आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दोन दशकांपेक्षा जास्त लोटला आपण भारतीय नोटांवर महात्मा गांधींचा तो हसरा फोटो बघतो आहोत. नोटा बदलल्या, बंद झाल्या, रंग बदलले पण फोटो काही बदलला नाही. पण गांधीजींचा फोटो नोटांवर फार उशिरा छापल्या जाऊ लागला त्या आधीसुद्धा काही लोक होऊन गेले ज्यांचा फोटो नोटांवर छापला गेलाय.
ते कोण कोण? आणि कधी छापले गेले हे फोटो?

रिसर्व बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना १९३५ साली झाली. तेव्हा भारतावर इंग्रजांचं शासन होतं. त्यामुळे भारत स्वतंत्र होईपर्यंत ज्याही नोटा छापल्या जायच्या त्याच्यावर ब्रिटनचा राजा जॉर्जचा फोटो असायचा.

१९४९ साली स्वतंत्र भारतात नोट छपाई चालू झाली. यावेळी राजा जॉर्ज याचा फोटो नोटांवरून काढून टाकण्यात आला. त्याजागी अशोक स्तंभाची छवी छापली जाऊ लागली.

भारत स्वतंत्र व्हायच्या आधी, RBIची स्थापना व्हायच्या आधीसुद्धा मुद्रा होत्याच, नोटा होत्याच. अनेक संस्थानं स्वतःच्या वेगळ्या नोटा छापायचे. याचंच एक उदाहरण म्हणजे हैदराबाद संस्थान.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही राज्य पारतंत्र्यातच होती. जसं की गोवा. गोवा तेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं आणि ते भारताच्याच नावानी गोव्यात नोटा छापायचे. त्या नोटांना एस्कुडो म्हणत. या एस्कुडो वर राजा जॉर्ज (दुसरा) याचा फोटो छापून यायचा.

गोव्याप्रमाणेच पाँडिचेरीसुद्धा परकीयांच्या ताब्यात होते. तिथे १९५४ पर्यंत फ्रेंच लोकांचं राज्य होतं. तेव्हा तिथल्या नोटांवर फ्रान्सच्या राजाचा फोटो असायचा. या नोटांना रुपई म्हणत. १९६४ नंतर तेथे भारतीय नोटांचा वापर सुरू झाला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









