The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चीन त्यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर रोबोट्सची भरती करतोय, हे आपल्यासाठी धोकादायक आहे.

by द पोस्टमन टीम
16 June 2020
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आज जग जेव्हा एकीकडे कोरोना व्हायरसच्या महामारीशी लढा देत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनने आपल्या कुरापती चालूच ठेवल्या आहेत. अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील संघर्ष फारच तणावपूर्ण होत असून चीनने आपल्या सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. चीन सध्या सैन्याचा आधुनिकीकरणाकडे वळला आहे. याचाच एक भाग म्हणून चीनकडून एक रोबोट योद्धा तयार करण्यात आला आहे.

चीन नेहमी आपल्या सैन्याचे बळ वाढवण्यासाठी आपल्या आक्रमकतेचे प्रदर्शन करत असतो. सध्या चीनने त्यांच्या सैन्यात एका रोबोट योध्याचा समावेश केला आहे.

हे रोबोट मशीन गन लोड करण्यापासून मिसाईल लाँच पर्यंत अनेक कामं करू शकतात. या रोबोटमुळे मनुष्यबळाची हानी टाळणे देखील शक्य होणार असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे.

चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीने (PLA) जवळ सध्या अनेक छोटे मैदानी रोबोट आले आहेत. जे अत्यंत बिकट परिस्थितीत देखील कार्य करू शकतात, युद्धभूमीची योग्य प्रकारे देखरेख करण्यास सक्षम आहेत. इतकंच नाहीतर हत्यारांच्या मदतीने शत्रूला कायमच संपवू शकतात.

सीसीटीव्ह ह्या चिनी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, एक मीटरपेक्षाही उंचीचा हा रोबोट एका छोट्या हल्लेखोर वाहनासारखा दिसतो. हा टँकच्या स्वरूपात असून, युद्धातील परिस्थिती अनुरूप स्वतःत बदल करण्याची क्षमता या रोबोटमध्ये आहे. अत्यंत तीव्र गतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा रोबोट जाऊ शकतो अगदी जिना देखील चढू शकतो.



या रोबोटमध्ये एक मशीनगन आहे तिच्या जोडीला रात्री परिस्थितीचे अवलोकन करायला एक नाईट व्हिजन कॅमेरा देखील आहे.

तो व्यवस्थितपणे शत्रूचा शोध घेऊन त्यावर निशाणा साधू शकतो. हा रोबोट कुठल्याही गुप्तचर कारवाईत देखील सहज वापरला जाऊ शकतो. याचा निशाणा अगदी अचूक असला तरी काही काळासाठी याला मानवी दिशा निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. याला लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने स्वयंचलित केले जाणार आहे आणि चीनच्या सैन्यात हा रोबोट सामील होणार आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

चिनी सैन्यात मोठ्या संख्येने रोबोटचा समावेश केला जात आहे. रॉकेट लाँचर लोड करून शत्रूवर हल्ला करण्याचे काम स्वयंचलित रोबोटचा माध्यमातून केले जाणार आहे. यामुळे ज्या परंपरागत क्रेनचा वापर केला जाई तो आता टळणार असून त्यावर खर्च होणारे मनुष्यबळ युद्धात वापरता येणार आहे.

एका सैन्य तज्ञाच्या हवाल्यानुसार अशा रोबोट्समुळे भविष्यात सैन्य दलात मनुष्याकडून होणारे काम केले जाणार असून मनुष्यावरचा भार कमी होऊन सैन्य संदर्भातील रणनीती ठरवण्याच्या कामाला त्यांना वेळ देता येणार आहे. या रोबोट्समुळे चिनी सैन्यदल हे अधिक सुसज्ज होत असून शत्रूपक्षासाठी ही धोक्याचीच घंटा आहे.

चीनच्या सैन्यात रोबोट्सचा समावेश आपल्याला त्या देशाचा तांत्रिक प्रगतीची कथा सांगतो आहे. सध्या भारत चीन सीमेवर जो तणाव आहे, त्याला लक्षात घेता चिनी सैन्यदलाचे आधुनिकीकरण ही भारतासाठी धोक्याची घंटा समजायला हरकत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

देश कोरोनाशी लढत असताना काश्मीरमध्ये आपल्या जवानांनी एक महत्वाचं ऑपरेशन केलंय

Next Post

चीनी सरकारवर प्रश्नचिन्ह उभा करू शकेल अशा शब्दांवर तिथे बंदी आहे. वाचा संपूर्ण यादी.

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

चीनी सरकारवर प्रश्नचिन्ह उभा करू शकेल अशा शब्दांवर तिथे बंदी आहे. वाचा संपूर्ण यादी.

कोरोना व्हायरस चीनने पसरवला या आरोपावर चीन काय म्हणतोय वाचा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.