The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्मिळ आणि आपल्या पाकिटात जपून ठेवलेली एक रुपयाची नोट आता परत येतेय

by द पोस्टमन टीम
17 March 2025
in ब्लॉग, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


पैसा म्हणजे जीवन नसले तरी जीवनाचा एक अविभाज्य घटक नक्कीच आहे. पृथ्वी सूर्याभोवती नाही तर रुपयाभोवती फिरते असेही कुणीतरी म्हटले आहे. भारतीय चलनासाठी रुपया हा शब्द सोळाव्या शतकापासून रूढ आहे. पूर्वीच्या काळी सोन्याच्या मोहरा, तांब्याचे दम, चांदीची नाणी अशा धातू रूपातील चलनाचा वापर करून व्यापार विनिमय चालत असे. हळूहळू चलनाचे मूल्य घसरत गेले तसे त्याचे भौतिक रूप देखील बदलत गेले.

सोन्याच्या मोहरा आणि चांदीची नाणी कालबाह्य झाली आणि त्याऐवजी कागदी नोटांचे चलन सर्वांनी स्वीकारले. आजही भारतात एक, दोन, पाच, दहा रुपयांची नाणी वापरली जात असली तरी, मोठे व्यवहार मात्र नोटा वापरूनच केले जातात.

१ रुपयाची नोट ही चलनातील सर्वात छोटी नोट मानली जाते. नोटबंदीच्या काळात नोटा आणि बंदा रुपयाची किंमत आपण सर्वांनीच अनुभवला आहेच. २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार झाल्या. त्याऐवजी २०००, ५००, २००, आणि १०० रुपयाच्या नव्या नोटा चलनात आल्या.

आपण वापरत असलेल्या या नोटा रिझर्व्ह बँक चलनात आणत असते. नोटांच्या छपाईपासून, बँकांपर्यंत त्या नोटा पोहोचवणे आणि त्यांचा हिशोब ठेवणे या सर्वांची जबाबदारी रिझर्व बँकेची असते.



१ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि तेंव्हापासून ब्रिटिशांनी रिझर्व्ह बँकेला रुपया चलनात आणण्याचा अधिकार दिला. भारतात नोटांची पहिली प्रेस १९२८ साली स्थापण्यात आली. तत्पूर्वी कागदी नोटा बँक ऑफ इंग्लंड येथून छापल्या जात होत्या.

३० नोव्हेंबर १९१७ रोजी पहिल्यांदा एक रुपयाची कागदी नोट चलनात आली. या एक रुपयाच्या नोटेने आता शंभरी पार केली आहे. या शंभर वर्षाच्या प्रवासात या नोटेने बरेच बदल अनुभवले आहेत.

१९१७ मध्ये आलेली पहिली रुपयाची नोटही आजच्या नोटेच्या तुलनेत थोडी साधीच होती. तिचा रंग फिकट पिवळसर होता. ही नोट बँक ऑफ इंग्लंडमाध्ये छापण्यात आली होती. या नोटेवर डाव्या कोपऱ्यात इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचम याची प्रतिमा असलेला नाण्याची छाप आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

नोटेच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात आणि खालच्या डाव्या कोपऱ्यात 1 Rupee असं इंग्रजीत लिहिलं आहे. शिवाय यावर, ‘मी धारकाला एक रुपया ही रक्कम देण्याचे वचन देतो आहे,’ अशी प्रॉमिसरी नोटही छापण्यात आली होती. ही झाली पुढची बाजू याच्या मागच्या बाजूला आठ वेगवेगळ्या भारतीय लिपींमध्ये एक रुपया असं छापलं आहे.

एक रुपयाचं मूल्य आज फार नसलं तरी एक रुपयाच्या नोटेचं महत्व मात्र खूप मोठं आहे. एक रुपयाची नोट ही भारतीय चलनात किमतीने सर्वांत लहान असली तरी, अधिकाराने ती मोठीच आहे.

कारण, इतर सर्व नोटा रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणल्या जात असल्या तरी, एक रुपयाची नोट मात्र भारत सरकार थेट चलनात आणतं. म्हणूनच एक रुपयाच्या नोटेवर ‘भारत सरकार’ असा उल्लेख असतो आणि भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. हो! एक रुपयाच्या नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी नसते.

व्यवहारात एक रुपया मूल्य असणाऱ्या या नोटेच्या छपाईसाठी बराच खर्च येतो. आरबीआयच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार १९२६ मध्ये पहिल्यांदा एक रुपयाच्या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती. १९४० साली ही छपाई पुन्हा सुरु करण्यात आली. यानंतर, पुन्हा १९९४ मध्ये या नोटेची छपाई बंद करण्यात आली. त्यानंतर २०१५ मध्ये या नोटेची छपाई पुन्हा सुरु करण्यात आली.

कोणत्या किमतीच्या किती नोटा छापायच्या हे देशाचा विकास दर आणि मुद्रस्थितीच्या दरावर ठरवण्यात येते. नव्या नोटा छापताना फाटक्या नोटा किती, खराब झालेल्या नोटा किती, राखीव साठ्याची आवश्यकता किती याचा देखील विचार केला जातो.

२०२० च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत, वित्त मंत्रालयाने एक रुपयाच्या नव्या नोटेची छपाई सुरु करण्याचे ठरवले, यासाठी गॅझेट अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तर, वित्त मंत्रालयाच्या नव्या सुचनेनुसार एक रुपयाच्या या नव्या नोटेचे स्वरूप नेमके कसे असेल हे जाणून घेऊया.

  • या नव्या नोटेवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वर ‘भारत सरकार’ असे लिहिलेले असेल.
    एक रुपयाच्या नव्या नोटेवर २०२० सिरीज मधील एक रुपयाच्या नाण्याची प्रतिमा असेल ज्यावर, ‘सत्यमेव जयते’ लिहिले असेल.
  • या नोटेच्या नंबरींग पॅनेलवर L अक्षर छापलेले असेल.
  • या नोटेवरील पहिले तीन अल्फान्युमरिक चिन्हे की एकाच आकाराची असतील.
    नव्या नोटेच्या खालच्या डाव्या बाजूला एक काळी पट्टी असेल ज्यावर नंबरींग पॅनेल असेल.
    या नोटेवर एक रुपयाच्या नाण्याची प्रतिमा छापलेली असेल त्यावर २०२० लिहिले असेल आणि भारतीय रुपयाचे चिन्ह ‘₹’ देखील लिहिलेले असेल.
  • या नव्या नोटेच्या दुसऱ्या बाजूला देखील भारत सरकार आणि ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ लिहिलेले असेल.
  • त्यावर ‘समुद्र सम्राटाचे’ चित्र असेल. रुपयाच्या चिन्हासोबतच त्यावर धान्याचे देखील चित्र असेल. जे देशाच्या कृषिप्रधानतेचे प्रतिक आहे.
  • या नोटेचा रंग गुलाबी आणि हिरवा असेल.
  • या नोटेचा आकार ९.७ X ६.३ सेमी इतका असेल.
  • या नोटेवर अशोक स्तंभाचे वॉटरमार्क असेल.
  • डाव्या बाजूला वरून खालच्या दिशेने भारत लिहिलेले असेल.

एक रुपयाची ही नोट किमतीने सर्वात लहान असली तरी तिचा इतिहास मात्र मोठा आहे. अर्थात, एक रुपयांच्या नोटा नियमितपणे छापल्या जात नाहीत. नाणी आणि नोटांच्या संग्रह करणाऱ्या लोकांकडून अशा नोटांना मोठी मागणी असते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नियोजन आयोगाचे प्रमुख माँटेक सिंग अहलुवालिया यांच्यासारख्या नामवंत वित्त सचिवांची स्वाक्षरी असलेल्या नोटा तर आता दुर्मिळ झाल्या आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

गंगू मेहतर – १८५७च्या उठावातील एक विस्मृतीत गेलेला महान क्रांतिकारक

Next Post

लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे खरे अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे खरे अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत

जेआरडी टाटांनी या माणसाला "भारतीय हवाई वाहतुकीचे संस्थापक" म्हणून गौरवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.