The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका दारूच्या बाटलीसाठी १० हजार सैनिक आपले प्राण गमावून बसले होते

by द पोस्टमन टीम
3 March 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


दोन समूहात यु*द्ध केव्हा होते? ज्यावेळी त्या दोन्ही समूहातील वाद विकोपाला जातात आणि चर्चेतून प्रश्न सुटणे अशक्य होऊन जाते, त्याचवेळी त्यांच्यात भीषण यु*द्ध छेडते, जे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सुटत नाहीत, ते हिं*सेच्या मार्गाने सोडवण्याचा आणि एका समूहाने आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजे यु*ध्द.

इतिहास अशा असंख्य यु*द्धकथांनी भरलेला आहे. ज्यात अनेकांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर इतिहासात स्वर्णाक्षरांत आपले नाव कोरले आहे. परंतु इतिहासात काही यु*द्धे अशी देखील आहेत, ज्या मागील कारणे अत्यंत बालिश आणि हस्यास्पद होती. पण या यु*द्धांत असंख्य लोकांनी आपले प्राण गमावले होते.

असंच एक यु*द्ध आहे “दारूचे यु*द्ध”.

या यु*द्धात ‘दारू’साठी १० हजार ऑस्ट्रियन सैनिकांनी आपले प्राण गमावले होते. या यु*द्धाला इतिहासातील सर्वात मूर्ख यु*द्ध म्हटले जाते.

याचा किस्सा असा आहे की – १७८८ साली ऑस्ट्रियन सैन्य युरोपच्या कैरनसीब्स शहरापर्यंत येऊन पोहचले होते. त्याकाळी ऑस्ट्रियन सैन्य एका अंब्रेलासारखे कार्यरत होते. त्यांच्यासोबत अनेक राष्ट्रांचे सैन्य एकत्रितपणे यु*द्ध करत होते. याला हैब्सबर्ग साम्राज्य म्हणून देखील इतिहासात ओळखले जाते. या साम्राज्यात ऑस्ट्रियाबरोबरच जर्मनी, फ्रान्स, पोलंड आणि झेक प्रजासत्ताक या देशांचे सैन्य एकत्रितपणे यु*द्ध मोहिमेला जायचे.



या विविध देशांच्या सैनिकांना भाषेचा मोठा अडसर येत असे, वेगवेगळ्या भाषा असल्यामुळे त्यांना एकमेकांशी संवाद साधणे बऱ्याचदा अवघड असायचे, यामुळे सैन्यात सुसूत्रता निर्माण करणे फार जिकरीचे कार्य होते. या वेळी बहुभाषी अनुवादकांची मदत घेतली जात होती. यातच या सैनिकांचा कामकाजाचा बराच कालावधी खर्च होत होता.

हे सैन्य त्यावेळी ऑटोमन तुर्कांच्या साम्राज्यावर चालून गेले होते. त्या रात्री दोन्ही साम्राज्याचे सैन्य अगदी एकमेकांच्या समोर उभे होते. अशावेळी मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगली गेली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

परंतु १७ सप्टेंबरच्या रात्री भलताच प्रकार घडण्यास सुरुवात झाली. झालं असं की डॅन्यूब नदीच्या किनाऱ्यावर रात्री गस्त घालणाऱ्या ऑस्ट्रियन सैन्याला त्यांचे साथीदार असलेले रोमानियन सैनिक दारू पिताना दिसले. ऑस्ट्रियन सैन्य देखील थकलेले असल्यामुळे त्यांनी त्यांच्या सोबत प्यायला बसण्याचा निर्णय घेतला.

मित्र राष्ट्र रोमानियाचे सैनिक आपल्याला दारू देतील या भावनेने ज्यावेळी हे सैनिक त्यांचा वाट्याची दारू मागायला गेले त्यावेळी तिथे एकच दारूची बाटली शिल्लक होती. त्या बाटलीवरून या सैनिकांमध्ये आपसात बाचाबाची सुरू झाली.

आधी लहान वाटणाऱ्या भांडणात अचानक सैनिकांनी गोळ्या चालवायला सुरुवात केली.

ही तर कथेची केवळ एकच बाजू आहे, दुसरीकडे ऑस्ट्रियन सैन्याची एक तुकडी या दारू पिणाऱ्या सैनिकांपासून लांब तुर्की सैन्यावर नजर ठेवून होती. ज्यावेळी या दारुड्या सैनिकांमध्ये आपसातल्या लढाईत बंदुकीच्या गोळ्या चालवल्या गेल्या त्यावेळी ही मोर्चा सांभाळणारी सैन्य तुकडी सावध झाली. त्यांना असं वाटलं की ह*ल्ला झाला आहे.

इतर सैन्य तुकड्यांना सावधानतेचा इशारा म्हणून हे लोक ‘तुर्क तुर्क’ ओरडू लागले. त्यामुळे इतर सैन्य तुकड्या देखील सचेत झाल्या, या सैनिकांची ‘तुर्क तुर्क’ ही आरोळी त्या दारुड्या सैनिकांच्या कानापर्यंत देखील जाऊन पोहचली. त्यांचा देखील समज झाला की तुर्कांनी आक्र*मण केले. मग यांनी देखील आपल्या बंदुकी घेऊन नदीच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या त्यांच्याच सैन्य तुकडीवर ह*ल्ला चढवला.

दोन्ही बाजूला असणाऱ्या ऑस्ट्रियन व रोमानियन सैन्य तुकड्या तुर्कांच्या आक्र*मणाच्या द*हश*तीने एकमेकांवर गोळीबार करत होत्या. त्याच वेळी ऑस्ट्रियन सैन्यासोबत आलेल्या जर्मन सैन्य तुकडीला सर्व प्रकार लक्षात आला. मग त्यांनी दोन्ही बाजूच्या ह*ल्लेखोर सैनिकांना शांत करण्यासाठी ‘हाल्ट हाल्ट’ (halt halt) अशा आरोळ्या मारण्यास सुरुवात केली.

त्यांचा उद्देश इतकाच होता की हा जो काही आपसातल्या गैरसमजामुळे गोळीबार सुरू आहे, तो थांबावा, पण झालं भलतंच, या आपसात लढणाऱ्या ऑस्ट्रियन सैन्याला वाटले की ते लोक “हाल्ट हाल्ट” नाही तर ‘अल्लाह अल्लाह’च्या घोषणा देत आहेत. तुर्की सैन्य हे यु*ध्दावेळी ‘अल्लाह अल्लाह’ ओरडतात हे ऑस्ट्रियन सैन्याला माहिती होते.

त्यामुळे जर्मन सैन्य तुर्की सैन्य असल्याचा गैरसमज त्यांना झाला व त्यांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला. ते एकमेकांवर अंदाधुंद गोळ्या चालवत होते.

अशा प्रकारे दारूच्या नशेत आणि एकमेकांची भाषा न कळाल्यामुळे, या सैनिकांनी आपसातच यु*द्ध लढले. या यु*द्धात एका रात्रीत तब्बल १० हजार जण आपल्या प्राणास मुकले.

या यु*द्धाला युरोपियन इतिहासात कैरन्सीब्सचे यु*द्ध म्हणून ओळखले जाते. हे यु*द्ध झाल्यानंतर दोन दिवसांनी तुर्की सैन्य त्याठिकाणी येऊन पोहचले होते, पण ते ज्यावेळी तिथे पोहचले तेव्हा समोर यु*द्ध करायला शत्रूच नजरेस पडला नाही कारण ते आपसात लढून मेले होते.

हे सैन्य आपसात लढून कसे मेले हे समजून घेण्यासाठी तत्कालीन इतिहासकारांना तब्बल ४ दशकांचा कालावधी लागला. हे यु*द्ध अत्यंत मूर्खपणाने या सैनिकांनी आपसातच लढल्यामुळे या यु*द्धाचे व्यवस्थित दस्तावेज तयार करण्यात आले नव्हते. आजही हे यु*द्ध इतिहासातील सर्वात मूर्खपणाचे यु*द्ध म्हणून ओळखले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पाकिस्तानातील लष्करी हुकुमशाहीने झुल्फिकार भुट्टोचा बळी घेतला होता

Next Post

आपल्यावरील बला*त्काराचा बदला घेण्यासाठी फूलनदेवीने २० जमीनदारांना यमसदनी पोहचवलं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

आपल्यावरील बला*त्काराचा बदला घेण्यासाठी फूलनदेवीने २० जमीनदारांना यमसदनी पोहचवलं होतं

थायलंडमध्ये बनलेलं हे पेय आज जगात नंबर एकचं एनर्जी ड्रिंक बनलं आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.