The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या भारतीय शास्त्रज्ञाच्या वाट्याला आयुष्यभर उपेक्षाच आली

by द पोस्टमन टीम
30 January 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


आपण केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला प्रत्येक वेळी मिळतेच असे नाही. विजेचा शोध लावणारा निकोला टेस्ला त्याच्या आयुष्याच्या शेवटी गरिबीचं आयुष्य जगला. विजेच्या शोधासाठी आजही सगळे एडिसनलाच महत्त्व देतात. आयुष्यभर एखाद्या गोष्टीसाठी केलेल्या प्रयत्नाची पोचपावती न मिळणे म्हणजे किती मोठे दुर्दैव!

वैज्ञानिक क्षेत्रात कित्येक वेळा या घटना घडतात. अशीच एक घटना भारतातसुध्दा प्रसिध्द आहे, ती म्हणजे महान भारतीय वैज्ञानिक डॉ. संभू नाथ डे यांची. कॉलरासारख्या त्यावेळी जीवघेण्या असणारया साथीच्या आजारावर औषध शोधण्यात त्यांचा मोठा हात होता.

कलकत्त्यापासुन ३० किमी अंतरावर असलेल्या गारीबती गावात त्यांचा जन्म १५ एप्रिल १९१५ या दिवशी झाला. डे यांचे वडील एक छोटासा उद्योग चालवत असत. १९३५ साली त्यांनी वैद्यकीय विद्यालयात प्रवेश मिळवून तिथली शिष्यवृत्तीसुध्दा मिळवली. विद्यालयातील एम एन डे या प्राध्यापकाच्या सांगण्यावरुन त्यांनी १९४७मध्ये लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. लंडनच्या विद्यापीठात जाऊन त्यांनी पीएचडीचे शिक्षण घेतले.

डॉक्टरेट मिळवल्यानंतर ते कलकत्त्याला परत आले. आल्यानंतर त्यांनी ‘रॅबिट इंटेस्टीनल लूप मॉडेल’ या आपल्या महत्त्वपूर्ण विषयावर काम चालू केले. पुढे जाऊन कॉलरा आजाराच्या निदानासाठी याच विषयाचा त्यांना अमाप फायदा झाला.



एकोणिसाव्या शतकात कॉलराची जीवघेणी साथ पसरली. या साथीत भारतीय उपखंड आणि युरोपात लाखो लोकांचे प्राण गेले. या रोगाची सुरुवात आत्ताच्या बांगलादेशमधील जेस्सोर इथे झाली.  अर्थात याबद्दल काही वैज्ञानिकांचे मतभेद आहेत. परंतु साथ जास्त पसरल्यावर युरोपमधील वैज्ञानिक लुई पाश्चर, जर्मन वैज्ञानिक रॉबर्ट कोच यांनी या जीवघेण्या आजाराची कारणे जाणून घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी कॉलराची लागण झालेल्या हजारो रुग्णांचा अभ्यास केला.

या प्रयत्नात यश आले नसले तरी रॉबर्ट कोच यांच्या मते बॅसिलस  नावाचा जीवाणू कॉलरा पसरवण्यासाठी कारणीभूत होता. या जीवाणूचा शोध लावल्याचा चुकीचा दावा त्यांनी केला होता.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

कोचच्या पॉईझनच्या सिद्धांतावर डे यांचा विश्वास नव्हता. या सिध्दांतानुसार कॉलराचा जीवाणू एक्झोटॉक्झीन निर्माण करतो ज्याने रुग्णाचा मृत्यू होतो. या सिध्दांताला चुक ठरवण्यासाठी ७६ वर्षाचा कालावधी लागला. विब्रीओ कॉलरी  नावाच्या जीवाणूने इंटरटॉक्सीन निर्माण केल्यानंतर कॉलराची लागण होते हे डे यांनी सिध्द केले.

एवढेच नाही तर डेंनी कॉलरासाठी पहिले यशस्वी रॅबिट मॉडेल तयार केले. यामध्ये त्यांनी सशाच्या आतड्यात एक विशेष प्रकारची अखंड साखळी निर्माण केली, या साखळ्यांना वैद्यकीय भाषेत “लिगेटेड इंटेस्टीनल लूप” असे म्हटले जाते. या साखळ्यांचा वापर करून दे यांनी सिध्द केले की विब्रीओ कॉलरी  नावाच्या जीवाणूने एक विशेष प्रकारचे एंडोटॉक्झीन निर्माण केले की कॉलरा होतो.

कॉलराची लागण झाल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता का जाणवते याचे स्पष्टीकरण देण्यातही त्यांना यश आलं होतं.

डेंना मिळालेल्या या यशानंतरही १९६०-६५पर्यंत कॉलराचे थैमान चालू होतेच. १९५०मध्ये १,७६,३०७ लागण झालेल्या रूग्णांपैकी ८६,९९७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. ४९.३४ % असणारा हा मृत्यूदर १५ वर्षानंतर दे यांच्या संशोधनाच्या परिणामाने २९.९ % एवढा झाला.

म्हणूनच डॉ. संभू डे यांचं कार्य महत्त्वपुर्ण होतं. फक्त भारतीय उपखंडासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठीच. कॉलरा संबंधीत काम करत असताना डे यांनी बोस संस्थेत खरा चमत्कार केला.

बोस संस्थेत डे यांनी १९५४ पासून काम करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांचे खरे काम सुरु झाले ते १९५७ साली. ३ वर्ष काम केल्यानंतर १९६० साली त्यांनी कॉलरावर उपचार म्हणून एग्झोटॉक्सीनची निर्मिती केली.

परंतु वैज्ञानिक संशोधनाच्या सेवांची भारतात असलेली दुर्दैवी अवस्था, त्यातच वैद्यकीय संशोधनास त्यावेळी प्रतिकूल असलेले भारतीय हवामान त्यांना हे काम पूर्ण न करु देण्यास कारणीभूत ठरले. शेवटी १९७३मध्ये त्यांनी सगळ्या शैक्षणिक कामांतून आणि संशोधनांतून निवृत्ती घेतली.

१९७८ मध्ये ४३व्या नोबेल संमेलनात आपल्या भाषणात ते म्हणतात,

“१९६०च्या सुरुवातीपासूनच मी मृत आहे, नोबेल समितीने मला नेहमीच दुर्लक्षित केले. कॉलराच्या औषधावर मला गरजेचे साहित्य आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने मी त्यावर काम करणे सोडून दिले”

“डे यांचा १९८५ साली मृत्यू झाला तेव्हाही त्यांना फार प्रसिद्धी नव्हतीच. त्यांना एकही मोठा भारतीय पुरस्कार दिला गेला नाही, तसेच कोणत्याही विद्यापीठाने त्यांचा यथोचित सन्मान केला नाही ही एक खूप मोठी शोकांतिका राहील. कॉलरासारख्या विषयावर संशोधन करण्याचा त्यांचा निर्णय त्यावेळी काळानुरुप अतिशय योग्य होता.

डे यांची ही प्रेरणादायी कथा, जिच्यात त्यांच्यातील जिद्द, त्याग, समर्पण यांची ओळख आपल्याला होते, नक्कीच खूप लोकांना प्रेरित करेल. प्रसिध्दी आणि मोठमोठ्या वैज्ञानिक प्रकल्पांच्या मागे पळणाऱ्या या जगात जिथे कधीकधी वैज्ञानिक निर्मितीचीच कमतरता असते अशावेळी डॉ. संभू डे यांचे जीवन एक आदर्श चरित्र म्हणून उभे राहते”,

असे मत ‘करंट सायंस’ या वैज्ञानिक मासिकाच्या संपादकीयमध्ये पद्मनाभन बाळाराम लिहितात.

१५ एप्रिल १९८५ला वयाच्या ७०व्या वर्षी डॉ. डेंचे निधन झाले.

त्यांच्या कार्याला सलाम!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक ,युट्युब|
Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हिंदू संस्कृतीत गरुड मूर्तींची पूजा का करतात..?

Next Post

चल मेरी लुना : आज धूळ खात पडलेली लुना एकेकाळी रस्त्यावर दिमाखात धावत होती

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

चल मेरी लुना : आज धूळ खात पडलेली लुना एकेकाळी रस्त्यावर दिमाखात धावत होती

'या' दगडावरील मजकुरामुळे प्राचीन इजिप्तच्या इतिहासाचा उलगडा झाला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.