The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टॅलिनने माणसांना फक्त जगातूनच नाही तर फोटोमधून देखील गायब केलंय

by द पोस्टमन टीम
2 December 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपल्याकडे एखादा राजकीय पक्ष म्हटलं की मग त्या पक्षाचा सगळा लवाजमा आलाच. त्यात विविध कार्यकर्ते असतील, वेगवेगळे काम करण्यासाठी वेगवेगळे विभाग असतील किंवा आणखी काही असेल पण या सगळ्यांत सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे आयटी सेल. या आयटी सेलची जबाबदारी काय? तर त्यांना आपल्या पक्षाची भूमिका, घडामोडी, विकासकामे हे सगळं इंटरनेटद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं लागतं.

हे सगळं करताना यात बऱ्याचदा खोटे फोटो वापरले जातात. सध्याच्या काळात तर फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून तयार केलेली चित्रे पसरवण्याचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर अशी अनेक खोटी छायाचित्रे असून ती नंतर बनावट असल्याचे समोर आल्याचे प्रकार नवीन नाहीत.

निवडणुकांच्या काळात तर हा प्रकार बरेचदा घडताना दिसतो. एखाद्या नेत्याची प्रतिमा मालिन करण्यासाठी हे बनावट फोटो बर्‍याच वेळा वापरले जातात, तर बरीच खोटी छायाचित्रे, प्रतिमा तयार करण्यासाठी वापरली जातात.

परंतु तुम्हाला हे आश्चर्यकारक वाटेल की चित्रांसोबत गडबड करून लोकांना भुरळ घालण्याचे प्रकार आजचे नाहीत. फोटोशॉपसारखं सॉफ्टवेअरच काय तर अगदी कम्प्युटर नव्हते तेव्हापासूनच या सगळ्याची सुरुवात झाली होती.



आपल्या देशात बनावट छायाचित्रांचा वापर साधारणपणे राजकीय हेतूंसाठी केला जातो.

पण कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की सुमारे ७० वर्षांपूर्वी रशियन हुकूमशाह स्टॅलिन याने आपल्या विरोधकांना छायाचित्रांमधून गायब करत एक जबरदस्त षडयंत्र रचलं होतं.

स्टॅलिनची सोव्हिएत सत्तेवर मक्तेदारी होती. संपूर्ण सरकारच्या पाठिंब्याने विरोधकांना इतिहासातून गायब करण्याचा एक घाणेरडा खेळ स्टॅलिनने खेळला होता. विशेष बाब म्हणजे हे कृत्य करण्यासाठी समोरचा व्यक्ती स्टॅलिनचे मजबूत विरोधक असणे आवश्यक नव्हते तर त्यावेळी केवळ त्याच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा तो स्वतःचा विरोधक मानत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अशाप्रकारे स्टॅलिनने आपले किती राजकीय ‘विरोधक’ संपवून टाकले असतील याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. परंतु तो आपल्या विरोधकांना छायाचित्रांमधून गायब कसा करायचा ही एक अतिशय रंगतदार गोष्ट आहे.

स्टॅलिनने हा प्रकार केवळ एखाद्याला अदृश्य करण्यासाठीच वापरला नाही तर रशियन क्रांतीचे जनक लेनिन हे आजारी असताना त्याने त्यांच्यासोबतचे एक छायाचित्र संपूर्ण देशात प्रकाशित केले होते आणि आपला फायदा साधला होता.

स्टॅलिनच्या छायाचित्रांमध्ये केल्या गेलेल्या या कलात्मक कामांचा खुलासा प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आणि ग्राफिक डिझायनिंगचा इतिहासकार म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या डेव्हिड किंग यांनी केला. डेविड यांनी सोव्हिएत युनियनच्या फोटोंचा आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा संग्रह केला होता.

या काळात त्यांच्या एक गोष्ट निदर्शनास आली की स्टॅलिन केवळ वर्तमानातीलच विरोधकांना छायाचित्रांमधून नष्ट करून थांबला नव्हता तर त्याने इतिहासातीलसुद्धा काही लोकांना कायमचे नष्ट करण्याचे षडयंत्र रचले होते.

या सगळ्या संग्रहीत केलेल्या छायाचित्रांवर डेव्हिड यांचं १९९७ मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं ज्याचं नाव होतं “कमिसार वैनिसेज: द फाल्सिफिकेशन ऑफ फोटोग्राफ्स एंड आर्ट इन स्टालिन्स रसिया” (Commissar Vanishes: The Falsification of Photographs and Art in Stalin’s Russia)

(कमिसार हे सोव्हिएत नेशन्समधील सर्वात मोठे पद होते.)

सदर पुस्तकात डेव्हिड किंगने एकापाठोपाठ एक खुलासे केले आणि हे दाखवून दिले की स्टॅलिनने इतिहासात कशा प्रकारे आपल्या विरोधकांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

इस तस्वीर में स्टालिन के साथ निकोलाई येझोव स्टालिन के साथ दिख रहे हैं. ये मास्को कैनाल के शुभारंभ की तस्वीर है. लेकिन कुछ सालों बाद जब निकोलाई सत्ता से बेदखल किए गए तो तस्वीरों से भी गायब हो गए.
सदर छायाचित्रात स्टालिनसोबत येझोव दिसत आहेत. मॉस्को कॅनलच्या शुभारंभाच्या वेळचं असणाऱ्या या छायाचित्रात दिसणारे निकोलस काही दिवसांनी जेव्हा सत्तेतून घरी गेले तेव्हा ते छायाचित्रांतूनसुद्धा अदृश्य करण्यात आले.

पहली तस्वीर में ट्रॉट्स्की दिख रहे हैं तो वहीं दूसरी तस्वीर से गायब हैं.
हे छायाचित्र सोव्हिएतचे महत्त्वाचे नेते लिओन ट्रॉटस्की यांचे असून ते ७ नोव्हेंबर १९१९ला काढलेले आहे. या छायाचित्रात त्या काळातील सोव्हिएत नेतृत्वातील मोठे नेते दिसत आहेत, जे रशियन क्रांतीचा दुसरा वर्धापन दिन साजरा करीत आहेत. यामध्ये व्लादिमीर लेनिनसह लिओन ट्रॉटस्की आहेत.

लेनिन असताना ट्रॉटस्की सोव्हिएत युनियनच्या बलाढ्य लोकांपैकी एक होते परंतु स्टालिन यांनी सत्ता ताब्यात घेताच त्यांच्यात मतभेद सुरू झाले. कालांतराने ट्रॉटस्कीला छायाचित्रातून गायब करण्यात आले आणि हे सगळं इथेच थांबलं नाही तर पुढे ट्रॉटस्कीची निर्घृण ह*त्यासुद्धा करण्यात आली.

stalin

सदर छायाचित्र १८९७ मधले आहे या चित्रात उभ्या असलेल्या लोकांच्या वरच्या डाव्या बाजूला उभा असलेला मुलगा अलेक्झांडर माल्चेन्को हा असून, त्या मुलाच्या आईने लेनिनला आपल्या घरात लपण्याची जागा दिली होती. पुढे माल्चेन्को रशियन सरकारचा भाग झाला. लेनिन सत्तेत असताना त्याला एक चांगलं पद मिळालं. पण हा माल्चेन्कोसुदधा स्टॅलिनला विरोध करतच संपला. त्याला १८ नोव्हेंबर १९३० रोजी फासावर अडकवण्यात आलं.

हे लोकांना नष्ट केलेली छायाचित्रे तर अगदी किरकोळ आहेत. स्टालिनच्या कारकीर्दीत १९३५ ते १९३७ या काळात ‘ग्रेट पर्ज’ नावाचा एक अत्यंत क्रूर खू*नाचा कट रचण्यात आला होता. यात हजारो लेखक आणि सरकारी अधिकारी मारले गेले जे सरकारच्या विरोधात काही ऐकत होते किंवा बोलत होते. याच खू*न करण्यात आलेल्या लोकांत ट्रॉटस्कीचासुद्धा समावेश होता.



या सगळ्यात अजून एक रंजक छायाचित्र आहे ज्याचा वापर स्टॅलिनने सोव्हिएत नेशन्समध्ये स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केला होता. या चित्रात स्टॅलिन मध्यमवयीन लेनिनसोबत दिसला आहे. हा फोटोसुद्धा बनावट असल्याचा दावा आहे. हे चित्र स्टॅलिनने यासाठी वापरलं होतं की जेणेकरून स्टॅलिनला सोव्हिएतमधील लोकांनी लेनिनचा खरा वारस समजावं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

तानाजी मालुसरेंनी कोंढाणा कसा काबीज केला..?

Next Post

या अधिकाऱ्याने भारतात पंचायतराज आणि नियोजनाचा पाया रचलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या अधिकाऱ्याने भारतात पंचायतराज आणि नियोजनाचा पाया रचलाय

कॉंग्रेसच्या या नेत्याला खुद्द गांधीजींनी 'भारतीय राष्ट्रवादाचा लेखक' म्हटलं होतं...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.