The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्राझीलच्या प्रसिद्ध ‘स्नेक आयलंड’वरून सापांची संख्या का कमी होतेय..?

by द पोस्टमन टीम
1 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


ब्राझील, दक्षिण अमेरिका खंडातील आकारानं सर्वात मोठा देश. दोन गोष्टी या देशाची ओळख झालेल्या आहेत. एक म्हणजे फुटबॉल आणि दुसरी म्हणजे अमेझॉन नदी. या देशावर निसर्गानं भरभरून कृपा केलेली आहे. अमेझॉनच्या खोऱ्यातील विस्तीर्ण विषुववृत्तीय जंगलं (रेन फॉरेस्ट) अनेक सजीवांसाठी वरदान आहेत. त्याठिकाणी कित्येक परिसंस्था आणि नैसर्गिक साधन संपत्ती आढळते.

ब्राझीलमधील निसर्गसौंदर्याबद्दल ऐकून दरवर्षी लाखो पर्यटक, पर्यावरणप्रेमी आणि संशोधक या देशातील विविध ठिकाणांना भेटी देतात. मात्र, ब्राझीलमध्ये अशी काही ठिकाणं आहेत. ज्याठिकाणी एकदा जर तुम्ही पाऊल ठेवलं तर जिवंत परत याल की नाही याची शाश्वती नाही!

‘इल्हा दा क्विमादा ग्रँड’ हे बेट अशाच ठिकाणांपैकी एक आहे. हे बेट ‘स्नेक आयलंड’, या नावानं कुप्रसिद्ध आहे. 

असं काय कारण आहे की, या बेटाला स्नेक आयलंड हे नाव पडलं?



अटलांटिक महासागरात ‘इल्हा दा क्विमादा ग्रँड’ हे बेट आहे. साओ पाउलोमधील इतनाहेम नगरपालिकेच्या नियंत्रणात हे बेट आहे. ४३ हेक्टरच्या भूभागावर या बेटाचा पसारा असून काही भाग घनदाट विषुववृत्तीय जंगलांनी तर काही भाग उघड्या-बोडक्या डोंगरांनी व्यापलेला आहे. 

साओ पाऊलोपासून साधारण ९० मैल अंतरावर वसलेलं हे बेट प्रथमदर्शी कुणालाही भुरळ घालेल असंच आहे. मात्र, प्रत्येक ब्राझिलियन व्यक्तीच्या मनात या बेटाची द*हश*त आहे. त्याला कारणही तसंच आहे. जगातील सर्वात जीवघेण्या सापांपैकी एक असलेल्या ‘गोल्डन लान्सहेड वायपर्स’चं हे बेट एकमेव वस्तीस्थान आहे. याठिकाणी तब्बल २ ते ४ हजार गोल्डन लान्सहेड सापडतात.

‘गोल्डन लान्सहेड वायपर’ हा जगातील सर्वात विषारी साप असलेल्या पीट वायपरचाच एक प्रकार आहे. फक्त ‘क्विमादा ग्रँड’ बेटावरच तो आढळतो. या सापाने दंश केल्यानंतर तासाभरातचं व्यक्तीचा जीव घेऊ शकतं. म्हणजे चुकून जरी तुम्ही या बेटावर गेलात आणि हा साप चावला तर जगण्याचे चान्सेस जवळपास शून्यच आहेत. कारण बेटावरून साओ पाउलोचं अंतर ९० मैल आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

सर्पदंशाच्या दोन अतिशय भयानक गोष्टी ब्राझीलच्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. सापांच्या भीतीमुळं याठिकाणी मनुष्यवस्ती नाही.

एक दिवस एक उपाशी मासेमार या बेटावर गेला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृतदेह त्याच्याचं बोटीत सापडला. त्याच्या अंगावर शेकडो ठिकाणी सर्पदंशाच्या खूणा होत्या. त्यावरूनच कल्पना करता येऊ शकते की, त्याचा मृत्यू किती भयानक पद्धतीनं झाला असेल. 

१९०९ ते १९२० या काळात याठिकाणी एक कुटुंब राहिल्याचं सांगितलं जातं. किनारी भागात असलेल्या लाईटहाऊसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं हे कुटुंब होतं. एक दिवस सापांच्या एका झुंडीनं त्यांच्या घरात प्रवेश करण्यात यश मिळवलं आणि संपूर्ण कुटुंबाचा जीव गेला.

या बेटावर इतके साप कसे आणि कुठून आले याबाबत देखील एक दंतकथा सांगितली जाते. चाचेगीरी करणाऱ्यांनी या बेटावर आपली लूट लपवली होती. ती सुरक्षित रहावी म्हणून त्यांनीच याठिकाणी साप सोडले होते, असं लोकं सांगतात. मात्र, जवळपास ११ हजार वर्षांपूर्वी समुद्राची पाणीपातळी एतकी वाढली की, बेट ब्राझीलच्या मुख्यभूमीपासून दूरावलं. त्यामुळं याठिकाणी असलेल्या सापांच्या प्रजाती याच ठिकाणी अडकल्या.

बेटावर मनुष्य वस्ती नाही इतर प्राणी नाहीत त्यामुळं सापांना कुठलाही अडथळा नाही. परिणामी त्यांची संख्या झपाट्यानं वाढत गेली, असं अभ्यासक सांगतात. विविध ऋतूंमध्ये बेटावर येणारे स्थलांतरित पक्षी या सापांच्या भक्ष्यस्थानी सापडतात.

साधारण साप आपली शिकार शोधतात, दंश करतात आणि विषानं शिकारीचा मृत्यू होण्याची वाट पाहतात. मात्र, लान्सहेड साप एकदा पक्ष्यांना दंश करून त्यांना शोधू शकत नाहीत म्हणून ते दंश करतानाचं अतिशय शक्तीशाली विष तयार करतात.

कोणत्याही साधारण सापाच्या तुलनेत तीन ते पाचपट भयानक असतं. या विषामुळं त्वचा वितळते. अगदी मानवाचं मांस देखील वितळू शकतं.

सापांच्या धोक्यामुळं ब्राझील सरकारनं या बेटावर जाण्यासाठी बंदी घातलेली आहे. जरी कायदेशीर बंदी नसती तरी बेटाबद्दल माहिती असणारा व्यक्ती इथे जाण्याची हिंमत करणं कठीणच आहे. कारण बेटावरील काही ठिकाणी प्रत्येक चौरस मीटरमध्ये एक साप इतक्या मोठ्या प्रमाणात साप सापडतात.

गोल्डन लान्सहेडनं दंश केल्यानंतर किडनी फेल होते, ब्रेन हॅमरेज होते, यकृतामध्ये रक्तस्त्राव होतो आणि पेशींचं पाणी होतं. यावरून अंदाज लावता येऊ शकतो की, लान्सहेड किती भयानक मृत्यू देतो. 

ब्राझिलियन नौदल, येथे असलेल्या लाइटहाऊसची पाहणी करण्यासाठी वर्षातून एकदा बेटावर जाते. १९२० पासून हे लाइटहाऊस पूर्णपणे स्वयंचलित केलेले आहे.

जीवशास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी हे बेट एक महत्त्वपूर्ण प्रयोगशाळाच आहे. गोल्डन लान्सहेडचा अभ्यास करणारे अभ्यासक विशेष परवानगी घेऊन बेटावर जाऊ शकतात. ब्राझीलमधील सर्पदंशाने झालेल्या मृत्यूंपैकी ९० टक्के मृत्यू हे लान्सहेड सापाच्या दंशानं होतात. गोल्डन लान्सहेड आणि लान्सहेड हे दोन्ही पीट वायपरचेचं प्रकार आहेत.

अभ्यासकांच्या मते, जर त्यांनी गोल्डन लान्सहेडच्या विषावर तोड शोधला तर कुठल्याही विषारी सापाच्या विषावर तो परिणामकारक ठरू शकतो. काही शास्त्रज्ञांना असंही वाटतं की, औषधोपचारात या सापाचं विष एक उपयुक्त साधन ठरू शकतं. ब्राझीलियन बुटान्टन इन्स्टिट्यूटमध्ये फार्मास्युटिकलच्या उद्देशानं विषारी सरीसृपांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ मार्सेलो दुआर्ते यांनी एका मुलाखतीमध्ये गोल्डन लान्सहेडच्या विषातील वैद्यकीय क्षमतेबाबत माहिती दिलेली आहे. ‘आम्ही विषाच्या विविध शक्यता पडताळून पाहत आहोत. विविध हार्ट डिसीजवर गोल्डन लान्सहेडचं विष प्रभावी असल्यास सिद्ध झालं आहे, ‘ असं मार्सेलो म्हणाले होते.

वैज्ञानिक महत्त्वामुळं गोल्डन लान्सहेडला काळ्या बाजारात मोठी मागणी आणि किंमत आहेत. हे साप मिळवण्यासाठी वन्यजीव तस्कर (बायोपायरेट्स) या बेटावर जाण्याचा प्रयत्न करतात. काहींना त्यात यशही येतं. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका गोल्डन लान्सहेडला १० हजार ते ३० हजार अमेरिकन डॉलर्सपर्यंत किंमत मिळते.

गेल्या काही वर्षांमध्ये ब्राझिलियन नेव्हीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू केली आहे. त्यामुळं सांपांचा अधिवास धोक्यात आला आहे. गेल्या १५ वर्षात सांपांची संख्या जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाली असल्याचं काही अभ्यासक सांगतात. सापांची संख्या कमी होणं ही कदाचित मानवासाठी चांगली बातमी ठरू शकते मात्र, गोल्डन लान्सहेड प्रजातीसाठी नक्कीच ही धोक्याची घंटा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारतीय हॉकी संघाला जेव्हा कोणी प्रायोजक मिळत नव्हता तेव्हा नवीन पटनाईक पुढे आले

Next Post

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी भगवतगीतेची शपथ घेऊन पदभार स्वीकारला होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी भगवतगीतेची शपथ घेऊन पदभार स्वीकारला होता

या माणसाचा IQ न्यूटनपेक्षा जास्त आहे, पण अचिव्हमेंट्स त्याच्या निम्म्याही नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.