The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगाला स्पर्शही न करता जग बदलणाऱ्या चिमुकल्याची गोष्ट

by द पोस्टमन टीम
8 May 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपल्या शरीरात नैसर्गिक प्रतिकार क्षमता असते. कुठलाही आजार पसरवणारा जीवाणू किंवा विषाणू जेव्हा आपल्या शरीरात शिरकाव करतो तेव्हा ही प्रतिकारशक्ती या जीवाणू किंवा विषाणू विरोधात शरीरात प्रतिकूल वातावरण निर्माण करते आणि तो विषाणू मारला जातो. त्यामुळे एखादा आजार झालाच तर तो लवकर आटोक्यात येतो. पण, ज्यांच्या शरीरात निसर्गत:च रोगप्रतिकारशक्ती नसते त्याचं काय? कोरोनाचं काय, साधी सर्दी आणि तापही अशा लोकांच्या जीवावर बेतू शकतो.

लाखात असे एखादे मुल जन्मते, ज्याच्यात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारी यंत्रणाच नसते.

काही जनुकीय बदलामुळे ही मुले जन्मत:च सिव्हर कंबाइंड इम्युनोडिफीशियन्सी या आजाराने ग्रस्त असतात ज्याला एससीआयडी म्हटले जाते. जात्याच प्रतिकारशक्ती नसल्याने यांची खूप काळजी घ्यावी लागते.

२१ सप्टेंबर १९७१ रोजी अमेरिकेत जन्मलेल्या डेव्हिड फिलीप व्हेटर हाच आजार घेऊन जन्माला आला. आजूबाजूच्या वातावरणातून संसर्ग होऊ नये म्हणून त्याला नेहमीच एका बायो बबलमध्ये ठेवले जात असे. बारा वर्षांचा होईपर्यंत तो चोवीस तास असाच बबलमध्ये जगला. आयुष्यातील शेवटचे दोन आठवडे काय तो फक्त मोकळ्या वातावरणात जगला असेल, तेही डॉक्टर आणि त्याचे आई-वडील त्याला वाचवण्याचा नाहक प्रयत्न करत होते म्हणून.

डेव्हिड व्हेटरसारखी मुले अगदी क्वचित जन्माला येतात. एससीआयडी म्हणजेच स्किड हा आजार आई-वडिलांतील काही गुणसूत्र मुलांमध्ये संक्रमित होऊन ॲक्टीव्ह होतात तेव्हाच होतो. दुर्दैवी गोष्ट म्हणजे या कुटुंबातील कोणत्याही मुलात हा आजार संक्रमित होण्याची ५०-५० शक्यता होती. म्हणूनच एका मुलीनंतर डेव्हिडच्या आईवडिलांना दुसरे अपत्य होऊच द्यायचे नव्हते. पण, मुलगी एकटीच पडते आणि तिला कुणीतरी सोबत भावंडं हवं म्हणून त्यांनी दुसरे मुल होऊ देण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत स्किडसारख्या आजारात बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्याचे तंत्रज्ञानही प्रगत झाले होते. त्यांना वाटले जरी होणाऱ्या मुलात हा आजार उद्भवला तरी या प्रगत तंत्राच्या सहाय्याने त्याच्यावर नक्कीच उपचार करता येतील असा त्यांचा समज होता.



डेव्हिड जन्माला आल्या आल्याच त्याला एका सुरक्षित बायो बबलमध्ये ठेवण्यात आले. बोनमॅरो ट्रान्सप्लांट व्यवस्थित होईपर्यंत त्याच्यासाठी हाच एक उपाय होता. 

त्याची बहिण कॅथरीनचा बोनमॅरो त्याच्याशी जुळेल असा डॉक्टरांचा कयास होता. पण, कॅथरीनचा रक्तगट आणि त्याचा रक्तगट जुळला नाही. आता जोपर्यंत त्याला जुळणारा बोनमॅरो मिळणार नाही तोपर्यंत त्याला बबलमधे राहणेच भाग होते. त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

त्याकाळात असे आणखीही काही बबल बेबीज् होते. पण डेव्हिडला जे थोडं फार दीर्घायुष्य मिळालं तेही त्यांच्या वाट्याला आलं नाही. ही मुलं अवघ्या पाच सहा महिन्यातच जग सोडून गेलीत. बबलमध्ये का असेना पण, डेव्हिड मोठा होत होता यानेच त्याच्या आईवडिलांना बरे वाटत होते.

बबलमध्ये असूनही त्याच्यासाठी एक स्पेशल चेंबर बनवण्यात आला होता. डॉक्टर, नर्स किंवा अगदी त्याच्या आईने जरी त्याला उचलून घ्यायचं असेल किंवा त्याला स्वच्छ करायचं असेल, तरी त्याच्यासाठी बनवलेल्या विशिष्ट चेंबरमध्येच जावं लागे. त्या चेंबरमधील प्रत्येक वस्तूचे निर्जंतुकीकरण केलेलं असे. तिथल्या भिंतीवर जे हँड ग्लोव्हज असत तेच घालून त्याला स्पर्ष करायचा.

त्याला दिले जाणारे अन्न, पाणी, त्याचे डायपर्स, कपडे, पुस्तके, छोटासा टीव्ही असे सगळे साहित्य निर्जंतुक करून मगच दिले जाई. निर्जंतुक करून पुन्हा ते एका एअरबॅगमध्ये लॉक केले जाई. 

तो तीन वर्षांचा झाला तेव्हा त्याच्यासाठी दवाखान्यात जसे स्पेशल चेंबर होते अगदी तसेच चेंबर त्याच्या कॉनरीमधील घरातही बसवण्यात आले. त्याला थोडासा बदल मिळावा म्हणून. कधी दवाखाना तर कधी घर अशी त्याच्या राहण्याची जागा सारखी बदलली जात असे. कधी कधी अगदी क्वचित त्याला बाहेर फिरायलाही नेले जात असे. पण त्याही वेळेस त्याच्या चेहऱ्याभोवतीचा बायो बबल न्यावाच लागे.

तो ६ वर्षांचा झाल्यावर अंतराळ संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी त्याच्यासाठी एक स्पेस सूट बनवला. हा स्पेशल स्पेस सूट घालून तो कुठेही फिरू शकत होता. पण हा सूटही एका लांब पाईपद्वारे बायो बबललाच जोडलेला होता. पण त्याला या सूटमध्येही कंटाळा येत असे. अगदी मोजून फक्त सात वेळच त्याने हा सुट वापरला असेल. नंतर त्याने हा सूट वापरणेही सोडून दिले.

आतापर्यंत त्याच्याबद्दल माहिती संपूर्ण अमेरिकेत पोहोचली होती. संपूर्ण देशात डेव्हिड एक उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय झाला होता. टीव्हीवरून वरचेवर त्याच्या हालचालींबद्दल किंवा त्याच्या तब्येतीत होणाऱ्या सुधारणेबद्दल माहिती दिली जात असे. त्यामुळे तो एक स्टार पर्सनॅलिटीच बनला होता.

पण तो असा किती दिवस त्या बबलमध्येच राहणार? उद्या त्याने त्या बबलमध्ये राहण्यास नकार दिला तर काय होईल? अशा नानाविध प्रश्नांना उत येऊ लागला.

चोवीस तास बबलमध्ये मानवी स्पर्शापासून दूर राहूनही हा मुलगा आनंदी कसा राहू शकतो असा प्रश्न खुद्द त्याच्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांनाही पडला होता.

शेवटी १९८३ मध्ये त्याच्या डॉक्टरांनी त्याचे बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्याचे ठरवले. यासाठी रक्तगट जुळण्याचीही आवश्यकता नाही असे तंत्रज्ञान त्यांनी शोधले होते. पहिल्यांदा डेव्हिड आपल्या बबलमधून बाहेर येऊन एका निर्जंतुक केलेल्या रूममधे ॲडमिट झाला. यावेळी त्याने पहिल्यांदा मानवी स्पर्श अनुभवले. अगदी त्याच्या आईने गालावर दिलेला गोड पापासुद्धा. पण हा मानवी स्पर्श त्याच्यासाठी खूपच दुर्दैवी ठरला.

त्याची बहिण कॅथरीनचा बोनमॅरो त्याच्यात ट्रान्सप्लांट करण्यात आला पण कॅथरीनच्या बोनमॅरोमधूनच त्याला संसर्ग झाला आणि यातून त्याच्या शरीरात कॅन्सर पसरला. कॅथरीनच्या बोनमॅरोमध्ये जीवघेणा एपस्स्टीन-बार नावाचा विषाणू होता जो डॉक्टरांना दिसलाच नाही. या विषाणूने डेव्हिडच्या शरीरात प्रवेश करताच त्याने कॅन्सरच्या पेशींना उत्तेजन दिले आणि रोगप्रतिकार नसलेल्या डेव्हिडच्या शरीराला या कॅन्सरने अवघ्या काही दिवसातच पोखरून काढले.

बारा वर्षांच्या डेव्हिडने २२ फेब्रुवारी १९८४ रोजी हे जग सोडले.

त्यानंतर एससीआयडीवरील उपचारात जर बोनमॅरो ट्रान्सप्लांट करायचाच असेल तर ते मुल तीन महिन्याचे होण्याआधीच केला तर यशस्वी होतो हेही सिद्ध झाले.

आता तर बाळाच्या जन्माआधीच म्हणजे गर्भातच त्याला स्किड असण्याचे निदान करता येते. आज हे तंत्रज्ञान बरेच प्रगत झाले आहे.

यामुळे कदाचित त्या बाळाचे आयुष्य वाढते पण ते बाळ सर्वसामान्य माणसासारखे जगू शकेल अशी कोणतीही उपचार पद्धती सध्या तरी विकसित झालेली नाही. यावर आता Gene थेरपीने उपचार करण्याचे प्रयोग सुरु आहेत पण त्यालाही अजून यश मिळालेले नाही.

डेव्हिडला कॉनरीतील स्मशानभूमीत दफन करण्यात आले, त्याच्या थडग्यावर लिहिलेली अक्षरे सांगतात, “त्याने कधीच या जगाला स्पर्श केला नाही, पण त्याच्यामुळे हे जग मात्र हेलावून गेले.”

डेव्हिडच्या अशा अवेळी जाण्याने त्याचे आईवडील आणि डॉक्टरांसह सर्वांनाच धक्का बसला होता. आपण कोरोनाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरात बसण्यास का-कु करत होतो. पण बारा वर्ष बायो बबलमध्ये कशी काढली असतील याची कल्पनाच केलेली बरी.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मिहीरकुल – आपल्या क्रौर्याने भारतभर तांडव घालणारा ‘हूण’ सम्राट

Next Post

या तेरा वर्षाच्या मुलाने बनवलीये साबणाचं पाणी रिसायकल करणारी वॉशिंग मशीन

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या तेरा वर्षाच्या मुलाने बनवलीये साबणाचं पाणी रिसायकल करणारी वॉशिंग मशीन

अमेरिकेतल्या पहिल्या पेंड्युलम घड्याळातील दोषामुळे फिजिक्सला कलाटणी मिळाली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.