The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर जाऊन इस्लाम स्वीकारला होता का…?

by द पोस्टमन टीम
13 September 2020
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


चंद्रावर पाउल ठेवणारा पहिला माणूस म्हणून नील आर्मस्ट्रॉंग यांचे नाव इतिहासात कायमच अजरामर राहील. नासाच्या अपोलो ११ उपक्रमांतर्गत चंद्रावर अंतराळवीरांना पाठवण्याची मोहीम यशस्वी झाल्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग यांचे नाव संपूर्ण जगभर ओळखले जाऊ लागले.

नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पाउल ठेवल्यानंतर तिथून रेडीओ लहरींद्वारे पृथ्वीवासियांना पाठवलेल्या संदेशात म्हटले होते की, “मानवी कुतुहलाचे हे एक मोठे यश असून, मानवी जिज्ञासाची हे छोटेसे पाउल उत्तुंग भविष्याच्या दिशेने झेपावेल.”

यानंतर नील आर्मस्ट्रॉंग यांची ख्याती सप्त खंडात पसरली. नील आर्मस्ट्रॉंग यांच्या या ख्यातीसोबतच काही अफवाही तितक्याच वेगाने पसरल्या. ज्यांचे स्वतः नील, नासा आणि अमेरिकी सरकारनेही वारंवार खंडन केले आहे.

नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावरून पृथ्वीवर परतल्यानंतर अशी चर्चा सुरु होती, की चंद्रावर नील यांना अजान ऐकू आली. ते ध्वनी नेमके कशाचे आहेत हे त्यांना त्यावेळी लक्षात आले नाही.

परंतु जेंव्हा ते इंडोनेशियात गेले तेंव्हा त्यांना समजले की चंद्रावर त्यांनी ऐकलेले ते ध्वनी म्हणजे अजान होती. यानंतर त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला.



नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर जाण्याचा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर त्यांच्या प्रसिद्धीत भर पडत गेली. कित्येक वर्षे ही अफवा चर्चेत राहिली आणि यात अनेक किस्स्यांची भर पडत राहिली. या अफवेला खरी सुरुवात ८०च्या दशकातच झाली.

यावेळी असा दावा करण्यात आला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर अपोलो ११ यान उतरताच यातील अंतराळवीरांना काही वेळाने एक विचित्र आवाज ऐकू आला. परंतु त्यांना त्या भाषेचा किंवा ध्वनीचा अर्थ माहिती नव्हता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

नंतर आर्मस्ट्रॉंग यांनी जगातील काही महत्वाच्या देशांचे दौरे करण्याचा कार्यक्रम आखला. यावेळी ते इजिप्तमध्ये गेले. इजिप्तमध्येही त्यांना तोच आवाज ऐकू आला जो त्यांनी चंद्रावर ऐकला होता.

जेंव्हा या आवाजाबद्दल त्यांनी अधिक चौकशी केली तेंव्हा त्यांना कळले की हा ध्वनी अजानचा आहे. हे ऐकल्यावर त्यांनी लगेचच इस्लाम धर्माचा स्वीकार केला.

त्याचवेळी इंडोनेशियातील एक गायक सुहाएमी याने एक गाणे लिहिले. ज्यात त्याने या दाव्याचा संदर्भ घेऊन ‘चांद पर अजान की आवाज गुंजी’ अशा ओळी लिहिल्या होत्या. आणि याच गाण्यात पुढे त्याने नील आर्मस्ट्रॉंगने इस्लाम धर्म कुबूल केल्याचे लिहिले होते.

इंडोनेशियात हे गाणे बरेच गाजले. याच गाण्याच्या आधाराने इंडोनेशियातील प्रसार माध्यमातून या प्रकारचे दावे केले जाऊ लागले. अनेक वृत्तपत्रांनी नील आर्मस्ट्रॉंग यांनी इस्लाम कुबुल केल्याच्या बातम्या छापल्या.

ही अफवा इतकी पसरली की, १९८३ साली स्वतः अमेरिकन सरकारला ही निव्वळ अफवा असल्याचे जाहीर करावे लागले.

१९६९ सालच्या नासाच्या या चंद्र मोहिमेत नील आर्मस्ट्रॉंगसोबत एड्वीन एलीड्रीन देखील होते. नील आर्मस्ट्रॉंगनंतर १९ मिनिटांनी एड्वीन एलीड्रीन चंद्रावर उतरले. दोघांनी मिळून पुढील अडीच तास चंद्रावर वेळ घालवला.

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर दोघांनी काय केले याचा तपशील सादर करणारा एक लेख एलीड्रीन यांनी लिहिला. परंतु या संपूर्ण लेखात त्यांनी कुठेही कसलाही विचित्र ध्वनी ऐकल्याचे लिहिले नाही. त्यामुळे ही निव्वळ एक अफवाच होती हे यावरून सिद्ध होते.

पण, तरीही या चर्चा थांबल्या नाहीत. आर्मस्ट्रॉंग यांच्यासोबत काम करणारे त्यांचे एक सहकारी विवियन यांनी एशियन रिसर्च सेंटर इंटरनॅशनल ख्रिश्चन फेलोशिपचे डायरेक्टर फील पार्शल यांना पत्र लिहून कळवले होते की, आर्मस्ट्रॉंग यांनी इस्लाम कबूल केल्याच्या किंवा चंद्रावर अजान ऐकल्याच्या ज्या चर्चा सुरु आहेत त्या निव्वळ अफवांवर आधारित आहेत.

स्वतः आर्मस्ट्रॉंग यांच्यावतीने हा खुलासा करण्यात येत आहे की, त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारलेला नाही. आणि या चर्चेत अजिबात तथ्य नाही.

मलेशिया, इंडोनेशिया आदी देशात ज्या बातम्या छापल्या जात आहेत त्यांना सत्यतेचा आधार नाही. या बातम्या म्हणजे पत्रकारीतेचा दर्जा घसरल्याची लक्षणे आहेत. या बाबतीत स्वतः आर्मस्ट्रॉंग टेलिफोनच्या माध्यमातून मुलाखत देण्यासही तयार आहेत.

यावरून त्याकाळात या अफवांनी चांगलाच जम बसवला होता असे दिसते. आर्मस्ट्रॉंग यांच्या ‘फर्स्ट मॅन’ नावाच्या चरित्रातही या अफवेचा उल्लेख केला असून त्याचे खंडन करण्यात आले आहे. यात असाही उल्लेख करण्यात आला आहे की, जगभरातील अनेक संस्था नील आर्मस्ट्रॉंग हे त्यांच्या संस्थेचे सदस्य असल्याचा दावा करतात.

पण, अशा संस्थांनी केलेले दावे देखील पोकळ असून त्यांना कुठल्याही सत्याचा आधार नाही. अशा प्रकारचे तथ्यहीन दावे करून हे लोक आर्मस्ट्रॉंग यांच्या प्रसिद्धीचा आणि प्रतिष्ठेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचेही या पुस्तकात म्हटले गेले.

अशा प्रकारे सातत्याने या दाव्याचे खंडन करण्यात आले, यावरूनच आर्मस्ट्रॉंग यांनी इस्लाम काबुल केल्याची बातमी ही एक शुद्ध अफवा होती हे सिद्ध होते. नासाने १९६९ साली यशस्वी ठरलेल्या या चांद मोहिमेची कागदपत्रे नासाने आपल्या वेबसाईटवरून प्रकाशित केली. त्यातही चंद्रावर कुठला विचित्र आवाज ऐकल्याची नोंद नाही.

आर्मस्ट्रॉंग यांनी कित्येक ठिकाणी मुलाखती दिल्या, तेंव्हाही त्यांना या कथित धर्मांतराच्या प्रश्नाना उत्तरे द्यावी लागत. आपल्या प्रकट मुलाखतीतही आर्मस्ट्रॉंग यांनी हे दावे सपशेल चुकीचे असल्याचे म्हटले.

शेवटी शेख मुहम्मद सालीह अल मुनाज्जीद यांनी एक फतवा जरी केला. या फतव्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की, आर्मस्ट्रॉंग यांनी इस्लाम कबुल केल्याचा दावा ही निव्वळ अफवा असून, त्यांनी इस्लाम स्वीकारलेला नाही. हे सगळे दावे काल्पनिक असून याला सत्याचा आधार नाही.

या संपूर्ण हकीकतीचा सखोल अभ्यास केल्यानंतर आम्हाला यात कसलेही तथ्य आढळले नाही. त्यामुळे नील आर्मस्ट्रॉंग यांनी इस्लाम कबुल केल्याच्या बातमीवर कुणीही इथून पुढे चर्चा करू नये. अशाप्रकारच्या अफवांना बळ देऊ नये.

स्वतः मौलवींनी अशा प्रकारचा फतवा जाहीर केल्यानंतर या चर्चा विरत गेल्या. पुन्हा कधीही कुणीही याचा उल्लेख केला नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या जुनागढच्या नवाबाला तिथे कुत्रंही विचारत नाही

Next Post

आपल्या पोरांसाठी तर मार्व्हल आणि डीसी दोन्ही चांदोबाच होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आपल्या पोरांसाठी तर मार्व्हल आणि डीसी दोन्ही चांदोबाच होता

हिंदीसोबतच या पाच भाषा जगातील सगळ्यात कठीण भाषा मानल्या जातात

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.