The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या कीबोर्डवर ABCD अशी क्रमाने बटणं का नाहीत..?

by द पोस्टमन टीम
7 December 2024
in विज्ञान तंत्रज्ञान, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज कितीतरी कामे मशीन्सद्वारे करवून घेतली जातात. कपडे धुण्यासाठी वॉशिंग-मशीन, मसाले आणि डाळी वाटण्यासाठी मिक्सर, तसेच लिखा-पढीच्या कामासाठी कंप्युटर वापरला जातो. कंप्युटरचा एक अविभाज्य भाग म्हणजे की-बोर्ड! कंप्युटरवरील कामे सुलभ आणि जलद होतात यामागचे एक कारण म्हणजे की-बोर्ड आणि त्याची रचना.

आज आपण ज्या रुपात की-बोर्ड वापरतो आहोत तो जर तसा नसता तर?

आज आपण जो की-बोर्ड वापरतो आहोत त्याला (QWERTY) क्वर्टी की-बोर्ड म्हटले जाते. या कीबोर्डवरील अक्षरे जर QWERTY अशा उलटसुलट क्रमाऐवजी ABCDEF या क्रमाने असती तर काय झाले असते किंवा ती अशा उलटसुलट क्रमाने का लावली आहेत याचा विचार केलाय का कधी?

१८०० च्या दशकाच्या सुरुवातीच्या दिवसांत जगभर टायपिंगसाठी अनेक प्रकारच्या यंत्रांचे शोध लावले जात होते. १७१४ साली लंडनच्या हेन्री मिल यांनीही एका टाईप रायटरचा शोध लावला होता. या शोधासाठी त्यांना पेटंटही मिळाले होते असे म्हटले जाते, पण याचे कोणतेही पुरावे सापडत नाहीत.



त्यानंतर १८६८ साली क्रिस्तोफर लॅथम शोल्स याने QWERTY कीबोर्ड विकसित केला. त्याचे पेटंटही त्याला मिळाले. आजही बहुतांश कीबोर्डमध्ये क्रिस्टोफर शोल्सने विकसित केलेला कीबोर्ड ले-आऊटच वापरला जातो.

क्रिस्तोफर लॅथम शोल्सचा जन्म १९ फेब्रुवारी १८१९ रोजी झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रिंटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने विस्कॉन्सिनच्या साउथपोर्ट टेलिग्राफमधे काम केले. त्यानंतर स्वतःचे वर्तमानपत्र देखील काढले.

१८६६ साली सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. तेव्हा त्याच्या संस्था प्रमुखांनी त्याला कागदावर लिहिणारी मशीन बनवता येईल का असे विचारले. क्रिस्तोफरने सॅम्युएल-डब्ल्यू या कंपनीच्या मदतीने एक डिजिटल मशीन तयार केले आणि १८६७ साली त्याला या मशीनचे पेटंट देखील मिळाले. सुरुवातीच्या या मशीनवर फक्त अंकांचा वापर करण्यात आला होता. पेशाने वकील आणि डिझायनिंगचा छंद असणारे कार्लोस ग्रीनीनने अंकासोबतच शब्दाच्या वापरासाठी या मशीनमधे काही सुधारणा करता येईल का विचारले तेव्हा क्रिस्तोफर मशीनमधे आणखी बदल करण्यासाठी संशोधन करू लागला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

कार्लोस ग्रीनीन यांच्या विनंतीवरूनच क्रिस्टोफरला एक चांगला टाइप रायटर बनवण्याची कल्पना सुचली. त्याने अशा प्रकारचा एक टाइप रायटर बनवला देखील. त्याच्या या संशोधनासाठी त्यांना २३ जून १८६८ रोजी अजून एक पेटंट त्याच्या नावावर झाले.

सुरुवातीला या टाइप रायटरच्या कीबोर्डमुळे जलद टायपिंग करता येत नसे. या टाइप रायटरवर एक काळे आणि पांढरे अशा दोन बटना बसवण्यात आले होते. पण, या टाइप रायटरवर 0 आणि 1 टाइप करण्यासाठी कुठलीच कळ नव्हती. 0 आणि 1 साठी O (ओ) आणि I (आय)चाच वापर केला जात असे. त्यांनी बनवलेल्या या पहिल्या टाइप रायटरवरील वर्णमालेत २८ कीज् होत्या. हा कीबोर्ड बनवल्यानंतर क्रिस्टोफरना खूपच आनंद झाला होता.

पण या टाइप रायटरवरील सर्व कीज धातूच्या बनवलेल्या होत्या. थोड्या स्पीडने कुणी टायपिंग केल्यास आजूबाजूची अक्षरेही आपोआप दाबली जाते आणि टायपिंगमध्ये बऱ्याच चुका होत असत. 

या धातूंच्या कीजमुळे टायपिंगच्या स्पीडवरही परिणाम होत असे. या समस्येवर काही तरी उपाय काढण्यासाठी पुन्हा क्रिस्तोफर कामाला लागला. त्याला त्याचा मित्र जेम्स डेंग्रावरनेही यासाठी मदत केली. कीबोर्डवरील कीज एकमेकांपासून थोड्या दूर अंतरावर बसवल्या. त्यासाठी वापरला जाणारा धातूही बदलून पहिला.

त्यानंतर त्याने अक्षरांचा क्रमही बदलून पहिला आणि कीबोर्डचे आजचे रूप तयार झाले. इंग्रजीत पाच स्वर आहेत आणि प्रत्येक शब्दात यातील एक तरी स्वर असतोच. नव्या प्रकारच्या कीबोर्डमध्ये इतर चार स्वर वरच्या ओळीत बसवले आणि A मात्र खालच्या ओळीत घेतला. यामुळे एकावेळी जास्त अक्षरे दाबली जाण्याची समस्याही सुटली. क्रिस्टोफरच्या या संशोधनाचा पुढे अनेकांना फायदा झाला. आजही होत आहे.

१८७३ पर्यंत या प्रकारचे टाइप रायटर खूपच प्रसिद्ध झाले होते. रेमिंग्टन या टाइप रायटर कंपनीने याच प्रकारचे कीबोर्ड वापरून आपले टाइप रायटर बनवले. रेमिंग्टनला याचा खूपच फायदा झाला. सुरुवातीला टाइप रायटरशी जुळवून घेणे लोकांना अवघड गेले मात्र हळूहळू याचा वापर वाढत गेला. 

या कीबोर्डला पुढेही भरपूर पसंती मिळणार होतीच, पण हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचे भाग्य क्रिस्तोफरच्या नशिबी नव्हते. १८९० मध्येच त्त्याचा मृत्यू झाला. त्याच्या टाइप रायटरने कित्येकांच्या किचकट कामात सुलभता आणली असेल. आजही आपण त्यानेच बनवलेल्या कीबोर्डचा वापर करतो. तरीही त्याने बनवलेला कीबोर्ड आणि आजचा कीबोर्ड यातही बराच बदल झालेला आहे.

त्याने अक्षरांचा जो लेआउट दिला त्यात अजूनही बदल झालेला नाही. उलट आजच्या कीबोर्डमधे कीज जवळ-जवळ आहेत. असे असले तरी टायपिंग स्पीड वाढली आहे आणि टायपिंग मिस्टेकची शक्यताही कमी झाली आहे.

आजचा कीबोर्ड वापरायला अतिशय सुलभ बनला आहे. आज आपण कितीतरी तंत्रज्ञानाचा उपयोग करतो आहोत त्याचा उपयोग करून आपले आयुष्य अधिकाधिक सुलभ करून जगतो आहोत. आपले श्रम वाचवण्यासाठी यापूर्वी कुणीतरी श्रम घेतले आहेत. क्रिस्तोफर शोल्सने जर हा क्वार्टी कीबोर्ड बनवला नसता तर विचार आज आपले काय झाले असते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

प्राचीन इजिप्शियन पुतळ्यांच्या ‘तुटक्या नाका’मागे ही अंधश्रद्धा आहे..!

Next Post

गव्हाचे भाव कमी करण्यासाठी अमेरिकेत ‘स्लाइस ब्रेड’वर बंदी घालण्यात आली होती!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

गव्हाचे भाव कमी करण्यासाठी अमेरिकेत 'स्लाइस ब्रेड'वर बंदी घालण्यात आली होती!

लाछिमान गुरूंग - २०० सैनिकांना एकट्याने अंगावर घेतलेला गोरखा लेजेंड

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.