The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ग्रीन टी’चे फायदे सर्वांना माहित आहेत, आता इतिहास वाचा

by द पोस्टमन टीम
28 August 2025
in आरोग्य, इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


चहा गेल्या हजारो वर्षांपासून लोकांचे आवडते पेय आहे. चहाचाच एक आरोग्यदायी प्रकार असलेला ग्रीन टी सध्या भारतात लोकप्रिय होत आहे. औषधी गुणांमुळे ग्रीन टी उच्च आणि मध्यमवर्गीय लोकांच्या स्वयंपाकघरात आपलं स्थान निर्माण करतोय. एक कप ग्रीन टी आपल्याला तरतरी आणतो आणि मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होते.

पण हा ग्रीन टी आला कुठून? 

चहा, मग तो कुठल्याही प्रकारचा का असेना, कॅमेलिया सायनेन्सिस  नावाच्या वृक्षापासून तयार केला जातो. या वृक्षाच्या अनेक प्रजाती आहेत. या प्रजाती पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. याची वाढ एका झुडपासारखी असते. आज हे झाड चहासोबत संपूर्ण आशिया खंडात पसरलं आहे.

ग्रीन टीची निर्मिती कॅमेलिया सायनेन्सिसच्या पानांपासून केली जाते. जेव्हा ग्रीन टीची निर्मिती केली जाते त्यावेळी प्रक्रियेच्या दरम्यान अत्यंत कमी ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतो, अर्थात किण्वन (फरमेन्टेशन) प्रक्रिया करण्यात येते.



ग्रीन टीचा उगम चीनच्या संस्कृतीत असल्याचे मानले जाते. पण, आशियाच्या इतर भागातही त्याचे मुबलक उत्पादन केले जाते.

चिनी सम्राट शेन नंग याच्या समोर एकदा एक गरम पाण्याचे भांडे ठेवले होते, त्या भांड्यात अचानक एका झाडाची काही वाळलेली पाने येऊन पडली. यामुळे पाण्याला एक वेगळा रंग आला. त्या चिनी सम्राटाने त्या पाण्याचा घोट घेऊन बघितला तेव्हा त्याला त्या पाण्याची चव फार आवडली. मग काय! त्याने त्या पाण्याचे नियमित प्राशन करण्यास सुरुवात केली आणि यातूनच ग्रीन टीचा जन्म झाला.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

हे इसवी सन पूर्व २७३७ च्या आसपास घडलं. इसवी सन ३५० मध्ये पहिल्यांदा चहा प्राशनाचा उल्लेख करण्यात आला होता. चीनमध्ये उगम पावलेला हा चहा पुढे जपान आणि मध्य पूर्व आशियाच्या संस्कृतीचा एक भाग बनला.

चीनच्या फुजियान क्षेत्राच्या एका डोंगराळ भागात ग्रीन टीचे उत्पादन घेतले जाते. इथले वाईट आणि उलॉंग हे चहाचे प्रकार देखील जगप्रसिद्ध आहेत.

पर्वतीय क्षेत्र चहा उत्पादनासाठी उपयुक्त मानले जातात. ग्रीन टीचे उत्पादन जरी वर्षभर घेता येत असले तरी उन्हाळा आणि वसंत ऋतूमध्ये या वृक्षाला चांगली पालवी फुटते. याच ऋतूत चहाची पाने निवडली जातात.

भारतात सर्वप्रथम १८१५ साली काही इंग्रज अधिकारी आसामच्या दौऱ्यावर असताना त्यांचे लक्ष हे चहाच्या झाडाकडे गेले. त्याला स्थानिक लोक काबाईल पेय म्हणत.

पुढे भारतीय गव्हर्नर लॉर्ड बेंटिकने १८३५ साली भारतात चहाचे उत्पादन करण्याचे आदेश दिले, याचा परिणाम म्हणून आसाममध्ये चहाच्या बागा अस्तित्वात आल्या आणि भारतात ग्रीन टीचा उगम झाला.

चहाची पाने पहिल्यांदा हाताने काढली जातात, मग ती मशीनच्या प्रक्रियेतून जातात. काही महत्वाच्या एंझाईम्सला बाहेर काढण्यासाठी त्यांचे व्यवस्थित चर्वण करण्यात येते. यानंतर सुखण्याची आणि ऑक्सिजनेशनची प्रक्रिया सुरू होते.

ग्रीन टी इतर चहाच्या प्रकारांपेक्षा वेगळी आहे. ग्रीन टीला बराच काळ ऑक्सिजीनेट करण्यात येते. ऑक्सिजीनेशनंतर चहाच्या पानांना वाळायला ठेवतात. ग्रीन टीची चव तिच्या ऑक्सिजनेशनवर अवलंबून असते.

ग्रीन टीचे सर्वाधिक उत्पन्न आशियाई देशात घेण्यात येते. चीन ह्याचा सर्वात मोठा उत्पादक आहे. त्यानंतर जपान, इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. चीनची चायनीज गन पावडर, ड्रॅगनवेल आणि स्नोवी माऊंटन जियान तसेच जपानचचे मचा, सेंचा, कुकीचा हे काही प्रसिद्ध ग्रीन टीचे उपप्रकार आहेत.

भारत ग्रीन टीच्या उत्पादनात मागे नसून जगातील सर्वोत्तम ग्रीन टी दार्जिलिंगला तयार करण्यात येते. ज्याला भारतीय शाम्पेन म्हणून ओळखले जाते.

ग्रीन टी आरोग्यदायी असल्यामुळे कॅन्सर आणि इतर आजारांचं संकट कमी होतं. कॅन्सर पेशंटला ग्रीन टी पिण्याचा सल्ला वेळोवेळी दिला जातो. ग्रीन टीमुळे वजन नियंत्रित राहते. हृदय रोगापासून देखील संरक्षण होते. जपानमध्ये तर आरोग्य संवर्धक असल्याने जेवणाच्या वेळी ग्रीन टीचे सेवन करतात.

चीनमध्ये उदयास आलेल्या या ग्रीन टीचे सेवन आता जगभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात केले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आंतरजालावरील काळी दुनिया ‘डार्क वेब’ काय आहे जाणून घ्या..!

Next Post

काय आहे भारत आणि चीनमधला अक्साई चीन वाद?

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
Next Post

काय आहे भारत आणि चीनमधला अक्साई चीन वाद?

ठिकेकरवाडी - या गावच्या सरपंचाने कोरोनालढ्याचं आदर्श मॉडेल उभारलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.