The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१०० वेळा नकार मिळाला, परंतु या महिलेने जगासाठी ग्राफिक डिझायनिंग सोपं केलं

by Heramb
12 October 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


शाळेत असताना तुम्हाला कदाचित चित्रकला आणि त्या संबंधित डिझाईनची कला जमत नसेलही. पण आजमितीस आधुनिकीकरणाने सर्व काही सुलभ केलं आहे, मग चित्रकला आणि ग्राफिक डिझाईनचं क्षेत्र कसं मागे राहील! तुम्हाला डिझाईनिंग जरी जमत नसली तरी आधुनिक साधनांचा वापर करून तुम्हीसुद्धा एक ‘एक्स्पर्ट’ ग्राफिक डिझायनर बनू शकता. असं असलं तरी स्वतःच्या सर्जनशीलतेचा (क्रिएटिव्हिटी) कस मात्र सगळीकडेच लागतो. कष्ट, सर्जनशीलता आणि सुसंगतता (कन्सिस्टन्सी) या गोष्टींना कोणताही पर्याय आधुनिक विज्ञानाकडे नाही आणि जर आधुनिक विज्ञान या गोष्टींना पर्याय देत असेल तर मानवी सर्जनशीलतेला तो मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

पण डिझाईनिंग सोपे आणि सुलभ करण्याचे काम कॅन्व्हा या ॲप आणि वेबसाईटने केले. कॅन्व्हा एक ग्राफिक डिझाईन प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मचा वापर सोशल मीडिया ग्राफिक्स, प्रेझेंटेशन्स, पोस्टर्स, डॉक्युमेंट्स आणि इतर व्हिज्युअल सामग्री तयार करण्यासाठी केला जातो. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना वापरण्यासाठी अनेक टेम्पलेट्स उपलब्ध आहेत. हा प्लॅटफॉर्म वापरण्यास विनामूल्य असून अतिरिक्त कार्यक्षमतेसाठी कॅन्व्हा प्रो आणि कॅन्व्हा एंटरप्राइझसारखी सशुल्क सदस्यता कॅन्व्हा कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.

जून २०२० मध्ये, कॅन्व्हाने ६ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर ६ कोटी डॉलर्सची उलाढाल केली होती. तर सन २०१९ चे मूल्यांकन हे जवळपास दुप्पट होते. सप्टेंबर २०२१ मध्ये, कॅन्व्हाने २० कोटी डॉलर्स उभारले आणि ४० अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन घोषित केले.

कॅन्व्हाची स्थापना ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे मेलेनिया पर्किन्स, क्लिफ ओब्रेक्ट आणि कॅमेरून ॲडम्स यांनी १ जानेवारी २०१३ रोजी केली. पहिल्या वर्षी कॅन्व्हाचे ७ लाख ५० हजारपेक्षा जास्त युजर्स होते. पण या कंपनीच्या उत्तुंग यशामागे कॅन्व्हाच्या संस्थापिका मेलेनिया पर्किन्स यांचे कठोर परिश्रम आहेत. त्यांचाच प्रवास जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

मेलिना पर्किन्सने कॅन्व्हाची स्थापना करून डिझायनिंगच्या जगात क्रांती केली. आज एक नवशिक्या देखील कॅन्व्हा वापरून आश्चर्यकारक डिझाइन तयार करू शकतो. “यस्य कृत्यं न विघ्नंति शीतमुष्णं भयं रति । समृद्धिरसमृद्धिर्वा स वै पण्डित उच्यते ।।” या श्लोकाप्रमाणे ज्या व्यक्तीचं कार्य थंडी, उष्णता, भय, प्रेम, समृद्धी किंवा या सर्वांच्या अभावानेही बाधित होत नाही तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे.



स्वसामर्थ्याने अब्जाधीश बनलेल्या कॅन्व्हाच्या सह-संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेलानी पर्किन्सच्या कथेचे हे सार आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. मेलिना यांना आयुष्यात तब्बल १०० हून अधिक गुंतवणूकदारांच्या नकारांचा सामना करावा लागला. पण आज त्या ज्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत, तिथपर्यंत क्वचितच काही लोक पोहोचू शकतात. ज्यांना काही मोठे आणि नवे करायचे असूनही जर ते पुन्हा पुन्हा अडचणींमुळे निराश होत असतील तर अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मेलिना पर्किन्स यांचा हा जीवनप्रवास प्रेरणादायी ठरणार आहे.

मेलिना यांचं वय फक्त ३४ वर्षे आहे. त्यांचा जन्म १९८७ साली ऑस्ट्रेलियामध्ये झाला. २००७ मध्ये त्या एका विद्यापीठात पार्ट-टाइम शिकवत होत्या. विद्यार्थ्यांना ‘डेस्कटॉप डिझाईन सॉफ्टवेअर’ शिकवायचे होते. सॉफ्टवेअर खूप गुंतागुंतीचे आहे आणि ते शिकणे आणि शिकवणे सोपे नाही असे मेलिनाला असे वाटले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सॉफ्टवेअर खूप महाग देखील आहे. येथूनच त्यांना कॅन्व्हा तयार करण्याची कल्पना आली. एक असे सॉफ्टवेअर असावे ज्यामध्ये कोणताही मनुष्य सहज डिझाईन करू शकेल, असे त्यांना वाटले.

मेलिना यांनी नंतर एका बिजनेस पार्टनरसह ‘फ्यूजन बुक्स’ नावाची कंपनी सुरू केली. फ्यूजन बुक्स ही एक डिझाईन कंपनी होती. मेलिनाचा बिजनेस पार्टनर क्लिफ ओब्रेक्ट होता. दोन्ही बिजनेस पार्टनर क्लिफ आणि मेलिना यानंतर विवाहबद्ध झाले. २०१२ साली, ‘कॅमरून ॲडम्स’ त्यांच्या व्यवसायात सामील झाल्या आणि तिघांनी मिळून कॅन्व्हा सुरू केले. कॅन्व्हा इतर डिझाईन प्लॅटफॉर्मसपेक्षा वापरण्यास खूपच सोपे आहे.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

प्रत्येक व्यवसायाचे यश हे कधी आणि किती व्यवसाय निधी मिळतो यावर अवलंबून असते. कोणाची बिजनेस आयडिया जर १०० पेक्षा जास्त वेळा नाकारली गेली तर ती व्यक्ती आपल्या नवकल्पनेवरच शंका घेण्यास सुरुवात करेल. पण मेलिनाच्या बाबतीत असे काही घडले नाही. त्यांचा स्वतःवर आणि कॅन्व्हाच्या कल्पनेवर पूर्ण विश्वास होता. कंपनीला पहिला निधी मिळण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली.

“प्रत्यक्षात माझ्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे निधी मिळवण्यात अडचण आली.” असे स्वतः मेलिना पर्किन्स मान्य करतात. व्यवसाय ज्या प्रकारे प्रेझेंट केला पाहिजे त्याप्रमाणे तो होत नव्हता असा त्या चुकीच्या दृष्टिकोनाचा अर्थ होता. जेव्हा जेव्हा संभाव्य गुंतवणूकदाराशी चर्चा होत होती तेव्हा त्याला कॅन्व्हाचे फक्त तांत्रिक उपाय (टेक्निकल सोल्युशन्स) सांगितले जात असत. अशा शेकडो मिटींग्स याच प्रकारे संपल्या.

गुंतवणूकदारांना तांत्रिक उपाय माहित असणे आवश्यक नाही तर त्यांना यात नाविन्यपूर्ण असे काय आहे हे जाणून घ्यायचे आहे, हे मेलिना पर्किन्स आणि त्यांच्या बिजनेस पार्टनर्सच्या हळूहळू लक्षात आले. मग त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला. संभाव्य गुंतवणूकदारांना आता त्यांनी खरी, डिझाईनची आणि त्याबद्दल नव्याने आणलेल्या उपायांची गोष्ट सांगायला सुरुवात केली.

‘सॉफ्टवेअरची बटणे स्क्रीनवर नेमकी कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण सेमेस्टर लागतो’ असं अनेक विद्यार्थी म्हणायचे हे मेलिना यांनी गुंतवणूकदारांना सांगितले. ही झाली समस्या. आता या समस्येचं निराकरण करण्यासाठी कॅन्व्हा तयार केले गेले आहे आणि अनेक लोक कॅन्व्हा वापरत आहेत याचं स्पष्टीकरण मेलिना यांनी गुंतवणूकदारांसमोर अचूकरीत्या केलं. अखेर गुंतवणूकदारांचे विचार बदलू लागले आणि कंपनी वाढू लागली.

मध्यंतरी मेलिना पर्किन्स यांचा उल्लेख जगभरातील वृत्तपत्रे, न्यूज वेबसाइट्स आणि टीव्ही चॅनल्समध्ये झाला आहे. याचे कारण म्हणजे मध्यंतरी कॅनव्हाला २० कोटी डॉलर्सची गुंतवणूक मिळाली होती. या गुंतवणूकीनंतर, कॅन्व्हा एखाद्या स्त्रीद्वारे चालवल्या जाणाऱ्या जगातील सर्व स्टार्ट-अपमध्ये पहिल्या क्रमांकाचा स्टार्टअप बनला आहे. रुपयांमध्ये बोलायचं झालं तर सध्या कंपनीचे मूल्यांकन २२ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

समुद्री अंतर किंवा जहाजाचा वेग ‘नॉटिकल माईल’ किंवा ‘नॉट्स’मध्ये का मोजतात..?

Next Post

आकाश चोप्राला मैदानावर जे मिळालं नाही, ते त्याने ‘कमेंट्री बॉक्स’मध्ये कमावलं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

आकाश चोप्राला मैदानावर जे मिळालं नाही, ते त्याने 'कमेंट्री बॉक्स'मध्ये कमावलं

इतिहासातील सर्वात शक्तिशाली यो*द्धे असलेले रोमन ग्लॅडिएटर्स शुद्ध शाकाहारी होते!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.