The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामाजिक विषयांना वाचा फोडणारा हा लेखसंग्रह प्रत्येकाने वाचायलाच हवा

by द पोस्टमन टीम
9 July 2020
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


लेखक-सागर कळसाईत

कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी निघाला आणि अमेरिकेत जाऊन पोचला. पण समुद्रमार्गाने अमेरिकेत कसं जायचं हे त्याने सगळ्या जगाला त्यावेळी दाखवून दिलं. अशी किती तरी माणसं समुद्रप्रवास करून नव्या जगाचा शोध लावू पाहत होते; पण त्यातले बरेच भटकले, बरेच समुद्रातच विलीन झाले. बऱ्याच लोकांना समुद्री वादळाशी झुंज देणं जमलं नाही. पण कोलंबस मात्र त्या प्रवासात येणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देऊन किनारा गाठू शकला. त्यामुळे त्याचं नाव आजही जगाला माहीत आहे.

आज अशाच एका झुंजारवादी व्यक्तीविषयी बोलावंस वाटतंय.

चपराक प्रकाशनचे संपादक- घनश्याम पाटील सर!

त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं एक जबरदस्त पुस्तक ‘दरवळ’ मिळालं. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुस्तक मिळण्यासाठी थोडा उशीर झाला पण जसं पुस्तक हातात घेतलं तसं सोडावसं वाटलं नाही.



कडू औषध आपण पटकन गिळून टाकतो आणि गोड चॉकलेट मात्र निवांत चघळत खातो. ‘दरवळ’ वाचताना मन अधिर होतं, सुरुवातीला खूप पटपट वाचून काढावं वाटलं. पण ‘दरवळ’मधील चौथाच लेख, ‘धोका प्रतिक्रियावाद्यांचा’ वाचला आणि थोडा थांबलो.

सरांनी यात म्हटलं आहे की, “अभिव्यक्तीच्या नावाखाली आपण फक्त प्रतिक्रियावादीच झालोय.” कोणतीही गोष्ट अर्धवट ऐकायची, वाचायची, पहायची आणि लगेच आपली मतं मांडायची यामुळे जो धोका निर्माण झाला आहे तो किती टोकाचा असू शकतो याची दखल सरांनी घेतली.

हे देखील वाचा

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मत कोणतंही असो, चांगलं किंवा वाईट ते मांडण्याआधी त्यामागची आपली जबाबदारी आपल्याला समजायला हवी, आणि मग मात्र ‘दरवळ’ वाचनाची अधिरता थांबवून एक-एक लेख नीट वाचत गेलो, त्यावर चिंतन-मनन करत गेलो.

अगदी सहज आणि सोप्या, तितक्याच परखड भाषेत सरांनी बऱ्याच विषयांवर प्रकाश टाकला आहे. एकीकडे फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्तेविषयी बोललं जातं, निसर्गाला, सरकारला, पूर्ण यंत्रणेला दोष दिला जातो पण त्यासाठी उपाययोजनेवर कोणीच बोलत नाही. सरांनी ‘आजार रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला’ या लेखामधून तेच उपाय मांडले आहेत.

देशभक्ती म्हणजे खूप मोठे शब्द न वापरता ‘स्वतःच्या बायकोला ओळख देणं ही सुद्धा देशभक्तीच ठरावी!’ असं म्हटलं आहे. हे वाक्य सहज वाटत असलं तरी गांभीर्याने लक्ष दिलं तर त्यामागे स्त्रिचा आदर लपला आहे.

‘कशासाठी? भुकेसाठी?’ हा लेख अप्रतिम झाला आहे. भूक म्हणजे काय? यावरचा अभ्यास आणि त्याचं केलेलं स्पष्टीकरण वाचून माणूस विचारात पडल्याशिवाय राहात नाही.

कोरोना व्हायरसने घातलेलं थैमान बघून पुण्यातून जेव्हा कुरियरने पुस्तक घरी पोहोचलं तेव्हा त्यावर सैनिटायजरचा फवारा करण्यात आला होता. पण ‘दरवळ’ वाचून झाल्यावर वाटलं की माझ्या मनावर, विचारांवर काही विषाणू बसले असतील तर ते खऱ्याअर्थी सरांच्या लेखणीमुळे दूर झाले. दरवळमधील प्रत्येक लेख त्यावर चिंतन आणि मनन करण्यास भाग पाडतो.

‘उमलत्या अंकुरांना बळ द्या’ या विचारातून मला स्वतःला नव्याने काही लिहण्याची प्रेरणा मिळाली. एकीकडे समाजातील कोणत्याही व्यक्तीविषयी सडेतोडपणे लिहायला सर घाबरत नाहीत तसंच त्याच व्यक्तीच्या चांगल्या कामाबद्दल त्याचं कौतुक करण्यातही कमी पडत नाहीत. कोणतेही व्यक्तिगत द्वेष-मोह न ठेवता तठस्थपणे विचार मांडणारा व्यक्ती सापडणे दुर्मिळच!

गेली सहा-सात वर्षात सरांसोबत राहून जे काही शिकलो ते अतुलनीय आहे. सरांचा संघर्ष, त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर धाडसाने मात करण्याची जिद्द जवळून पाहिली आहे. तसा त्यांचा हा संघर्ष त्याही आधीपासूनचा! स्वभावात विनम्रता, विचारात व्यापकता-कार्यात तत्परता आणि सर्वांनाच जमेल तशी मदत करण्याची वृत्ती या माणसात पाहायला मिळते.

म्हणतात ना, गुरु तो जो अज्ञानाचा अंधकार दूर करतो, तो जो आपल्यातील सामर्थ्याची जाणीव करून देतो. तो जो ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखवतो आणि त्या मार्गावर वेळोवेळी साथही देतो.

आज ‘दरवळ’ वाचून मला खात्री झाली की साहित्य क्षेत्रातला मला माझा ‘गुरु’ मिळाला. इथून पुढचा माझ्या लेखणीतून निघालेला प्रत्येक शब्द सर्वप्रथम घनश्याम पाटील सरांना अर्पण असेल!

घनश्याम पाटील सर तुमच्या विचारांचा, कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळत राहो.


“दरवळ” लेखसंग्रह  खालील लिंकवर उपलब्ध-
https://shop.chaprak.com/product/darval
(घनश्याम पाटील यांचा संपर्क क्रमांक- 7057292092)


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

३० वर्ष रोज १५ किमी जंगलातून वाट काढत हा पोस्टमन दुर्गम भागातील लोकांना पत्र पोचवतोय

Next Post

पानिपत नेमकं सुरू कधी झालं…?

Related Posts

ब्लॉग

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

24 April 2026
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
Next Post

पानिपत नेमकं सुरू कधी झालं...?

सार्वजनिक गणेशोत्सव नक्की कोणी सुरु केला...? टिळक, रंगारी की....

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

24 April 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.