The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भटकंती: छ. संभाजीनगरची नहर-ए-पाणचक्की

by शंतनू परांजपे
11 April 2025
in भटकंती, इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


भटकंती या सदरातला हा पुढचा लेख. या सदराचा उद्देश हाच की सर्व कुटुंबीयांना घेऊन जाता येईल अशा एक प्रेक्षणीय स्थळाची अगदी नेमकी माहिती अगदी थोडक्यात देता येईल अशा स्वरूपात लिहिण्याचा मानस आहे. ५ ते १० मिनिटांत वाचता येईल असेच लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. 

प्राचीन काळातील काही गोष्टी आपल्याला अगदी चक्रावून टाकतात. आपल्या पूर्वजांकडे विज्ञानाचे प्रचंड ज्ञान होते आणि त्याचा उपयोग ते रोजच्या व्यवहारातील गोष्टी पार पाडण्यासाठी करत असत याचाच प्रत्यय आपल्याला जागोजागी येत असतो. असाच एक प्रयोग संभाजीनगर शहरात असलेल्या पाणचक्कीमध्ये केला आहे.

सुमारे चारशे वर्षांपूर्वी मलिक अंबर या सेनापतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये नहरींच्या माध्यमातून पाणी आणले आणि शहराला पाणी पुरवले. त्या योजनेला ‘नहर-ए-अंबरी’ असे म्हणत असत. त्यानंतर सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘नहर-ए-पाणचक्की’ची बांधणी करण्यात आली.

फिरत्या पाण्यात प्रचंड उर्जा असते आणि त्यातून दगडी जातेसुद्धा फिरवले जाऊ शकते ही अभिनव कल्पना त्याकाळातील अभियंत्याच्या डोक्यात आली. नहर-ए-पाणचक्कीचा उपयोग हा प्रामुख्याने दळणाचे जाते फिरवण्यासाठी केला जात असे आणि त्यातून धान्य दळण्यात येत असे.

जाते

असे म्हणतात की बाबा शहा मुसाफिर यांनी हे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण केले. या पाणचक्कीसाठी सुमारे चार मैलांवरून नहरीच्या माध्यमातून पाणी आणण्यात आले आहे. हे पाणी सायफन पद्धतीने भिंतीवर नेण्यात येते व तेथून जाते फिरविण्यासाठी आवश्यक असलेले पाणी तेवढे खापराच्या पाइपद्वारे वळवण्यात येऊन उरलेले पाणी खाली असलेल्या हौदात पडते.



पुर्वीच्या काळी ही पाणचक्की यात्रेकरूंचा थांबा असे. तिथे त्यांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था केली जात असे.  मक्का, मदिना इथे जाणाऱ्या यात्रेकरूंसोबतच बंगाल, ओडिशा, आणि हैदराबादकडे जाणारे यात्रेकरूसुद्धा पाणचक्कीत थांबत असत. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था पाणचक्कीत करण्यात येत असे. दगडी जात्यावर तयार करण्यात आलेले पीठ त्यासाठी वापरले जात होते.

असे म्हणतात की, या पाणचक्कीच्या इथे मोठे ग्रंथालय होते आणि अनेक विद्यार्थी इथे अभ्यास करण्यासाठी येत असत. त्यामुळे या जागेला बरेच महत्व प्राप्त झाले होते.

अभियांत्रिकीचा अविष्कार आणि पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या पाणचक्कीकडे पाहिले जाते. ही पाणचक्की पाहण्यासाठी देशविदेशीचे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पाणचक्की परिसर

पाणचक्कीची नहर आजही काही अंशी सुस्थितीत आहे. उन्हाळ्यात या नहरीचे पाणी बंद होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर नहरीतून पाणी वाहू लागते. त्यामुळे पाणचक्कीत पाणी येते. पाणचक्की पाहण्यासाठी देशी-परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

दरवर्षी राज्यभरातून अनेक शाळांच्या सहली पाणचक्की पाहण्यासाठी येतात. त्यामुळे उन्हाळ्यात पंपाद्वारे पाणचक्कीच्या भिंतीवर पाणी चढविण्यात येते. सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे पाणचक्कीची व्यवस्था आहे.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे ब्रिटीशांनी काढलेले हे पेंटिंग्ज तुम्ही पाहिलेत का…?

Next Post

या चीनी सम्राटाने मरणोत्तर सुरक्षिततेसाठी ८००० पुतळ्यांची फौज बनवली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

या चीनी सम्राटाने मरणोत्तर सुरक्षिततेसाठी ८००० पुतळ्यांची फौज बनवली होती

पृथ्वीवरच्या 'या' ठिकाणांवर गुरुत्वाकर्षण शक्ती चक्क "शून्य" आहे!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.