The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोर्टा कांड – हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग

by द पोस्टमन टीम
9 May 2025
in ब्लॉग, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


हैदराबाद मुक्तीसंग्राम हे वास्तविक पाहता भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रतिकृतीच. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जसे इंग्रजाच्या कौर्याचे उदाहरण म्हणून जालियनवाला बाग ह*त्याकांड ओळखले जाते तसेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात रझाकारांच्या कौर्याचे प्रतिक म्हणून  ‘मुचलंब’ व ‘गोर्टा’ येथील ह*त्याकांड ओळखले जाते. १० मे १९४८ रोजी झालेल्या या पूर्णपणे दुर्लक्षित घटनेविषयी  हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अभ्यासक भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे यांनी सादर केलेल्या शोध निबंधाचा काही संपादितांश. 

मुचळंबच्या घटनेनंतर सरकार दरबारी कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे रझाकारांना अधिकच जोर चढला, हिसामोद्दीनच्या व*धात गोरट्यातील लोकांचा सहभाग होता असा रझाकारांचा समज झाला होता.

१० मे १९४८ रोजी सकाळीच हिसामोद्दिनच्या व*धाच्या सूडबुद्धीने पेटलेल्या २५०० पेक्षा जास्त रझाकारांनी व पस्तकौमांनी गोरट्यावर आकस्मिक ह*ल्ला केला, यात घोरवाडी, भालकी, हुमनाबाद, बसवकल्याण, हुलसूर, बेलूर, मेहकर, इ. गावचे रझाकार व पस्ताकौम होते. मोठ्या संख्येने ह*त्यारबंद रझाकार अचानक गावात घुसले व त्यांनी दिसेल त्यास मारण्यास सुरवात केली.

हिंदू लोकांची आकस्मिक ह*ल्ल्यामुळे पाचावर धारण बसली, ते गडबडले, त्यांना काहीच सुचत नव्हते. जो तो आपल्या घरांनी दडून जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. रझाकार लोकांना घराबाहेर ओढत आणि ठार करत. नारायणराव मक्तेदार, रामराव पटवारी व बस्वप्पा माली पाटील यासारख्या व्यक्तींना देखील त्यांच्या वाड्यातून बाहेर ओढत आणून लक्ष्मीच्या मंदिरासमोर मारले गेले.



गोरट्यात महादप्पा डूमणे यांचा तीन मजली मजबूत व भव्य वाडा होता, जणू छोटा किल्लाच. त्यावेळी इतर कोणत्याही इमारतीपेक्षा वाडा उंच व विस्ताराने मोठा होता. गावातील लुटालूट, जाळपोळ, कापाकापी पाहून जवळपास ७०० ते ८०० लोकांनी या वाड्यात आश्रय घेतला त्यात जांच्याकडे ह*त्यारे होती असे ह*त्यारधारी नागप्पा हलम्बरे, काशाप्पा भालके, सिद्रामप्पा पटणे, मारतीअण्णा कोणे, चनाप्पा डूमने, दानू कोळी, विठोबा कोळी व मारुतीराव परीट हे कुशल वीर होते.

वाड्यात जमलेल्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी या बहादूर तरुणांवर होती. माडीवर पत्रे लावून मोर्च्याच्या जागा केल्या गेल्या. मोर्चे धरले गेले. इकडे गावात घोंगावणारे रझाकाररूपी वादळ आता डूमणे सावकाराच्या वाड्याकडे वळले, डूमणे सावकार हे परिसरातील प्रसिद्ध आसामी होती, ते जरी सावकार असले तरी एक दानशूर व्यक्तिमत्त्व व मदतीला धावून जाणारे म्हणून त्यांची ख्याती होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

डूमणे सावकाराचा वाडा लुटावा व जाळून टाकावा या हेतूने रझाकार तिकडे वळले पण तिथे वेगळेच घडले. रझाकारांना वाड्यातून प्रतिकार होऊ लागला. वाड्यातील तरुणांनी आता निर्वाणीचे यु*द्ध करायचे ठरविले होते, आतून फाय*रिंग होऊ लागली. गोफण गुंडयाचा व दगड धोंड्यांचा भयानक मारा सुरु झाला. वाड्यातून होत असलेल्या आकस्मिक प्रतीकारामुळे अनेक रझाकार ठार झाले, कित्येक जखमी झाले. रझाकारांशी लढताना मारुतीअण्णा कोणे व चनाप्पा बिरादार या दोघांना वीरमरण आले, दिवसभर हा मुकाबला चालला, सूर्यास्त होऊन अंधार पडू लागला तशी रझाकारांनी फाय*रिंग बंद केली व ते गाव सोडून निघून गेले.

रझाकार जाताच वाड्यातील ग्रामस्थांनी विचार केला की अपमानित झालेले रझाकार उद्या दुप्पट तयारीने येतील या विचाराने रात्रीच्या सुमारास वाडयातील लोक बाहेर पडले व आपापल्या पाहुण्याच्या गावांनी रातोरात निघून गेले.

इकडे रझाकारांनी दिवसभर गावातील जवळपास २०० लोकांची ह*त्या केली होती. वकिलांच्या ‘प्रोटेस्ट कमिटीने’ होनाळी, गोरटा व परिसरातील गावांचा दौरा केला. कमिटीच्या मते गावात फक्त पस्ताकौम व मुसलमानांची घरे न जळता शिल्लक होती.

कमिटीने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या ह*ल्ल्यात २०० लोक मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी झाले, आर्थिक नुकसान सुमारे ७० लाख रुपयांचे झाल्याचे कमिटीने नमूद केले. या घटनेची नोंद भारत सरकारच्या श्वेतपत्रिकेतही करण्यात आली आहे, हैदराबाद संस्थानातील भारत सरकारचे प्रतिनिधी के. एम. मुन्शी यांनीसुद्धा या परिसराचा दौरा केला व आपल्या ‘द एंड ऑफ अन इरा’ या पुस्तकात या विषयी सविस्तर माहिती दिली आहे.

लेखक :- भाऊसाहेब उमाटे, लातूर.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

खाण कामगारांसाठी बनवलेल्या जीन्सला हॉलिवूडने जगभर फेमस केलं

Next Post

युरोपातून आलेला पाव आज आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

युरोपातून आलेला पाव आज आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनलाय

हा जापानी सैनिक दुसरं महायु*द्ध संपल्यानंतरसुद्धा २९ वर्षे लढत होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.