The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेच्या CIA ने क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोला मारायचे ६३८ असफल प्रयत्न केले होते

by Heramb
25 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धानंतर जग द्विध्रुवीय बनले होते. एकीकडे अमेरिकेची भांडवलशाही आणि लोकशाही शासन व्यवस्था तर दुसरीकडे सोव्हिएत युनियनची साम्यवादी शासन व्यवस्था. या दोन्ही व्यवस्थांमध्ये भांडण होते ते वैचारिक पातळीचे. पण या भांडणाचे बघता बघता संघर्षामध्ये रूपांतर झाले आणि पार क्युबन मिसाईल क्रायसिस पर्यंत या संघर्षाने मजल मारली. क्युबन मिसाईल क्रायसिस सुरु असताना जग दोन आर्थिकदृष्ट्या लहान देशांकडे का लक्ष देईल हा विचार करून चीनने भारतावर आक्रमण केले आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा फायदा घेतला. या मोठ्या संकटादरम्यान ‘वासीली अलेक्सानड्रोवीच आखिरपोव्ह’मुळे मोठा अनर्थ टळला. 

क्युबन मिसाईल क्रायसिस:

क्युबन मिसाईल क्रायसिसचं संकट संपल्यानंतर संबंध जगाने सुटकेचा निश्वास सोडला होता, कारण यावेळी सबंध जग आ*ण्विक यु*द्धाच्या उंबरठ्यावर होते. सोव्हिएत युनियनने फ्लोरिडाच्या पॅन-हॅन्डल जवळच असलेल्या क्युबा या बेटावर आपली ‘मिडीयम आणि इंटरमीजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल्स’ पाठवण्याचा प्रयत्न केला होता. क्युबाने या मिसाईल्स मेंटेन करण्यासाठी मोठे प्लांट्स उभारले होते.

२९ ऑगस्ट १९६२ रोजी अमेरिकन प्रशासनाला सोव्हीएट्सचा हा डाव समजला आणि ‘वॉर इज द लास्ट ऍक्ट ऑफ डिप्लोमसी’ या न्यायानुसार थेट ह*ल्ला करण्यापूर्वी त्यांनी डिप्लोमसीचा वापर करून क्युबाचे सर्व समुद्रमार्ग अमेरिकन नेव्हीच्या मदतीने अडवले. याशिवाय अमेरिकेने तुर्कस्तानमध्ये आपल्या बॅलिस्टिक मिसाईल्स पाठवण्याची तयारी दर्शवली होती.

त्यावेळी निकिता ख्रुश्चेव्हने माघार घेतली आणि क्युबामधील मिसाईल इंस्टॉलेशन्स मागे घेण्याचे आश्वासन दिले. पण यावेळी एका माणसाला संताप आवरत नव्हता. तो होता क्युबाचा महान क्रांतिकारक, बरीच वर्षे क्युबाचा पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष राहिलेला ‘फिडेल कॅस्ट्रो’. याचे पूर्ण नाव फिडेल अलेजांद्रो कॅस्ट्रो रुझ!

कॅस्ट्रो हा एक निडर हुकूमशहा आणि सोव्हिएट्सपेक्षाही वाईट कम्युनिस्ट होता. पण अनेकांनी त्याला स्वातंत्र्य प्रदान करणारा महान नेता आणि सामाजिक समतेवर विश्वास ठेवणारा व्यक्ती म्हणून सन्मानही दिला होता. शीतयु*द्धाच्या काळात, विशेषत: क्यूबन मिसाईल क्रायसिसच्या वेळी कॅस्ट्रो जगभर प्रसिद्ध झाला. एक कम्युनिस्ट म्हणून, त्याने शीतयु*द्धाच्या काळात सोव्हिएट्सच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला होता. सीआयएसह जगातील विविध लोकांनी आणि पक्षांनी ह*त्येचा प्रयत्न करूनही त्याची ह*त्या होऊ शकली नाही.



ओसामा-बिन-लादेनच्या आधी अमेरिकेचा प्रमुख शत्रू असणारा कॅस्ट्रो:

कॅस्ट्रोला मारण्याचे सर्वाधिक प्रयत्न झाले होते. कदाचित जगाच्या इतिहासात एवढ्या वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न करूनही जिवंत राहिला असा कॅस्ट्रो एकमेव माणूस असावा. अनेक राष्ट्रांनी त्याला ‘मॅनिप्युलेटिव्ह’ असे संबोधले होते शिवाय अनेकांच्या मते त्याने क्युबामध्ये अनेक आर्थिक घोटाळेही केले होते. कॅस्ट्रोने २६ सप्टेंबर १९६० रोजी संयुक्त राष्ट्रात दिलेल्या सर्वात प्रदीर्घ भाषणाचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ आहे. हे भाषण तब्बल ४ तास २९ मिनिटे सुरु होते.

या लांबलचक भाषणानंतर कॅस्ट्रोच्या ह*त्येचे प्रयत्न सुरु झाले, त्या प्रयत्नांपैकी बहुतेक ह*त्येचे प्रयत्न अमेरिकेची गुप्तहेर संस्था ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ अर्थात सीआयएने केले होते. युनायटेड नेशन्सला कॅस्ट्रोच्या भाषणामध्ये आणि एकूणच त्याच्या विचारांमध्ये रस वाटू लागला होता. हे पाहून अमेरिकेला कॅस्ट्रोचा उर्वरित जगावर किंवा पश्चिम युरोपवर प्रभाव पडू शकतो याबद्दल खात्री वाटली आणि म्हणून सीआयएच्या दृष्टीने त्याला संपवणे महत्वाचे बनले. 

१९६२ साली क्युबन मिसाईल क्रायसिसनंतर कॅस्ट्रोबद्दल एकूणच द्वेष आणि नकारात्मक भावना वाढू लागल्या. क्युबन मिसाईल क्रायसिसच्या आधी अमेरिकेच्या मुख्य भूमीवर कधीही लढण्याची वेळ आली नाही. पण आता मात्र कम्युनिझम अमेरिकन्सच्या अगदी जवळ येऊन ठेपला होता. क्युबन सरकारची सोव्हिएत युनियनशी मैत्री करणे देखील त्यांच्यासाठी फारसे अनुकूल नव्हते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

कॅस्ट्रोच्या ह*त्येचे ६३८ प्रयत्न:

२२ नोव्हेंबर १९६३ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची ह*त्या झाल्यानंतर कॅस्ट्रोच्या ह*त्येच्या प्रयत्नांमध्ये आणखीनच वाढ झाली. ‘ली हार्वे ओसवाल्ड’ नावाच्या माणसाने पॉईंट ब्लँक फायरिंग करून जॉन एफ. केनेडी यांची ह*त्या केली, काही लोकांच्या मते, ली हार्वे ओसवाल्ड हा कॅस्ट्रोचा माणूस होता. आजमितीसही अनेक लोक यावर विश्वास ठेवतात. याशिवाय कॅस्ट्रोच्या ह*त्येच्या प्रयत्नांचा बदला घेण्यासाठी क्युबातून हा एजन्ट पाठवण्यात आला होता, असाही अनेकांचा विश्वास आहे.

योगायोगाने म्हणा किंवा कसेही, पण अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडींच्या ह*त्येच्या दिवशीच कॅस्ट्रोला मारण्याचा प्रयत्न झाला. सीआयएच्या एका एजंटने क्युबामध्ये घुसखोरी केली. त्याने कॅस्ट्रोला एक घातक विषारी द्रव्यांनी भरलेलं पेन दिलं, हे विषारी द्रव्य पेन उघडताच कॅस्ट्रोच्या शरीरात प्रवेश करेल आणि त्याचा मृत्यू होईल अशी त्या एजन्टची योजना होती. पण प्रत्यक्षात तसं घडलंच नाही. कॅस्ट्रोच्या सुदैवाने त्याच्याआधी त्याच्या एका एजन्टने ते पेन वापरलं.

युनायटेड स्टेट्सच्या चर्च कमिटीने १९७५ साली पहिल्यांदा हा तथा-कथित किस्सा दाखवला होता. युनायटेड स्टेट्सची चर्च कमिटी पूर्वी ‘युनायटेड स्टेट्स सिनेट सिलेक्ट कमिटी’ म्हणूनही ओळखली जात होती. सीआयएच्या कॅस्ट्रोच्या ह*त्येच्या प्रयत्नांबाबत, गुप्तचर ऑपरेशन्सच्या संदर्भात सरकारी कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती.

१९६० च्या दशकात ह*त्येचे प्रयत्न सुरू होण्यापूर्वी सीआयएने कॅस्ट्रोची जगभरातील प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्याला त्याच्या सभोवतालच्या लोकांचा पाठिंबा मिळू नये. ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांच्या अध्यक्षतेच्या काळात, मुलाखतीदरम्यान कॅस्ट्रो विचित्र वागावेत यासाठी सीआयएने संपूर्ण रेडिओ रूममध्ये एलएसडीसारख्या पदार्थांची फवारणी करण्याची योजना आणली होती.

त्यानंतर एजंटांनी कॅस्ट्रोची दाढी काढण्याचा प्रयत्न केला. क्युबामध्ये जेव्हा कॅस्ट्रो शासक बनले तेव्हा त्यांनी क्युबामध्ये दाढी ठेवण्याचा ट्रेंड सुरू केला होता. जगभरामध्ये दाढी हा त्यांचा पर्सनल ब्रँड बनला होता दाढी काढणे म्हणजे त्याचा मूळ ब्रँड गमावणे आणि त्यामुळे त्यांना असलेले समर्थन गमावण्याचा धोकाही उत्पन्न होतो. दाढी काढण्यासाठी अनेकांनी केमिकल फवारण्याचा प्रयत्न केला, पण ते सर्व अयशस्वी ठरले, त्यामुळेच कॅस्ट्रोचा एकही फोटो दाढीशिवाय नाही.

नैतिकतेचे संरक्षण:

चर्च समितीने तयार केलेल्या काही ह*त्येच्या योजनांमध्ये त्या वेळी लास वेगासमध्ये राहणाऱ्या गुन्हेगारांचा तसेच मियामीमध्ये हद्दपार करण्यात आलेल्या कॅस्ट्रोच्या विरोधकांचा क्युबन लोकांचा समावेश होता. १९७५ साली, कॅस्ट्रो यांनी सीनेटर जॉर्ज मॅकगव्हर्न यांना २४ ह*त्येच्या प्रयत्नांची यादी देऊन सीआयएवर आरोप केले. कॅस्ट्रो न्यूयॉर्कमध्ये असतानाही त्यांच्या ह*त्येचे प्रयत्न झाले. १९७९ साली युनायटेड नेशन्समध्ये भाषण देण्यासाठी ते न्यूयॉर्कला गेले होते.

न्यूयॉर्कमध्ये एका पत्रकाराने कॅस्ट्रोची मुलाखत घेतली तेव्हा त्याला “शर्टाखाली बुलेटप्रूफ व्हेस्ट घातली आहे का?” हे विचारण्यात आले. कॅस्ट्रोने आपली शर्टाखालील उघडी कातडी दाखवली आणि “मी नैतिक व्हेस्ट घालतो” अशी प्रतिक्रिया दिली. कॅस्ट्रोच्या ह*त्येच्या प्रत्येक प्रयत्नाचे वर्णन केल्यानंतर या लेखाचे रूपांतर एका लहान पुस्तकात होईल. कॅस्ट्रोच्या ह*त्येच्या प्रत्येक प्रयत्नाचे स्पष्टीकरण बघायचे असल्यास तुम्ही २००६ मधील “638 वेज टू किल कॅस्ट्रो” नावाची डॉक्युमेंट्री पाहू शकता.

अशक्यप्राय वाटणारं सर्व्हायव्हल:

थोडक्यात, सीआयएने क्युबाच्या बाहेरच्या लोकांनी त्याला गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यापासून ते अन्नाद्वारे विष देण्यापर्यंत आणि तो वापरत असणाऱ्या काही सामान्य वस्तूंना प्राणघातक गोष्टींमध्ये रूपांतरित करण्यापर्यंत सगळे प्रयत्न केले. ज्या बीचवर कॅस्ट्रो पोहायला जात असे त्याठिकाणच्या शंख-शिंपल्यांमध्येही सीआयएने स्फो*टके ठेवली पण कॅस्ट्रोचा मृत्यू सीआयएकडून व्हायचाच नव्हता. एका ठिकाणी कॅस्ट्रो स्वतः म्हणतो, “ह*त्येच्या प्रयत्नातून वाचणे ही ऑलिम्पिक स्पर्धा असती तर मी सुवर्णपदक जिंकले असते!”

१९ एप्रिल २०१६ रोजी फिडेल कॅस्ट्रो यांनी शेवटचे सार्वजनिक भाषण दिले होते. यावेळी ते तब्बल ८९ वर्षाचे होते. कॅस्ट्रो सीआयएच्या त्या सर्व ह*त्येच्या प्रयत्नांतून वाचले आणि अखेर वृद्धापकाळाने २५ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जोसेफ मेडिसिन क्रो – अमेरिकेच्या मूलनिवासी रेड इंडियन्सचा ‘लास्ट वॉर चीफ’

Next Post

प्लासीच्या लढाईत सिराज उद दौलाला मारून ब्रिटिशांनी कलकत्त्याच्या ब्लॅक होलचा बदला घेतला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

प्लासीच्या लढाईत सिराज उद दौलाला मारून ब्रिटिशांनी कलकत्त्याच्या ब्लॅक होलचा बदला घेतला

प्राचीन काळी पर्शियन लोकांनी वाळवंटात विजेशिवाय चालणारे रेफ्रिजरेटर बनवले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.