The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इन्सेप्शन – या चित्रपटाचा क्लायमॅक्स अजूनही लोकांना समजलेला नाही

by नंदकुमार कारभारी
15 July 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


चित्रपट : इंसेप्शन (Inception)
वर्ष : २०१०
शैली : विज्ञान कल्पनारम्य (Sci-Fi)
भाषा : इंग्रजी (हिंदीमधेही उपलब्ध)

स्वप्न – आपल्या सगळ्यांसाठी एक दैनंदिन गोष्ट जरी असली तरी आपल्याला अचंबित करण्याची क्षमता स्वप्नांमध्ये असते हे नाकारता येणार नाही. विज्ञानालाही स्वप्नांचं कोडं पूर्णपणे सोडवता आलेलं नाही. आपल्या सर्वांच्याच मनात स्वप्नांविषयी कुतुहूल असतं आणि त्यावर पडणारे असंख्य प्रश्न. स्वप्नांचा विषय, समजायलाच एवढा कठीण आहे की त्यावर एखादा चित्रपट बनवून तो लोकांच्या गळी उतरवणे म्हणजे महाकठीण काम. पण हे शिवधनुष्य उत्कृष्टपणे एका चित्रपटाने पेललंय.

त्या चित्रपटाचं नाव आहे “इन्सेप्शन”.

२०१० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय ते “ख्रिस्टोफर नोलन” नावाच्या कसलेल्या दिग्दर्शकानं. नोलन हा हॉलीवूडमधील एक नावाजलेला दिग्दर्शक असून त्याच्या कामाची झलक ही त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांवरून येते.



चित्रपटाची सुरुवात होते डोमिनिक कौब नावाच्या इसमापासून, जो एक व्यावसायिक चोर असतो. आपल्या प्रशिक्षित साथीदारांच्या मदतीने चोरी करतो. पण ही चोरी कुठल्या हिऱ्या-मोत्यांची चोरी नसते. ती मानवी मनातील माहिती, कल्पना आणि गुपितांची चोरी असते. मानवी मन आपली गुपितं अंतर्मनात, म्हणजे सुप्त मनात (Subconscious Mind) सुरक्षित ठेवतं. तिथून आपल्या नकळत ही गुपितं चोरण्यात कौब आणि त्याचा साथीदार आर्थर यांचा हातखंडा असतो.

पण एखाद्याच्या मनात घुसणार कसं तेही त्या व्यक्तीच्या नकळत, आणि त्याच्या मनातील गोष्टींची चोरी करणार कशी?

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

कौब त्यासाठी एका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. तो त्या व्यक्तीच्या सुप्त मनात प्रवेश करण्यासाठी स्वप्नांचा उपयोग करतो. त्या व्यक्तीला बेशुद्ध करून आपल्या साथीदारांसोबत तो त्याच्या स्वप्नात प्रवेश करून तिथून त्याच्या सुप्त मनातून ती गुपितं, कल्पना तो माहिती करून घेत असतो आणि हे सगळं त्या व्यक्तीला कळणारही नाही इतक्या शिताफीने.

अशीच एका ‘सायतो’ नावाच्या व्यावसायिकाच्या मनातील गुपितं चोरायची कामगिरी करताना कौब आणि त्याचे साथीदार पकडले जातात. सायतो संधीचा फायदा घेऊन त्यांना स्वतःसाठी एक काम करण्याची गळ घालतो. पण हे काम नेहमीसारखं मनातील गुपित चोरण्याइतकं सरळ नसत. असं काम आतापर्यंत कोणीच केलेलं नसतं.

सायतोला एका व्यक्तीच्या सुप्त मनात स्वप्नाच्या आधारे कल्पना रुजवायची असते. ती व्यक्ती म्हणजे ‘रॉबर्ट फिशर’– सायतोच्या प्रतिस्पर्धी कंपनीचा उत्तराधिकारी. सायतोला रॉबर्टच्या मनात त्याची स्वतःचीच कंपनी संपवायची कल्पना रुजवायची असते.

कौब सुरुवातीला नकार देतो, पण जेव्हा सायतो त्याबदल्यात कौबवर बायकोच्या ह*त्येच्या असलेल्या आरोपातून सुटका करून द्यायची हमी देतो तेव्हा तो या कामाला होकार देतो.

काम हातात घेतल्यानंतर कौब त्यासाठी स्वतःची एक टीम तयार करतो. रॉबर्टच्या अंतर्मनात घुसण्यासाठी व त्याच्या मनात कंपनी संपवण्याची कल्पना रुजवण्यासाठी कौब स्वप्नांच्या तीन पायऱ्यांची योजना आखतो. स्वप्नांच्या तीन पायऱ्या म्हणजे स्वप्नाच्या आत स्वप्न आणि त्याच्या आत एक स्वप्न.

त्याच्या टीममध्ये सहभाग असतो-

एम्स- स्वप्नांमधील बहुरुप्या,
युसूफ- गुंगीच्या औषधाचा तज्ज्ञ,
अरियाडने- स्वप्नांचं डिझाईन एका चक्रव्युहाप्रमाणे तयार करणारी आर्किटेक्ट
आणि
आर्थर- मदतनीस.

चित्रपटाचा वेग हा सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकदम लयीत आहे. तो कुठेही रटाळ वाटत नाही आणि याचं सर्व श्रेय हे निर्विवादपणे दिग्दर्शकाला जातं. लिओनार्डो, मायकेल केन, जोसेफ लेवीट, टॉम हार्डी, एलेन पेज यांनी स्वतःच्या पात्रांना योग्य न्याय दिलाय.

चित्रपट पाहताना लेखकाचं स्वप्नाबद्दल असलेलं वैज्ञानिक ज्ञान, लेखकाची बारीक निरीक्षणं मन जिंकून जातात. स्वप्नांच्या तीन पायऱ्यांमधील थरार दिग्दर्शकाने अचूक टिपला आहे. पूर्णवेळ चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

चित्रपटाची पटकथा, चित्रीकरण, कला दिग्दर्शन, व्हिजुअल इफेक्ट या जमेच्या बाजू आहेत. चित्रपटातील थरारक क्षण जिवंत करण्याचं काम केलंय पार्श्वसंगीतानं. हॅन्स झिमर या संगीतकाराने दिलेल्या पार्श्वसंगीताने चित्रपटाला चार चांद लावलेत.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या, समीक्षकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटाने पूर्ण जगातून तब्बल ८१ कोटी डॉलर्सची कमाई केली. या चित्रपटाला ४ ॲकेडमी अवार्ड्स बरोबरच इतरही अवार्ड्स मिळाले.

कौब आणि त्याचे सहकारी आपल्या कामात यशस्वी होतात का?
कौब त्याच्या बायकोच्या मृत्यसाठी कारणीभूत कसा ठरतो ?
कौबची मेलेली बायको त्यांच्या कामात कसा अडथळा आणते ?
व्यक्तीच्या मनात स्वप्नाच्या आधारे कल्पना स्थापन करणं, रुजवणं शक्य आहे हे कौबला कसं कळतं?

या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा चित्रपट पाहिल्यानंतर मिळतील. चित्रपट पाहण्यासाठी घालवलेला वेळ कामी वाया जाणार नाही हे नक्की!


या माध्यमावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकाची असतात, संपादक मंडळ त्याच्याशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारताचं ‘हे’ यश अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचं सर्वात मोठं अपयश म्हणून गणलं गेलंय

Next Post

वयाच्या ८९ व्या वर्षी तब्बल ४२ किमी धावून या आजी खऱ्याखुऱ्या ‘आयर्नमॅन’ बनल्या आहेत!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

वयाच्या ८९ व्या वर्षी तब्बल ४२ किमी धावून या आजी खऱ्याखुऱ्या 'आयर्नमॅन' बनल्या आहेत!

मिझोरममधील फुटीरतावादी बंड मोडून काढण्यासाठी इंदिराजींनी एअर फोर्सचा वापर केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.