The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकदा लंडनमध्ये चक्क ‘बिअर’चा महापूर आला होता..!

by द पोस्टमन टीम
7 January 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


शाळेत असताना आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी महापुरावर निबंध लिहिला असेल. आपण आजवर फक्त पाण्याचाच महापूर पाहिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल पाण्याशिवाय आणखी कशाचा महापूर येणार? बरोबरच आहे तुमचं! कारण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, आजपासून सुमारे दोनशे वर्षापूर्वी लंडनमध्ये बिअरचा महापूर आला होता. थांबा थांबा! बिअरचा महापूर म्हणजे काय आकाशातून पाण्याऐवजी बिअरचा पाऊस पडला नव्हता. तर, एका दारूभट्टीत झालेल्या अपघातामुळे हा महापूर आला होता. पण या पूरात नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

१७ ऑक्टोबर, १८१४ च्या त्या दुपारी लंडनच्या सेंट गिल्स परिसरात ऍने सॅव्हिले आपल्या मुलासाठी रडत होती. आदल्या दिवशीच तिचा दोन वर्षाचा मुलगा जॉन मयत झाला होता.

तिच्या घरातील तळमजल्यात ती तिच्या शेजारणीसह आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती. त्याला दफन करण्यासाठी ते जाणारच होते इतक्यात तिचा तो तळमजला बिअरनी भरून गेला आणि त्या तळमजल्यातील सगळे लोक त्या बिअरच्या पुरात बुडून गेले.

न्यू स्ट्रीटवरील एका इमारतीत भाड्याने राहणारी मेरी बेनफिल्ड आपल्या चार वर्षाच्या हॅना नावाच्या मुलीसोबत संध्याकाळचा चहा घेत होती. ती इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत होती त्या इमारतीच्या खाली बिअर साचून इमारत खिळखिळी झाली आणि कोसळली. तिची चार वर्षाची मुलगी या महापुरात वाहून गेली.

ग्रेट रसेल स्ट्रीटच्या मागच्या बाजूला असणाऱ्या टॅव्हीस्टॉक आर्म्स पब्लिक हाउसबाहेर १४ वर्षाचा एलिनोर कुपर पाणी भरत होता. त्याच्या शेजारची २५ फुट उंचीची ती भिंत कोसळली आणि तो त्याखाली गाडला गेला. त्या दिवशी लंडनमध्ये एक आश्चर्यजनक आपत्ती आदळली होती.



इतिहासात ही आपत्ती ‘द लंडन बिअर फ्लड’ म्हणून ओळखली जाते.

लंडनमधील हेन्री मॅक्स अँड कंपनी ही एक पेय निर्मिती करणारी भट्टी होती. राजा जॉर्ज तिसरा याच्या काळापासून ही भट्टी अस्तित्वात होती. या कंपनीचा मद्यनिर्मितीचा व्याप प्रचंड मोठा होता त्यामुळे विक्री झाल्यानंतरही तब्बल एक लाखापेक्षाही जास्त बॅरेल्स भरून त्यांच्याकडे दारू शिल्लक राहायची. एक बॅरेल सुमारे बावीस फुट उंचीचा होता. यातील प्रत्येक बॅरेलमध्ये काठोकाठ बिअर भरलेली असायची. हे मोठाले बॅरेल्स लाकडापासून बनलेले असत आणि त्यावर लोखंडाचे जाडजूड झाकण बसवलेले असे. यातील एका बॅरेलमध्ये ५,५६,५०० लिटर इतकी बिअर भरलेली होती आणि असे १० लाख बॅरेल्स त्या भट्टीत होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आंबवून ही बिअर बनवली जाते. एकदा अशीच एका बॅरेलमध्ये भरलेल्या बिअरची ही आंबण्याची प्रक्रिया सुरूच होती. तेव्हा बिअरच्या गोदामावर देखरेख करणाऱ्या क्लर्कने बघितले की एका बॅरेलचे टोपण थोडेसे हलले आहे. पण, अशा छोट्या छोट्या गोष्टी तर नेहमीच होत असतात म्हणून त्याने या घटनेकडे दुर्लक्ष केले आणि तो गोदामामधून बाहेर पडला.

पहाटे साडेचारच्या दरम्यान त्याने गोदामाची पाहणी केली आणि फक्त एकाच तासात म्हणजे साडेपाच वाजता त्याला गोदामातून एक मोठा स्फो*ट झाल्याचा आवाज आला.

गोदामातील एका बॅरेलमध्ये ज्यात आंबण्याची प्रक्रिया सुरू होती त्यात अतिरिक्त वायू धरला होता आणि आत प्रचंड दाब तयार झाल्याने हा बॅरेल फुटला. या बॅरेलच्या फुटण्याने त्याच्या शेजारील बॅरेल्सनाही धक्का बसला आणि ते सांडले. हा स्फो*ट इतका मोठा होता की या गोदामाची पंचवीस फुट उंचीची भिंत कोसळून पडली. आतली सगळी बिअर वाहून रस्त्यावर आली आणि वाटेत जे जे काही येईल तेही आपल्या सोबत वाहून नेऊ लागली.

बिअरची एकेक लाट १५ फुट उंचीची होती. भट्टीच्या मागच्या बाजूलाच एक झोपडपट्टी होती ज्यात हा बिअरचा प्रवाह शिरला आणि या झोपडपट्टीतील अनेक घरे वाहून गेली. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या या बिअरसोबत सगळेच कस्पटाप्रमाणे वाहत होते. या लाटेत प्रत्येकजण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. एकीकडे या बिअरच्या प्रचंड मोठ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता तर दुसरीकडे, लोक जे हाताला लागेल ते साहित्य घेऊन ही फुकटची बिअर भरून नेण्याची घाई करत होते.

ज्यात लाटेने नऊ जणांचा बळी घेतला होता त्यात या गोदामातीलच तीन कामगार मात्र आश्चर्यकारकरित्या वाचले होते. पण, आपल्या मुलासाठी शोकाकुल झालेली ऍने सेव्हील आता त्याच्याच शेजारी एका कबरीत दफन झाली होती.

यानंतर दोन दिवसांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन झाली. जिथे जिथे या महापुरामुळे नुकसान झाले होते त्या सगळ्या भागातून या समितीने सर्व्हेक्षण केले. क्रीकचा जबाबही नोंदवून घेतला. क्रीक गेली सतरा वर्षे हेन्री मॅक्स कंपनीसाठी काम करत होता. या समितीने दाखल केलेल्या अहवालावरून न्यायाधीशांनी याला एक दुर्दैवी आपत्ती घोषित केले. यात ज्या लोकांचा मृत्यू झाला तो दु:खद असला तरी तो अनाहूतपणे, अपघाताने आणि दुर्दैवामुळे झाला असल्याचे न्यायाधीशांनी जाहीर केले. या अपघातासाठी कोणालाही जबाबदार धरण्यात आले नाही.

तसेही सगळी भट्टीच वाहून गेल्यामुळे या भट्टीच्या मालकाचे दिवाळे निघालेच होते. त्यामुळे त्याला निर्दोष सोडण्यात आले. त्याला निर्दोष तर सोडलेच पण त्याने या सगळ्या जो कर भरला होता तोही त्याला परत मिळाला. त्याच्या धंद्याची नुकसान भरपाई म्हणून ब्रिटीश पार्लमेंटकडून त्याचा कर माफ करण्यात आला.

तेव्हापासून बिअर आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी लाकडी बॅरेल्स वापरण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्याऐवजी अधिक मजबूत अशी स्टीलची बॅरेल्स वापरली जाऊ लागली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या क्रिकेट मॅचमध्ये एका बॉलमध्ये ६,७ नाही तर तब्बल २८६ रन काढले होते..!

Next Post

या कारणामुळे उभारण्यात आली होती जगातील पहिली रक्तपेढी !

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या कारणामुळे उभारण्यात आली होती जगातील पहिली रक्तपेढी !

शास्त्रीजी आणि होमी भाभा यांच्या संशयास्पद मृत्यूमागे CIA असल्याच्या चर्चा आजही सुरु आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.