The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेत कृष्णवर्णीय बाळांचा वापर मगरींच्या शिकारीसाठी ‘चारा’ म्हणून केला जात असे

by Heramb
28 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अमेरिकेत वर्णभेदाच्या नावाखाली सतत होत आलेले अत्याचारांबद्दल आणि अन्यायांबद्दल आपण जाणतोच. निवडक कृष्णवर्णीय लोकांनाच कशा प्रकारे “टार्गेट” केलं गेलं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘मार्टीन्सविले सेव्हन’. अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांना अशाच प्रकारे हीनतेची आणि गुलामासारखी वागणूक वेळोवेळी देण्यात आली. आज त्याच अमेरिकेतील काही राजकारण्यांनी जगभरातील मानवाधिकारांच्या रक्षणाचा ठेका घेतला आहे हे भलतंच नवल म्हणावं लागेल.

कोणत्याही संवेदनशील माणसाला कृष्णवर्णीय लोकांना दिली जाणारी हीन वागणूक बघितल्यावर त्यांची दया येईल. अमेरिकेतील काही उच्चवर्गीय आणि श्वेतवर्णीय लोक कृष्णवर्णीयांच्या लहान मुलांचा आपल्या शिकारीला आकर्षित करण्यासाठी वापर करत असत. त्यांची ही शिकार काही साधीसुधी नव्हती तर चक्क मगरीला आमिष दाखवण्यासाठी या कृष्णवर्णीय बाळांचा वापर होत असे. या सगळ्या प्रकारात त्यांचा जीव गेला तरी कोणाला पर्वा नव्हती. याबद्दलच अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी आजचा प्रयत्न..

कथेमध्ये काही बदल आपल्याला जाणवतात. परंतु काही घटनांचे अहवाल अत्यंत भयानक होते. सर्वांत विचित्र वास्तव म्हणजे दक्षिण युनायटेड स्टेट्समधील राज्यांमध्ये या गोष्टीला प्रोत्साहन देण्यात आले शिवाय अशा प्रकारच्या गुन्ह्यांत सहभागी गुन्हेगारांना माफी करण्यात आली. काही लोकांनी ‘हे फक्त चर्चेचे विषय आहेत आणि अशा कोणत्याही घटना प्रत्यक्षात घडल्याच नाहीत’ असे दावे केले. पण एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात मात्र या घटनांवर अनेक लेख आणि बातम्या वाचायला मिळत होत्या.

या अहवालांचा आणि बातम्यांचा आजवर शोध घेतला जात आहे. काही अहवालांनुसार, १८०० आणि १९०० च्या दशकाच्या उत्तरार्धात मगरीची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. कारण अशा प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांची मजबूत कातडी बेल्ट, शूज आणि पिशव्या तयार करण्यात वापरली जात असत. त्यामुळे या कच्च्या मालाची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणावर वाढली. 



३ जून १९०८ रोजी वॉशिंग्टन टाइम्समध्ये एक धक्कादायक बातमी छापून आली. यामध्ये एका प्राणिसंग्रहालयामध्ये दोन कृष्णवर्णीय लहान मुलांना २५ पेक्षा जास्त मगरी असलेल्या पिंजऱ्यामध्ये पाठवण्यात आले होते. मगरींनी साहजिकच त्या दोन मुलांना पकडायचा प्रयत्न केला. पण त्या दोन लहानग्यांच्या जीवापेक्षा प्राणीसंग्रहालयाच्या रक्षकांना “मनोरंजन” महत्त्वाचे होते. संपूर्ण बातमीमध्ये प्राणिसंग्रहालयातील त्या रक्षकरुपी भक्षकांना किंवा प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाला शिक्षा झाल्याचा कुठेही उल्लेख नव्हता. म्हणजे त्या कृष्णवर्णीय बालकांचे जीवन व्यर्थ होते. 

“रिचमंड टाइम्स डिस्पॅच” नावाचे वृत्तपत्र १६ ऑक्टोबर १९१९ रोजी प्रकाशित झाले, त्यामध्ये “गेम प्रोटेक्शन” नावाच्या विनोदाचा एक प्रकार होता. वृत्तपत्राच्या या भागामध्ये काही लघुकथा येत असत. फ्लोरिडाच्या काही अधिकाऱ्यांनी कृष्णवर्णीय बाळांचा मगरीसाठी अमिष म्हणून वापर केल्याची एक कथा यामध्ये आहे. पण त्या लहानग्यांप्रती सहानुभूती दाखवण्याऐवजी ही लघुकथा त्यांची थट्टा करते.

ऑक्टोबर १९०२ मध्ये सेंट लुईस रिपब्लिकने शहरातील वेल्ड प्रोफेट परेडमधील सर्व फ्लोट्सचे वर्णन केले. माजी कॉन्फेडरेट सैनिकाने स्थापन केलेली एक गुप्त सोसायटी, व्हील्ड प्रॉफेट ऑर्गनायझेशन संघटनेने लुईझियाना खरेदीचा इतिहास सांगण्यासाठी परेड आयोजित केली होती. फ्लोट क्रमांक १५ला “लुईझियाना मधील वृक्षारोपण जीवन” असे नाव दिले गेले होते. त्यात एक मगर एका कृष्णवर्णीय बाळाला गिळताना प्रदर्शित केली होती. 

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

आफ्रिकन अमेरिकन मुलांना मगरींसाठी आमिष म्हणून वापरण्याची कथा ही “निराधार” आहे असा काही गटांनी युक्तिवाद केला. फ्लोरिडामधील चिपले येथे असाच एक प्रयत्न झाला असे १९२३ साली टाइम मॅगझीनमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. पण याच लेखात अशा प्रकारच्या गोष्टींचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत असेही टाइम मॅगझिनने म्हटले आहे. फ्लोरिडाच्या चिपले शहराच्या ‘ऑरेंज काउंटी चेंबर ऑफ कॉमर्सने’ मगरींना दाखवण्यात येणाऱ्या कृष्णवर्णीय मुलांच्या आमिषाच्या कथेला “मूर्ख खोटे, खोटे आणि बिनडोक” असे म्हटले आहे.

आफ्रिकन अमेरिकन मुलांना मगरींसाठी आमिष म्हणून वापरण्याच्या कथांचा उगम कुठे झाला हे अस्पष्ट आहे. गुलामगिरीच्या इतिहासाबद्दलच्या काही प्राथमिक स्रोतांचा अभ्यास केल्यास दक्षिणेकडील दलदलीचा भाग हा पळून जाणाऱ्या गुलामांना नैसर्गिक अडथळा होता असे दिसून येते. पाठोपाठ येणाऱ्या एका श्वेतवर्णीय माणसावर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर त्याला दलदलीत पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता असे सॉलोमन नॉर्थअपने आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहे. त्यानंतर त्याने साप आणि मगर अशा सरपटणाऱ्या तसेच पाण्यात  वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांपासून स्वतःच्या बचावाचा प्रयत्न करताना रात्रीच्या वेळी अशा भूप्रदेशात फिरण्याच्या धोक्यांचे वर्णन केले आहे.

कृष्णवर्णीय बाळाला मगर गिळत आहे अशा आशयाची प्रतिमा दक्षिण युनायटेड स्टेट्समधील काही श्वेतवर्णीय लोकांच्या अहंकारातून तयार झाली असावी. कारण ही प्रतिमा पळून जाणाऱ्या गुलामांसाठीसुद्धा दहशत निर्माण करणारी होती. पण तरीही कृष्णवर्णीय लहान मुलांना अशा प्रकारे कशासाठी चित्रित केले गेले, याचा ठोस पुरावा मात्र आपल्याकडे नाही. सर्वांत वाईट म्हणजे अशा प्रकारच्या प्रतिमांचा आणि चित्रांचा वापर पर्यटकांना फ्लोरिडा राज्याकडे आकर्षित करण्यासाठी केला गेला होता.

फ्लोरिडा राज्यातील बहुसंख्या श्वेतवर्णीय जनतेने कमीतकमी अर्धशतकासाठी कृष्णवर्णीय बाळ हे मगरीसाठीचे आमिष असल्याची भयानक प्रतिमा अनेक कारणांसाठी वापरली. स्मृतिचिन्हे, पोस्टर्स आणि पोस्टकार्ड म्हणून अशा प्रतिमा विकल्या गेल्या. अशा वर्णद्वेषी आणि हिंसक थीमचे फ्लोरिडा राज्य हेतुपुरस्सर पर्यटकांसाठी बाजारीकरण करीत असे. यामुळे विसाव्या शतकात दक्षिणेत प्रचलित असलेल्या वंशभेदाची खोल पातळी आपल्याला दिसून येते.

काही लोकांनी त्यांच्या उत्पादनांच्या ब्रँडिंगमध्ये या कृष्णवर्णीय लोकांविरोधी प्रतिमांचा वापर केला. ‘लिटिल आफ्रिकन ज्येष्ठमध’, आणि ‘स्टेनिल्गो’ हा शरीरावरील डाग कायमचे काढून टाकण्यासाठी वापरण्यात येणारा साबण. १८९९ साली, ‘मॅमीज लिटल एलिगेटर बाईट’ हे गाणे ‘हेन्री वाइज’ने लिहिले होते. हे गीत ‘सिडनी पेरिन’ने संगीतबद्ध केले होते आणि मॉडे रॉकवेलने गायले होते. कृष्णवर्णीय मुलांचा मगरीसाठी आमिष म्हणून वापर करण्याबद्दल या गाण्यात दोनदा उल्लेख आहे.

१९५७ साली, सिबिल माल्बेम्बर्गने ‘आमोस’ नावाचे लहान मुलांसाठी पुस्तक लिहिले. ही कथा ‘अमोस’ आणि ‘बटरकप’ या दोन कृष्णवर्णीय मुलांविषयी होती. हे दोघे दलदलीत खेळत होते आणि त्यांची “स्निप-स्निप” नावाच्या मगरीशी मैत्री झाली होती. तथापि, पूर्वीच्या बातम्या आणि लेखाच्या तुलनेत, आमोस हे पुस्तक कृष्णवर्णीय मुलांवर केलेले पूर्वीचे अन्याय दूर करते असे दिसते. या कथेमध्ये, दोन आफ्रिकन अमेरिकन नायक आणि त्यांच्या नव्याने मिळवलेल्या मगररुपी मित्रामध्ये कोणतीही दुःखद घटना घडली नाही.

कृष्णवर्णीय मुलांचा मगरीसाठी आमिष म्हणून वापर होत असल्याच्या अशा वर्णद्वेषी ऐतिहासिक घटनांमुळे, फ्लोरिडा विद्यापीठाचे अध्यक्ष केंट फुच्स यांनी जून २०२० मध्ये विद्यापीठाच्या प्रसिद्ध “गेटर बाईट” चीअरवर बंदी घातली.

स्नोप्स.कॉमने (snopes.com) कृष्णवर्णीय मुलांचा मगरीसाठी आमिष म्हणून वापराच्या संदर्भात पूर्वी लिहिलेल्या अहवालांची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. लेखात असलेल्या कथा सिद्ध करू शकतील असे कोणतेही पुरावे त्यांना मिळालेले नाहीत. आजपर्यंत, काही इतिहासकार अजूनही अशा क्रू*र प्रथेला अनेक लोक बळी पडल्याचा दावा करणाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कृष्णवर्णीय मुलांचा मगरीसाठी आमिष म्हणून वापराची कथा खरी होती की नाही हा प्रश्न आहे. पण अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकनांना रूढीवादी लोकांनी कसे अमानुषपणे वागवले आणि अपमानित केले याचे हे चित्रण आहे. शतकानुशतके कृष्णवर्णीयांच्या जीवनाचे कसे अवमूल्यन केले गेले याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही कथा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

 

ShareTweet
Previous Post

कुंबळेचा १० विकेट्सचा विक्रम व्हावा म्हणून श्रीनाथने चुकूनही विकेट मिळू नये अशी बॉलिंग केली

Next Post

सगळ्या गावाच्या मिळून बँकेत ५००० कोटींपेक्षा जास्त ठेवी, हे आहे भारतातलं सर्वांत श्रीमंत गाव

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

सगळ्या गावाच्या मिळून बँकेत ५००० कोटींपेक्षा जास्त ठेवी, हे आहे भारतातलं सर्वांत श्रीमंत गाव

तेव्हा दोन ज्यू धर्मगुरूंनी मुस्लिमांच्या पवित्र 'काबा'चं रक्षण केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.