The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानने फक्त आपल्याच नाही तर जगभरातल्या लोकांच्या डोक्याचा ताप वाढवून ठेवलाय

by द पोस्टमन टीम
28 December 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आज प्रत्येक ऑफिसमध्ये कंप्युटर वापरलाच जातो. पण याच कंप्युटरमध्ये जेव्हा एखादा व्हायरस घुसतो तेव्हा मात्र सगळीच कामे ठप्प होतात आणि सगळ्यांचीच चांगलीच भंबेरी उडते. कंप्युटर व्हायरसने अनेकदा मोठमोठ्या कंपन्यांसमोर आव्हान उभे केला आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसमोरही अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एकदा का हा व्हायरस तुमच्या कंप्युटरमध्ये घुसला कि, तुमचा पीसी स्लो होणे, डाटा लिक होणे इथपासून ते संपूर्ण सिस्टीम क्रॅश होण्यापर्यंत समस्या निर्माण होतात.

बरेचदा कंप्युटरचे काम बिघडवण्यासाठीच अशा प्रकारचे व्हायरस मुद्दाम बनवले जातात. जसे कंप्युटरमधील एखादा प्रोग्रॅम बनवला जातो अगदी तसाच कोडींगद्वारेच हा व्हायरसही बनवला जातो. कंप्युटरची सिस्टीम खराब करणे, कंप्युटरचे नियंत्रण मिळवणे किंवा त्यातील एखादी महत्त्वाची माहिती चोरी करणे या उद्देशानेच याची निर्मिती केली जाते.

पण, पहिला कंप्युटर व्हायरस कधी निर्माण झाला असेल किंवा कुणी निर्माण केला असेल?

पहिल्या कंप्युटर व्हायरसची निर्मिती पाकिस्तानमध्ये झाली. ज्याला ब्रेन व्हायरस म्हणून ओळखले जाते.

अर्थात व्हायरसची निर्मिती करण्याच्या उद्देशाने हा पहिला व्हायरस निर्माण झाला नाही. तर, आपण बनवलेल्या सॉफ्टवेअर्सची पायरसी वाचवण्यासाठी म्हणून एक सिस्टीम बनवण्यात आली आणि या सिस्टीमने लोकांची डोकेदुखी वाढवून ठेवली तेव्हा लक्षात आले की पायरसी रोखण्यासाठी बनवलेला हा प्रोग्रॅम म्हणजे कंप्युटर व्हायरस आहे. याच व्हायरसच्या आधाराने पुढे कंप्युटर हॅकर्सनी नवनवे व्हायरस जन्माला घातले.



ब्रेन व्हायरस नावाचा हा प्रोग्रॅम जन्माला घालणाऱ्या पाकिस्तानमधील बासित आणि अमजद यांना याची थोडीही कल्पना नव्हती की त्यांच्यामुळे कंप्युटरच्या दुनियेत मोठा भूकंप येणार आहे.

बसित आणि अमजद हे दोघे भाऊ लाहोरमध्ये राहणारे. लाहोर हे पाकिस्तानमधील आयटी हब मानले जाते. त्याकाळी म्हणजे १९८०च्या दशकात त्यांच्याकडे स्वतःचा कंप्युटर नव्हता. पण दोघा भावांना कोडींगमध्ये खूप रस होता. लाहोरमधील एका सायबर कॅफेमध्ये तासनतास बसून त्यांनी एक कंप्युटर सॉफ्टवेअर निर्माण केले. दोघांनीही हे सॉफ्टवेअर काही कंपन्यांना विकले. त्यांचे सॉफ्टवेअर चांगले चालत होते. अनेक जणांकडून त्यांना सॉफ्टवेअर बनवून देण्याबाबत विचारणा होऊ लागली. त्यांनाही हेच हवे होते. मागणीनुसार त्यांनी अनेकांना सॉफ्टवेअर बनवून दिले. आणखीही काही नवे सॉफ्टवेअर बनवले. पण, त्यांना अपेक्षित होता तसा प्रतिसाद मिळत नव्हता.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

नंतर त्यांच्या असे लक्षात आले की, आपण बनवलेले सॉफ्टवेअर लोक परस्पर एकमेकांना फुकटात देत आहेत. त्यामुळे त्यांना फायदा होत नाहीये. या पायरसीवर काही तरी उपाय करण्यासाठी त्यांनी एक नवा प्रोग्रॅम बनवण्याचे ठरवले आणि अशाप्रकारे कंप्युटरमधील या पहिल्या व्हायरसचा जन्म १९८६ साली झाला.

हा प्रोग्रॅम बनवल्यानंतर त्यांनी आपल्या सॉफ्टवेअरच्या फ्लॉपीमध्ये हा व्हायरस लोड केला. पण, पहिल्यांदा फ्लॉपी वापरणाऱ्या वापरकर्त्याच्या हे लक्षात येत नसे. पण, नंतर जर तीच फ्लॉपी दुसरीकडे चालवण्याचा प्रयत्न केला तर, स्कीनवर अमजद यांच्या कंपनीचे नाव, त्यांचा फोन नंबर आणि पत्ता येत असे.

जोपर्यंत त्यांच्या कंपनीने दिलेला कोड एंटर केला जात नाही तोपर्यंत पीसीवर दुसरे काही काम करणेच शक्य नव्हते. त्यामुळे नाईलाजाने का असेना लोकांना त्यांच्या कंपनीचे लायसन्स घ्यावेच लागे.

या प्रोग्रॅममुळे त्यांच्या सॉफ्टवेअर्सची पायरसी तर थांबली पण एक मोठाच पेच यामुळे निर्माण झाला होता. ज्यामुळे संपूर्ण जगभरातील कंप्युटर्सवर याचा परिणाम जाणवू लागला.

फ्लोरिडा, मियामीतील एका साप्ताहिकासाठी काम करणाऱ्या एका महिला पत्रकाराने फोन करून अमजदला याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांना कळले की आपण बनवलेल्या एका प्रोग्रॅमने किती हाहाकार माजवला आहे. त्या महिला पत्रकाराला जाणून घ्यायचे होते की, अमजद आणि बसित यांना या प्रोग्रॅमची कल्पना नेमकी कशी सुचली.

त्यांनी बनवलेला हा ब्रेन व्हायरस अपोआपच एका फ्लॉपीवरून दुसऱ्या फ्लॉपीवर कॉपी होत असे. असाच पसरत पसरत आता तो अमेरिकेत पोहोचला होता. अपोआपच कॉपी होणाऱ्या या व्हायरसने पिट्सबर्ग, पेनिसिल्वेनिया, डेलवेअर आणि जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीपर्यंत प्रवास केला होता. प्रॉव्हिडन्स जर्नल-बुलेटीन या वर्तमानपत्राच्या सिस्टीमवर या व्हायरसने विपरीत परिणाम केला होता. याशिवाय, हॉंगकॉंगमधील काही ट्रेंडींग टर्मिनल्सवरही याचा परिणाम झाला होता. ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या लोकांच्या खाजगी संगणकातही हा व्हायरस घुसला होता.

हा व्हायरस एकदा कंप्युटरमध्ये घुसला की सिस्टीमच बंद पडत असे. अगदी त्याच्या कंपनीकडून कोड घेतला तरी ती सिस्टीम पूर्ववत होत नव्हती.

पण, आता तर त्यांना अशाप्रकारचेच व्हायरस बनवून देण्यासाठी धमक्या पण येऊ लागल्या. काहींनी तर त्यांच्यावर सायबर अटॅकचे आरोपही लावले. दोघांनीही आपला तसा काही उद्देश नसल्याचे समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण आता काहीच उपयोग नव्हता. कारण, हा व्हायरस आता संपूर्ण जगभर पसरला होता.

या व्हायरसच्या कोडींगचाच काही भाग उचलून नंतर अनेकांनी यावर अँटी-व्हायरसही शोधून काढला. या अँटी-व्हायरसनेच ब्रेन-व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला. पण ब्रेन व्हायरसनंतरही असेच अनेक खतरनाक व्हायरस बनवण्यात आले. तेव्हापासून ही व्हायरस आणि अँटी-व्हायरसची लढाई सुरूच आहे.

त्यानंतर या दोघाही भावांनी सॉफ्टवेअर निर्मितीचा मार्ग सोडला आणि आता ते इंटरनेट सेवा क्षेत्रात काम करत आहेत. पण, आजही पहिला व्हायरस बनवण्यासाठी अमजद आणि बसित यांनाच पहिल्या व्हायरसचे निर्माते म्हटले जाते.

बसित आणि अमजद यांनी बनवलेला मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बनवलेला व्हायरस होता. पण त्याआधी रिचर्ड स्क्रेंटा नावाच्या एका शाळकरी मुलाने आपल्या मित्रांची फिरकी घेण्यासाठी म्हणून असा एक व्हायरस निर्माण केला होता. पण या व्हायरसमुळे कुठल्या पीसीचे जास्त नुकसान झाले नाही. त्याच्या व्हायरस फक्त ॲपलच्याच संगणकावरच चालत होता.

रिचर्डने एल्क क्लोनर नावाचा एक प्रोग्रॅम बनवला होता, जो गेमिंग डिस्कमधून पसरला जात होता. डिस्क कंप्युटरमध्ये टाकताच मॉनिटरवर रिचर्डची एक कविता झळकत असे.

हा व्हायरस त्याने १९८३ साली बनवला होता त्यामुळे अनेकजण यालाही पहिला व्हायरस मानतात. पण, ब्रेनने जितका प्रादुर्भाव केला होता तितका या व्हायरसचा प्रसार झाला नव्हता.

त्यामुळे ब्रेन व्हायरस हा मायक्रोसॉफ्टचा पहिला व्हायरस मानला जातो. या व्हायरसने नंतर कंप्युटर तंत्रज्ञानात बरेच बदल घडवून आणले. पण पायरसी रोखण्यासाठी म्हणून केलेल्या एका लहानशा प्रयोगाने जगभरातील कंप्युटर सिस्टीमचे नाक दाबून आपल्या मुठीत ठेवले. तंत्रज्ञानाने मानवी जगण्यात सुसह्यता आणली तसेच यामुळे काही जटील समस्याही उभ्या राहिल्या हे मात्र कुणीही नाकारू शकणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जपानच्या भीतीने अमेरिकेने इमर्जन्सी करन्सी सुरु केली होती..!

Next Post

जगातला पहिला सायबॉर्ग – जन्मजात रंगांधळा होता पण आता रंगांना ‘ऐकू’ शकतो

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

जगातला पहिला सायबॉर्ग - जन्मजात रंगांधळा होता पण आता रंगांना 'ऐकू' शकतो

'झी फाइव्ह'वर असलेले 'हे' चित्रपट अजिबात चुकवू नका..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.