The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयलिन ॲश जगातील सर्वांत वयस्कर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होत्या..!

by द पोस्टमन टीम
28 October 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गेल्या कित्येक दशकांपासून जगाच्या विविध कोपऱ्यांमध्ये क्रिकेट खेळलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर हजारो खेळाडू आले अन् गेले. त्यातील काहींनी चाहत्यांच्या मनात एक अमीट छाप पाडली. जोपर्यंत क्रिकेट खेळलं जाईल तोपर्यंत त्यांची आठवण काढली जाईल, अशी काही खेळाडूंची कामगिरी आहे. ‘जेंटलमन्स गेम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये काही ‘फियरलेस ब्युटीज्’नं देखील आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही.

मिताली राज, हिदर नाईट, सना मीर, सारा टेलर, एलिस पेरी, स्मृती मंधाना, झुलन गोस्वामी, शार्लोत एडवर्ड्ससारख्या कित्येक मुलींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. या मुलींनी महिला क्रिकेटला सन्मान मिळवून देण्यासाठी धडपड केली आणि त्यात त्यांना यश देखील आलं.

या सर्व मुलींना प्रेरणा देण्याचं काम करणारी व्यक्ती मात्र, प्रसिद्धीच्या झोतापासून बरीच दूर होती. या व्यक्तीने वयाच्या ११०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मानाचं स्थान मिळवण्यासाठी महिला क्रिकेट किती कालावधीपासून संघर्ष करत आहे, याची एकमेव साक्षीदार म्हणून या व्यक्तीकडं पाहिलं जातं. तब्बल ११० वर्षांपासून क्रिकेटचा प्रवास पाहिलेली ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?

क्रिकेटच्या मैदानात तिनं २९ मॅचेस खेळून तिनं ४२ विकेट्स आणि १९ कॅचेस घेतलेले आहेत. क्रिकेटच नाही तर गोल्फच्या मैदानाची हिरवळसुद्धा तिला तितकीच प्रिय आहे. एखाद्या साधारण मुलीप्रमाणं राहणं तिला कधी आवडलंच नाही. एक मुलगी म्हणून ती घरात बसणं तिला आवडलं नाही. म्हणूनच जेव्हा देशाला गरज होती तेव्हा तिनं दुसऱ्या महायु*द्धात देखील सहभाग घेतला.

या सर्व गोष्टी एखाद्या चित्रपटातील काल्पनिक पात्रच करू शकते ना? मात्र, या सर्व गोष्टी ‘आयलिन ॲश’ नावाच्या ब्रिटिश महिलेनं आपल्या आयुष्यात खरंच केल्या आहेत. एकेकाळी इंग्लंडची राईट आर्म मीडियम बॉलर असलेल्या आयलिन ॲश यांनी वयाची शंभरी पार करून २०२१ साली आजच्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला.



इंग्लंडमधील हायबरीमध्ये ३० ऑक्टोबर १९११ रोजी आयलिन ॲशचा जन्म झाला. आयलिनला व्हेलान नावानं देखील ओळखलं जायचं. आयलिननं इंग्लंडसाठी १९३७ ते १९४९ या काळात सात कसोटी सामने खेळले आहेत. दुसऱ्या महायु*द्धापूर्वी जून १९३७ मध्ये नॉर्थम्प्टन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिनं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं आणि महायु*द्धानंतर मार्च १९४९ मध्ये ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयलिननं सात कसोटी सामने खेळून २३ च्या सरासरीनं १० विकेट्स घेतल्या. याशिवाय तिनं सिव्हिल सर्व्हिस, मिडलसेक्स आणि साऊथ इंग्लंडसाठी देशांतर्गत क्रिकेट देखील खेळलं. आयलिन ॲशच्या क्रिकेट कारकिर्दीसह इतर अनेक प्रभावी विक्रम त्यांच्या नावावर आहेत.

ॲश हयात असलेल्या सर्वांत ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होत्या. २०११ साली, ॲश शंभर वर्षांहून अधिक काळ जगणाऱ्या एकमेव महिला कसोटी क्रिकेटपटू बनल्या होत्या. आयलिन ॲशला मेरीलेबोन क्रिकेट क्लबमध्ये मानद सदस्यत्व मिळालेल आहे. त्यानंतर इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक फायनलपूर्वी लॉर्ड्सवर बेल वाजवण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्या दिवशी इंग्लंडच्या महिला संघाला विश्वचषक उंचावताना पाहण्याची संधी देखील आयलिनला मिळाली.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

इंग्लंडच्या महिला संघानं विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार हिदर नाईटनं आयलिन यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी आयलिन १०५ वर्षांच्या होत्या. “वयाची शंभरी पार केलेली असूनही आयलिन इतकी उत्साही स्त्री आपण अद्यापपर्यंत पाहिली नाही. त्या एकदम तंदुरुस्त आहेत. त्या दररोज नियमित योग करतात आणि एखाद्या महाविद्यालयीन तरूणीप्रमाणं रेडवाईनचा आनंदही घेतात. आयुष्य कशा प्रकारे जगलं पाहिजे, हे त्यांच्याकडून शिकायला हवं”, अशा शब्दांमध्ये हिदरनं त्यांची स्तुती केली होती.

त्याच वर्षी त्यांनी ड्रायव्हिंग टेस्ट पास केली होती. त्यांचा अनोखा कारनामा आयटीव्हीनं चित्रीत केला होता. १०५ वर्षांच्या आयलिनला कार चालवताना पाहताना अनेकांना प्रेरणा मिळाली होती. जगभरातील नेटीझन्सनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.

सर्वात ज्येष्ठ क्रिकेटर अशी ओळख असलेल्या आयलिन ॲशनं आपलं काही आयुष्य यु*द्धाच्या रणधुमाळीमध्ये घालवलं होतं. वयाच्या अठराव्या वर्षापासून आयलिन हर मॅजेस्टीच्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये कार्यरत होती. दुसऱ्या महायु*द्धाच्या कठीण काळात आयलिनला ब्रिटिश गुप्तचर एजन्सी MI-6 मध्ये तैनात करण्यात आलं होतं. गुप्तचर एजन्सीमधून स्वेच्छानिवृत्ती घेण्यापूर्वी त्यांनी त्याठिकाणी ११ वर्षे सेवा दिली.

दुसऱ्या महायु*द्धात आपल्या देशाची सेवा केल्यानंतर आयलीन आपल्या पतीसोबत नॉर्विचला राहायला गेल्या. त्याठिकाणी गेल्यानंतर आयलीनला गोल्फ खेळण्याचा नाद लागला. एखाद्या प्रोफेशनल खेळाडूलाही लाजवतील अशा प्रकारे त्या गोल्फ खेळायच्या. अगदी वयाच्या ९८व्या वर्षापर्यंत त्या गोल्फ खेळत होत्या ही नक्कीच आश्चर्याची गोष्ट आहे.

२०२१ साली जानेवारी महिन्यात आयलिन यांनी कोविड – १९ लस घेतली. ही लस घेणाऱ्या त्या युकेमधील सर्वात जास्त वयाच्या महिला ठरल्या आहेत. लस घेण्यासाठी अनेक तरुण घाबरत होते. मात्र, आयलिन यांनी न घाबरता लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांना कुठलाही त्रास झाला नाही. आपल्या कृतीतून त्यांनी लस घेण्यास घाबरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं.

३० ऑक्टोबर २०२१ रोजी आयलिन ॲशनं आपल्या वयाची ११० वर्षे पूर्ण केली होती. त्यानिमित्त इंग्लंडमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघाचा कर्णधार जो रूट, एकदिवसीय संघाचा कर्णधार इयान मोर्गन यांनी आयलिनला शुभेच्छा दिल्या होत्या.

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू केट क्रॉस, कॅथरीन ब्रंट आणि हिदर नाइट यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर ईसीबीने प्रकाशित केलेल्या व्हिडिओ मेसेजद्वारे आयलिनला त्यांच्या शुभेच्छा पाठवल्या. इंग्लंड महिला संघाच्या सध्याच्या मुख्य प्रशिक्षक लिसा केइटली यांनी देखील ११० वर्षांच्या एव्हरग्रीन आयलिनला शुभेच्छा दिल्या होत्या.

आकड्यांचा विचार केला तर आयलिन यांनी अतिशय कमी सामने खेळले होते. मात्र, ज्या परिस्थितीमध्ये त्या खेळल्या तो काळ नक्कीच कठिण होता. भरीस भर म्हणजे त्यांनी गुप्तचर यंत्रणेत देखील काम केलं, ही गोष्ट नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.

अशा या एव्हरग्रीन असलेल्या आयलिन येणाऱ्या अनेक पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देत राहतील यात शंकाच नाही. 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

डिप्रेशनमध्ये आत्म*हत्या करायला निघालेला रॉबर्ट क्लाइव्ह ईस्ट इंडिया कंपनीचा संकटमोचक होता

Next Post

या चलाख डॉक्टरने एका माणसाला मांत्रिकाच्या मृत्यशापातून वाचवलं होतं..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

11 September 2024
Next Post

या चलाख डॉक्टरने एका माणसाला मांत्रिकाच्या मृत्यशापातून वाचवलं होतं..!

ग्रीक गणितज्ञ आणि तत्वज्ञानी 'पायथागोरस' हा शाकाहाराचा सर्वात जुना पुरस्कर्ता आहे.

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.