The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतातली समांतर सिनेमा चळवळ खऱ्या अर्थाने श्याम बेनेगल यांनी सुरु केली

by द पोस्टमन टीम
14 December 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सिनेमा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते निसर्ग रम्य ठिकाणी प्रेम गीतांवर थीरकणारे नायक-नायिका, चार सहा गुंडांना एकटाच पुरून उरणारे नायक आणि हि*टल*रसारख्या कठोर हृदयाचे नायिकेचे वडील. पण या व्यतिरिक्त उत्क्रुष्ट दर्जाच्या कथा, पटकथा, बाज, सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणारे सिनेमेसुद्धा सिनेमाचीच एक दुसरी बाजू आहे हे आपण विसरतो.

शतायुषी असलेल्या भारतीय सिनेमाने अगदी मूकचित्रपटापासून, पिंजरा, मुघल-ए-आज़म, शहेनशाह, डॉन ते बाहुबली असे अनेक प्रयोग या सोनेरी पडद्यावर साकारलेले बघितले. आपल्यासारखीच सामान्य माणसं, आपल्या जिद्दीने, कष्टाने, विशेषतः ‘कथाकथना’ प्रति असलेल्या आपल्या विलक्षण प्रेमामुळे भारतीय सिनेमातील सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणून उदयास आली.

अनेक विख्यात, अनुभवी, व जगावेगळी क्रीएटीव्हीटी असणारे दिग्दर्शक, कथाकार, गीतकार यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. सिनक्षेत्रात असे अनेक दिग्दर्शक होऊन गेले ज्यानी आपल्या कामातून समाजाच्या वस्तुस्थिती कडे जगाचे लक्ष वेधून घेतले.



प्रथमदृष्टी शांत व स्थिर दिसणाऱ्या पडद्याआड, किती वादळे थैमान घालताहेत ह्याची जाणीव करून दिली. अशाच अग्रणी दिग्दर्शिकापैकीच एक होते “श्याम बेनेगल”.

बेनेगलांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी, त्रिमुलघेरी, सिकंदराबाद येथे झाला. त्यांचे वडील हे व्यावसायिक छायाचित्रकार होते. ते मुळचे कर्नाटकातले असल्या मुळे, कोंकणी व इंग्लिश या दोन्ही भाषा बेनेगलांना येत होत्या. प्रसिद्ध चित्रपट निर्माता ‘गुरू दत्त’ हे त्यांचे काका होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

ThePrint

कॅमेराची ओळख बेनेगलांना अगदी लहानपाणी इथेच झाली. चित्रपटाचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं. सत्यजीत रे यांचे ते विशेष चाहते होते. रेंच्या चित्रपटांमधील पोक्त भावना, ज्वलंत विषय व ते संवेदनशील विषय हाताळण्याची त्यांची कला, या गोष्टी बेनेगलांना महत्वाच्या वाटत. ‘सत्यजित रे’ना ते आपल्या गुरूच्या स्थानी मानत.

निजाम कॉलेज येथून इकॉनॉमिक्स विषय घेऊन त्यांनी पदवी मिळवली. विषय जरी इकॉनॉमिक्स असला तरी मनात असलेल्या सिनेप्रेमा मुळे कॉलेजात त्यांनी ‘फिल्म सोसायटी’ची स्थापना केली.

बेनेगलांनी आपल्या व्यावसायीक कारकीर्दीची सुरुवात, मुंबईच्या एका जाहिरात कंपनीत ‘कॉपीरायटर’ म्हणून काम करत केली. लवकरच ते फिल्म मेकिंगकडे वळले.

कॉपीरायटर म्हणून काम करत असताना त्यांनी ९०० जाहिराती, ११ कॉर्पोरेट फिल्म्स व अनेक डॉक्युमेंट्रिस बनवल्या.

१९८०-८३ आणि १९८९-९२ या कालावधीत त्यांनी ‘ फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे’ येथे प्रोफेसर व अध्यक्ष अशा दोन भूमिका पार पाडल्या.

करियरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या चित्रपटांसाठी ग्रामीण बाज असलेल्या कथा निवडल्या. बेनेगलांना पहिलं व्यावसायिक यश हे त्यांच्या ‘अंकुर’ या सिनेमाने दिलं. आंध्रप्रदेशातील एका छोट्याश्या खेड्याभोवती कथा गुंफली होती. अंकुर चित्रपटातूनच शबाना आज़मी ह्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

या सिनेमाद्वारेच समांतर सिनेमा चळवळीची बीजं रोवली गेली, पाया रचल्या गेला. अनेक नामवंत कलाकरांना हेरून त्यांना चित्रपट स्रुष्टीत आणण्याचं श्रेय बेनेगलांना जातं. त्यांनी हेरलेल्या नामवंत कलाकरांपैकी स्मिता पाटील आणि नसरूद्दीन शहा ही दोन महत्त्वाची नावं.

नंतरच्या काळात आपल्या मूळच्या ग्रामीण कथा बाजूला ठेवत ते शहरी भागाकडे वळले. कलयुग, मंडी आणि त्रिकाल या चित्रपटांद्वारे त्यांनी आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलं. डॉक्युमेंटरीज हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू , सत्यजित रे , महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेक थोर व्यक्तींच्या आयुष्यावर त्यांनी डॉक्युमेंटरीज बनवल्या.

दूरदर्शनसाठी त्यांनी केलेल्या भारत: एक खोज, यात्रा, कथासागर सारख्या मालिका खूप गाजल्या. मधल्या काळात डॉक्युमेंटरीज आणि मालिकांमध्ये रमलेल्या बेनेगलांनी १९९१ साली ‘अंतर्नाद‘ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दणदणीत पुनरागमन केलं.

Amazon.com

त्यांनी केलेल्या अनेक चित्रपटांपैकी सूरज का सातवा घोडा (१९९३), सरदारी बेगम (१९९६), समर (२०००), झूबेदा (२००१), नेताजी सुभाषचंद्र बोस (२००५), वेलकम टू सज्जनपूर (२००८) & वेल डन आबा (२००९) हे काही नावाजलेले चित्रपट.

गांधीजींच्या पूर्वायुष्यावर आधारित The making of Mahatma ही डॉक्युमेंटरी त्यांनी बनवली. त्यांनी तयार केलेली आणखी एक महत्त्वाची आणि सुंदर डॉक्युमेंटरी म्हणजे संविधान: The Constitution of India.

Wikipedia

बेनेगलांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. भारत सरकारने चित्रपट स्रुष्टीतल्या त्यांच्या अमूल्य योगदाना बद्दल त्यांना १९७६ साली “पद्मश्री” आणि १९९१ साली “पद्मभूषण” पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केला.
अशा ह्या अष्टपैलू दिग्दर्शकाला मानाचा मुजरा !!!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मुलगी जन्मली की १११ झाडं लावणारं गाव

Next Post

इस्लामचा प्रवास विज्ञानवादाकडून धर्मांधतेकडे कसा झाला?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

इस्लामचा प्रवास विज्ञानवादाकडून धर्मांधतेकडे कसा झाला?

ही स्वमग्न व्यक्ती एका संपूर्ण शहराचं चित्र फक्त स्मरणशक्तीच्या बळावर तयार करू शकते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.