The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुनर्जन्म घेतल्याचा दावा केलेल्या या स्त्रीमुळे प्राचीन इजिप्तच्या अनेक रहस्यांचा उलगडा झालाय

by द पोस्टमन टीम
17 July 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘पुनर्जन्म’ या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे अनेकजण आहेत. अगदी याबाबत शास्त्रज्ञांना देखील कुतुहल आहे. या संकल्पनेवर आधारित जगभरात शेकडो चित्रपट देखील तयार झाले आहेत. शाहरूख खानचा ‘ओम शांती ओम’ तर तुम्ही पाहिलाच असेल! शांतीप्रिया(दीपिका पदुकोन)ला वाचवताना ओम (शाहरूख) प्रकाशचा मृत्यू होतो. मात्र, त्याचा ओम कपूर पुनर्जन्म होतो आणि तीस वर्षांनी तो शांतीच्या खूनाचा बदला घेण्यासाठी सज्ज होतो. शांतीप्रियासारख्या दिसणाऱ्या सॅन्डी (दीपिका पदुकोन)च्या मदतीनं ओम कपूर, मुकेश मेहरा(अर्जुन रामपाल)ला भीती दाखवतो. मुकेशच्या तोंडून शांतीचा खून केल्याचा कबुलीजबाब घेतो, असं या चित्रपटात दाखवलेलं आहे. ही तर झाली चित्रपटातील गोष्ट. पण, खरंच एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म होतो का आणि त्याला मागच्या जन्मीचं सगळं आठवतं का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

इंग्लंडमध्ये जन्मलेल्या एका महिलेनं तिचा पुनर्जन्म झाल्याचा दावा केला होता आणि विशेष म्हणजे ती तिच्या अगोदरच्या जन्मातील अनेक दाखले देत होती. डोरोथी लुईस एडी, असं या महिलेचं नाव होतं. डोरोथीची गोष्ट मोठी रंजक आहे.

१६ जानेवारी १९०४ रोजी लंडनमधील ब्लकहिथ भागात डोरोथी लुईस एडीचा जन्म झाला. डोरोथी ओम सेती म्हणून देखील ओळखल्या जातात. ती ब्रिटिश पुरातन वस्तूंची केअर टेकर आणि लोककलाकार होती. पुढे तिनं ‘अ‍ॅबिडोस सेती’ मंदिराची देखभाल केली आणि इजिप्शियन पुरातन वास्तू विभागाची ‘ड्राफ्ट वुमन’ म्हणूनही काम पाहिलं. हा आपला दुसरा जन्म असून पूर्वीच्या जन्मात आपण पुरातन इजिप्तमध्ये पुरोहित होतो, असं तिचं म्हणणं होतं. आपल्या याच विश्वासाच्या जोरावर अ‍ॅबिडोस येथे तिनं केलेल्या ऐतिहासिक संशोधनामुळं तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. तिचं आयुष्य अनेक लेखक, संशोधक आणि माहितीपट निर्मात्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

लंडनमध्ये आयरिश आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या डोरोथीच्या पुनर्जन्माची गोष्ट वयाच्या तिसर्‍या वर्षापासून सुरू झाली. एक दिवस खेळत असताना ती घरातील जिन्यावरून खाली पडली आणि बेशुद्ध झाली. त्यानंतर काय घडलं याबद्दल ठोस माहिती नाही. काहीजण म्हणतात की, लहानग्या डोरोथीला मृत घोषित करण्यात आलं होतं. मात्र, अचानक ती शुद्धीत आली. तर काहींचा असा दावा आहे की, पडल्यामुळं तिला ‘फॉरेन ऍक्सेंट सिंड्रोम’प्रकारची मेंदूची दुखापत झाली होती. मात्र, या अपघातामुळं तिचं संपूर्ण आयुष्य उलथापालथ झालं होतं. शुद्धीत आल्यानंतर तिच्या भाषेमध्ये कमालीचा बदल झाला होता. मध्येच ती तिच्या आई-वडिलांना ‘घरी’ घेऊन जाण्यास सांगत होती. तिला घर कुठे आहे? हा प्रश्न विचारला की, मग ती तीन वर्षांची मुलगी नि:शब्द होत होती. या प्रकारामुळं तिचे आई-वडील मात्र, प्रचंड गोंधळून गेले होते.

तिचा अपघात झाल्यानंतर जवळपास एका वर्षानं तिचे आई-वडिल तिला ब्रिटिश म्युझियममध्ये लागलेलं इजिप्शियन एक्झिबिशन पहायला घेऊन गेले. त्याठिकाणी गेल्यानंतर डोरोथी पुन्हा विचित्र बडबडू लागली. चित्रात असलेल्या सेती मंदिराकडं बोट करून ती म्हणू लागली, ते माझं घर आहे. त्याठिकाणीच मी राहत होते. ती आनंदानं उड्या मारत होती आणि इजिप्शियन मूर्तींच्या पाया पडत होती. 



तिच्या आई-वडिलांनी तिला मोठ्या प्रयत्नांनी तिथून बाहेर काढलं. मात्र, ती जशीजशी मोठी होत होती ती वारंवार अशा एक्झिबिशनला भेटी देत राहिली. एक दिवस तिची भेट प्रसिद्ध इजिप्शोलॉजिस्ट ई. ए. वॉलास बज यांच्याशी झाली. त्यांनी तिला हायरोग्लिफिक्स (चित्रालेखांचा अभ्यास करणारी शाखा) शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

वाढत्या वयानुसार तिचं प्राचीन इजिप्तविषयी असणारं आकर्षण भयानक वाढत गेलं. शाळेमध्ये इजिप्त संस्कृतीविषयी जर काही अपमानास्पद शिकवलं की ती संतापत असे. यामुळे तिला अनेकदा शाळा देखील बदलाव्या लागल्या.

वयाच्या १४ व्या वर्षी तिनं मागच्या जन्मी ‘प्रथम सेती’शी असलेल्या तिच्या लैंगिक संबंधाचं वर्णन करण्यास सुरुवात केली. मागील जन्मी तो आपला प्रियकर असल्याचा दावा तिनं केला. आताही रात्रीच्या वेळी तो आपल्या बेडवर येतो असं तिचं म्हणणं होतं. वयाच्या सोळाव्या वर्षी तिला शाळा सोडावी लागली. तिनं प्लेमाऊथ येथील एका आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या काळात तिनं आठवणाऱ्या गोष्टींचा अभ्यास आणि संदर्भ लावण्यास सुरुवात केली. मागच्या जन्मी आपलं नावं बेनट्रेश होतं आणि डोरोथी हा आपला पुनर्जन्म आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

इजिप्तच्या सेती मंदिरांत ती ईसीसची पुजारीन म्हणून काम करत होती. मात्र, तिला सेतीपासून गर्भ राहिला. ईसीसच्या पुजारीनीचं कौमार्य नष्ट होणं हा मोठा गुन्हा होता. तिला या गुन्ह्यासाठी सुनावणीसाठी उभं करण्यात आलं. याचं दरम्यान तिनं स्वत: आत्महत्या केली होती, असा दावा डोरोथीनं केला.

वयाच्या २७व्या वर्षी तिनं लंडनमधील एका इजिप्शयन नियतकालीकासाठी लिखाण करण्यास सुरुवात केली. तिथेच तिची ओळख इमाम मेगुद याच्याशी झाली आणि दोघांनी लग्न केलं. त्यानंतर ती त्याच्यासोबत कैरोला गेली. जर तिचे पुनर्जन्माचे दावे खरे असतील तर एका अर्थानं ती तिच्या घरीच गेल्याचं म्हणता येईल. कैरोमध्ये गेल्यानंतर तिला एक मुलगा झाला. त्याचं नाव तिनं ‘सेती’ असं ठेवलं. ती स्वत:ला देखील ‘ओम सेती'(अरेबिकमध्ये सेतीची आई) म्हणवून घेत होती. मात्र, ती ज्या मागच्या जन्मीच्या गोष्टी सांगत होती. त्यावरून तिच्या वैवाहिक जीवनातही गोंधळ माजला आणि तिचा पती तिला सोडून इराकमध्ये स्थायिक झाला. मात्र, डोरोथीचं इजिप्शियन प्रेम खूपच जास्तं होतं. ती कैरोमध्येच आपल्या मुलासह राहिली. तिथे तिनं ‘नॅशनल डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅन्टिक्स’मध्ये ड्राफ्टस् वुमन म्हणून काम पाहिलं. काम करत असताना तिनं अनेक अभ्यासपूर्ण लेख आणि पुस्तकं लिहिली.

वयाच्या पन्नाशीमध्ये अचानक अ‍ॅबिडोसमध्ये काम करण्याची संधी डोरोथीला मिळाली. हे तेच ठिकाण होतं जिथे मागच्या जन्मी राहिल्याचा दावा तिनं केला होता. तिथे सुरू असलेल्या उत्खननात अभ्यासकांना मदत करण्याचं काम तिच्याकडं होतं. तिचा अभ्यास आणि तिनं पुरवलेल्या माहितीची पुरातत्वशास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणात मदत झाली. १९८१मध्ये वयाच्या ७७व्या वर्षी डोरोथीचा मृत्यू झाला.

प्राचीन इजिप्शियन संस्कृतीबद्दल तिनं लिहिलेल्या असंख्य रहस्यमयी निबंधांमुळं आणि तिच्या पुनर्जन्माच्या गोष्टींमुळं स्थानिक लोकांच्या मनात तिच्याबद्दल भीती होती. 

ख्रिश्चन किंवा मुस्लीम दफनभूमी तिला मृत्यूनंतर स्वीकारणार नाही, याची डोरोथीला जाणीव होती. त्यामुळं तिनं आपल्या परसामध्ये आपल्या अंत्यविधीसाठी कबर बांधून ठेवली होती. मात्र, शेवटच्या क्षणी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी घराच्या परसामध्ये तिचा अंत्यविधी करण्यास परवानगी नाकारली. इतर कुठल्याही सामान्य व्यक्तीप्रमाणं तिचा अंत्यविधी व्हावा, हा एक व्यक्ती म्हणून तिचा हक्क असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. शेवटी ख्रिश्चन सिमेंट्रीनं डोरोथीच्या अंत्यविधीसाठी एका कोपऱ्यातील व पडीक पडलेली जागा देऊ केली. मात्र, त्याठिकाणी कुठलही बांधकाम न करण्याची त्यांनी अट घातली होती.

डोरोथी अगदी असामान्य आयुष्य जगली होती. तिला पडणाऱ्या स्वप्नांमुळं आणि आठवणाऱ्या गोष्टींमुळं तिच्या आयुष्यात अनेकदा गोंधळ उडाला मात्र, कुठल्याही दबावाला बळी न पडता तिनं आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणं जगली. ती जे सांगत होती ते खरं होतं की खोटं हा आजही वादाचा मुद्दा आहे. विल्यम शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकामध्ये, हॅम्लेट होरॅशिओला “there are more things in heaven and earth than are dreamt of in your philosophy,’  असं म्हणाला होता ते आपण विसरता कामा नये.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

…म्हणून या खटल्यात खुनाचा आरोप सिद्ध होऊनही कोर्टाने आरोपीला निर्दोष सोडलं होतं

Next Post

कुत्रा, मांजर, उंदीर ओल्ड फॅशन झाली, या माणसाने एक मगर पाळली आहे..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

कुत्रा, मांजर, उंदीर ओल्ड फॅशन झाली, या माणसाने एक मगर पाळली आहे..!

सबंध युरोपला धडकी भरवणारा 'अत्तिला हूण' आजवरच्या सर्वात क्रू*र शासकांपैकी एक होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.