The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अपयश झाकण्यासाठी परिस्थितीला दोष देताय, मग चेतन सकारियाची ही स्टोरी वाचाच

by द पोस्टमन टीम
24 June 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आयपीएलमुळे अनेक नवख्या खेळाडूंची जगाला ओळख होते. या स्पर्धेनं कित्येक खेळाडूंचं आयुष्यच बदलून गेलंय. आयपीएलनं अशाच एका अष्टपैलू खेळाडूची ओळख आपल्याला करून दिली. त्याचं नाव आहे चेतन सकारिया!

चेतन सकारिया हे नाव क्रिकेट जगात नवं असलं तरी अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपाला येत आहे. २०२१ साली चेतन सकारियानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच त्यानं चमकदार कामगिरी केली. आयपीलच्या राजस्थान रॉयल्सनं फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या लिलावात १.२० कोटी रुपये देत चेतन सकारियाला आपल्या टीममध्ये सामावून घेतलं. या खेळाडूनंही पंजाबविरुद्धच्या सामन्यात ३ फलंदाजांना बाद करुन धडाकेबाज एन्ट्री केली, राजस्थाननं खेळलेल्या सहा सामन्यांत उत्तम गोलंदाजी केली

कोणत्याही गोष्टींमध्ये सतत नकारात्मकता शोधण्यात, त्यात परिस्थितीला आणि सतत दुसऱ्याला नावं ठेवणाऱ्या आपल्या सर्वांसाठीच चेतन सकारियाचा प्रवास प्रेरणादायी आहे.

२३ वर्षाच्या चेतन सकारियाचं नाव सहा वर्षांपूर्वी कुचबिहार ट्रॉफीमध्ये सर्वप्रथम चर्चेत आलं होतं ते त्यानं त्या स्पर्धेतील सहा मॅचमध्ये १८ विकेट्स घेतल्या तेव्हा!

या कामगिरीमुळे त्याची चेन्नईतील एमआरएफ पेस फाऊंडेशनसाठी निवड झाली. याठिकाणी जाण्यासाठी चेतनकडं चांगले बुटही नव्हते. सौराष्ट्राचा सिनियर खेळाडू शेल्डन जॅक्सननं चेतनला बुट घेऊन दिले. ‘मला नेटमध्ये आऊट केलंस तर तुला बुट घेऊन देईल’ असं चॅलेंज जॅक्सननं चेतनला दिलं होतं. चेतननं ते चॅलेंज पूर्ण केलं आणि जॅक्सननं दिलेल्या नव्या बुटांसह चेतन सकारिया एमआरएफ फांऊडेशनमध्ये गेला.



अर्थात, वाटतो तेवढा सोपा प्रवास नव्हता हा. त्यानं आज इथपर्यंत पोहोचण्यासाठी कितीतरी कष्ट घेतलेत. घरची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे चेतनचं क्रिकेट एक वर्ष थांबलं होतं. यावेळी त्याच्या मामांनी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी मदत केली होती. चेतनला इंजिनियर व्हायचं होतं. पण त्याने शिक्षण थांबवलं आणि दोन वर्ष बुक स्टॉलवर नोकरी धरली.

चेतन सौराष्ट्रच्या अर्थात गुजरातच्या वतीने देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. अलीकडेच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं. यात त्याने पाच सामन्यांमध्ये १२ विकेट घेतल्या होत्या. खरंतर, सय्यद मुश्ताक अली स्पर्धा सुरु असताना चेतन सकारियाच्या भावाने आत्मह*त्या केली. चेतनच्या खेळावर याचा परिणाम होऊ नये म्हणून घरच्यांनी ही बातमी त्याच्यापासून सहा दिवस लपवून ठेवली होती. गेल्या वर्षी सौराष्ट्रला रणजी करंडक स्पर्धेत विजय मिळवून देण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

चेतन सकारियाने खूप संघर्ष पार करत त्याचं क्रिकेटमधलं करिअर बनवलं आहे. सर्वसामान्य परिस्थितीत आपल्या खेळण्याच्या जिद्दीनं त्यानं स्वतःला सिद्ध केले आहे. हा वेगवान गोलंदाज अतिशय साधारण कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील टेम्पोचालक होते. पाच वर्षांपूर्वीपर्यंत तर घरात टीव्हीदेखील नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमी असल्याने त्याने चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु त्याच्या परिचित व्यक्तीने त्याला त्यांच्या दुकानात काम करायला सांगितले आणि त्याच्या शिक्षण आणि खेळाचा खर्च उचलला. त्यांना त्याच्या डोळ्यातील चमक जाणवत होती की चेतन सकारिया हा नक्कीच खेळात स्वतःच्या जिद्दीने काहीतरी वेगळं करणार आणि आज चेतन सकारिया याने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळून कुटुंबाचं नशीब उजळून टाकले आहे.

राजस्थान रॉयल्सचा कार्तिक त्यागी जखमी झाल्याने पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात चेतनला संधी मिळाली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे मैदान हे बॅट्समनसाठी कायमच वरदान ठरत असते.

पंजाबच्या टीममध्ये अनेक चांगले बॅट्समन होते, त्यांनी राजस्थानविरुद्ध २२१ रन करत बॅटींगची शक्ती देखील दाखवली.

बॉलर्सची कसोटी पाहणाऱ्या पिचवर आणि प्रतिस्पर्धी टीम विरुद्ध सौराष्ट्राचा फास्ट बॉलर असलेल्या चेतननं आपली ताकद सिद्ध केली. ४ ओव्हर्समध्ये ३१ रन देत मयांक अग्रवाल, केएल राहुल आणि झाय रिचर्डसन या तिघांना आऊट केलं.

राजस्थानच्या इनिंगचा पहिला आणि शेवटचा हे दोन्ही ओव्हर चेतननं टाकले. T20 क्रिकेटमध्ये ‘पॉवर प्ले’ आणि ‘डेथ ओव्हर्स’ या दोहोंत चांगली बॉलिंग करून चेतननं पहिल्याच सामन्यात त्याचं कर्तुत्व दाखवून दिलं. त्याचबरोबर त्यानं निकोलस पुरनचा एक अविस्मरणीय कॅच घेतला. राजस्थाननं खराब फिल्डिंग करत तीन कॅच सोडल्या असताना चेतननं टीमचा फिल्डिंगचा स्तरही उंचावण्याचा प्रयत्न केला होता आणि या पहिल्याच सामन्यातून अनेक भारतीयांची मनं जिंकून घेतली.

एवढंच नाही तर भारतीय संघातही स्वतःचं स्थान निर्माण केलं. नुकताच भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलाय तर दुसरा एक संघ आता श्रीलंका दौऱ्यावर जातोय. जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात विराट-रोहित-बुमराह-शमी असे दिग्गज खेळाडू नसतील. काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजी करत आयपीएलमध्ये आपले चांगले प्रदर्शन करण्याऱ्या चेतन सकारियानं या टीममध्ये स्वतःचा समावेश करून घेतलाय.

आयपीएल लिलावानंतर चेतन सकारिया कोट्याधीश झाला. पण कोरोनामुळे त्याच्या वडिलांचंही निधन झाल्यानं आता घरात तो एकमेव कमावता व्यक्ती आहे. या स्पर्धेतून मिळणाऱ्या पैशातून राजकोटमध्ये चांगलं घर घेण्याचं त्याचं स्वप्न आहे.

परिस्थितीशी झगडून त्यावर मात करत चेतन सकारियानं जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर इथवरचा प्रवास केला आहे. त्याच्या भावी कारकीर्द अनेकांना प्रेरणा देणारी असेल यात शंकाच नाही. त्याच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मंगळावर व्हेकेशनला पाठवतो म्हणून या कंपनीने लोकांना पद्धतशीर चुना लावला होता

Next Post

या गावातले लोक एकमेकांशी चक्क पक्षांच्या भाषेत संवाद साधतात

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

या गावातले लोक एकमेकांशी चक्क पक्षांच्या भाषेत संवाद साधतात

अमेरिकेने एकदा ब्रिटनवर ह*ल्ला केला होता पण ब्रिटनने एवढं सिरियसली घेतलं नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.