The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिनी लोक वन्यजीवांना का खातात..?

by द पोस्टमन टीम
4 June 2020
in विश्लेषण, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


अमेरिकेनंतर जागतिक महासत्ता बनण्यासाठीची शर्यत वाढत चालली असताना चीनने या शर्यतीत मोठी आघाडी घेतली आहे असे वाटत होते. परंतु गेल्या काही महिन्यात चीनच्या वुहान शहरात सुरुवात झालेल्या कोरोना या वैश्विक आजार पसरवणाऱ्या विषाणूने चीनच्या महासत्ता होण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावल्याचे चित्र आहे.

कोरोना हा चीन मधून उत्पन्न झालेला पहिला विषाणू नसला तरी जागतिक पातळीवर कोरोनाने जो प्रभाव पाडला आहे त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर अतिशय प्रतिकूल परिणाम होणार एवढं मात्र नक्की.

कोरोनाची उत्पत्ती नेमकी कशी झाली हे अजुन जरी नक्की नसले तरी बाकी विषाणू हे चीन मधील लोकांच्या मांसाहारी आहारातुनच झाली आहे हे सिध्द झाले आहे. एचआयव्ही, इबोला यासारखे आजार मानवांमध्ये येण्याचे कारण चिनी लोकांच्या मांसाहारातच होते असे आज पुरावे उपलब्ध आहेत. 

जागतिक सरासरीच्या ५०% मांस विक्रीची दुकाने चीनच्या शहरांमध्ये वसली आहेत. जिथे फळे, भाजीपाला याबरोबरच खेकडे, उंदीर, साप, कासव आणि अशा अनेक प्राण्यांचे मांस विकले जाते.

संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमानुसार चीन जैवविविधता असणारा एक खुप मोठा देश आहे. जगातील जवळ जवळ १०% वनस्पती तर १४% प्राण्यांच्या प्रजाती चीन मध्ये बघायला मिळतात. जागतिक भूभागाच्या ६.५ % भूभाग व्यापलेल्या चीन मध्ये जगातील १४% पृष्ठवंशीय राहतात, २०% मासे, १३.७% पक्षी, ७११ सस्तन, २१० उभयचर अशी जैवविविधतेची उपलबध्ता आढळते.



चीनमधील प्रसिध्द असलेल्या काही प्रजातींमध्ये राक्षस पांडा, दक्षिण चिनी वाघ, सोनेरी माकड, चिनी डॉल्फिन यांचा समावेश होतो. बाकी देशामध्ये आढळणाऱ्या पँगोलिन, आशियायी हत्ती, आशियायी काळे अस्वल, सायबेरीयन वाघ, मंगोलीयन हरिण हे सुध्दा चीनमध्ये सापडतात.

जंगली मांसाहार चीनमध्ये अतिशय सामान्य बाब आहे. जंगली प्राण्यांचा मांसाहार म्हणून वापर चीन मध्ये सर्रास केला जातो. प्राण्यांचे अवयव औषधी गुणांनी युक्त म्हणुन विकले जातात. गाढव, कुत्रा, मगर, हरिण अशा प्राण्यांच्या मांसाची विक्री चीनमध्ये वैध आहे.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

चीनमध्ये अशा मांसाहारास प्रोत्साहन मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे तत्कालीन चिनी हुकुमशहा ‘माओ झेडोंग’ याने बनवलेल्या आर्थिक आणि सामजिक यंत्रणा. चीनच्या आर्थिक विकासास पाठबळ देण्यासाठी मांसाहारास प्रोत्साहन देणारी यंत्रणा १९५८-१९६२ या काळात बनवण्यात आली.

कृषी अर्थव्यवस्थेचं रुपांतर औद्योगिक अर्थव्यवस्थेत करण्याचा उद्देश असला तरी अनेक विकृत निर्णयांची अंमलबजावणी केल्यामुळे १८ दशलक्ष ते ४५ दशलक्ष लोकांचा भुकबळी त्यावेळी गेला. अन्नाची कमतरता यावेळी अतिशय जास्त जाणवत होती. या मानवनिर्मित कमतरतेच्या स्थितीमुळे नागरिकांनी प्राण्यांची कत्तल करण्यास सुरुवात केली.

सिचूयान प्रांतात १९६० साली एकुण ६२,००० हरणांची कत्तल करण्यात आली. आणि मंगोलियन हरणांची जवळ जवळ संपुष्टात येईल एवढ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. जंगली मांसाहार जो आधी फक्त दक्षिण चीनमध्ये होत असे तो आता सगळीकडे सुरु झाला. याच वेळी छोटे शेतकरी जंगली प्राण्यांचा सांभाळ करायला लागले, साप, वटवाघुळ, कासव यांना जगण्याचं साधन म्हणून पाळले जाऊ लागले.

१९८८ मध्ये चीनने वनसंरक्षण कायदा लागू केला. ज्यानुसार देशातील सगळी वनसंसाधने सरकारी अखत्यारीत आली. याच कायद्यात जंगली प्राण्यांना पाळणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी संरक्षण देण्यात आले. सरकारने जंगली प्राण्यांच्या उत्पादनास आणि संगोपनास प्रोत्साहन दिले.

चीनने पुढे जगातील सगळ्यात मोठा वनसंगोपन कार्यक्रम राबवला. अनेक जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात पाळले गेले. पँगोलिन आणि वाघ ज्यांचा व्यापार अवैध होता ते पण आता बाजारात विकले जाऊ लागले.

वन्यजीव हे तेव्हापासुनच देशाच्या खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. विविध औषधी उपयोग असलेल्या वन्यजीवांच्या वाढीस प्रेरणा देणाऱ्या अनेक औद्योगिक यंत्रणा चीनमध्ये आज काम करत आहेत. शारिरीक ताकदीसाठी सुध्दा या वन्यजीवांच्या मांसाचा वापर केला जातो.

दक्षिण चीनच्या ‘मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्रानुसार २०१७ मध्ये वन्यजीव व्यापार आणि खाद्य व्यापारामध्ये चीनमध्ये ७४ अब्ज डॉलरची उलाढाल झाली ज्याने १४ दशलक्ष लोकांना रोजगार पुरवला गेला.

उपलब्ध असलेल्या वन्यजीवांचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्याने आज जगावर एक मोठे संकट आले आहे. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरीही निसर्गासमोर माणुस नेहमीच हतबल राहणार हे आपल्याला आता या वैश्विक आजारामुळे कळतंय. यापुढे तरी मानव आपल्या मर्यादा ओळखून आयुष्य जगेल अशीच आशा बाळगूया!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

बौद्ध धर्माचे भाष्यकार द्वितीय बुद्धघोष धर्मानंद कोसंबी

Next Post

सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी कोर्टात चक्क व्हाट्सऍपवरच्या फेक व्हायरल मेसेजचा दाखला दिलाय

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी कोर्टात चक्क व्हाट्सऍपवरच्या फेक व्हायरल मेसेजचा दाखला दिलाय

या वृद्ध महिलेने आपल्या सहाशे रुपये कमाईतले पाचशे रुपये करोनालढ्यासाठी दिलेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.