The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही महिला जगातली पहिली साहित्यिक मानली जाते

by द पोस्टमन टीम
11 May 2024
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


असं म्हणतात की जगातली पहिली साहित्य निर्मिती ही एका स्त्रीनं केलेली आहे. मेसोपोटामियाच्या महान सर्गोनची मुलगी एनहेडुआना हिनं पहिलं साहित्य लिहिलं असं सांगितलं जातं.

आधुनिक काळात जवळपास प्रत्येकजण ’लेखक’ किंवा ‘कवी’ बनला आहे. पूर्वी किमान लिहिता येऊ शकणं ही लेखनासाठीची प्राथमिक अट होती मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे व्हॉईस कमांडच्या मदतीनं कोणीही मनातले शब्द कागदापेक्षा स्क्रिनवर उतरवू शकत आहे. लिहिण्याचा उगम विचार करण्यात आहे. विचार करु शकणारा प्रत्येकजण लिहू शकतो आणि म्हणूनच पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस लेखक आहे. ते लेखन बरं, वाईट, त्याचा साहित्यिक दर्जा वगैरे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत मात्र त्याला व्यक्त होता येणं ही पहिली अट आहे.

मनातले विचार एखाद्या लिपीत उतरवून काढावेत असं वाटून ते सर्वप्रथम कोणी केलं असावं याचा कधी विचार केलाय?

आज अनेक भाषा आणि लिपीत साहित्य निर्मिती होते मात्र सगळ्यात आधी अशी साहित्यकृती कोणी निर्माण केली हा कुतुहलाचा विषय आहे. प्राचीन इतिहासाच्या पुराव्यानुसार आणि इतिहासकारांच्या मते जगातली पहिली साहित्य निर्मिती करण्याचा मान एका महिलेला जातो.



प्राचीन सुमेर संस्कृती (इ.स. पूर्व २२८५ ते २२५०) जिला त्या काळात मिसोपोटोमिया म्हणून ओळखलं जाई. त्या साम्राज्याचा सम्राट सर्गोनची मुलगी एनहेडुना हिला जगातली पहिली साहित्यिक म्हणून ओळखलं जातं.

एनहेडुआना सर्गोनची सख्खी मुलगी होती की दत्तक मुलगी यावर अभ्यासकांत एकमत नसलं तरीही सर्गोन आपल्या मुलीला मान द्यायचा आणि तिच्या बुध्दिमत्तेचं त्याला फ़ार अभिमान आणि कौतुक होतं याबाबत दुमत नाही. तिच्यावर त्यानं अक्कद आणि सुमेरियन देवतांना खुश करण्याची कामगिरी सोपवली होती. या देवतांच्या आराधनेमुळे सर्गोन साम्राज्यात समृध्दी आणि शांतता नांदते असा विश्वास होता.

एनहेडुआनाचा अर्थ आहे आकाशाच्या देवतेची पुजारी. तिनं आपल्या प्रार्थनेमधे देवतांच्या स्तुतीला नव्या शब्दांत बांधलं. जनतेत राजद्रोहाची भावना निर्माण होऊ नये यासाठी तिनं प्रार्थनांमधून लोकांना नैतिकता शिकवली आणि याविरूद्ध कर्म हे पाप असल्याचं बिंबवलं. सर्गोन साम्राज्यासाठी हे खूप फ़ायद्याचं ठरलं. भारतात ज्याप्रमाणे तुलसीदासानी दोहे रचून कार्य केलं तसंच एनहेडुआनाचं कार्य मानलं जातं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

इन्निन्स्गुरा, निन्मेसारा आणि इन्निन्मेहुसा या तीन मुख्य ग्रंथांव्यतिरीक्त एनहुडेआनानं जवळपास ४२ कविता लिहिल्या, ज्यात तिनं आयुष्यातल्या आशा आकांक्षा, कामना, उदासी, दु:ख, नैराश्य, आनंद, अडचणी या सगळ्यांना मार्मिक लयीत मांडलं आहे. तिच्या सर्व रचना व्यक्तिगत अनुभवावर आधारीत आणि सुस्पष्ट मानल्या जातात. या कवितांमधून एकात्मतेचा विचार तिनं सातत्यानं मांडला आहे.

नश्वर जगात परस्पर सहकार्यानं जास्तीत जास्त आनंदात आयुष्य कसं व्यतीत करता येईल हे या कवितांमधून मांडलं आहे. ख्रिश्चन चर्चच्या प्रारंभिक प्रार्थनांवर एडेनहुआनाच्या कवितांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. वास्तविक पाहता बॅबिलॉनियाच्या कवितांनी संपूर्ण हिब्रू बायबल युनानी कवी होमरचं महाकाव्य इलियाड आणि ओडिसी प्रभावीत आहे मात्र या सगळ्यावर एनहेडुआनाच्या कवितांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

गंमतीची गोष्ट ही की आज आपण लेखनाचे कॉपीराईट वगैरे शब्द उच्चारतो मात्र पहिली साहित्य निर्मिती करणार्‍या एनहेडुआनानं याचं महत्त्व जाणलं होतं. तिच्या प्रत्येक लिखाणाखाली तिच्या नावाची मोहोर आहे.

आपलं साहित्य पुढे अनेक युगं वाचलं जाणार आहे हे कदाचित तिनं जाणलं असावं. याशिवाय तिच्या मालकीच्या सर्व वस्तूंवर तिनं तिच्या नावाची मोहोर उमटविली होती. अशा प्रकारे वस्तूंवर नावाची मोहोर उमटविणारी ती पहिली व्यक्ती असावी.

१९२७ साली ब्रिटिश पुरातत्ववादी सर लियोनार्ड वूली यांना सुमेर संस्कृतीच्या उर शहरातील उत्खननात एक थाळीसारखी वस्तू सापडली होती. ज्यावर लिहिलेल्या ओळींचा अर्थ असा आहे, एनहेडुआना जी जीरूचे प्रधान पुरोहित आणि नन्नरची पत्नी अणि सम्राट सर्गोनची मुलगी आहे ती इआना मंदिरात रहाते. या थाळीवर एनहेडुआनाचं चित्रही रेखाटलं आहे. याच संशोधनात वुडीला एनहेडुआनाला ज्या मंदिराच्या आवारात दफ़न केलं त्याचाही शोध लागला. क्रीवाजेकच्या अभिलेखांनुसार तिच्या मृत्यूपश्चातही लोक तिच्या कबरीवर चढाव चढविण्यासाठी येत असत. मृत्यूपश्चातही अनेक शतकं तिची पूजा केली गेली आणि तिला सन्मानही दिला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

डेथ व्हिसल म्हणून फेमस झालेली ॲझटेक व्हिसल काय आहे हे संशोधकांना अजून कोडंच आहे

Next Post

या खानसाम्याने चंपारणमधे गांधीजींचा जीव वाचवला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

या खानसाम्याने चंपारणमधे गांधीजींचा जीव वाचवला होता

भटकंती - निसर्गाचा गूढ आणि अद्भुत चमत्कार 'बेलम गुहा'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.