आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अमेरिका. सध्याच्या घडीला असलेली जागतिक महासत्ता!
याच जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत उजवी विचारसरणी असलेल्या डोनाल्ड ट्रम्पचे सरकार आले आणि नेहमी समाजवादी राज्यव्यवस्था आणि भांडवलवादी अर्थव्यव्यस्था असलेल्या अमेरिकेत राज्यव्यवस्थेची गाडी समाजवादी रुळावरुन खाली उतरण्यास सुरुवात झाली. नैतिक मूल्यांचे महत्त्व आज अमेरिकेत दिवसेंदिवस कमी होत गेले आणि निवडणुकीत अमेरिकन जनतेने ट्रम्प यांच्या विरोधात कौल दिला होता.
जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय इसमाचा एका गोऱ्या अधिकाऱ्याकडून झालेला अपघाती मृत्युमुुळे अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कांंसाठीचे आंदोलन पुन्हा एकदा छेडण्यात आले होते.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी डाव्या विचारसरणीच्या ‘अँटीफा’ या संघटनेला या आंदोलनासाठी जबाबदार ठरवले होते.
पोलिसांद्वारे होणाऱ्या अ*त्याचाराविरोधी या आंदोलनात नुकसान पोहचवण्याच्या आरोपाखाली ‘अँटीफा’ या संघटनेला द*हश*तवादी संघटना म्हणून घोषित करण्यात येईल अशी धमकी त्यांनी दिली होती .
‘अँटीफा’बद्दल जाणकार असलेल्या लोकांच्या मते ट्रंप यांच्याकडे हे सिध्द करण्यासाठी कोणताही पुरावा नव्हता आणि असे करण्याचा अधिकारही त्यांना अमेरिकी कायदा देत नव्हता. अखेरीस डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार गेले आणि त्यांच्या जागी जो बायडेन सत्तेत आले. जो बायडेन यांच्या विजयात आणि ट्रम्प यांच्या पराभवात ‘अँटीफा’ या संघटनेचा मोठा वाटा होता. अँटिफा नावाची ही संघटना नेमकी काय आहे आणि तिची संरचना काय आहे हे आपण जाणून घेऊ..
‘अँटीफा’ हा शब्द इंग्रजीमधील फॅ*सिस्टविरोधी शब्दाचे लघुरुप आहे. (AntiFasist-“an-TEE-fuh”.)
“अँटीफा- द अँटी फॅ*सिस्ट हैंडबुक” या पुस्तकाचे लेखक मार्क ब्रे यांच्या मते अँटीफा म्हणजे वर्णव्यवस्थेच्या विरोधात कार्य करुन व्यवस्था आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करणारी एक जहालवादी संघटना आहे. बाकी विरोधकांमध्ये आणि यांच्यामध्ये जो फरक आहे तो हा की यांचा सरकारवर विश्वास नसतो. पोलिस आणि भांडवलशाही समाज या वर्णभेदास समर्थन करतो असा समज अँटीफामध्ये आहे. त्यामुळे स्वत:च्या हातात सत्ता घेण्याची त्यांची वृत्ती त्यांना काही प्रमाणात आ*तंक*वादाकडे झुकवते हे खरं.
हिं*सावादाचे विविध पातळीवर समर्थन करणारे वेगवेगळे गट अँटीफामध्ये आहेत. काही गट स्वत:च्या हक्कांसाठी त्यांच्यावर होणाऱ्या अ*त्याचारास सहन करण्याचा मार्ग अवलंबतात तर काहींच्या मते हिं*साचाराचे उत्तर हिं*साचारानेच दिले जावे. तरीही हिं*साचार हा अँटीफाच्या कार्यप्रणालीचा एक अविभाज्य घटक आहे.
अँटीफाचा मुख्य उद्देश उजव्या विचारसरणीचा विरोध करणे हा आहे. ज्यामध्ये श्वेतबहुसंख्यवाद, फॅसिजम यांंसाठी काम करणाऱ्या संघटनांचा विरोध करणे हाही एक उद्देश आहे.
दुसऱ्या महायु*द्धाच्या वेळी युरोपमधील फॅसिस्ट नेत्यांच्या विरोधात लढताना अँटीफाची सुरुवात झाली. गनिमी काव्याने जर्मनीत हिटलरच्या विरोधात, इटलीमध्ये बेनिटो मुसोलिनीच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे अँटीफा त्यावेळी गाजली. मार्क ब्रे यांच्या मते अमेरिकेतील अँटीफा ही ७०-८० च्या दशकात उजव्यांच्या विरोधात इंग्लंड आणि जर्मनीमध्ये केल्या गेलेल्या यु*ध्दापासून प्रेरित आहे.
जाणकारांच्या मते, एक गैरसमज असाही आहे की अँटीफा म्हणजे एकाच पध्दतीच्या लोकांचा गट. तसेच त्यांची संख्या कमी आहे. अँटीफा ही संघटना केंद्रित नसून विखुरलेली आहे. अमेरिकेतील काही शहरांमध्ये तर अँटीफाचे अस्तित्व अतिशय कमी आहे. भरपुर कष्ट घेऊन एकत्र येण्याचा प्रयत्न केला गेला तरी मोठ्या मुश्किलीने १०० कार्यकर्ते गोळा होतात. आंदोलने न करता, कसलाही लढा न देता फक्त आपल्या आसपास असणाऱ्या तथाकथित निओ-ना*झी लोकांच्या हालचालींवर लक्ष देण्याचं काम हे लोक करतात.
मार्क ब्रे यांच्या मते कधी कधी अशा निओ-ना*झी गटात जाऊन त्या गटाला आतून कमकुवत बनवायचे काम हे लोकं करतात.
अमेरिकेतील ही अँटीफा अतिशय चांगल्या प्रकारे नियोजित आहे. ऑनलाइन एकमेकांशी सतत संपर्कात राहणे, श्वेतवर्णीय लोकांच्या एखाद्या चाहत्याच्या विरोधात कारस्थान करायचे असेल तर त्यासाठीची योजना ऑनलाइनच सांगणे. इतक्या उघडपणे या गोष्टी केल्या जातात. अमेरिकेतील महत्त्वाची अँटीफाची मुख्य ठिकाणे म्हणजे उत्तर कैलिफोर्नियामधील बर्कले, ओकलँड आणि ओरेगॉन.
श्वेतवर्चस्व असलेल्या काही संघटनांचा विरोध करण्यासाठी २०१७ मध्ये रस्त्यावर उतरल्यानंतर ही गोष्ट वर्तमानपत्रांमध्ये झळकली. त्यावेळी अँटीफाने अतिशय धडाडीने आपला विरोध दर्शविला असला तरीही कुठल्याही प्रकारची हिं*सा करण्याच्या तयारीने अँटीफा तेथे गेली होती याचे कसलेही पुरावे नाहीत. एका विशिष्ट गोष्टीला विरोध करण्यासाठीच ते तिथे एकत्र आलेले हे त्यावेळी स्पष्ट झाले.
जाणकारांच्या मते, मागच्या वर्षी श्वेतवर्णीय वर्चस्ववादाने घेतलेले बळी दुसऱ्या कोणत्याही प्रकारे गेलेल्या बळीपेक्षा जास्त आहेत. ‘लाफ्री’च्या आकडेवारीनुसार डाव्या संघटना या उजव्या संघटनांच्या तुलनेत नेहमीच कमी आक्र*मक पवित्रा घेतात.
अँटीफा आता प्रजासत्ताक नेत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. काही नेत्यांनी मागच्या वर्षी अँटीफाला प्रादेशिक द*हश*तवादी संघटना घोषित करण्यात यावी अशी मागणी केली होती, परंतु ती फेटाळून लावण्यात आली.
सध्या होत असलेल्या आंदोलनात अँटीफाचा किती हात आहे हे सांगणे अवघड आहे. काहींच्या मते श्वेतवर्णीय वर्चस्व असलेल्या काही संघटनाच या आंदोलनाला हिं*सक वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रंपच्या मते हा हिं*साचार पसरवण्यामागे अँटीफाचा हात आहे.
परंतु जाणकारांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि ह*ल्ले घडवून आणण्यासाठी अँटीफा खूप छोटी आणि विखुरलेली संघटना आहे. काहींच्या मते आंदोलकांमध्ये अँटीफा आणि श्वेतवर्णीय वर्चस्ववादाचे समर्थन करणारे असे दोन्ही गट आहेत. फक्त कोणाची संख्या जास्त आहे हे सांगणे अवघड आहे असे संगितले जाते.
काही आंदोलकांमध्ये तरुण श्वेतवर्णीय मुलेदेखील आहेत. मार्क ब्रे च्या मते अँटीफामध्ये सगळ्या वयाचे, जातीचे लोकांचा समावेश आहे. चांगली नोकरी करणाऱ्यांपासुन तर टुकारपणे फिरणाऱ्या बेरोजगार तरुण मुलांचाही समावेश अँटीफामध्ये होतो.
अँटीफाला द*हश*तवादी संघटना घोषित करणे ट्रंप यांना सोपे नक्कीच जाणार नाही. त्याची काही कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे:
१. अमेरिकेत स्थित असलेल्या कुठल्याही संघटनेस कायद्याने द*हश*तवादी संघटना म्हणून घोषित करता येत नाही. कायद्यानुसार फक्त आंतरराष्ट्रीय संघटनेला द*हश*तवादी संघटनेचा शिक्का दिला जाऊ शकतो. प्रादेशिक संघटनांच्या बाबतीत विचार विनिमय झाल्यानंतर त्याबद्दल विचार केला जातो. तसेच अँटीफा हा शिक्का देण्याच्या अखत्यारीत बसत नाही असं जाणकार म्हणतात.
२. अँटीफा म्हणजे गट नाही. ‘लाफ्री’च्या मते अँटीफा म्हणजे फक्त एक चळवळ आहे. चुकीच्या गोष्टींच्या विरोधात एका विशेष काळासाठी केली जाणारी चळवळ. ठरवून हिं*साचाराचे कट उभारण्याचा काहीही पुरावा अँटीफाच्या बाबतीत सापडत नाही.
डाव्यांमध्येही अनेक धोकादायक संघटना आज काम करत आहेत. या संघटनांमुळेच सरकारला शांततापूर्ण आंदोलन दडपवून टाकण्याची संधी मिळते. हिं*साचारी प्रवृत्तीच्या निवडक लोकांमुळे महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर सरकारला माती टाकता येते.
शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्या मांडणे आज त्यामुळेच जास्त गरजेचे झाले आहे. स्वत:च्या हक्कांसाठी सरकारच्या विरोधात उभे राहण्याचा आपला हक्क आपण संविधानिकरित्याच वापरायला हवा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








