The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वर्णद्वेष आणि पोलियोवर मात करून ऑलिम्पिक गाठणारी महिला खेळाडू…

by द पोस्टमन टीम
4 February 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


माणूस या भूतलावरचा अतिशय असंतुष्ट प्राणी आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा, पण आपल्या इच्छा इथवर येऊन थांबतायत कुठे? देवाने दिलेले सुदृढ शरीर, विचारशक्ती या सगळ्यांना आपण अगदी सहज नजरअंदाज करतो.

पण विचार करा एक दिवस तुमच्या एखाद्या अवयवाने आपली क्रिया करणेच थांबविले तर? किती कामे आपण नीट करु शकू? एकही नाही.

या जगात अशी कितीतरी कर्तबगार माणसे आहेत, ज्यांनी अपंगत्वाला हरवून आपला ठसा या जगावर उमटवला.

हेलन केलर, फ्रँकलीन रूझवेल्ट, लुड्विग बीथॉवन आणि अनेक अशा व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्या नशिबी आलेल्या भल्या मोठ्या आव्हानांना हुलकावणी देऊन यश मिळविले.

आपण जरा डोळसपणे आपल्या अवती भवती पाहिलं तर अशी माणसे आढळतील, ज्यांना अपघातात किंवा आजारपणात एखादा अवयव गमवावा लगला. पण तरीही, उत्स्फूर्तपणे ते परत उठून उभे राहतात.



अमेरिकेत अशीच एक खेळाडू होऊन गेली जिने, आपल्या नशिबी आलेल्या व्यंगत्वावर मात करून हे सिद्ध करून दिले की ‘देवाने दिलेली क्षमता, भरभक्कम इच्छाशक्ती, व प्रयत्नांत असलेल्या सातत्यामुळे माणूस हवं ते मिळवू शकतो, असंभवाला संभव करु शकतो’.

हे सिद्ध करणारी क्रीडापटू होती ‘विल्मा रुडोल्फ’.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

१९४० साली अमेरिकेत, क्लार्कवील्स, टेनीसी येथे एका अतिशय गरीब कुटुंबात विल्माचा जन्म झाला. तिच्या घरात, तिच्या व्यतिरिक्त तिचे वडील, दोन आया व तिची २१ भावंडे होती. इतका मोठा परिवार असल्यामुळे सगळ्यांचीच आबाळ होत असे. विल्मा कुपोषित जन्माला आली. जन्माच्या वेळी तिचे वजन केवळ ४.५ पाउंड एवढेच होते.

बालपणी बराच काळ विल्माने आजारपणाशी लढण्यातच घालवला. न्यूमोनीया, टायफाईड यांसारख्या आजारांनी तिला ग्रासले होते. त्याकाळी तिथे पसरलेल्या ‘पोलिओ’च्या साथीचा परिणाम विल्मावर देखील झाला.

१९४४ साली तिला पोलिओ झाला. यात तिचे प्राण तर वाचले, पण डाव्या पायाने ती अपंग झाली. तिच्या गावापासून ५० किलोमीटर दूर बसचा प्रवास करून, दर आठवड्याला तिचे कुटुंबीय तिला उपचारासाठी शहरात नेत. इतर वेळी घरीच तिची तेलाने मालिश केली जात असे. काही वर्षांनी का होईना, पण तिच्या कुटुंबीयांच्या प्रयत्नांना यश आले. तिच्या पायांत त्राण येऊ लागले, व आता ती लेग ब्रेसचा वापर थांबवून ऑर्थोपेडिक शूज वापरू लागली. विल्माला आता धावता देखील येत होते.

शाळेत असताना तिला तिचेच मित्र- मैत्रिणी या तिच्या दोषावरून हीणवत, पण वील्माने तिच्या त्या वाईट आठवणींना मागे सोडले होते. दिवसागणीक तिच्या पायात शक्ती येत होती, आता ओर्थोपेडिक शूजचासुद्धा वापर न करता तिला तितक्याच गतीने धावता येऊ लगले. हायस्कूलला असताना विल्माने बास्केटबॉल संघात भाग घेतला. पाहता पाहता राज्यस्तरीय सामन्यासाठी तिची निवड करण्यात आली. स्टेट बास्केटबॉल स्पर्धा असताना ‘एड टेंपल‘ यांनी विल्माला पाहिले व तिची गती पाहून त्यांनी तिला रनिंग फिल्डसाठी येण्यास सांगितले.

एड हे ‘टनीसी स्टेट युनिव्हर्सिटी’ येथे रनिंग कोच होते. उन्हाळ्यातील रनिंगच्या ट्रेनिंगच्या वेळी विल्माची ओळख ‘टायगरबेल्स’ या संपूर्ण अफ्रिकन महिला असलेला संघ होता. तो संघ त्यांच्या अनाकलनीय गती व कठोर शिस्तीसाठी प्रसिद्ध होता. बघता बघता आपल्या गती व रनिंगसाठी असलेल्या प्रेमामुळे व विशेष कौशल्यामुळे विल्मा अनौपचारिकरीत्या टायगरबेल्सचाच एक भाग झाली.

१९५६ साली, वयाच्या सोळाव्या वर्षी विल्माने सीएटल येथे ऑलिमपिक्ससाठी सुरू असलेल्या रनिंग सिलेक्शन चाचणीत भाग घेतला. त्यात तिची निवड झाली व १९५६ च्या मेलबर्न येथे घेण्यात आलेल्या ऑलिम्पिक्समध्ये तिने, अमेरिकन टीमचा भाग म्हणून, 4 X 100 मीटर रिलेमध्ये, एक कांस्यपदक पटकावले. या ऑलिंपिकनंतर काही काळातच तिने तिची पहिली मुलगी, योलाण्डाला जन्म दिला.

या अवेळी आलेल्या मातृत्वाचा परिणाम आता तिच्या नुकत्याच भरारी घेत असलेल्या करियरवर होणार होता. कोच टेंपल यांनी, ‘कोणत्याही आईला संघात घेणार नाही’ ही घोषणा केली होती. पण विल्माच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी विल्माला एक संधी दिली. पण त्या पूर्वी त्यांनी ‘तुला आपल्या जोडीदाराला व मुलीला विसरावे लागेल’ अशी अट विल्माला घातली. काळजावर दगड ठेऊन, विल्मा पुन्हा खेळाकडे वळली. आता तिच्या समोर एकच ध्येय होते, ते म्हणजे’ १९६० चे ऑलिम्पिक्स.

१९६० साली, रोम येथे होणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये विल्माने भाग घेतला. टायगरबेल्स संघातील आठ खेळाडूंपैकी एक होती विल्मा. या ऑलिम्पिक्समध्ये विल्माने १०० व २०० मीटर डॅश व रिले प्रत्येकी एक, अशी तीन सुवर्णपदके पटकावली.

याच तिच्या विजयामुळे ही पदके पटकावणारी ‘पहिली महिला व पहिली आफ्रिकन’ असे दोन विक्रम तिच्या नावावर नोंदवण्यात आले.

तिच्यासाठी आयोजित केलेला तो सत्कार समारंभ हा क्लर्क्सवील येथील पहिला वर्णभेद नसलेला समारंभ होता. या ऑलिम्पिक्सनंतर विल्माने रनिंगमधून निवृत्ती घेतली व एका शाळेत ती ‘रनिंग कोच’ म्हणून नोकरी करु लागली. पुढे विल्माने एका NGOची स्थापना केली. या ऑर्गनायझेशन मार्फत, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ती मदत करत असे.

वयाच्या ५४व्या वर्षी विल्माला ‘ब्रेन कॅन्सर’ ने ग्रासले व पुन्हा आजारपणाशी ती लढू लागली. पण ही लढाई ती फत्ते करु शकली नाही व तिने अखेर जगाचा निरोप घेतला. १९८० मध्ये एका मुलाखतीत तिने म्हटले होते की ‘विल्मा रुडोल्फ ही कोणी एक खेळाडू होती इतकीच माझी ओळख मर्यादित न ठेवून, अमेरिकन मुला मुलींपुढे एक असे उदाहरण बनायचे आहे, जिच्या कडे बघून ते देखील आपल्या व्यंगत्वावर मात करण्याची हिंमत बाळगु शकतील, जिला बघून त्यांना देखील हा विश्वास येईल की प्रयत्न केले तर अशक्य असे काहीच नसते.’


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

रेल्वेचा टी.सी. ते पहिल्याच प्रयत्नात जिल्हाधिकारी झालेल्या होतकरू तरुणाचा संघर्षमय प्रवास

Next Post

ए मोहोब्बत तेरे अंजाम पे… : ‘मल्लिका-ए-गजल’ अख्तरी बाईंचा अंतर्मुख करणारा प्रवास

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

ए मोहोब्बत तेरे अंजाम पे... : 'मल्लिका-ए-गजल' अख्तरी बाईंचा अंतर्मुख करणारा प्रवास

दलित स्त्रियांमध्ये कुटुंबनियोजनाबद्दल जागरूकता घडवणारी पहिली महिला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.