The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंटरनेटवरचे फेक रिव्ह्यूज तुम्हाला मूर्ख तर बनवत नाहीयेत ना..?

by द पोस्टमन टीम
4 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपण सर्रास झोमॅटो, स्विगी यांसारख्या सेवांचा लाभ घेतो. होम डिलिव्हरी करणारा डिलिव्हरी बॉय आपल्याला रेटिंग द्यायला सांगतो. तेवढेच बिचाऱ्याचे भले म्हणून आपण फाइव्ह स्टार रेटिंग देऊन मोकळे होतो. हे रिव्ह्यूज आणि रेटिंग आज उद्योग व्यवसायाचा कणा आहेत. रेटिंगवरून एखादा व्यवसाय किंवा उद्योजक पुढे येतो किंवा मागे फेकला जातो, हे आजच्या उद्योगजगताचे वास्तव.

साधे कधी बाहेर जेवायला जायचे म्हटले तरी आपण पहिली गोष्ट काय करतो, तर जिथे जायचे त्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटबद्दलचे रिव्ह्यूज वाचतो. हीच गोष्ट इतरही सेवांच्या बाबतीत खरी आहे. डॉक्टरकडे जायचे तरी रिव्ह्यूजचा आधार घेतला जातो. एखाद्या रिसॉर्टमध्ये ऑनलाईन बुकिंग करायचे म्हटले तरी सगळ्यात आधी आपण इतर लोक त्याबद्दल काय म्हणत आहेत हे चेक करतो.

एवढेच कशाला, ॲमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या शॉपिंग पोर्टल वरून कोणतेही उत्पादन खरेदी करण्याआधी आपण त्याचे रिव्ह्यूज वाचतो आणि त्या प्रॉडक्टला किती रेटिंग आहेत हे देखील तपासतो. थोडक्यात आपल्या खरेदीची दिशा या रिव्ह्यूजवरून ठरते. पण तुम्हाला हे माहित आहे का, की यातले जवळपास ४० टक्के रिव्ह्यूज फेक असतात. आणि त्यांचा हेतू तुम्हाला उल्लू बनवणे हाच असतो.

आता हे फेक रिव्ह्यू प्रकरण काय आहे? तर हा रिव्ह्यू लिहिणारे लोक मुळात जेन्युईन कस्टमर नसतातच. अशा प्रकारचा पॉझिटिव्ह रिव्ह्यू देण्यासाठी त्यांना संबंधित उत्पादकाने पैसे देऊ केलेले असतात किंवा ते उत्पादन फुकट दिलेले असते. पॉझिटिव्ह रिव्ह्यूज लिहिण्याची देखील एक प्रकारे किंमत असते.

असाच एक समूह म्हणजे ॲमेझॉन रिव्ह्यू ग्रुप. बार्टर सिस्टीमप्रमाणे या ग्रुपवर असे व्यवहार चालतात. इथे कोणीही आपले रिव्ह्यूज लिहू शकतो. चांगल्या रिव्ह्यूजना त्यासाठीची अवॉर्ड्सही मिळतात. या रिव्ह्यूजना शोधणे अत्यंत सोपे आहे.



fiverr.com नावाची एक फ्रिलांसींग वेबसाईट आहे. यावर चक्क काही रिव्ह्यूअर्सनी आपल्या जाहिराती दिलेल्या आहेत. आम्ही तुमच्या प्रॉडक्टबद्दल पॉझिटिव्ह रिव्ह्यूज देऊ शकतो असे सांगत हे लोक संभाव्य ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. यांचे ग्राहक कोण?

तर आपल्या प्रॉडक्टची ऑनलाईन विक्री करणाऱ्या काही कंपन्या आणि उद्योजक. या प्रॉडक्ट आणि सेवांना हाय रेटिंग असेल आणि ज्यांच्याबद्दलचे रिव्ह्यूज चांगले असतील तर त्यांना अर्थातच जास्त ग्राहक मिळतात आणि त्यातून त्यांचा बिझनेस चांगला चालतो हे साधे लॉजिक. बिझनेस चांगला चालतो कारण सर्च इंजिनमधल्या टॉप रिझल्टमध्ये पहिल्या दोन तीन पेजेसवर बहुधा हेच प्रॉडक्ट्स असतात. यासाठी एक साधा प्रयोग करून पाहा.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ॲमेझॉनसारख्या साइटवर जाऊन कोणत्याही एका प्रॉडक्ट वर सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिल्या पेजवर दिसणाऱ्या बहुतेक सर्व प्रॉडक्टचे रेटिंग चार स्टार्स किंवा त्यापेक्षा जास्त असते. बहुधा सगळेच ग्राहक पहिली तीन-चार पेजेसच पाहतात आणि कोणती वस्तू घ्यायची ते ठरवतात. 

त्यामुळे सहाजिकच कमी रेटिंग नसलेल्या आणि त्यामुळे तिसाव्या किंवा चाळीसाव्या पेजवर दिसणार्‍या वस्तू ग्राहकांच्या समोर येतच नाहीत. त्यामुळे बहुसंख्य विक्रेत्यांसाठी पहिल्या पाच पेजेस वर आपले उत्पादन झळकणे महत्त्वाचे असते. त्यासाठी ते अनेक मार्ग अवलंबतात.

फेक रिव्ह्यूजचा अजून एक वापर हा सामान्य दर्जाच्या किंवा निम्नस्तरीय उत्पादनांच्या विक्रीसाठी केला जातो. कधीकधी फेक प्रॉडक्ट्सही याद्वारे विकले जातात. त्यांचे आकर्षक पॅकेजिंग आणि स्टार रिव्ह्यूज या जोरावर हे प्रॉडक्ट्स खपतात. असे खोटे रिव्ह्यूज लिहिण्यासाठी देखील पैसे मिळतात. अनेकदा तर रिव्ह्यूअरने हा प्रॉडक्ट पाहिलेलासुद्धा नसतो. बरेचदा निगेटिव्ह रिव्ह्यूजही लिहिले जातात. त्यासाठीही पैसे दिले जातात. त्यांचा हेतू प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या उत्पादनाविषयी खोटा अपप्रचार करणे हा असतो.

वरील काही विक्रेते ॲमेझॉन आपले उत्पादन टॉप पेजेसमध्ये दिसावे यासाठी दरमहा दहा हजार डॉलर्स खर्च करतात.

आता या सगळ्यावर नियंत्रण कोणाचे? तर सर्व शॉपिंग पोर्टल्सना हा प्रकार माहिती आहे. ॲमेझॉनसारख्या काही वेबसाइट्स ग्राहकांना रिपोर्ट अब्युज असा ऑप्शन देतात, ज्याद्वारे ग्राहकाला हे दिशाभूल करणारे रिव्ह्यूज दाखवून देता येतात.

ॲमेझॉनवर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स कॅटेगरीमधील सुमारे ६१ टक्के रिव्ह्यूज फेक आहेत. प्रत्यक्ष खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी केवळ तीन ते दहा टक्के ग्राहक जेन्युईन रिव्ह्यूज लिहितात, हे स्टॅटिस्टिक्स पुरेसे बोलके आहे. अशाप्रकारे फेक रिव्ह्यूज लिहून दरमहा हजारो डॉलर्स कमावणारे अनेक जण आहेत.

या सगळ्या गोष्टी आपल्याकडच्या ग्राहकांना देखील माहिती आहेत. परंतु प्रश्न हा उरतो की अशा प्रकारचे फेक रिव्ह्यूज ओळखायचे कसे?

एक म्हणजे रिव्ह्यू करणाऱ्या व्यक्तीचे प्रोफाइल चेक करणे. जर त्या व्यक्तीने केवळ एकाच उत्पादनाचा रिव्ह्यू दिलेला असेल तर काहीतरी गडबड नक्कीच आहे. दुसरे म्हणजे रिव्ह्यूचे टाइमिंग चेक करणे.

जर एका विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या उत्पादनाला मिळणाऱ्या रिव्ह्यूजमध्ये अचानक वाढ दिसत असेल किंवा मिळणारे सर्वच रिव्ह्यूज पॉझिटिव्ह किंवा फाईव्हस्टार असतील तर संशयाला जागा आहे. अजून एक म्हणजे रिव्ह्यूज लिहिण्याची शैली तपासून पाहणे.

समजा एखाद्या उत्पादनाला पन्नास रिव्ह्यूज आहेत. यापैकी जवळपास तीस रिव्ह्यूजमध्ये लिहिण्याची शैली किंवा भाषा यांच्यात आश्चर्यकारक साम्य आहे. असे असले तर हा फेक रिव्ह्यू असण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ अमेझिंग, वंडरफुल, आउटस्टॅंडिंग असे एकच शब्द असलेले रिव्ह्यू वारंवार आढळत असतील तर ही धोक्याची सूचना आहे. शिवाय काही वेबसाइट्स ग्राहकांना रिव्ह्यू पडताळून पाहण्याची सोय करून देतात.

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग एका संक्रमणावस्थेतून जात असताना आपण ऑनलाइन शॉपिंगवर जास्तच अवलंबून राहात आहोत. आपल्याही नकळत आपल्या मेंदूचा ताबा घेत आपला चॉईस पाहिजे तसा वळवण्याचा आणि आपल्या खरेदीला अपेक्षित दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण या गोष्टीला न भुलणे आणि केवळ चांगला रिव्ह्यू आहे म्हणून डोळे झाकून खरेदी न करणे हे ग्राहक म्हणून आपले कर्तव्य आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारताला दोन टाइम झोन्सची (प्रमाणवेळांची) का गरज आहे..?

Next Post

झपाट्याने होत असलेलं वाळवंटीकरण दुबईसाठी खूप मोठी डोकेदुखी धरत आहे..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

झपाट्याने होत असलेलं वाळवंटीकरण दुबईसाठी खूप मोठी डोकेदुखी धरत आहे..!

अजिंक्य रहाणेलाही वाटत असेल कधी एकदा ही साडेसाती संपेल आणि परत संघात जागा मिळेल.!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.