The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कम्युटरचा शोध चार्ल्स बॅबेजने लावला, परंतु पहिला कम्युटर प्रोग्राम या महिलेने लिहिला होता

by Heramb
27 November 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजमितीस कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणारे क्षेत्र म्हणजे ‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्र’. ‘आयटी वाल्यांना चांगला पगार असतो’ वगैरे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. किंबहुना आयटी क्षेत्राशी संलग्न झाल्याशिवाय कोणत्याही व्यवसायाचे पानही हालत नाही. पण आयटीमध्ये ऐटीत काम करण्यासाठी तुमच्याकडे कॉलेज डिग्रीबरोबरच आवश्यक ती कौशल्ये असायला हवीत. त्यांपैकी एक आणि सर्वात महत्वाचे कौशल्य म्हणजे प्रोग्रॅमिंग.

आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एखादी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय तर्क वापरता हे यात महत्वाचे. संपूर्ण आयटी इंडस्ट्रीचा गाभा म्हणजे तर्क आणि त्यावर आधारित प्रोग्रामिंग. पण या जगात प्रोग्रामिंगची सुरुवात कोणी केली असा प्रश्न तुमच्या मनात कधी उद्धभवला आहे का? आपल्यापैकी कोणी आयटी प्रोफेशनल असेल तर कदाचित उत्तर देईल, डेनिस रिचे, ज्यांनी ‘सी’ प्रोग्रॅमिंग लँग्वेज शोधून काढली. पण हे खरं उत्तर नाही.

जगातील पहिली प्रोग्रॅमर म्हणून ओळखली जाणारी एक ब्रिटिश महिला आहे. ‘ॲडा लव्हलेस’ म्हणून ती ओळखली जाते. तिचे मूळ नाव ‘ऑगस्टा ॲडा बायरॉन’ होते. ॲडाचा जन्म १८१५ साली लंडनमध्ये झाला. ती गणितज्ञ आणि चार्ल्स बॅबेजची सहकारी होती, बॅबेजच्या डिजिटल कम्प्युटरच्या प्रोटोटाइपसाठी तिने एक प्रोग्राम तयार केला. यामुळे तिला पहिली कम्प्युटर प्रोग्रामर म्हटले जाते.

लव्हलेस ही प्रसिद्ध कवी ‘लॉर्ड बायरन’ आणि ‘ॲनाबेला मिलबँके बायरन’ यांची मुलगी होती. तिच्या जन्मानंतर दोन महिन्यातच ‘लॉर्ड बायरन’ आणि ‘ॲनाबेला मिलबँके बायरन’ यांचा घटस्फोट झाला. ती या दाम्पत्याची एकमेव वैध अपत्य होती. नंतर तिच्या वडिलांनी ब्रिटन कायमचेच सोडले आणि त्याची मुलगी त्याला ओळखतही नव्हती. सुरुवातीच्या काळात काही खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांनी तिला शिकवले आणि काही काळाने ती स्वतः शिकू लागली. या स्वाध्यायामध्ये तिला लंडन विद्यापीठातील गणिताचे पहिले प्राध्यापक, गणितज्ञ-तर्कशास्त्रज्ञ ऑगस्टस डी मॉर्गन यांनी मदत केली.

तिच्या शैक्षणिक आणि सामाजिक कामांमुळे ती अँड्र्यू क्रॉस, चार्ल्स बॅबेज, सर डेव्हिड ब्रूस्टर, चार्ल्स व्हीटस्टोन, मायकेल फॅराडे आणि लेखक चार्ल्स डिकन्स यांसारख्या शास्त्रज्ञांच्या संपर्कात आली. यामुळे तिचे ज्ञान दिवसेंदिवस वाढत गेले. ॲडाने तिच्या दृष्टिकोनाचे वर्णन “काव्यशास्त्र” म्हणून केले आणि ती स्वतःला ‘अनॅलिस्ट’ किंवा ‘मेटाफिजिशियन’ म्हणत असे.



८ जुलै १८३५ रोजी तिने विल्यम किंग, बॅरन द एठथ्-शी लग्न केले आणि त्याला १८३८ साली उच्च पदाची सरदारकी (अर्ल) मिळाली तेव्हा ती लव्हलेसची ‘काउंटेस’ बनली. तिची बॅबेजशी ओळख त्यांच्या परस्पर मैत्रिणी, लेखिका ‘मेरी सोमरविले’ने १८३३ साली एका पार्टीमध्ये करवून दिली होती. तेव्हापासूनच तिला बॅबेजच्या मशिन्समध्ये रस वाटू लागला.

लग्न आणि मातृत्वामुळे तिच्या गणिताच्या अभ्यासात खंड पडला, पण सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर तिने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, १८४३ साली इटालियन गणितज्ञ आणि अभियंता ‘लुइगी फेडेरिको मेनाब्रेया’ यांनी लिहिलेल्या ‘1842: एलिमेंट्स ऑफ चार्ल्स बॅबेजस् अनॅलिटीकल मशीन’ या लेखाचे भाषांतर आणि त्यावर भाष्य करण्यासाठी तिच्याकडे पाठवण्यात आले होते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

तिचे तपशीलवार आणि विस्तृत भाष्य अतिशय उत्कृष्ट होते. विशेषत: बर्नौली नंबर्सचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी प्रस्तावित अनॅलिटीकल इंजिनचे प्रोग्रामिंग कसे केले जाऊ शकते याचे तिने केलेले वर्णन अतिशय उत्कृष्ट होते. आपल्या वर्णनात ती म्हणते, “ज्याप्रमाणे जॅकवर्ड-लूम मशीन फुले आणि पाने विणतात त्याप्रमाणे अनॅलिटीकल इंजिन बीजगणितीय नमुने विणते.”

अधिक महत्त्वाचे म्हणजे, लेखात ॲडाची काही विधाने आधुनिक दृष्टीकोनातून दूरदर्शी आहेत. ‘अनॅलिटीकल इंजिन संख्येव्यतिरिक्त इतर गोष्टींवरही काम करू शकते, हे इंजिन कोणत्याही जटिल समस्येचे विस्तृत आणि वैज्ञानिक विभाग पाडू शकते’ असे अनुमान तिने लावले, अशाच प्रकारच्या गोष्टींचा पुढे प्रोग्रॅमिंगमध्ये वापर होऊ लागला. पुढे यातच प्रगती होऊन ऑब्जेक्ट ओरियंटेड आणि ‘सी’ सारख्या लँग्वेजेसचा उदय झाला.

अनॅलिटीकल मशीनचे अंक-मोजणीच्या पलीकडेही अनेक उपयोग आहेत हे ओळखणारी ती पहिली होती आणि अशा मशीनद्वारे काम करणारा पहिला ‘अल्गोरिदम’ तिने प्रकाशित केला. यामुळेच तिला पहिली कम्प्युटर प्रोग्रामर म्हणून ओळखले जाते. गणिताच्या कक्षांबाहेर संगणकाची क्षमता सिद्ध करणारी ती पहिली गणितज्ञ होती.

बॅबेजने अनॅलिटीकल इंजिनचा फक्त एक छोटासा भाग तयार केला, परंतु लव्हलेसचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. सुरुवातीची प्रोग्रॅमिंग लँग्वेज ‘ॲडा’ हे नाव तिच्याच नावावरून ठेवण्यात आले आहे. तसेच, ऑक्टोबरमधील दुसरा मंगळवार हा अनेक ठिकाणी ‘ॲडा लव्हलेस डे’ म्हणून साजरा केला जातो. यादिवशी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याची पद्धत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

किरणोत्सर्गी पाणी चक्क एनर्जी ड्रिंक म्हणून दिलं जायचं, भीषण परिणाम समोर आल्यावर बंदी घातली

Next Post

इसवीसन २९५७ साठी पुरून ठेवलेलं टाइम कॅप्सूल MIT ला चुकून २०१५ सालीच सापडलं होतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

इसवीसन २९५७ साठी पुरून ठेवलेलं टाइम कॅप्सूल MIT ला चुकून २०१५ सालीच सापडलं होतं

खऱ्या आयुष्यातील 'इंडियाना जोन्स' ॲमेझॉनच्या जंगलात मोहिमेवर असताना बेपत्ता झाला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.