The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उत्तम वास्तुकलेचा नमुना असूनही हे शहर आज ओस पडलंय..!

by द पोस्टमन टीम
25 July 2025
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भूतप्रेत, पिशाच्च ह्या सगळ्या मानवी संकल्पना आहेत. कुणी याला अंधश्रद्धा मानतं तर कुणीचा यावर विश्वास असतो. बरेचदा आपल्या मित्रमैत्रीणींमध्ये, कुटुंबात हा विषय निघाला की निरनिराळे गमतीदार किस्से ऐकायला मिळतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवानुसार तिखटमीठ लावून गोष्टी सांगतो. कधी आपला विश्वास बसतो, कधी नाही!

या मागे युक्तीवाद असाही केला जातो की, ज्याप्रमाणे या ब्रम्हांडात चांगल्या शक्ती आहेत, तशा वाईट शक्ती देखील आहेत. या सगळ्या संकल्पना मानवी विचारांच्या पलीकडे आहेत. पण जर एखाद्या शहरात माणसं नाही तर भुतं राहतात असं कुणी म्हणालं तर?

क्रँको हे शहर ‘भूतांचं शहर’ अर्थात ‘सिटी ऑफ घोस्ट’ म्हणून ओळखलं जातं. २०१० साली ‘वर्ल्ड मॉन्युमेंट फंड्स’च्या यादीत या शहराचं नाव समाविष्ट करण्यात आलं.

विसाव्या शतकाच्या शेवटी तेथील सर्व नागरिकांनी या शहराचा त्याग केला. इटली या देशाच्या दक्षिणी टोकावर हें सुंदर व सुबक पण निर्जीव शहर वसलेलं आहे. टोरांटोच्या खाडीपासून ४० किलोमीटरच्या अंतरावर ‘बूट ऑफ इटली’च्या कमानीवर स्थित आहे.



शहराच्या संरक्षणासाठी हे शहर उभं एका डोंगरावर बांधलं आहे. शहराची बांधणी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे.

आक्रमकांपासून वाचवण्यासाठी योग्य ती काळजी शहराच्या बांधणीत विचारात घेतली गेली. त्यामुळे कुठल्याही शत्रूची या शहराकडे बघण्याची हिंमत कधी झाली नाही. या शहराची बांधणी जशी बुलंद आहे, त्याच प्रमाणे तिथले एकेकाळचे रहिवासी देखिल तितकेच बुलंद होते. शहराने अनेक बिकट प्रसंग बघितले.

या सगळ्या प्रसंगाशी सामना करून जवळपास एकोणिसाव्या शतकापर्यंत आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं. शतकाच्या शेवटी पूर , दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांनी शहराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. जवळपास १३०० नागरिकांनी आपलं वास्तव्य दक्षिण अमेरिकेत हलवलं. त्यानंतरसुद्धा भूस्खलन १९७२ चा पूर, १९८० चा भूकंप यामुळे शहराची परिस्थिती अधिक बिकट होत गेली व शेवटी १८०० नागरिकांना हलवण्यात आले. हे स्थलांतर कुणाच्याच इच्छेनुसार होत नव्हतं, पण दुसरा उपाय नसल्यामुळे जड अंतःकरणाने नागरिकांनी शहर सोडलं. पण एका व्यक्तीने शहर सोडण्यास नकार दिला. आयुष्याचे शंभर वर्ष आपल्या जन्मभूमीवर घालवेल असं सांगून त्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला!

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

पुराव्यांनुसार जवळपास ८व्या शतकापासून वसाहत होती. काही ग्रीक साधू येथे राहत. त्यावेळी ‘सोन्याचा डोंगर’ अर्थात ‘माउंटेन ऑफ गोल्ड’ म्हणून अशा या शहराचा उल्लेख आढळतो. पण इथे सोनं म्हणजे नागरलेली जमीन किंवा सुपीक जमीन या अर्थाने!

इ.स पूर्व १०६०, साली अर्लाण्डो नावाचा राजा तेथे राज्य करत होता असा उल्लेख आहे. त्यानंतर सत्ता नोबेलमन एर्बर्टोकडे गेली. तेराव्या शतकात तिथे एक विद्यापीठाची स्थापना झाली. यामुळे शहराची लोकसंख्या वाढत गेली.

१६०० साली शहरात पहिल्यांदा लँडस्लाइड म्हणजेच भूस्खलेन झालं. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. या संकटातून शहर पुर्ण सावरलं नव्हतं तर आणखी एक भयंकर संकट शहरावर कोसळलं. १६५६ साली मृत्युने थैमान घातला ‘ब्लँक डेथ’ या आजाराची साथ पसरली. या आजाराने अनेकांचे बळी घेतले आणि लोकसंख्या कमी होत गेली.

१८१५ साली या शहराला दोन जिल्ह्यांमधे विभागाण्यात आलं. १८१६ साली इटलीच्या एकीकरणानंतर सूत्र कार्मिन क्रोकोकडे गेले.

आज हे शहर अनेक हॉलीवूडच्या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी वापरलं जातं. पण या शहराचे सौन्दर्य टिकवण्यासाठी एकावेळी ३५ लोकांनाच तिथे राहण्याची परवानगी मिळते. २००७ साली पूर्वी राहत असलेल्या नागरिकांनी एकत्र येवून क्रँको सोसायटीची स्थापना केली. ‘या शहराच्या आठवणी कायम आमच्या मनांत कोरल्या गेल्या आहेत’, असं मत स्थानिक व्यक्त करतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हॉलिवूड सुपरस्टार ‘जॅकी चॅन’चे वडील जासूस तर आई स्मग्लर होती

Next Post

ग्रहांच्या प्रदक्षिणेचे नियम योहान्स केप्लरने मांडले पण संशोधन टिको ब्राहचे होते..!

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

ग्रहांच्या प्रदक्षिणेचे नियम योहान्स केप्लरने मांडले पण संशोधन टिको ब्राहचे होते..!

एकदा सचिनने पाकिस्तानकडून फिल्डिंग केली होती, त्यातच कपिलचा कॅचही सोडला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.