The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१० हजार उधारीवर घेऊन सुरु केलेला व्यवसाय आज करोडोंची उलाढाल करतोय..!

by Heramb
20 September 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


तुम्ही मफ्टी या कपड्याच्या ब्रँडचे नाव नक्कीच ऐकले असेल. होय, पुरुषांच्या फॅशनचा हाच तो प्रसिद्ध भारतीय ब्रँड. मफ्टीची सुमारे ४०० कोटींची वार्षिक उलाढाल आहे. पण मफ्टी एक ‘ब्रँड’ बनण्याची कथा फारच रंजक आणि प्रेरणादायी आहे. जर आपल्यापैकी कोणाला व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर ही कथा नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते.

मफ्टीचे मालक ‘कमल खुशलानी’ यांनी १० हजार रुपये उधार घेऊन शर्ट्स बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्या दूरदृष्टी आणि मेहनतीमुळे आज तोच व्यवसाय कोट्यवधी रुपयांचा झाला आहे. चला तर मग मफ्टीआणि कमल खुशलानी यांच्या यशस्वी प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

कमल खुशलानी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९६६ रोजी झाला. ते मुंबईत राहिले आणि वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. कमल एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. वय वर्ष १९ असताना त्याचे वडील वारले. उदरनिर्वाह चालवण्यासाठी कमलने एका व्हिडिओ कॅसेट कंपनीत नोकरी सुरु केली.

कमल खुशलानी यांना सुरुवातीपासूनच फॅशनची चांगली जाण होती. हळूहळू फॅशन हीच त्यांची आवड बनली. त्यांना फॅशन उद्योगात काम करून पैसे मिळवायचे होते आणि केवळ इतकेच नाही तर नावही कमावायचे होते.



अखेरीस १९९२ साली त्यांनी ‘मिस्टर अँड मिस्टर’ ही कंपनी सुरु केली. या कंपनीने पुरुषांसाठीचे शर्ट्स तयार करून विकले. ही कंपनी सुरु होण्यासाठी कमल खुशलानी यांनी त्यांच्या मावशींकडून १० हजार रुपये उधार घेतले आणि कमलची व्यापारी म्हणून कारकीर्द सुरु झाली.

कमलचे काम चांगले चालले होते. आयुष्यही छान चालले होते, पण कमल आपल्या कामावर समाधानी नव्हता. आपण आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करत नाही असे त्याला वाटले. जर त्याने आपली सर्व शक्ती लागू केली तर तो केवळ देशातच नव्हे तर जगभरात फॅशनची नवी लाट निर्माण करू शकतो, असा त्याचा विश्वास होता.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

‘मिस्टर अँड मिस्टर’ सुरु केल्यानंतर ६ वर्षांनी, १९९८ साली कमल खुशलानी यांनी ‘मफ्टी’ नावाचा फॅशन ब्रँड सुरु केला. हा फॅशन ब्रँड कमल खुशालनी यांनी एकट्यांनीच सुरु केला. त्यांच्याकडे एक दुचाकी होती, त्यावर बरेच किलो कापड भरून वर्कशॉपमध्ये नेले जात होते.

नव्वदीचे दशक हा एक असा काळ होता जेव्हा भारत फॅशनच्या मोठ्या स्थित्यंतरातून जात होता आणि मफ्टी कंपनीने कॅज्युअल वेअर ब्रँड तयार करण्याच्या संधीचे सोने केले. हे सर्व वैयक्तिक कर्ज आणि दुचाकीने जोरावर सुरू झाले होते. पहिली काही वर्षे, कमल खुशलानी यांनी त्यांच्या जेवणाच्या टेबलवर काम सुरु केले, तेच त्यांचे डिझाईन स्टुडिओ होते आणि त्यावेळी त्यांचे गोदाम जेवणाच्या टेबलखाली होते.

वर्कशॉपमधून दुचाकीवर कपडे लोड करून ते विकायला जात असत. त्यांच्याकडे त्यावेळी कर्मचारी अथवा कार्यालय नव्हते. त्यांच्याकडे एक मोठी सुटकेस होती. त्या सुटकेसमध्ये ते कपडे भरत दुचाकीवरूनच मालाची ने-आण करीत असत.

काही काळ असेच चालले. लोकांना मफ्टीची नवीन शैली, फिटिंग आणि कम्फर्ट आवडत होता. फॅशन आता जुन्या शैलीपासून दूर, नवीन शैलीकडे जात होती. या नव्या शैलीत लोक कंफर्टला खूप महत्त्व देऊ लागले. या कारणांमुळे लोकांनी इतर भारतीय ब्रॅण्ड्सपेक्षा मफ्टीला प्राधान्य दिले.

जर या ब्रॅंडनेही इतरांनी बनवलेल्या कपड्यांसारखे कपडे तयार केले, तर कोणतेही फॅशन स्टोअर मफ्टीचे कपडे घ्यायला तयार झाले नसते, हे कंपनीच्या लक्षात आले होते. मफ्टी ब्रॅण्डने काहीतरी ‘वेगळे’ केले त्यामुळेच त्यांना या प्रचंड वाढ असलेल्या बाजारात प्रवेश मिळाला.

स्ट्रेच जीन्स पँट फक्त मुलींसाठी बनवली जायची असाही एक काळ होता. पण मफ्टी ब्रॅंडने अशी स्ट्रेच जीन्स पॅन्ट पुरुषांसाठीही लाँच केली. लोकांनीही याला स्वीकृती दर्शवली. खरंतर, मफ्टी कंपनीने काही वर्षांपूर्वी आपला नफा वाढवण्यासाठी महिलांसाठी कपडे बनवण्यास सुरुवात केली होती. मात्र, लगेचच महिलांचे कपडे जास्त विकले जात नाहीत हे मफ्टीला समजले. मग कंपनीने आपले धोरण बदलले आणि काम फक्त पुरुषांचे कपडे तयार करण्यास आणि विकण्यास सुरुवात केली.

भारतावर आक्रमण केलेल्या परकीय सशस्त्र दलांकडून ‘मफ्टी’  हा शब्द आला आहे. हा शब्द गणवेश घालण्याऐवजी कॅज्युअल ड्रेसिंग करण्यासाठी वापरला जात असे. ब्रँडचा आकस्मिक अर्थ लक्षात ठेवूनच पहिल्या टॅगलाइनची निर्मिती झाली; “मफ्टी-एनिथिंग एल्स इज युनिफॉर्म”. वर्षानुवर्षे ब्रँड आणि बाजाराच्या वाढीसह, टॅगलाइन पुन्हा नव्याने तयार करण्यात आली: “मफ्टी- अल्टर्नेटीव्ह क्लोथिंग”.

दोन दशकांपेक्षा जास्त वर्षांच्या अनुभवासह, खुशलानी यांनी शून्यातून कंपनीची उभारणी केली आहे. कंपनीसाठी त्यांची दृष्टी आणि ध्येय नेहमीच ‘भारतीय मूल्यांसह पहिला जागतिक फॅशन ब्रँड तयार करणे’ हा आहे.

सध्या हा ब्रँड ९० एलएफएस (लार्ज फॉरमॅट स्टोअर्स), १२०० एमबीओ (मल्टी ब्रँड आउटलेट्स) आणि ३०० ईबीओजसह (एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स) संपूर्ण भारतात उपलब्ध आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कम्प्युटरमधील एका एररमुळे नासाची अपोलो-११ मोहीम धोक्यात आली होती! 

Next Post

मियांदादचा जीव अडकलेली ऑडी रवी शास्त्रींनी जिंकली आणि टशन के साथ मैदानावर फिरवली

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

मियांदादचा जीव अडकलेली ऑडी रवी शास्त्रींनी जिंकली आणि टशन के साथ मैदानावर फिरवली

रशियाने तयार केलाय जगातील सगळ्यात शक्तिशाली बॉ*म्ब 'झार बॉ*म्ब'..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.