The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इलॉन मस्कने जाहीर केलेल्या मेंदूची क्षमता वाढवणाऱ्या ‘ब्रेन चिप’च्या ट्रायल्स सुरु झाल्यात

by द पोस्टमन टीम
24 January 2026
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एक लाख वर्षांपूर्वी मानवाच्या कमीत कमी ६ उपजाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एक उपजाती शिल्लक आहे. ती म्हणजे आपण अर्थात होमो सेपियन्स. माणूस आणि निसर्गातील इतर प्राणी यांच्यात एक मुलभूत फरक आहे आणि तो म्हणजे मानवाकडे विचार करायला बुद्धी आहे आणि प्राण्यांच्याकडे ती नाही. मानवाला आधीपासून त्याच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचं कुतुहुल होतं. सुरुवातीला अग्नीचा शोध, मग चाकाचा शोध मग शेतीचं तंत्रज्ञान मानवाने विकसित करून टप्प्या टप्प्याने मानवाने आपली प्रगती साधली.

शेती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या जगात विविध सभ्यता निर्माण झाल्या. त्या सभ्यतांमध्ये बरीच शहरं स्थापन झाली. शहरांचा आकार वाढत जाऊन त्यांचे रुपांतर हे राज्यात झाले. हे सर्व चालू असताना देव, धर्म, पंथ, हे विचारही उदयास आले. औद्योगिक क्रांतीनंतर देव, धर्म, पंथ ह्यांची पकड सैल होऊन त्याची जागा विज्ञान आणि तंत्रज्ञानाने घेतली.

औद्योगिक क्रांतीचं हे युग विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अस्तित्वात होतं. त्यानंतर त्याची जागा संगणकाने घेतली. संगणक जणू या संगणक युगाचा मूलाधार बनला. आजच्या जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबत माहितीचंही महत्व वाढलं आहे. इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार हल्लीच प्रसिद्ध झाला आहे की “Data is the new wealth”.

ह्या माहिती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहिती विस्फोटा(information explosion)नंतर एखादा माणूस काय करतो, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत? या सर्व गोष्टी गूगल आणि फेसबुक या कंपन्यांच्या मालकी असलेल्या निरनिराळ्या अल्गोरिथमला जोडल्या गेल्या आहेत. हा डेटा इतका अवाढव्य आहे की ह्या डेटाचा वापर करून माणसाच्या तांत्रिक, मानसिक, व इतर गरजा भागवण्यासाठी व त्याचे लहान मोठे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळी यंत्रे विकसीत केली गेली आहेत.



विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक दिग्गज लोकांनी त्यांच्या योगदानामुळे त्या क्षेत्रात सर्वोच्च पद प्राप्त केले आहे. ह्या दिग्गजांची नावे तर तुमच्या परिचयाची असतीलही स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग. या दिग्गजांच्या बैठकीत आपलं स्थान प्राप्त केलेला माणूस म्हणजे इलॉन मस्क. ह्या माणसाची व त्याच्या कामाची तुलना मार्वलच्या अव्हेंजर्स या सिनेमातल्या टोनी स्टार्क अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका आयर्न मॅन याच्यासोबत केली तर ते चुकीचे ठरणार नाही.

इलॉन मस्क नक्की आहे तरी कोण? 

तसं तर इलॉन मस्क हे नाव सर्वांच्या परिचयाचे आहे, तरीही या अवलियाबद्दल आपण आणखी विस्ताराने जाणून घेऊ. इलॉन मस्कचा जन्म २८ जून १९७१ रोजी प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिकेत झाला. लहानपणापासून इलॉन हा आत्ममग्न (introvert) आणि प्रयोगशील होता. वयाच्या दहाव्या वर्षी इलॉन मस्कला संगणकीय विद्येत आणि व्हिडीओ गेममध्ये स्वारस्य निर्माण झाले.

त्याने मिळालेल्या शिष्यवृत्तीतून कमोडोर VIC – 20 (Commodore VIC – 20) नावाचा एक संगणक मिळवला. त्या संगणकाचा उपयोग करून तो प्रोग्रामिंग शिकला आणि वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्याने ब्लास्टार (Blaster) नावाचा बेसिक व्हिडीओ गेमचा प्रोग्रामिंग कोड “PC & Office Technology” या मासिकाला अंदाजे ५०० डॉलर्समध्ये विकला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

१९९७ साली इलॉन मस्कने अर्थशास्त्रात व भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली. इलॉन मस्क हा जसा प्रयोगशील माणूस आहे तसाच तो सफल उद्योजक म्हणून ही जगभरात प्रसिद्ध आहे. आयटी क्षेत्रातील बालेकिल्ला असलेल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये (Silicon Valley) इलॉन मस्कच्या सर्व कंपन्या स्थित आहेत. Zip 2, X.com, PayPal, Space X, Tesla, Solarcity & Tesla Energy, Neuralink, The Boring Company या सर्व कंपन्याचा संस्थापक इलॉन मस्क आहे व संचालक मंडळावर कार्यरत आहे. तर ही होती इलॉन मस्कची तोंडओळख.

इलॉन मस्क हा उद्योजकापेक्षा त्याच्या प्रयोगशीलवृत्तीमुळे जास्त चर्चेत असतो. इलॉन मस्कने आजपर्यंत इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, मंगळावरील वस्तीसाठी अंतराळ संशोधन, जलद वाहतूक करण्यासाठी व वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 3D टनेल असे एकापेक्षा एक भन्नाट संशोधने केली आहेत. पण हल्ली इलॉन मस्कच्या एका वेगळ्या संशोधनामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. तर हे संशोधन नक्की काय आहे चला समजावून घेऊ.

माणसाकडे बुद्धी नावाचं प्रभावी शस्त्र निसर्गाकडून मिळालं आहे. पण ह्या बुद्धीला जोड लागते ती स्मरणशक्तीची. जर स्मरणशक्तीचीच नसेल तर प्राप्त केलेल्या ज्ञानाचा वापर कसा करणार? आणि जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तशी तशी त्याची स्मरणशक्ती ही हळूहळू कमकुवत होत जाते. आता आपण सगळेजण मोबाईल वापरतो आणि व्हाट्सॲप तर वापरतोच.

जसा तुम्ही व्हाट्सॲपचा बॅकअप घेता तसा जर तुम्हाला तुमच्या आठवणींचा व ग्रहण केलेल्या ज्ञानाचा एका चिपद्वारे बॅकअप घेता आला तर? जर तुमचा मेंदू एका चिपद्वारे नियंत्रित केला गेला व त्यामुळे तुमचे अनेक आजार ठीक होतील असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे कोणत्याही सिनेमात घडत नाही तर हे प्रत्यक्षात घडत आहे.

इलॉन मस्क हे भविष्य प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे. इलॉन मस्कने मानवी मेंदूत कॉम्प्युटर चिप लावणार असल्याची घोषणा केली आहे. इलॉन मस्कने न्यूरालिंक (Neuralink) नावाचा ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस स्टार्टअपची (Brain Computer Interface Startup) सुरुवात 2016 मध्ये सॅन फ्रान्सिसकोमधील बे एरियामध्ये केली होती. ही कॉम्प्युटर चिप 23 मिलिमीटर एवढ्या आकाराची आहे.

आता तुम्ही म्हणाल इलॉन मस्कच्या आधी बऱ्याच डॉक्टरांनी व वैज्ञानिकांनी ह्या अशा कॉम्प्युटर चिपवर संशोधन केले आहे. तर हो, जगातील काही नामवंत डॉक्टरांनी पार्किन्सन्स डिसीज, एपिलेप्सी, या आजारांच्या उपचारासाठी इलेक्ट्रोडचे मेंदूत रोपण (Implant) केलेले आहे. न्यूरालिंक (Neuralink) ही कंपनी ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस या क्षेत्रात काम करणारी पहिली कंपनी नाही. ब्रेनट्री नावाच्या कंपनीने न्यूरालिंक (Neuralink) च्या बरंच आधी ॲडव्हान्स न्यूरल इंटरफेस (Advance Neural Interface) या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

या कॉम्प्युटर चीपच्या मानव चाचणी करण्याआधी ह्या चीपची चाचणी इतर प्राण्यांवर केली गेली. ह्या चीपची यशस्वी चाचणी ही Gertrude नावाच्या डुकरावर केली गेली. त्यानंतर ही चीप ही एका माकडाच्या मेंदूत बसवण्यात आली व हा ही प्रयोग यशस्वी झाला. आता न्यूरालिंकचे लक्ष्य आहे ह्या चीपचे मानवी मेंदूत प्रत्यारोपण.

मानवी मेंदूत ह्या चीपचे प्रत्यारोपण स्कल सर्जरीच्या माध्यमातून ही प्रक्रिया करता येऊ शकते. ही चीप मानवी मेंदूचे सिग्नल वाचू शकते. ह्या चीपमुळे स्मरणशक्ती संदर्भातील आजार, हालचाली संदर्भातील आजार, अल्झायमर्स, डिम्नेशिया, पाठीच्या कणाच्या दुखापती यासारख्या न्यूरॉलॉजिकल समस्यांवर उपचार करण्यास मदत मिळणार आहे.

गेल्या दोन दशकात आपल्या समोर असलेले असंख्य प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञान सोडवत आहे. येत्या काळात विज्ञान संशोधन हे माध्यम मानवाच्या भौतिक प्रगती साधण्यासाठी गरजेचे आहे. इलॉन मस्क यांनी केलेलं संशोधन हे मानवी समस्यांवर शाप की वरदान ठरेल हे येणारा काळच सांगेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

वाचा आपण खातो त्या अन्नातील कॅलरीज कशा मोजल्या जातात..!

Next Post

आणखीन एका आफ्रिकन देशात अराजक, मिलिटरीने राष्ट्राध्यक्षांना गायब करून सत्ता काबीज केली

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

आणखीन एका आफ्रिकन देशात अराजक, मिलिटरीने राष्ट्राध्यक्षांना गायब करून सत्ता काबीज केली

Explainer: 5G तंत्रज्ञानाला जगभरातून विरोध का होतोय? ते खरंच धोकादायक आहे का?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.