The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा ब्रिटीश अधिकारी यु*द्धात “अनकिलेबल सोल्जर” म्हणून ओळखला जायचा

by द पोस्टमन टीम
12 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


यु* द्ध म्हटले की त्याच्यातून अनेक पराक्रमाच्या गाथा जन्म घेतातच. पराक्रमी वीर पुरुषांच्या साहसाच्या आणि बलिदानाच्या या कथा ऐकून आपल्यातही वीरश्री संचारते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पराक्रमी यो*द्ध्याची गोष्ट सांगणार आहोत. ज्याने आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष यु*द्धभूमीवर अनेकदा जवळून मृत्यूचे दर्शन घेतले. जो अनेकदा मृत्युच्या दाढेतून सुखरूप परत आला. त्याची प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि स्फूर्ती पाहून कित्येकांना आयुष्यातील समस्या म्हणजे निव्वळ क्षुल्लक तक्रारी वाटतील. अशा प्रसंगांशी दोन हात करण्याची प्रेरणा मिळेल. त्याच्यासमोर उभ्या ठाकलेल्या अडचणी आणि त्यावर त्याने जिद्दीने केलेली मात याची ही गोष्ट वाचल्यानंतर तुम्हालाही तुमच्या अडचणी म्हणजे, ‘किस झाड की पत्ती’ असे वाटेल.

लेफ्टनंट जनरल ‘एड्रियन कार्टन डी वायर्ट’ यांच्या आयुष्यातील या प्रसंगावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. एड्रियन असे सैनिक होते ज्यांनी अनेकदा प्रत्यक्षात मृत्यूशी झुंज दिली. परंतु शत्रूच्या गोळीने त्यांचा मृत्यू व्हावा हे कदाचित नियतीलाच मंजूर नव्हते. एड्रियन यांची प्रचंड इच्छाशक्ती आणि विजीगिषु वृत्तीनेच ते अमर झाले. जाणून घेऊया सर एड्रियन कार्टन डी वायर्ट यांची ही असामान्य शौर्य गाथा.

बेल्जियमच्या ब्रसेल्समधील एका अत्यंत श्रीमंत कुटुंबात ५ मे १८८० रोजी त्यांचा जन्म झाला. एड्रीयन ६ वर्षांचे असतानाच त्यांची आई त्यांना सोडून कायमची निघून गेली. आपल्या वडिलांसोबत ते इजिप्तची राजधानी कैरो येथे राहू लागले. एड्रियन यांनी इजिप्तमध्ये अरबी भाषेचा अभ्यास सुरु केला.

त्यांना पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंड येथील कॅथोलिक बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. प्राथमिक शिक्षण बोर्डिंग स्कूलमधूनच पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते ऑक्सफर्ड विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी ऑक्सफर्डमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु एड्रियन यांना तर यु*द्धज्वराने पछाडले होते. म्हणून शिक्षण अर्धवट सोडूनच त्यांनी ब्रिटीश सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. घरातून तर त्यांना कधीच याची परवानगी मिळाली नसती, त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांना कसलीही कल्पना न देता कॉलेजचे शिक्षण सोडून दिले आणि ते ब्रिटीश सैन्यात भरती होण्यास पोहोचले.



त्यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व नव्हते, न त्यांचे वय सैन्यात भरती होण्यासाठी अनुकूल होते. सैन्यात भरती होण्यासाठी तर वयाची २५ वर्षे पूर्ण असावी अशी अट असूनही त्यांनी २०व्या वर्षीच सैन्यात प्रवेश केला.

यासाठी त्यांनी चक्क आपले वय वाढवून घेतले. ब्रिटीश नागरिकत्व नसताना त्यांनी नागरिकत्वाबाबतही खोटीच माहिती सादर केली.

एकदा सैन्यात भारती झाल्यावर त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. यु*द्धात सहभागी होण्याच्या कल्पनेनेच त्यांच्यात जोश संचारला होता. युद्ध भूमीतही ते अत्यंत त्वेषाने लढत होते. पण, शत्रूच्या बंदुकांनी त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना पोटावर गोळ्या लागल्या होत्या आणि त्यांची अवस्था अगदीच गंभीर बनली होती. ज्या त्वेषाने ते शत्रूशी लढत होते, त्याच त्वेषाने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली आणि त्यांनी चक्क मृत्यूलाही शह दिला. या गंभीर अवस्थेतून ते बचावले होते. पण, त्यांना पुन्हा यु*द्ध भूमीवर जाण्याची परवानगी मिळाली नाही. त्यांना इंग्लंडमध्ये परत पाठवण्यात आले आणि तिथूनच सैन्याची सेवा करण्याचे आदेश देण्यात आले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१९०१ साली ते रॉयल ड्रॅगन गार्ड्सचे लेफ्टनंट बनले होते. १९१० साली त्यांना कॅप्टनपदी बढती मिळाली. १९१३ साली त्यांना ब्रिटीश नागरिकत्वही देण्यात आले. यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना दोन कन्यारत्नांची प्राप्ती झाली.

१९१४ साली पहिले विश्वयु*द्ध सुरु झाले तेंव्हा त्यांना सोमालियामध्ये कॅमल कोरसोबत नेमण्यात आले. इथल्या लढाईतही ते गंभीर जखमी झाले होते. त्यांची तुकडी ज्या किल्ल्यात थांबली होती त्या किल्ल्यावर शत्रूने जोरदार ह*ल्ला चढवला. सगळीकडून गोळ्यांचा तुफान मारा सुरु होता. यातच एड्रियन यांना पुन्हा गोळ्या लागल्या. यावेळी तर त्यांना गेल्या वेळीपेक्षाही गंभीर जखमा झाल्या. दोन गोळ्या त्यांच्या डोक्याजवळून गेल्या होत्या. यामुळे त्यांचा डावा डोळा आणि कान कायमचे निकामी झाले. याही अवस्थेतून ते पुन्हा एकदा सुखरूप बाहेर पडले.

एवढ्या गंभीर अवस्थेतून बाहेर आल्यानंतर आणि एक डोळा गमावल्यानंतरही एड्रियन यांच्यातील यु*द्धाविषयीचे आकर्षण जराही कमी झाले नव्हते. आपला डोळा कायमचा गेला याच्या दु:खापेक्षा इंग्लंडने सोमालिया जिंकून घेतले याचा आनंद त्यांच्यासाठी कैक पटीने मोठा होता. या विजयाने त्यांच्यात पुन्हा एकदा वीररस संचारला आणि पुन्हा एकदा आपण यु*द्धभूमीवर जाण्यासाठी ते उतावीळ झाले होते. यु*द्धाने त्यांना दोनदा चक्क मृत्यूशी भेट घडवून आणली होती, तरीही त्यांचे यु*द्धप्रेम जराही कमी झाले नव्हते.

ते इंग्लंडला परतले. एक डोळा कायमचा काढला गेल्याने त्यांना चष्मा वापरण्याचे सुचवले होते. पण, एड्रियन चष्मा न लावता त्या काढलेल्या डोळ्याच्या ठिकाणी काळी पट्टी लावत असत. अगदी एखाद्या समुद्रीडाकूप्रमाणे. १९१५ साली पुन्हा एकदा ते यु*द्धभूमीवर जाण्यासाठी सज्ज झाले.

पहिल्या महायु*द्धात ते सात वेळा जखमी झाले होते असे म्हंटले जाते. यात त्यांना डोके, पाय, गुडघा, हात आणि कानावर गोळी लागली होती. बंदुकीच्या गोळीमुळे त्यांचा एक हातही निकामी झाला. त्यांनी जितक्यावेळा मृत्यूशी पंगा घेतला तितक्या वेळा मृत्यूशी लढण्याचे धाडस क्वचितच कुणी दाखवले असेल. इतक्या वेळा त्यांना बंदुकीच्या गोळीने जखमी केले पण, त्यांचा जीव घेऊ शकेल अशी एकही गोळी शत्रूकडे नव्हती.

एकदा तर त्यांच्या हाताला अशी गंभीर जखम झाली होती की त्यांचा हात कधीच काम करू शकणार नव्हता. त्यांनी डॉक्टरांना विनंती केली की तो हात कायमचा काढून टाकावा. पण, डॉक्टरांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. तेंव्हा त्यांनी स्वतःहून तो हात काढला. या घटनेबद्दल यांनी ‘हॅप्पी ओडिसी’ या त्यांच्या आत्मकथेतही लिहिले आहे, “मी डॉक्टरांना विनंती केली की तो हात काढून टाका. पण, त्यांनी ऐकले नाही. मग मीच माझा हात ओढला आणि तो शरीरापासून अलग केला. असे करताना मला जराही वेदना झाल्या नाहीत.”

१९१६ साली त्यांना ‘विक्टोरिया क्रॉस’ या ब्रिटीश सैन्यातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना इतक्या वेळा गोळ्या लागल्या होत्या, डोळा गमावला होता, कानाला गंभीर इजा झाली होती, इतकेच काय एक हातही गमवावा लागला, तरीही त्यांनी लिहिले आहे, “खरे सांगायचे तर, मी यु*द्धाचा आनंद घेतला, यु*द्धाने मला काही वाईट क्षण, वाईट अनुभव दिले. पण, त्याशिवाय काही चांगले आणि भरपूर उत्साहाचे आनंदाचे क्षणही दिले.”

१९४१ साली त्यांना युगोस्लाव्हिया येथील ब्रिटीश सैन्याच्या एका खास अभियानासाठी पाठवले गेले. यावेळी त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले. हे विमान भूमध्य सागरी समुद्रात कोसळले. परंतु एड्रियन यातूनही बचावले. ते पोहत पोहत समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. इथे त्यांना इटालियन सैन्याने ताब्यात घेतले. यावेळी एड्रियन ६० वर्षांचे होते.

इटालियन सैन्याने त्यांना बंदी बनवून ठेवले होते. वयाच्या साठाव्या वर्षीही त्यांच्यातील उत्साह, उर्जा, लढण्याची उर्मी जराही कमी झाली नव्हती. या कैद्यांच्या कॅम्पमधून अनेकदा पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. शेवटी ब्रिटीश सरकारने एड्रियन यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना इंग्लंडला परत आणण्यात आले. यानंतरही काही काळ ते सैन्यातच होते. नंतर मात्र त्यांनी लष्करी सावेतून निवृत्ती पत्करली.

वयाच्या ८३ व्या वर्षी ५ जून १९६३ रोजी त्यांचे निधन झाले. एड्रियन यांचे अख्खे आयुष्य म्हणजे धाडस, उत्साह आणि सकारात्मकतेचे अद्भुत उदाहरण आहे. इतिहासात आजही ते अनकिलेबर सोल्जर म्हणून प्रसिद्ध आहेत. एक असा सैनिक ज्याला शत्रूच्या कुठल्याच गोळीमुळे मरण आले नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

फुकट आहे म्हणून हॉटेलातून खिशात भरून आणतो त्या टूथपिकला पण स्वतःचा इतिहास आहे..

Next Post

सीबीआयवाले इंदिराजींना अटक करायला गेले होते पण…

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

सीबीआयवाले इंदिराजींना अटक करायला गेले होते पण...

राजदूत म्हणजे ८०च्या दशकातील तरुणांचा जीव की प्राण!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.