The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदी चित्रपट संगीताला श्रीमंत करणारा मराठी माणूस- लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर

by द पोस्टमन टीम
29 October 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


१९६०च्या दशकात जेव्हा घराघरांत त्या मोठया काळ्या तबकड्यांवर सुमधुर गाणी लावली जायची, त्या तबकड्यांवर एलपी असे लिहिलेले असायचे.

अनेकांना एलपी म्हणजे लॉन्ग प्लेयिंग रेकॉर्डस् असे न वाटता ते लक्ष्मीकांत-प्यारेलाल असे लिहिलेले आहे असे वाटायचे इतकी त्यांच्या संगीताची मोहिनी श्रोतृवृंदांच्या मनावर होती.

काळाच्या ओघात रेकॉर्डस् कालबाह्य झाल्या आणि त्यांची जागा कॅसेट आणि सीडीजने घेतली. तरीही लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर कायम होती आणि आजही त्यांची गाणी लोक तेवढ्याच आवडीने पुन्हा पुन्हा ऐकतात.

लग्नाचे संगीत, दोस्तांची मैफिल ते एखाद्या प्रेमभंग झालेल्याच्या दुःखात सोबत असा सगळीकडे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताचा वावर होता.

बिंदिया चमकेगी, मैं शायर तो नहीं, चोली के पीछे क्या है अशी विविध ढंगांची गाणी देऊन लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या जोडीने १९६३ ते १९९८च्या काळात तब्बल ६३५ हिंदी चित्रपटांना संगीत देऊन चित्रपटसंगीताच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांत कोरले आहे.



हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकारांची सर्वाधिक यशस्वी जोडी म्हणून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचेच नाव घेतले जाते. पारसमणी पासून त्यांनी सुरुवात केली तेव्हा प्यारेलाल केवळ २३ वर्षांचे होते आणि लक्ष्मीकांत हे २६चे होते.

इतक्या लहान वयात त्यांनी हे यश मिळवले ते काही सहजसाध्य नव्हते. त्यासाठी त्यांनी संगीताची लहानपणापासून साधना केली, कष्ट घेतले, मेहनत केली. तेव्हाच त्यांच्याकडून रसिकांना सुमधुर संगीताची मेजवानी मिळू शकली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म ३ नोव्हेंबर, १९३७ रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्म झाल्याने त्यांचे नाव लक्ष्मीकांत असे ठेवण्यात आले होते. लक्ष्मीकांत यांचे बालपण मुंबईच्या विले पार्ले पूर्वेतल्या एका चाळीत गेले. त्यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

घरातल्या गरिबीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. लक्ष्मीकांत यांच्या वडिलांचे मित्र एक संगीतकार होते. त्यांनी लक्ष्मीकांत व त्यांच्या मोठ्या बंधूंना संगीत शिकण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार लक्ष्मीकांत सारंगी वाजवायला शिकले व त्यांचे मोठे बंधू तबलावादन शिकले. लक्ष्मीकांत यांना प्रसिद्ध सारंगीवादक हुसेन अली यांच्या सहवासात तब्बल दोन वर्षे राहण्याची संधी मिळाली

संगीतकार होण्याच्या आधी लक्ष्मीकांत यांनी हिंदी तसेच गुजराती चित्रपटांत लहानमोठ्या भूमिका केल्या. पुंडलिक व आँखे या चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केली होती.

लक्ष्मीकांत दहा वर्षांचे असताना त्यांना लता मंगेशकर यांच्या रेडियो क्लब, कुलाबा येथे झालेल्या कॉन्सर्टमध्ये सारंगी वादन करण्याची संधी मिळाली.

लतादीदींना त्यांचे सारंगी वादन खूप आवडले होते व त्यांनी त्यांचा कार्यक्रम संपल्यानांतर स्वत: त्यांच्याशी बोलून त्यांचे कौतुक केले होते. लक्ष्मीकांत व प्यारेलाल हे दोघेही लहानपणापासूनच अनेक वाद्ये वाजवण्यात पारंगत होते.

लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर व प्यारेलाल रामप्रसाद शर्मा हे दोघे एकत्र कसे आले हीसुद्धा रंजक गोष्ट आहे. प्यारेलाल शर्मा यांचे वडील रामप्रसाद शर्मा हे प्रख्यात ट्रम्पेटवादक व संगीतकार होते.

त्यांनी अनेक निष्णात वादक घडवले. प्यारेलाल यांच्या रक्तातच संगीत होते. त्यांना त्यांच्या वडिलांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच संगीत शिकवण्यास सुरुवात केली.

 

Laxmikant Pyarelaal 3 postman

त्यांचे वडील अत्यन्त कडक शिस्तीचे होते. त्यांना संगीत साधनेत कामचुकारपणा आणि टाळाटाळ अजिबात चालत नसे. त्यामुळेच प्यारेलाल हे संगीतात पारंगत झाले.

प्यारेलाल ११ वर्षांचे होते तेव्हा त्यांची हृदयनाथ मंगेशकर यांच्याशी मैत्री झाली. त्यांच्यासह त्याच काळात त्यांची लक्ष्मीकांत यांच्याशी देखील मैत्री झाली आणि त्यांनी सर्वांनी मिळून “सुरेल बाल कला केंद्र” या नावाने एक वाद्यवृंद स्थापन केला व लहान वयातच अनेक कार्यक्रम केले.

याच काळात लक्ष्मीकांत व प्यारेलाल यांची एकमेकांशी अगदी छान मैत्री झाली. प्यारेलालना संगीतकार व्हायचे नव्हते. त्यांना येहुदी मेन्युहिनप्रमाणे एक प्रख्यात व्हायोलिनवादक व्हायचे होते.

त्यासाठी वयाच्या सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते. पण लक्ष्मीकांत यांनी त्यांना थांबवले. ते दोघेही आघाडीचे वादक झाले व कल्याणजी-आनंदजी यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागले.

त्यावेळी त्यांचे नाव सहाय्यक संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल असे झळकत असे. त्यावेळी लक्ष्मीकांत त्यांना आपण हे नाव कायम ठेवू असे म्हणत असत आणि नेमके तेच घडले.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना पारसमणी हा चित्रपट मिळाला आणि त्यातील गाणी प्रचंड गाजली, आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही जोडी संगीतकारांची जोडी म्हणून चित्रपटसृष्टीत प्रस्थापित झाली.

त्यानंतर आलेल्या “दोस्ती” या चित्रपटातील गाणीसुद्धा रसिकांनी अगदी डोक्यावर घेतली. गाण्यांसाठी लोक चित्रपट बघू लागले. या चित्रपटासाठी त्यांना त्या वर्षीचा प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला.

या जोडीने मि. एक्स इन बॉम्बे’, ‘मिलन’, ‘पत्थर के सनम’, ‘शागीर्द’, ‘आये दिन बहार के’, ‘फर्ज’ अशा अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले. त्यानंतर आलेल्या “बॉबी” , “प्रेम रोग” , “सत्यम शिवम सुंदरम” या चित्रपटांतील गाण्यांनी तर लोकांना वेडच लावले.

लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार या हिऱ्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीताचे सोने केले.

गीतकार आनंद बक्षी यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताला न्याय देत अनेक सुंदर गीते रचून रसिकांसाठी असंख्य सुंदर आणि अजरामर गाणी तयार केली.

लक्ष्मीकांत व प्यारेलाल हे एकमेकांशी संगीताच्या व मैत्रीच्या धाग्याने एकमेकांशी इतके घट्ट जोडले गेले होते की दोघांच्याही मनात जवळजवळ सारखीच धून तयार होत असे. त्यांचे संगीत दुधात साखरेसारखे एकजीव झाले होते.

लक्ष्मीकांतजींनी संगीत दिलेले गाणे कुठले आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले गाणे कुठले हे अजिबात कुणी ओळखू शकणार नाही इतके त्यांचे विचार आणि संगीत एकसारखे होते. योगायोगाने त्या दोघांचाही रक्तगट बी पॉझिटिव्ह होता.

एकदा प्यारेलाल यांना अंघोळ करता करता एक चाल सुचली. तशाच प्रकारची चाल लक्ष्मीकांत यांना देखील सुचली होती. इतके हे दोघे एकमेकांशी जोडले गेले होते.

मिलनमधील ‘सावन का महिना’, ‘आए दिन बाहेर के”मधील ‘सुनो सजना’ , दुष्मनमधील ‘एक दुष्मन’ , शागीर्दमधील ‘दिल विल प्यार व्यार’ ही गाणी प्रचंड गाजली.

त्यांनी जवळजवळ ६०० चित्रपटांना संगीत दिले आणि त्यातील बहुसंख्य चित्रपट हे यशस्वी ठरले होते. त्यांना ७ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता तर असंख्य वेळेला नामांकने मिळाली होती. हम हा त्यांचा अखेरचा गाजलेला चित्रपट होता.

त्यानंतर त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता ओसरू लागली होती. त्यांनी संगीत दिलेले अनेक चित्रपट देखील तिकीटबारीवर साफ कोसळले होते. १९९८ सालचा बरसात की रात हा त्यांनी संगीत दिलेला अखेरचा चित्रपट.

२५ मे १९९८ रोजी मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंडे निकामी झाल्याने लक्ष्मीकांत कुडाळकर यांचे वयाच्या ६१व्या वर्षी अकाली निधन झाले आणि चित्रपटसृष्टीने एक मोठा संगीतकार गमावला.

त्यांचे सुमधुर संगीत आजही लोक विसरलेले नाहीत. त्यांची गाणी आजही एव्हरग्रीन आहेत आणि लोक असंख्य वेळेला ती ऐकतात.

हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या संगीताने श्रीमंत करणाऱ्या लक्ष्मीकांत कुडाळकर यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली !


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

 

Tags: bollywoodMusician
ShareTweet
Previous Post

भारताच्या अंतराळ संशोधनात क्रांती आणणाऱ्या दुर्लक्षित शास्त्रज्ञाची कथा…

Next Post

जगातील सर्वांत जास्त जुळे राहतात केरळमधील ‘या’ गावात

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जगातील सर्वांत जास्त जुळे राहतात केरळमधील 'या' गावात

बर्लिन वाॅल ओलांडण्याचे किस्से जर्मनीत आजही मोठ्या गमतीने सांगितले जातात

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.