The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अपघाताने कृत्रिम जांभळ्या रंगाचा शोध लागला आणि फॅशनच्या जगात क्रांतीच झाली

by द पोस्टमन टीम
21 October 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


साल १८५६. मार्च महिना.

रसायनशास्त्रज्ञ असलेला विलियम हेन्री परकीन त्याच्या प्रयोगशाळेत टाईमपास करत बसला होता. अर्थातच आसपास काही रसायनं होती. त्यातली काही रसायनं हाताळत असताना असं काहीतरी घडलं ज्यातून पुढे फॅशनच्या जगात क्रांतीच क्रांती झाली. काय घडलं होतं..? जाणून घेऊया!

परकीनचं शिक्षण लँडनच्या रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्रीमध्ये सुरु होतं. वय वर्षं १८. या वयातल्या हुशार आणि त्यातही शिक्षकांवर प्रभाव टाकण्यासाठी सतत प्रयत्नशील अशा विद्यार्थ्यांपैकी तो एक होता. युरोपातल्या कॉलेजांमध्ये ईस्टर या ख्रिस्ती सणाची सुट्टी असते. त्यातल्याच एका सुट्टीमध्ये परकीनला गृहपाठ म्हणून एक प्रयोग करायला सांगितला गेला. त्याला वाटलं आपण आपल्या डोक्याने काहीतरी रसायनं घेऊन ती एकमेकांत मिसळून प्रयोग करू शकतो. याच्या जीवावर त्याने एका प्रयोगशाळेत काही रसायनांची मिसळ सुरू केली.

कृत्रिम क्विनाईन (औषधी रसायन) तयार करण्याच्या प्रयत्नात तो होता. त्याने त्यात त्याने व्हिक्टोरियन गॅस लाईटमधून (लाईटचाच एक प्रकार, त्यातून) उरलेला कोळशाचा टार वापरला. त्यावेळी असंच वाटत असे की या गॅस लाईटमध्ये आणि उरलेल्या कोळशात एकसारखीच रासायनिक रचना असते.



जेव्हा त्याचं हे सगळं मिसळणं वगैरे संपलं तेव्हा साधं क्विनाईन त्याच्या हाती न लागता परीक्षानळीमध्ये काळ्या रंगाचा गाळ शिल्लक राहिला होता.

जेव्हा त्याने ते धुवायचा प्रयत्न केला केला तेव्हा काळा रंग गेला आणि गडद जांभळा रंग राहिला. त्याने तो रंग एका कपड्यावर घेतला. आणि त्याच्या लक्षात आलं की हा तर आपण रंग तयार केला आहे.

भले क्विनाईन तयार करण्यात परकीन अयशस्वी ठरला पण एका चुकीतून त्याने पहिला कृत्रिम रंग तयार केला होता, जे वैज्ञानिक जगातल्या अपघाती शोधांमधलं एक आश्चर्यकारक उदाहरण होतं.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

जांभळा रंग त्या काळात त्याच्या वेगळेपणामुळे प्रतिष्ठेचा समजला जात असे. १८५६ च्या त्या वसंत ऋतूमध्ये फॅशनच्या दुनियेत जांभळ्या रंगाच्या विविध छटा असलेले विविध रंग बरेच वेगळ्याच उंचीवर होते.

परकीनला लक्षात आलं होतं की या (फसलेल्या) प्रयोगात तो योग्य वाटेवरून पुढे जात आहे. त्यावेळी कृत्रिम रंग वगैरे काही माहीत नव्हतं, जे काही रंग होते ते वनस्पतींपासून, प्राण्यांपासून तयार केले जात असत. त्यावेळी लोकांच्या निवडीही मर्यादित होत्या. युरोपात मिळत होते ते ही आगदीच फिकट रंग पण त्यांच्या किंमती मात्र गगनाला भिडलेल्या असत. त्या काळी युरोपात रंग तयार करण्याची प्रक्रियाही बरीच मेहनतीची, वेळखाऊ होती आणि त्यातही जांभळ्या रंगाची प्रक्रिया तर त्याहून किचकट असे.

यासाठी खास भूमध्य सागरात फार शोधाशोध करून सापडणारे शंख वापरले जात असत. हे काम फार खर्चिकही तर होतच पण बऱ्याच मेहनतीचं आणि धडपडीचंही होतं.

जेव्हा जग औद्योगिकक्रांतीच्या पुढच्या टप्प्यात आलं तेव्हा या शोधाचं मोल समजलं. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सगळे उत्पादक तयार होते आणि ते उपयोगातही आलं. शोधाने तयार होऊ शकेल असं वादळ अजून पुरतं निर्माण होऊन लोकांच्या नजरेत आलं नव्हतं. सायमन गॅरफिल्ड त्याच्या पुस्तकात म्हणतो की,

”परकीनच्या ह्या शोधाला अनेक वर्ष पूर्ण होऊन त्या शोधाच्या ‘वाढदिवशी’ एका एकत्रीकरणात ‘CJT क्रॉनशॉ’ म्हणाला होता की जर एखाद्या ‘परी’ने येऊन जर परकीनला त्याच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा शोध लावण्यासाठीचा योग्य काळ विचारला असता तर क्षणभरात त्याने तो जागतिकीकरणोत्तर असा काळ निवडला असता ज्यात त्याच्या संशोधनाला खऱ्या अर्थाने भाव आला होता”.

फॅशन क्षेत्रातली क्रांती

परकीनने नवा ‘टायरियन जांभळा’ रंग तयार केला. प्राचीन काळी या रंगाचा वापर होत असे. पण कृत्रिमरित्या तयार केल्यावर परकीनमुळे १८५० च्या मध्यात आणि पुढेही हा रंग बायकांच्या फॅशनमध्ये अग्रणी बनला. त्यात पुढे फ्रेंच आणि स्विसकडून आलेल्या रंगछटाही मिसळून वापर होऊ लागला.

तिसऱ्या नेपोलियनची राणी युगेनी ही त्याकाळातील नवनव्या फॅशनची उद्गाती होती. १८५७ च्या उन्हाळ्यात तिने एकदा फिकट जांभळ्या रंगाचा सुती ड्रेस घालून त्यावर मोहक अशी टुमदार ‘हॅट’ घातली होती, तर तिची ही फॅशन पूर्ण पॅरिसभर बायका-पोरींनी ढापली.

आपल्या शोधातून उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने वडिलांकडून आर्थिक मदत घेऊन, शिक्षण सोडून परकीनने हा जांभळा रंग, त्याच्या विविध छटा तयार करण्यासाठी कारखाना उभा करण्याचं ठरवलं.

१८५७ च्या मेमध्ये कापड उद्योगात असलेल्या, परकीनच्याच एका सहकाऱ्याचं परकीनला अभिनंदनाचं पत्र आलं, “तु बनवलेल्या रंगांबद्दलच्या आकर्षणामुळे आणि लोकांमधल्या आवडीमुळे बायकांकडून या रंगाच्या कपड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे”.

परकीनने फक्त काही वेगळं, नवीन असं शोधलं नव्हतं तर जे काही शोधलं होतं ते रसायनशास्त्राच्या मदतीने रासायनिक प्रयोग, प्रक्रिया करून तयार केलं. जे रसायनशास्त्राचं क्षेत्र त्या काळात पैसे मिळवण्याच्या दृष्टीने अगदीच दुर्लक्षित होतं, तेच आता नावारूपाला आलं होतं. त्याच्या लंडनमधल्या घरात एका पाटीवर लिहिलं आहे की, ‘या माणसाने विज्ञानाधारित उद्योगाचा पाया रचला’.

दूरपर्यंत जाणवलेला परिणाम

या जांभळ्या रंगछटा फारकाळ टिकल्या नाहीत. १८७० नंतर बाकी नवनवे रंग फॅशनमध्ये येऊ लागले. पण परकीनच्या रंगशोधनामुळे झालेले परिणाम मात्र फार काळ टिकले. रसायनाधारित कृत्रिम रंग निर्मिती उद्योगांची जी मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याचा परिणाम आणि उपयोग फॅशन जगतात क्रांती आणण्यासाठी कारणीभूत ठरला.

त्याच्या रंगशोधनामुळे दोन मोठ्या समस्या सुटल्या – एक म्हणजे प्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे किंवा धुतल्यावर रंग फिकट होतात, ते आता कमी झालं होतं आणि रंग बनवण्यासाठीचा खर्चही कमी झाला होता.

परकीनने स्वतःच्या तंत्रज्ञानात सुधारणा करून पुढच्या काळात बरेच नवीन रंग बनवले पण महत्त्वाची बाब अशी की त्याच्या हातून रसायनशास्त्राच्या एका नव्या शाखेचा जन्म झाला होता, ज्यातून पुढे कित्येक नवे शोध लागले. त्याने आरंभलेल्या उद्योगाने केवळ नवीन रंग, रंगद्रव्य आणि रंगछटा जगात आणले नाहीत तर कृत्रिम रबर, तंतू, नायलॉन, पॉलिस्टर, पेनिसिलिन अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींची निर्मिती झाली.

तो खरं तर स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स, जेफ बेझॉस यांच्याहून फारसा निराळा नव्हता. यांच्या पंगतीतला पहिला परकीन होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे, पोरींनो-बायकांनो, आपला आवडता जांभळा रंग तयार करणाऱ्या या परकीनचे आपण आभार मानायला हवे की नको?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हुतात्मा अब्दुल हमीद यांचं भूत अजूनही पाकिस्तानी सैन्याला सतावत असेल

Next Post

या माणसाने पेप्सी-कोलापेक्षा दूध पिणं ‘कुल’ आहे हे लहान मुलांच्या मनावर ठसवलं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या माणसाने पेप्सी-कोलापेक्षा दूध पिणं 'कुल' आहे हे लहान मुलांच्या मनावर ठसवलं

सिंहालाच कुस्तीत हरवणारा पैलवान म्हणजे युजेन सॅंडो ..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.