढे आली ती फोर्ड कंपनीद्वारे प्रकाशित होणाऱ्या ‘डिअरबॉर्न इंडिपेंडंट’ या नियतकालिकातून. हे मूळ नियतकालिक त्याने स्वतः १९१९ साली विकत घेतलं, जे ‘फोर्ड आंतरराष्ट्रीय साप्ताहिक’ म्हणून ओळखलं जात असे. फोर्ड गाड्यांच्या विक्रेत्यांना प्रत्येक गाडीसोबत या साप्ताहिकाचं सदस्यत्वही त्या ग्राहकाला विकावं लागत असे, यामुळे बऱ्याच विक्रेत्यांनी या रचनेतून होणाऱ्या गैरसोयीबद्दल तक्रारही केली आणि हे गाडीसोबत सदस्यत्व विकण्याचं बंधन काढून टाकण्यासाठी कंपनीचं हे धोरण रद्द करण्याबाबतही सूचना केल्या.
२६ मे १९२७ या दिवशी शेवटची ‘मॉडेल-T’ असेंब्ली लाइनवर तयार झाली आणि त्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये डिअरबॉर्न इंडिपेंडंटनेही आपला गाशा गुंडाळला.
मॉडेल T गेली आणि मॉडेल A आली
१९२० च्या दशकात गाड्यांच्या या क्षेत्रातली स्पर्धा वाढली. प्रवासी गाड्यांमध्ये दशकापूर्वीपेक्षा दसपट जास्त पर्याय उपलब्ध झाले. या स्पर्धेत मॉडेल-T होती पण फार काळ ती टिकाव धरू शकली नाही. हळूहळू मॉडेल T ची विक्रीही घटली आणि एक वेळ अशी आली की ‘जुनाट प्रकारातली गाडी’ असं म्हणत मॉडेल T ला हिणवलं जाऊ लागलं आणि पुढे पुढे ही गाडी लोकांमध्ये विनोदाचा विषय बनली.
बरेच आढेवेढे घेऊन शेवटी फोर्डने १९२७ साली ‘यापुढे मॉडेल-T गाडीचं उत्पादन केलं केलं जाणार नाही’ असं जाहीर केलं.
जवळपास ४० हजार अशी साधनं किंवा वस्तू ज्या फक्त ‘मॉडेल-T’ बनवण्यातच उपयोग पडणार होत्या त्या सगळ्या मोडीत काढून अखेर डिसेंबर महिन्यात नवीन फोर्ड गाडी ‘मॉडेल-A’ बाजारात आली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










