The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या फेअरनेस क्रीमने जगभरात व्यावसायिक जाहिरातीची सुरुवात केली आहे

by द पोस्टमन टीम
15 February 2025
in ब्लॉग, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जाहिरात हे उत्पन्न वाढवण्याचे आणि आपले उत्पादन खपवण्याचे प्रभावी माध्यम समजले जाते. जागतिकीकरणाच्या युगात प्रत्येक व्यक्तीला आज मार्केटमध्ये जाहिरात करण्याची गरज पडते मग तो अगदी छोट्यात छोटा व्यवसाय असो किंवा मोठ्यात मोठा.

पेपर, पत्रके मग रेडीओ मग टीव्ही आजच्या जमान्यात सोशल मीडिया असा या जाहिरात आणि मार्केटिंगचा प्रचंड मोठा प्रवास झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी आज या मार्केटिंगची गरज भासते.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादक आणि सर्व्हिस प्रोव्हायडर अनेक प्रकारच्या युक्त्या योजत राहतात. ग्राउंड लेवलच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कॅम्पेन्स आयोजित केली जातात. याचा आवाका इतका प्रचंड आहे की अनेक कंपन्या आपल्या उत्पादनाच्या जाहिरातबाजीवर करोडो रुपये खर्च करत राहतात.

खास मार्केटिंगसाठी म्हणून अनेक स्पेशल कंपन्या निघालेल्या आहेत. ज्यांचे एका दिवसाचे चार्जेस लाखोंच्या घरात असतात. मार्केटिंगवर रीसर्च करणारे तज्ज्ञ तयार होण्यासाठी बिझनेस स्कूलमधून खास अभ्यासक्रमसुद्धा शिकवले जातात. बिझनेस मार्केटिंगचा फंडा आज जवळपास प्रत्येक बिझनेस यशस्वी करण्यासाठी वापरला जातो. आज जी ही करोडो रुपयाची मार्केटिंगची बाजारपेठ आहे याचा इतिहास मोठा रंजक आहे.



आता ऐकायला कदाचित वाईट वाटेल परंतु पूर्वीच्या काळी ज्याला ब्रोथेल म्हणजे वेश्यागृह असं म्हटलं जायचं या वेश्यागृहाच्या जाहिराती एका कागदी पत्रकावर छापून केल्या जात असत. अर्थात त्यावेळी या जाहिराती खुल्या पद्धतीने होत नसत. ज्या भागात त्यांची वस्ती असेल तिथल्या भिंती रंगवून अथवा काही सूचक प्रकारची चित्रे काढून लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि तिथे चालणाऱ्या गोष्टींची कल्पना देण्यासाठी म्हणून अशा प्रकारे गुप्त जाहिरात केली जात असे.

इजिप्तमध्ये चार हजार वर्षांपूर्वी फारोहच्या साम्राज्यांच्या काळात पपायरसच्या पानांवर वस्तूबाबत मेसेजेस लिहून वस्तूंची विक्री केली जात असे.

भिंती आणि दगडांवर रंगरंगोटी करून जाहिरात करणे हा प्रकार इजिप्शियन, ग्रीक संस्कृतीमध्ये पाहायला मिळत असे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

चीनमध्ये बांबूच्या बासरी वाजवून खाण्याच्या पदार्थांची विक्री केली जात असे. मध्ययुगीन कालखंडात जशी युरोप खंडाची प्रगती होऊ लागली, तशी तिथे व्यापार करणाऱ्या लोकांनी आपल्या नावाचे आणि आपल्या व्यवसायाची प्रतिमा असलेले बोर्ड बनवून घ्यायला सुरुवात केली.

१०० वर्षांपूर्वी जेंव्हा स्पर्धा फार तीव्र नव्हती. तेव्हा युरोपमधून आज ज्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून ओळखले जाते अशा अनेक कंपन्यांची सुरुवात झाली. त्यातली पहिली ग्राहक उत्पादनाची जाहिरात करण्याचा मान जातो  आज कॉस्मेटिकमध्ये जगप्रसिद्ध असलेल्या निविया क्रीमला. निळ्या रंगाच्या डबीत येणारी पांढरी क्रीम म्हणून निविया क्रीम आज ओळखली जाते.

आज निविया क्रीम ही अगदी जगभरात कॉस्मेटिक्सचा एक मोठा ब्रँड म्हणून प्रसिद्ध आहे. १९११ साली जर्मनीमध्ये या कंपनीची स्थापना झाली होती.  हे निविया क्रीम आज बऱ्याच कॉस्मेटिक उत्पादनात बेस म्हणून वापरले जाते.

the postman

जर्मनीमध्ये डॉ. आयझॅक लिफशुत्झ नावाच्या एका केमिस्टने युसरीट (Eucerit) नावाचे एक रसायन शोधून काढले होते जे पाणी आणि तेल यांना एकत्र मिक्स करून त्यांचा परफेक्ट बेस बनवू शकत होते. या केमिस्टची डॉ. ऑस्कर ट्रोपोलवित्झने दखल घेतली ज्यांची स्वत:ची कंपनी होती. याच जोडीने पुढे हे युसेरीट नावाचे stabilizer वापरून एक उत्तम कॉस्मेटिक क्रीम तयार होवू शकते याचा शोध लावला.

युसेरीट वापरून जे क्रीम तयार झाला त्याचा रंग अगदी पांढरा शुभ्र होता म्हणून या क्रीमला निविया हे नाव देण्यात आले. ज्याचा लॅटीन भाषेत अर्थ होतो बर्फासारखा पांढरा.

या कंपनीने हळूहळू युरोपमध्ये आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. आता जेंव्हा उत्पादनाचे नाव ठेवायचं होते तेंव्हा त्या काळी बहुतांश कंपन्या आपल्या उत्पादनाची नावे मालकांच्या नावावरून ठेवत होती. उदा. डिस्ने स्टुडीओचे नाव त्याचा मालक वॉल्ट डिस्नेच्या नावावरून ठेवले गेले होते.

निवियाच्या बाबतीत पहिल्यांदा ग्राहकाच्या मानसिकतेचा विचार केला गेला. निविया क्रीम बनवणाऱ्या दोन्ही संशोधकांची नावे जड आणि जर्मन होती. अशा नावाची क्रीम मार्केटमध्ये कोणी घेणार नाही असा विचार त्यानी त्या काळी केला आणि स्वत:चे आडनाव द्यायचे सोडून क्रीमचा बर्फासारखा पांढरा रंग पाहून त्यांनी निविया हे साधे सुटसुटीत ग्राहकांच्या तोंडात बसणारे नाव निवडले.

याचा फायदा त्यांना दिसला. निविया क्रीम जर्मन सीमा ओलांडून इतर युरोपीयन देशात पोहोचली. जाहिरातीमध्ये ह्युमन सायकोलॉजीचा जो वापर आज केला जातो त्याची सुरुवात या निविया क्रीमच्या उत्पादन आणि जाहिराती पासून झाली असे म्हणण्यास हरकत नाही.

निविया फक्त एवढ्यावरच थांबली नाही १९११ साली स्त्रियांसाठी क्रीम काढल्यानंतर १९२४ साली निवियाने खास पुरुषांसाठी आणि मुलांसाठीसुद्धा क्रीम बाजारात आणले. दाढी केल्यानंतर चेहऱ्याची जळजळ थांबवाणारे आफ्टर शेव्ह लोशन, शेव्हिंग सोप ह्या व्हरायटी पहिल्यांदा निवियाने  पुरुषांसाठी बाजारात आणल्या.

आजकाल आपण अनेक असे टॅलेंट हंट शो बघतो ज्याच्यामधून सर्वसामान्य घरातील मुले पुढे येतात आणि त्यांना जाहिरातीत किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करायला मिळते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल निवियाने ही कल्पना १९२५ साली प्रत्यक्षात आणली होती. निविया क्रीमचा नवा चेहरा कोण असेल या नावाने कंपनीने एक कॅम्पेन सुरु  केले होते. त्यातून हजारो मुलींचे फोटो पाहून त्यामधून निवडल्या गेलेल्या सर्वसामान्य घरातील मुलींना निवियाच्या मुली म्हणून जाहिरात पेपरवर स्थान देण्यात आले.

the postman

त्यानंतर निवियाने खास नवीन नव्याने आई झालेल्या स्त्रियांना निवियाचा चेहरा बनवला. प्रेग्नन्सीनंतर आत्मविश्वास गमावलेली आई निवियाची क्रीम लावून तिचा उजळलेला चेहरा आरशात पाहते अशा स्वरूपाची जाहिरात युरोपमध्ये प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाली होती.

आज हे सगळं ऐकायला बोलायला सोपं वाटत कारण आज आपण सगळीकडे मार्केटिंगची स्ट्रॅटेजी बघतो पण १०० वर्षांपूर्वी जेंव्हा मानवी संसाधने कमी होती, पहिल्या आणि दुसऱ्या महायु*द्धाची मोठी झळ बाजारपेठेला बसली होती तेव्हा स्वत:चे प्रोडक्ट चालवून दाखवणे हे अवघड काम होते. निवियाने ते त्या कालावधीमध्ये केले.

आज निवियाचा हा इतिहास ग्राहकांना आपल्या उत्पादनाबाबत कसे जागरूक करावे त्यांना आपले उत्पादन घेण्यासाठी कसे प्रेरित करावे या विषयावरची एक महत्वाची केस स्टडी म्हणून अभ्यासली जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

यांच्या नेतृत्वाखाली अनवाणी खेळून भारताने हॉकीत ‘गोल्ड’ मिळवलं होतं

Next Post

आजही भोपाळ गॅस गळतीतील पीडितांचं न्यायासाठी आंदोलन सुरु आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

आजही भोपाळ गॅस गळतीतील पीडितांचं न्यायासाठी आंदोलन सुरु आहे

यांनी महिला आरक्षणासाठी जीवाचं रान केलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.