The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रिटनच्या लायब्ररीत ठेवण्यात आले आहेत जगातील सर्वात खतरनाक बॅक्टेरिया !

by द पोस्टमन टीम
25 March 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ब्रिटनमध्ये एक अत्यंत वेगळ्या प्रकारची लायब्ररी अस्तित्वात असून त्याठिकाणी बॅक्टेरियाचे संवर्धन करण्यात येते. नॅशनल कलेक्शन ऑफ टाईप कल्चर नावाच्या या लायब्ररीमध्ये ६००० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. यापैकी काहींवर उपचार उपलब्ध असून इतरांवर उपचार उपलब्ध नाहीत. जर याठिकाणी काम करणाऱ्या संशोधकांनी योग्य ती सावधगिरी बाळगली नाही तर त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो. यामुळेच या बॅक्टेरियांची हाताळणी करण्यासाठी फार कठोर नियम बनवण्यात आले आहे.

१९१५ साली फ्रान्सच्या स्टेशनरी हॉस्पिटलला एक टेलिग्राम आला आणि त्यात लिहिले होते की, ब्रिटिश सैनिकांची तब्येत फारच खराब होते आहे. पहिल्या महायुद्धाचा तो काळ होता व ब्रिटिश सैनिक एका खंदकात कितीतरी दिवस राहत होते. डॉक्टरांनी सैनिकांच्या अवघड परिस्थितीसाठी बॅक्टेरियाला दोष दिला. त्या बॅक्टेरियाचे नाव होते शिगेला फ्लेक्सनेरी.

ब्रिटिश सैन्यदलात अधिकारी असलेल्या बॅक्टेरियोलॉजिस्ट विल्यम ब्राऊटन अलकॉक यांनी त्या बॅक्टेरियाचा शोध घेऊन त्याला पॅराफिन वॅक्समध्ये संवर्धित करून ठेवले.

ब्रिटनच्या या लायब्ररीत ६००० प्रकारच्या बॅक्टेरियाचे संवर्धन करण्यात आले. ब्रिटनची ही लायब्ररी जगातील सर्वांत जुनी लायब्ररी आहे. इथले चांगल्या सुदृढ व्यक्तीलासुद्धा आजारी पाडू शकतात. या ठिकाणी अनेक बॅक्टेरियांचे जिवंत नमुने गोळा करून ठेवण्यात आले आहेत. तिथे त्यांचे RNA व DNA स्वरूपातील जनुकीय सूत्र देखील संवर्धित करण्यात आले आहे. तब्बल ९००० वेगवेगळ्या प्रजाती इथे आहेत. त्यांच्यावर इथे संशोधन करण्यात येते.

ही लायब्ररी तयार करण्याचा प्रमुख उद्देश या जिवाणूंच्या अथवा विषाणूंच्या प्रादुर्भावाने कोणी आजारी पडलं तर त्याला तत्काळ औषध पुरवठा करता यावा हा आहे. अँटीबायोटिकच्या निर्मितीसाठी ही संस्था जगभरात प्रसिद्ध आहे. पेशंटमध्ये कुठल्याही बॅक्टरियाचा कसा प्रादुर्भाव होतो व त्यातून त्याला कसे बरे करता येईल यावर या संस्थेत संशोधन करण्यात येते. याठिकाणी बहुसंख्य बॅक्टेरियावर संशोधन करून त्यांची माहिती साठवून ठेवण्यात आली आहे. आज जगभरातील संशोधकांना ही माहिती उपलब्ध आहे.



बॅक्टेरिया शिगेला फ्लेक्सनेरीचे सॅम्पल १९१५ मध्ये घेण्यात आले होते, आजही इथे हा बॅक्टेरिया जिवंत स्वरूपात आहे. दरवर्षी या बॅक्टेरियामुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. याठिकाणी काळानुसार या बॅक्टेरियाच्या रचनेतल्या बदलांचे निरीक्षण करून त्यानुसार त्यांच्यावरील प्रभावी औषधांची निर्मिती केली जाते.

या लायब्ररीतून इतर देशात बॅक्टेरियाच्या अभ्यासासाठी स्ट्रेन पाठवले जातात.

याठिकाणी बॅक्टेरियाला हाताळण्यासाठी फार कडक नियम बनवण्यात आले आहेत. एका विशिष्ट काचेच्या पात्रात एका द्रव्याच्या आवरणात वर पॅराफिनचे कव्हर चढवून मगच बॅक्टेरियाच्या दळणवळणाला हिरवा कंदील देण्यात येतो.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

इथे जिवंत स्वरूपाचे बॅक्टेरिया असल्यामुळे इथे अनेक प्रोटोकॉल्सचे पालन शास्त्रज्ञ करतात. तीन स्तरांच्या सुरक्षा नियमांचे त्यांना पालन करावे लागते. बॅक्टेरियाच्या बायोसेफ्टी लेव्हलला तपासूनच त्याला हातळण्याची परवानगी प्रदान करण्यात येते. ज्या जिवाणूंवर उपचार शक्य आहे, अशाच जीवाणूंना हाताळण्यासाठी देण्यात येते.

फक्त तज्ज्ञांनाच इतर घातक बॅक्टेरियाला हातळण्याची परवानगी असते. इथे बॅक्टेरियाबरोबर विषाणू देखील संवर्धित करण्यात आले आहेत.

लायब्ररीत दरवर्षी ५० -५०० नवीन बॅक्टेरियाचे सॅम्पल येतात. त्या बॅक्टेरियाला लगेचच संवर्धित करण्यात येत नाही. आधी त्या बॅक्टेरियाची संपूर्ण माहिती काढली जाते, तिची नोंदणी करण्यात येते, जर तो बॅक्टेरिया एखाद्या संशोधन संस्थेकडून आला असेल तर त्याला सरळ संवर्धित करण्यात येते.

परंतु जर तो एखाद्या अज्ञात स्थळावरून आणण्यात आला असेल तर अगार प्लेट्सवर त्याच्या कॉलनिज तयार करण्यात येतात, यासाठी बायो इनोक्युलेशन पद्धत वापरण्यात येते.

पुढे हे आगार प्लेट्समधील बॅक्टेरियाच्या कॉलनीज क्रिप्टोप्रोटेक्टनटमध्ये घालून उणे २३ अंशावर ठेवण्यात येतात. ३- ४ तासाने मग हे बॅक्टेरिया संवर्धित करण्यात येतात. बहुतांश बॅक्टेरिया या प्रक्रियेत बाद होतात.

अलीकडे ही लायब्ररी डिजिटाईज करण्यात आली असून आता एका क्लिकवर इंटरनेटवर येथील बॅक्टरीयांची माहिती उपलब्ध आहे. सुरुवातीला या बॅक्टेरियाची माहिती एका कागदावर लिहिलेली असायची जी या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हायची. आता इथे पूर्ण जिनोम सिक्वेन्सचे अध्ययन ऑनलाइन करता येऊ लागले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

संघाचे स्वयंसेवक दसऱ्याला शस्त्रपूजन का करतात ? जाणून घ्या विशेष कारण !

Next Post

या शास्त्रज्ञाला वेड लागलंय या भीतीने कमिटीतील लोक नोबेल देण्यासाठी कचरत होते

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या शास्त्रज्ञाला वेड लागलंय या भीतीने कमिटीतील लोक नोबेल देण्यासाठी कचरत होते

भटकंती - महाराजांच्या आठवणी जागवणारी उंबर खिंड

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.