The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिमाजी आप्पाच्या तलवारीने महापराक्रम गाजवत स्वराज्याचा विस्तार केला होता

by शंतनू परांजपे
6 June 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


चिमाजी आप्पा म्हणजे बाळाजी विश्वनाथ यांचा धाकटा मुलगा. यांचा जन्म कधी झाला याबद्दल फारसे तपशील मिळत नाहीत. सन १७१५च्या आसपास दामाजी थोराताच्या कैदेत बाळाजी विश्वनाथ यांच्यासोबत ते होते. बाजीरावांना पेशवाईची वस्त्र मिळाल्यानंतर चिमाजी आप्पा यांना सरदारकी मिळाली.

पेशव्यांचे खाजगी व्यवहार सांभाळणे व पुण्यातील कुटुंबाकडे लक्ष देणे ही दोन मुख्य कामे चिमाजी आप्पा यांच्याकडे होतीच, तसेच काही वेळा मोहिमांवरसुद्धा जावे लागे. चिमाजी आप्पा यांची पहिली मोहीम माळवा प्रांतात सन १७२८ साली झाली. या मोहिमेत आमझरा येथे झालेल्या लढाईमध्ये त्यांनी गिरीबहाद्दर या मुघल सरदाराला संपवले.

thepostman
वसई किल्ल्यातील चिमाजी आपा यांचा पुतळा

त्यानंतर सन १७२९ साली पावसाळा संपल्यानंतर गुजरात प्रांतात चौथाई वसूल करण्यासाठी म्हणून चिमाजी आप्पा यांची स्वारी झाली. चिमाजी आप्पा यांच्या पराक्रमामुळे तेथील मुघल सरदार सरबुलंदखानाने शरणागती पत्करून मराठ्यांच्या चौथाई व सरदेशमुखीचे हक्क कबुल केले.

त्यानंतर पुढे शाहू राजांच्या आदेशानुसार जंजिरा किल्ला घेण्यासाठी, तसेच सिद्दी सात याचा बंदोबस्त करण्यासाठी सन १७३६ मध्ये याने कोकणात स्वारी केली. या स्वारीत सिद्दी सात मारला गेला.



पुढे चिमाजी यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची लढाई घडली, ती म्हणजे वसई येथे पोर्तुगीज सत्तेविरुद्ध झालेले यु*द्ध. वसई प्रांतातील पोर्तुगीजांच्या धार्मिक छळाला कंटाळून तेथील जनतेने पेशव्यांकडे रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा पेशव्यांनी आपले बंधू चिमाजी आप्पा यांना या मोहिमेवर पाठवले.

सन १७३७ साली झालेल्या या मोहिमेत मराठ्यांनी सुरुवातीला ठाणे, घोडबंदर, मनोर, पारसिक, अर्नाळा इत्यादी ठाणी जिंकून घेत पोर्तुगीजांना शह दिला.

या मोहिमेची जबाबदारी प्रामुख्याने अणजूरकर बंधूंवर होती. नंतर काही दिवसांनी चिमाजी आप्पांना भोपाळच्या लढाईत निजामाविरुद्ध जावे लागले, त्यामुळे वसईची ही मोहीम अर्धवटच राहिली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पुढे पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर १७३७ मध्ये पुन्हा एकदा यु*द्ध सुरु झाले. माहीमचे ठाणे घेतल्यानंतर चिमाजी आप्पा आपल्या फौजेसह वसई प्रांतात दाखल झाले. काही दिवस मुक्काम केल्यानंतर चिमाजी पुण्यास परतले. त्यानंतर सन १७३८चा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा थोरले बाजीराव पुण्यात आले, तेव्हा पुन्हा एकदा वसईवर ह*ल्ला करण्याचे ठरवले. यानंतर प्रचंड फौज घेऊन चिमाजी आप्पा वसई प्रांती उतरले. यावेळी त्यांच्यासोबत मल्हारराव होळकर वगैरे सरदारसुद्धा सामील झाले होते.

डिसेंबर महिन्यात पोर्तुगीजांचा सेनापती पद्रेमेलो हा मारला गेला. यानंतर मराठ्यांनी तारापूरचे ठाणे जिंकून घेतले. जानेवारी, सन १७३९ मध्ये मराठ्यांनी बाजी रेठरेकरसारखा यो*द्धा गमावला. यानंतर केवळ वसईचे ठाणे घ्यायचे बाजी राहिले होते.

वसई काही केल्या हातात येईना, त्यामुळे चिमाजी आप्पांनी सर्व सरदारांना एकत्र बोलावले व सांगितले की, “वसई ताब्यात येत नाही. माझा हेतू वसई घ्यावी असा आहे. तरी, तोफ डागून माझे मेलेले शरीर तरी वसई किल्ल्यात पडेल असे करा.” हे वीरश्रीयुक्त बोलणे सर्व सरदारांनी ऐकले आणि वसईवर निकराचा लढा केला आणि.. वसईवर मराठ्यांचे निशाण फडकले. अप्पांनी संपूर्ण उत्तर फिरंगाण मारून काढला.

या लढाईमुळे चिमाजी आप्पांचे व मराठ्यांचे नाव अजरामर झाले. उत्तर कोकण प्रांतातून पोर्तुगीजांची सत्ता संपूर्णपणे उखडून टाकण्यात आली. मराठ्यांना फिरंग्यांच्या ताब्यात असलेला ३४० गावांचा प्रदेश, २० किल्ले, २५ लाखांचा दारूगोळा वगैरे साहित्य मिळाले. तितक्यात बाजीराव साहेब वारल्याची खबर चिमाजी आप्पांना मिळाली. त्यामुळे ते लगेच पुण्यात परतले. पुढे सातारा येथे जाऊन शाहू राजांच्या करवी नानासाहेब पेशव्यांना पेशवाई पदाची वस्त्रे देवविली. यावेळी वसई येथे केलेल्या पराक्रमामुळे चिमाजी आप्पा यांचा सन्मान करण्यात आला.

thepostman
शिंगणापूर येथील पोर्तुगीज घंटा. अशा घंटा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळून येतात. वसई यु*द्धाचे प्रतिक म्हणून या घंटा अनेक मराठा सरदारांनी आपल्या देवतांना अर्पण केल्या.

पुढे सन १७४० साली चिमाजींनी दिव-दमण प्रांतावर ह*ल्ला करून तेथील उरलेल्या पोर्तुगीज सत्तेचा पराभव केला. त्यामुळे पोर्तुगीज आता फक्त गोव्यापुरतेच मर्यादित राहिले. चिमाजी आप्पा यांना क्षयाचा त्रास होता, त्यात या सर्व दगदगीमुळे त्यांची तब्येत आणखीनच खालावली. या मोहिमेनंतर लगेचच १७ डिसेंबर, १७४० रोजी त्यांचा मृत्यू झाला.

चिमाजी आप्पा याची पहिली पत्नी रखमाबाई. तिच्यापासून त्यांना ३ ऑगस्ट, १७३० रोजी सदाशिव नावाचा मुलगा झाला. मुलगा झाल्या झाल्याच रखमाबाईचे निधन झाले. यानंतर पुढील वर्षात चिमाजी आप्पांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव होते अन्नपूर्णाबाई. तिच्यापासून त्यांना बयाबाई नावाची मुलगी झाली. तिचा विवाह गंगाधर नाईक ओंकार यांच्याशी झाला. चिमाजी आप्पा यांची समाधी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात आहे.

thepostman
पुण्यातील ओंकारेश्वर येथील चिमाजी आपा यांची समाधी

चिमाजी आप्पा हे काही बाबतीत थोरल्या बाजीराव पेशव्यांपेक्षा श्रेष्ठ होते. ते शूर, धोरणी व मनमिळाऊ होते. बाजीरावांच्या अनुपस्थितीत घर आणि खासगी कारभार त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळला. वसईच्या किल्ल्यात सापडलेल्या एका फिरंग्याच्या मुलीला त्यांनी सन्मानाने पाठविल्याची हकीकत तर प्रसिद्ध आहेच. शाहू महाराजांकडील खासगी कामेसुद्धा त्यांनी अनेक वेळा केली आहेत.


संदर्भ – 

  • डॉ. आर.एच. कांबळे – मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी आप्पांचे योगदान (प्रबंध आणि ग्रंथ). पुणे. २०१६
  • गो. स. सरदेसाई – मराठी रियासत मध्यविभाग – १ (सन १७०७ ते १७४०) मुंबई. १९२५
  • चिमाजी आपा – कै. कृ. वा. पुरंदरे

या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: chimaji appa
ShareTweet
Previous Post

अ*फूचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याचा मुलगा भारतीय उद्योगविश्वाचा पितामह बनला

Next Post

माओच्या संपूर्ण क्रांतीच्या स्वप्नामुळेच लाखो चीनी नागरिकांचे आयुष्य धुळीस मिळाले होते

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

माओच्या संपूर्ण क्रांतीच्या स्वप्नामुळेच लाखो चीनी नागरिकांचे आयुष्य धुळीस मिळाले होते

तुम्ही एक वेळ स्वतःला विसरू शकता पण टपरवेअरचा डब्बा विसरून घरी नाही येऊ शकत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.