The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांगुलीने भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दादा बनवलंय!

by द पोस्टमन टीम
7 July 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्रिकेट हा भारतीय खेळ नाही. तरीही भारतात जे क्रिकेट वेड पाहायला मिळते ते इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. भारतातील क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेट हा त्यांचा धर्म आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेट संघ हा कमकुवत संघ असल्याचे मानले जात होते. परंतु, हळूहळू भारतीय संघाने आपली कामगिरी उंचावत नेली आणि या कमकुवत असल्याच्या प्रतिमेला कायमचा छेद दिला. क्रिकेट जगतातील काही सामने क्रिकेट रसिकांसाठी आजही संस्मरणीय आहेत.

लॉर्डसच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला तो क्षण आजही क्रिकेट रसिक विसरले नसतील.

२००२ साली नेटवेस्ट सिरीजच्या फायनल मॅचचा तो प्रसंग भारतासाठी अगदीच संस्मरणीय आहे. ही अशी मॅच होती जिथे जवळजवळ भारताची हार निश्चित झाली होती. परंतु युवराज सिंग आणि कैफ या जोडीने हरलेला डाव जिंकून खेळाचा परिणामच उलटा करून टाकला.

२००२ सालापर्यंत क्रिकेटच्या क्षेत्रात भारतीय संघाचा चांगलाच बोलबाला होता. विदेशी दौऱ्यात भारतीय टीमला हलके समजण्याची चूक कोणीही करत नसे.



भारतीय संघात एकाच वेळी क्रिकेटचे तीन दिग्गज खेळाडू खेळत होते. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड.

सेहवाग देखील आपल्या खेळत तरबेज होता.

भारतीय संघाचा कर्णधार होता सौरव गांगुली. सलग ९ मॅचेसमध्ये हार पत्करावी लागल्याने सौरव गांगुलीवर या मॅचचा चांगलाच दबाव होता. नेटवेस्ट सिरीजची ही फायनल जर जिंकली नसती तर सलग दहावा पराभव भारताच्या पदरी पडला असता. सौरव गांगुलीला आपली आणि आपल्या संघाची क्षमता सिद्ध करून दाखवायची होती.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

१३ जुलै २००२ रोजी झालेल्या या मॅचमध्ये सौरव गांगुलीने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ८व्या ओव्हर पर्यंत ४२ रन केले होते.

झहीर खान बॉलिंग करत होते. झहीर खानचा स्विंग बॉल ओळखता न आल्याने निक नाईट आउट झाला आणि इंग्लंडचा कर्णधार नसीर हुसेनने बॅटिंग घेतली. हुसैनवर देखील रन बनवण्यासाठी दबाव होता. नसीरने मार्क ट्रेस्कोथिकसोबत भागीदारी करत १८५ धावांचा डोंगर रचला.

मार्क ट्रेस्कोथिकने १०९ रन बनवले. नसीर हुसेनने ११५ रन बनवले. आशिष नेहराच्या बॉलवर नसीर हुसेन आउट झाला. नसीर हुसेनने चांगली कामगिरी केली होती. नंतर आलेल्या खेळाडूंनी पण चांगली कामगिरी केली. इंग्लंडच्या संघाने ५० ओव्हरमध्ये ५ बाद ३२५ धावांचे आव्हान उभे केले.

इंग्लंडने एवढी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर सौरव गांगुली आपल्या गोलंदाजांवर चांगलंच चिडला होता. कारण, फिल्डिंग करत असताना इंग्लंडच्या टीमला २६०-७० धावांवरच रोखणे हे त्यांचे लक्ष होते. परंतु भारतीय संघाचे हे लक्ष्य साध्य झाले नाही. दहावा पराभव पदरी पडतो की काय ही भीती सौरव गांगुलीला आतून अस्वस्थ करत होती. हीच भीती मनात घेऊन सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरले. दोघांनी मिळून शतकाची भागीदारी केली आणि विजयाचा पाया रचला.

५व्या ओव्हरमध्ये भारतीय संघाने १०६ धावा केल्या होत्या. संघाची स्थिती आत्तापर्यंत तरी मजबूत होती. परंतु चांगला शॉट खेळण्याच्या नादात गांगुली आउट झले.

काही काळाने सेहवाग पण बोल्ड झाला. आता २ बाद ११४ धावा अशी परिस्थिती होती.

यानंतर सचिन तेंडूलकर, दिनेश मोंगिया आणि राहुल द्रविड हेही फारशी चांगली कामगिरी न करताच परतले. इंग्लंडला आता विजयाची खात्री वाटत होती. कारण भारतीय संघातील चांगल्या खेळाडूंना त्यांनी परत पाठवले होते. इथून पुढे तर भारताला ही मॅच जिंकणे शक्यच नाही असा इंग्लंडचा पक्का समज झाला होता.

१५० धावाही पूर्ण झाल्या नव्हत्या आणि त्याआधीच भारताचे पाच खेळाडू चीत होऊन तंबूत परतले होते. सर्व फलंदाज लॉर्ड्स मैदानावर हताश होऊन बसले होते. इकडे इंग्लंडच्या गोलंदाजांची चेंडू फेक अधिक तीव्र होत होती. भारताला २०० चा टप्पा देखील पार करणे अशक्य आहे असे चित्र निर्माण झाले होते. अशातच मोहम्मद कैफ मैदानात उतरला आणि त्याने ५० धावा काढल्या. आता इंग्लंडचा कर्णधार नसीर हुसेनच्या चेहऱ्यावर देखील थोडीशी चिंता दिसू लागली. युवराजसिंगने देखील चांगले शॉट लावले. त्यावेळी हे दोन्ही नवोदित खेळाडू होते आणि दोघेही इतकी चांगली कामगिरी करतील याचा कुणीच अंदाज बांधला नव्हता.

दोघांनी मिळून ८० चेंडूत १२१ धावांची भागीदारी केली. यामुळे भारतीय संघाला थोडासा दिलासा मिळाला. आता भारतीय संघाला जिंकण्यासाठी ५० चेंडूत ५९ धावांची गरज होती. कसा बसा ३००चा टप्पा पार केला. आता तर हरभजन आणि कुंबळे देखील बाद झाले होते.

मोहम्मद कैफने कशीबशी गाडी रुळावर आणली होती. आता टीम इंडियाला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये दोन धावांची आवश्यकता होती तर इंग्लंडला जिंकण्यासाठी दोन विकेटची आवश्यकता होती. नसीर हुसेनच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले होते. शेवटची ओव्हर कुणाला द्यायची यावर विचार विमर्श केल्यानंतर एंड्र्यू फ्लिंटॉपला पाठवण्यात आले.

फ्लिंटॉपने पहिलाच चेंडू डॉट टाकला. त्यावर धावसंख्या वाढली नाही. दुसऱ्या चेंडूत एक धाव घेता आली. आता भारताला ४ चेंडूत १ धाव हवी होती.

तिसऱ्या चेंडूत झहीर खानने कव्हर खेळला आणि धावत सुटला. कैफदेखील विजेच्या वेगाने पळाला आणि शेवटची धाव पूर्ण केली. इंग्लंडच्या संघाचा चेहरा पूर्ण उतरला होता. भारताने ही मॅच जिंकली होती.

सलग ९ पराभव पचवल्यानंतर मिळालेल्या विजयाने गांगुलीला अक्षरश: बेहोष करून टाकले होते. लॉर्डसच्या बाल्कनीत उभे असलेल्या गांगुलीने विजयाच्या जल्लोषात अंगातील टीमची जर्सी काढली आणि ती हवेत फिरवली.

भारतीय संघासाठी हा विजय अगदीच धुंद करणारा होता. भारतीय खेळाडूंनी जल्लोष सुरु केला. सगळ्यात जास्त आनंद तर गांगुलीच्या चेहऱ्यावरून झळकत होता. गांगुलीच्या जल्लोषाने लॉर्डसचे मैदानदेखील त्यादिवशी हादरून गेले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

“दादा”पासून सुरु झालेलं “विजयपर्व” माहीने अखंड चालू ठेवलं

Next Post

राजाजींनी चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांची जाणीव नेहरूंना वेळीच करून दिली होती

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

राजाजींनी चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांची जाणीव नेहरूंना वेळीच करून दिली होती

मक्केत जन्मलेल्या मौलानांनी भारताच्या शिक्षणक्षेत्रात मुलभूत भर घातलीये

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.