The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेत लोक पैसे देऊन चक्क परमाणू स्फो*ट पाहायला जायचे..!

by द पोस्टमन टीम
12 December 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


तो शीतयु*ध्दाचा काळ होता. अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी एकेकाळी नेल्स एअर फ़ोर्स बेसचा भाग असणार्‍या नेवाडातल्या ६५० चौरस मैलांची निवड केली. या ठिकाणी एक अनोखा उपक्रम पार पडणार होता, जो वेगासमधे परमाणू पर्यटन नावाचा जगावेगळा प्रकार प्रचलात आणणार होता.

२२ एप्रिल १९५२ चा दिवस उजाडला तोच एक रोमांच घेऊन. अमेरिकन शीतयु*ध्दाच्या ऐन मध्यात एका महत्त्वपूर्ण घटनेचं जग साक्षीदार बनणार होतं. नेवाडातल्या युक्का तलावाच्या किनार्‍यावर असणार्‍या एका ज्वालामुखी टेकडीवर देशभरातून जवळपास दोनशे पत्रकार जमले होते. पत्रकार आणि छायचित्रकार समोर जे बघणार होते ते त्यांच्या नजरेतून आणि लेखणीतून सारं जग जाणणार होतं. ही ऐतिहासिक घटना होती, परमाणू बॉ*म्बचा स्फो*ट.

या प्रकारच्या चाचण्या वर्षभराहून अधिक काळ चालल्या होत्या मात्र पहिल्यांदाच त्याचं सार्वजनिक प्रदर्शन करण्यात येणार होतं. आजवर ज्याविषयी केवळ अधिकृत सूत्रं माहिती देत ती घटना आज प्रत्यक्ष बघायला मिळणार म्हणून पत्रकार चमूत उत्साह होता. ग्राउंड झिरोपासून केवळ दहा मैल अंतरावर “न्यूज नॉब” म्हणजेच पत्रकारांची सोय करण्यात आलेली होती. या ठिकाणाहून त्यांना समोर घडणार्‍या घटनेचं चित्रीकरण सहजपणे करता येणार होतं.

स्टेट वॉशिंग्टन बुलेटिनचा पत्रकार लिहितो, “आम्हाला गॉगल घालायला दिले गेले आणि संकेताची वाट पहायला सांगितलं गेलं. ते काही क्षण विलक्षण थराराचे होते. आम्ही विशिष्ट संकेत केलेल्या ठिकाणाकडे टक लावून पहात होतो. बॉ*म्ब टाकला गेला आणि दुसर्‍या क्षणाला एक चमकदार प्रचंड मोठा ढग छत्रीसारखा आकाशाच्या दिशेने झेपावत होता. हे घडत असतानाच एक उष्ण लहर आमच्या दिशेने झेपावली आणि मागोमाग शरीर हादरविणारा धक्का. हा धक्का इतका जोरकस होता की बेसावध असतो तर जमिनीवर पडलो असतो.”



३१ टन वजनाचा, पत्रकारांनी दिलेलं “बिग शॉट” हे टोपणनाव असणारा आणि ॲटोमिक एनर्जी कमिशननं दिलेलं “चार्ली” हे नाव असणारा हा बॉ*म्ब अमेरिकेनं दुसर्‍या विश्वयु*ध्दादरम्यान जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अनुक्रमे १३ किलोटन आणि २० किलोटनच्या तुलनेत बराच भक्कम होता.

अमेरिकन शीत*युध्दाच्या ऐन मध्याचा काळ होता. अमेरिकन सैन्य बॉ*म्ब शेल्टर्स आणि हवाई ह*ल्ल्यांच्या तालमीत व्यस्त होतं आणि अध्यक्ष ट्रुमन यांनी एक चकीत करणारा निर्णय घेतला.

नेवाडातली ६४० चौ. मैलांची जागा त्यांनी परमाणू स्फ़ो*टासाठी निवडली. नेवाडा येथील एअरबेसची निवड करण्यात आली. ही जागा परमाणू चाचण्यांसाठी एकमेव सुरक्षित जागा होती.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

चाचण्यांपूर्वी दोन आठवडे लास वेगसला याची कल्पना दिली गेली. इथल्या पर्यटन हालचालींवर नियंत्रण आणलं गेलं. याबाबत लास वेगसमध्ये सुरवातीला संभ्रमित वातावरण होतं. या चाचण्यांचे काही दुष्परिणाम झाले तर पर्यटन व्यवसाय धोक्यात येईल का? असाही विचार समोर आला. मात्र दुसरा मतप्रवाह हा होता की, लोकांमध्ये असणारी उत्सुकता व्यवसायवृध्दीसाठी वापरता येईल. जितके जास्त लोक या घटनेचे साक्षीदार बनायला लास वेगसला येतील तितका इथला व्यवसाय वाढेल. यापूर्वीही लास वेगसनं “गेटवे टू बोल्डर डॅम” अशी जाहिरात करून पर्यटकांना आकर्षित केलेलं होतंच आता “परमाणू शहर” अशी जाहिरात करुन अधिकाधिक पर्यटक खेचण्याचं आयतं कारण मिळालं होतं.

२७ जानेवारी १९५१ ला पहिला स्फ़ो*ट झाल्यानंतर वेगस चेंबर ऑफ़ कॉमर्सनं मोठ्या उत्साहात एक आवेदन जाहीर केलं ज्यात पर्यटन आकर्षणात पुढील परमाणू स्फो*टाच्या स्थळाचा उल्लेख करण्यात आला होता. २२ एप्रिल १९५२ च्या टेलिविजन प्रसारणानंतर तर अमेरिकेला परमाणू संस्कृतीनं झपाटून टाकलं. लास वेगस हे पर्यटकांच्या यादीत अग्रस्थानी आलं. इतकंच नाही तर या स्फ़ो*टादरम्यान निर्माण झालेला मशरुम क्लाउड हा वेगसमध्ये प्रतिक म्हणून वापरला जाऊ लागला.

पोस्टकार्डस, कॅण्डी, खेळणी या सगळ्यांवर हा ढग दिसू लागला. लास वेगसमधील फ़्लेमिंगो आणि सॅण्डससारख्या प्रतिष्ठानांनी ॲटोमिक कॉकटेल, ॲटोमिक हेअरडू आणि मिस ॲटोमिक बॉ*म्ब सौंदर्यस्पर्धांचंही आयोजन केलं.

लास वेगस चेंबर ऑफ़ कॉमर्सनं रितसर एक कॅलेंडरच प्रकाशित केलं. यात बॉ*म्बस्फ़ो*टांची सुनिश्चित स्थळं आणि त्यांच्या वेळा तसेच हे विस्फ़ो*ट कुठून जास्त चांगले दिसू शकतील त्या ठिकाणांची नावं, यांची यादीच प्रसिध्द केली. ‘द स्काय रूम ही डेझर्ट इन’मध्ये असणारी जागा नेवाडाचा पॅनोरॅमिक व्ह्यू देणारी होती जी पर्यटकांची सर्वात लाडकी होती. याव्यतिरिक्त माऊंट चार्लस्टन ही जागाही दुसर्‍या क्रमांकाची पसंती होती.

अनेक पर्यटक “ॲटोमिक बॉक्स लंच” सोबत घेत असत आणि सरकारी परवानगी काढून स्फ़ो*टाच्या शक्य तितक्या जवळ जाऊन चक्क पिकनिक करत असत. विस्फ़ो*टाच्या पूर्वसंध्येला वेगासमधील अनेक हॉटेल्स “डॉन बॉ*म्ब पार्टी”चं आयोजन करत असत. मध्यरात्रीपर्यंत जोशात मदिरापान करणारे पर्यटक बॉ*म्बची शलाका आकाश चमकवेपर्यंत पार्टी करत असत.

या चाचण्यांनी केवळ पर्यटन वृद्धी केली असं नाही तर सैनिकी नोकर्‍यातही वाढ झाली. दर तीन आठवड्यांनी एक बॉ*म्ब असे सलग बारा वर्षं २३५ बॉ*म्बस्फ़ो*ट करण्यात आले. या विस्फ़ो*टांचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून हवामानाचा अंदाज घेऊन ते केले जात. मात्र जसजशी वर्षं सरू लागली तसं या विस्फ़ो*टांचे दुष्परिणाम आजूबाजूच्या शहरात होत आहेत का? हे सतत तपासणार्‍या संशोधकांकडे वेगसच्या आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या. या तक्रारी मुख्यत्वे ईशान्य नेवाडा आणि दक्षिण उट्टान परिसरातून येत होत्या. या ठिकाणचे पाळीव प्राणी आणि जनावरं यांच्यावर या किरणोत्सारांचा दुष्परिणाम दिसू लागला होता. वाढत्या तक्रारींची दखल घेत १९६३ पासून जमिनीवर चाचण्यांना प्रतिबंध घालण्यात आला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गायींमुळे विषारी वायूंचं प्रमाण वाढतंय का?

Next Post

जवळपास साडे चारशे दिवस समुद्रात हरवला होता पण जगण्याच्या जिद्दीने परत आला

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

जवळपास साडे चारशे दिवस समुद्रात हरवला होता पण जगण्याच्या जिद्दीने परत आला

यांच्या पेंटिंग्स परदेशात करोडोत जातायत आणि आपल्याला यांचं नाव सुद्धा माहित नाही..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.