The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भटकंती – निसर्गाचा गूढ आणि अद्भुत चमत्कार ‘बेलम गुहा’

by द पोस्टमन टीम
6 May 2025
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गुहा म्हणजे प्राण्यांचे निवासस्थान हे तर आपल्याला माहिती आहेच. कधी काळी माणूसही गुहेतच राहायचा. आज प्रगत युगात पोहोचल्यावर आपण गुहेत राहण्याची कल्पनाही करू शकणार नाही. तरीही एखादी गुहा बघण्याची संधी मिळाली तर किती मजा येईल नाही! भारतीय उपखंडातील एक मोठी गुहा भारतातील आंध्रप्रदेश राज्यात आहे जी आज पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. आंध्रातील बेलम परिसरातील या गुहेला बेलम गुहा म्हटले जाते.

ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक रॉबर्ट ब्रूस फुट याला १८८४ साली या गुहांचा शोध लागला. कार्बन डेटिंग पद्धतीने या गुहेचे वय तपासले असता ते इसपू ४५०० पासून अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले. शिवाय १८८४ साली जेव्हा या गुहेचा शोध लागला तेव्हा तिथे काही भांडी आणि वस्तूही आढळल्या.

बौद्ध भिक्खू आणि जैन मुनींनी या गुहांमध्ये वास्तव्य केले असल्याचे पुरावेही इथे आढळतात.

२००२ पासून ही गुहा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. गुहेतील कोंदट अंधुक वातावरण आणि त्यात फिकट प्रकाशाचे केलेले लायटिंग यामुळे या गुहेतील वातावरण गूढ आणि मोहवणारे वाटते. एका वेगळ्या विश्वाची सफर केल्याचा अनुभव ज्याला घ्यायचा असेल त्याने या गुहेला आवर्जून भेट द्यायला हवी.

बेलम गुहा हैद्राबादपासून ३६५ किमी अंतरावर तर बेंगळूरूपासून ३०१ किमी अंतरावर वसलेली आहे. हैद्राबादपासून कुर्नुल मार्गे शॉर्टकटनेही जाता येते. कुर्नुलपासून फक्त १०० किमी अंतरावर असलेल्या बेलम गावातच ही गुहा आहे. कुर्नुलपासून तुम्हाला बस किंवा टॅक्सी अशी वाहने मिळू शकतात.



या गुहेची एकूण लांबी ३ किमी आहे, पण यातील फक्त १.५ किमी लांबीची गुहाच पर्यटकांसाठी खुली आहे. पुढे गुहेची उंची खूपच कमी कमी होत जाते त्यामुळे तिथे जाणे अडचणीचे ठरू शकते. या गुहेत सोडियम व्हेपरचे लँप बसवण्यात आले आहेत. शिवाय आत हवा खेळती राहावी म्हणून फ्रेश हवेसाठी पाईपलाईन केलेली आहे ज्यात छोट्या छोट्या छिद्रातून ताजी हवा आत सोडली जाते.

या गुहेच्या आत कुठेतरी पाताळगंगा या झऱ्याचा उगम होतो. भूगर्भशास्त्रज्ञांना अजूनही या झऱ्याचा उगम सापडलेला नाही. पण गुहेभोवताली वाहणाऱ्या या पाण्यामुळे गुहेत बरेच नैसर्गिक बदल पहायाला मिळतात.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

जमिनीत १५० फुट खोल असणारा हा झरा म्हणजे निसर्गाचे एक आश्चर्यच आहे.

गुहेखालून सातत्याने वाहणाऱ्या या पाण्यामुळे गुहेत ठिकठिकाणी चूनखाडीचे मोठमोठाले खडक निर्माण झाले आहेत. यातील काही खडक हे गुहेच्या छतापासून खालच्या दिशेने वाढलेले आहेत तर काही गुहेच्या जमिनीतून छताच्या दिशेने वाढले आहेत. या खडकाच्या अशा आकारांनी तर या गुहेभोवती आणखीनच चमत्कारी आणि गूढ वलय निर्माण झाले आहे.

बेलम गुहेच्या परिसरात जाताच तिथल्या अंगणात तुम्हाला एक कमळाच्या फुलात बसलेली एक मोठी मूर्ती आढळते. बौध्द धम्माशीसंबधित इतरही काही अवशेष या गुहेत सापडले होते जे सध्या अनंतपुरमधील वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.

गुहेत प्रवेश करण्याचा मार्गही खूपच सुंदर आहे. गुहेत जाण्यासाठी छोट्या छोट्या पायऱ्या केल्या आहेत त्या उतरून आत गेल्यावर एक मोठा पॅसेज लागतो ज्याच्या दोन्ही बाजूला दगडी बाक आहेत.

इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला पहिला स्टॅलेटाईट आणि स्टॅलागमाइट दिसेल. चुनखडी पाण्याच्या संपर्कात आल्याने अशा प्रकारच्या नैसर्गिक रचना तयार झाल्या आहेत. अशा रचना तुम्हाला इतरत्र कुठेही आढळणार नाही. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार अनुभवण्यासाठी तरी तुम्ही या गुहेला आवर्जून भेट द्यायला हवी. इथून पुढेही असाच मोठा पसेज आहे आणि त्यात वेगवेगळ्या खोल्या असल्याप्रमाणे चेंबर केलेले आहेत. ज्याला विविध नावांनी ओळखले जाते. जसे की ध्यान मंदिर, बौद्ध भिक्खुंनी हा भाग ध्यानसाधनेसाठी वापरला असेल असे वाटते. इथे दगडातच उशी आणि अंथरूण तयार केलेले दिसते. त्यानंतर पुढे जमिनीच्या खलून वाहणारी पाताळगंगा दिसते. मंडपम, कोटीलिंगळू असे आणखी काही भाग इथे आहेत.

चुनखडी आणि पाणी एकत्र आल्याने त्यापासून जे खडकांचे वेगवेगळे आकार तयार झाले आहेत. हे आकार विविध देवतांच्या मुर्तीसारखे दिसतात म्हणून त्यांना कोटीलिंगळू म्हटले जाते.

खडकातून तयार झालेल्या या आकारात एक सहस्त्रफणाधारी नाग देखील आहे.

आत केलेले लायटिंग आणि गुहेतील अंधार अशा दोन्हींची सरमिसळ झाल्याने आतील वातावरण आपल्याला अगदी भारावून टाकते. गुहेतील वातावरण दमट असल्याने आत जाताना सुती कपडे घालणे जास्त फायद्याचे ठरते. यामुळे अंगाला आलेला घाम शोषला जातो. शिवाय आत जाताना सोबत एक पाण्याची बॉटलही असावी. सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत ही गुहा पर्यटकांसाठी खुली असते.

पाताळगंगेमुळे आतील पृष्ठभागावर ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे आणि त्यात शिरणारे पाणी पाहतानाही एक चमत्काराचा फील येतो. या गुहेतच आणखी एक आश्चर्यकारक असणारी गोष्ट म्हणजे सप्तस्वर गुहा. या गुहेच्या एका भागात भिंतीवर कुठल्याश्या धातूचा पट्टीने किंवा हातातील वस्तूने हादरा दिल्यास सप्तस्वरांपैकी एक कुठला तरी स्वर निघतो. धातूच पट्टी आपटणाऱ्याला जर कुठल्या ठिकाणी हादरा दिल्यावर कुठला स्वर निघतो हे ओळखता येत असेल तर इथे असे हादरे देऊन इथून सप्तस्वर ऐकू येऊ शकतात.

बेलमच्या आसपासच्या परिसरातही अशीच काही आकर्षक ठिकाणे आहेत, ज्यांना तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता. जसे की यागांती, ओरावकल्लू, रॉक गार्डन, रोल्लापड्डू येथील अभयारण्य आणि अहोभिलाम मंदिर. थोडक्यात ही तुमची एक छोटी आणि मस्त अशी ट्रीप होऊ शकते. ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि विविध अद्भुत रोमांचक अनुभवांनी भरलेली ट्रीप अनुभवायची असेल तर बेलम गुहा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यास हरकत नाही.

अशा ठिकाणांना भेट दिल्यावर निसर्ग हा सर्वात मोठा कलाकार असल्याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या खानसाम्याने चंपारणमधे गांधीजींचा जीव वाचवला होता

Next Post

आपल्या धाडसाच्या बळावर या गुलामाने असंख्य गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केलं होतं

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

आपल्या धाडसाच्या बळावर या गुलामाने असंख्य गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केलं होतं

पावागढच्या महाकाली मंदिरातील रहस्यमय दगडाचं कोडं अखेर शास्त्रज्ञांना सुटलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.