The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माउंट एव्हरेस्टची उंची नेहमी बदलत का राहते..? हे घ्या उत्तर..!

by Heramb
28 October 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


निसर्गाच्या अनेक अद्भुत अविष्कारांपैकी एक म्हणजे एव्हरेस्टचे शिखर. माउंट एव्हरेस्ट हे हिमालय पर्वत रांगेतील एक शिखर आहे.  ते नेपाळ आणि तिबेट यांच्यामध्ये असून त्याची उंची सुमारे ८ हजार ८४९ मीटर आहे. एव्हरेस्टचे शिखर हा पृथ्वीवरील सर्वोच्च बिंदू मानला जातो. या पर्वताचे नाव एकोणिसाव्या शतकात, जॉर्ज एव्हरेस्टच्या नावावर ठेवण्यात आले. या शिखराचे मूळ, तिबेटियन नाव, ‘चोमोलुंगमा’ आहे. याचा अर्थ “जगाची देवी” असा होतो. तर या पर्वताचे नेपाळी नाव ‘सागरमाथा’ असून, या नावाचे विविध अर्थ आहेत.

एव्हरेस्टच्या उंचीची पहिली नोंद, १८५६ साली ब्रिटिश राजवटीत झाली होती. ब्रिटिश सर्वेक्षकांनी भारतीय उपखंडाच्या ‘ग्रेट ट्रिग्नॉमेट्री सर्वेमध्ये एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर असल्याची नोंद केली. अनेक गिर्यारोहकांच्या विष-लिस्टपेक्षा जगातील सर्वोच्च शिखर हवामान बदलाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

भारतीय उपखंडाच्या ग्रेट ट्रिग्नॉमेट्री सर्वेदरम्यान, या बलाढ्य एव्हरेस्टसमोर ट्रिग्नॉमेट्रीचा गणिती नियम फसला. एव्हरेस्टपासून समुद्र फारच दूर असल्याने, समुद्र-पातळी मोजणे अवघड होते. समुद्रसपाटीशिवाय, भौगोलिक ट्रिग्नॉमेट्री कोणत्याही प्रकारे उपयोगात आणता येत नाही. कारण, मोजमापासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसते. एव्हरेस्टजवळ समुद्र नसल्यामुळे हे काम अधिकच कंटाळवाणे झाले होते.

२०१५ साली नेपाळमध्ये विनाशकारी भूकंप आल्यानंतर नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्टची उंची पुन्हा मोजण्यासाठी पुढाकार घेतला, कारण या पर्वताची उंची आणि स्थान बदलत आहे असे निष्कर्ष काही तज्ज्ञांनी काढले होते. भारताच्या उत्तरेकडील हिमालय पर्वतरांगांची निर्मिती भारतीय उपखंड आणि युरेशियन खंड यांच्या एकमेकांवर आदळण्याने झाली. लाखो वर्षांच्या कालावधीत, या टकरांमुळे जगातील सर्वात मोठ्या पर्वतारांगेचा उदय झाला. हे भूखंड सतत एकमेकांवर आदळत असल्यामुळे एव्हरेस्ट पर्वताची उंची दरवर्षी सुमारे १.५ इंच वाढते.

एव्हरेस्टपासून समुद्र फारच दूर असल्याने, समुद्र-पातळी मोजणे अवघड होते. इंग्रज आणि भारतीय मात्र या पर्वताची उंची मोजण्यावर ठाम होते. या मोजमापाचे काम पुढे नेण्यासाठी, एक संशोधन पथक बंगालच्या उपसागराकडे गेले आणि तेथून दक्षिणेकडून उत्तरेकडे हिमालयाच्या दिशेने चालत जावे लागले. हा प्रवास पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागली, कारण या लोकांनी मार्गात भौगोलिक डेटा गोळा केला. नेपाळच्या जवळ पोहोचल्यानंतर त्यांना नेपाळमध्ये प्रवेश दिला नाही, म्हणून त्यांना शंभर मैलांपेक्षा जास्त अंतरावरून पर्वताची उंची मोजावी लागली.



असे असूनही, त्यांच्या रीडिंग्स समुद्रसपाटीपासून ८८४० मीटर अशी आली. हे मोजमाप त्यावेळी एकमताने मान्य करण्यात आले होते. या सर्व्हेनंतरही भविष्यात अनेक स्वतंत्र देशांनी आपापली पद्धत वापरून, एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम केलं आणि वेळोवेळी त्याच्या उंचीची नोंद ‘अपडेट’ करत राहिले.

काही रीडिंग्स मूळ रीडिंगपेक्षा फक्त एक तृतीयांश मीटरच्या अंतरावर होती, तर काही रीडिंग्समध्ये सुमारे ७२ मीटरची असमानता होती. म्हणजेच, एव्हरेस्टवर सुरुवातीच्या काळात चढलेल्या पहिल्या काही लोकांपेक्षा कालांतराने आलेल्या लोकांनी जास्त ‘उंचीवर’ चढाई केली होती. समुद्राच्या पातळीत भूमीच्या रचनेइतकाच फरक दिसून येतो. कारण समुद्राच्या लाटा बऱ्याच प्रमाणात अस्थिर असतात आणि वेळोवेळी समुद्राची ‘पातळी’ बदलू शकतात.

जरी ‘जागतिक सरासरी समुद्र पातळीचे एक प्रमाण’ अस्तित्वात असले तरी पर्वतांची उंची मोजताना शास्त्रज्ञांनी अचूक असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्यांना ‘एलिप्सॉइड’चा विचार करावा लागला. ‘एलिप्सॉइड’ ही पृथ्वीच्या स्वरूपाची गणितीय आकृती आहे. ही आकृती खगोलशास्त्र आणि भूविज्ञानातील गणनेसाठी ‘रेफरन्स फ्रेम’  म्हणून वापरली जाते. कारण पर्वत अत्यंत दाट असतात, गुरुत्वाकर्षणाचा समुद्राच्या पातळीवर परिणाम होतो, यामुळे पर्वतांच्या मोजलेल्या उंचीमध्ये वर्षानुवर्षे फरक पडतो.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

एव्हरेस्टच्या उंचीबद्दल पाश्चात्य देशांनी अनेक वर्षे संशोधन केल्यानंतर, एव्हरेस्टचे माहेरघर असलेल्या नेपाळने शोध सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. नेपाळने स्वतः पर्वताची उंची कधीच मोजली नव्हती आणि या विषयावर त्यांच्या मुद्द्याला जास्त महत्त्व होते. एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी ‘खिम लाल गौतम’ या गिर्यारोहक आणि संशोधकाने जीपीएस रिसीव्हर वापरून उंची मोजण्यासाठी एव्हरेस्टवर चढाई केली. त्याने ८०००-मीटरच्या डेथ झोनमध्ये धैर्यपूर्वक २ तास घालवले, जेणेकरुन उपग्रहाला एव्हरेस्टच्या शिखरावरून सिग्नल मिळण्यासाठी अधिक वेळ मिळू शकेल आणि अचूक उंची मोजता येईल.

नेपाळप्रमाणेच एव्हरेस्टचा अर्धा भाग असलेल्या तिबेटच्या बाजूने देखील एक चिनी मोहीम आयोजित केली गेली. प्रदीर्घ काळानंतर, चिन आणि नेपाळ या दोन्ही राष्ट्रांच्या संयुक्त प्रयत्नांनी शेवटी एव्हरेस्टचे मोजमाप यशस्वीरीत्या झाले आणि २०२० साली जगातील सर्वांत उंच शिखराबद्दल एक अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये आज माउंट एव्हरेस्ट ८८४६.८६ मीटर आहे सुरुवातीच्या मोजमापापेक्षा ९ मीटर उंच, असा निष्कर्ष काढण्यात आला.

उंचीमध्ये अतिशय कमी बदल असूनही, हे मोजमाप सर्वांत आधुनिक होते आणि म्हणूनच एव्हरेस्टची उंची मोजण्याची हीच अधिक अचूक पद्धत होती. शिवाय हा नेपाळच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कालांतराने एव्हरेस्टच्या उंचीमध्ये कितीही मोठे किंवा छोटे बदल झाले, जगातील या भव्य शिखरावर आपण असाल तेव्हा संपूर्ण जग खरोखर आपल्या पायांखाली असेल, हे मात्र निर्विवादपणे सांगता येऊ शकते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बंदु*कीची एकही गोळी न चालवता या यु*द्धात हजारो सैनिकांचा बळी गेला होता

Next Post

कॅम्पिंगला गेलेल्या माणसांना मार*हाण केली म्हणून एका अस्वलाला जेलमध्ये टाकलं होतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

कॅम्पिंगला गेलेल्या माणसांना मार*हाण केली म्हणून एका अस्वलाला जेलमध्ये टाकलं होतं

मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या बाईने संगीतातला सर्वोच्च ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.