The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोण आहेत चीनचे उईगर मुस्लीम ? जाणून घ्या त्यांचा इतिहास आणि भीषण वर्तमान

by द पोस्टमन टीम
19 May 2025
in वैचारिक, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


चीनच्या वायव्य सीमेवर असलेल्या शिनझियांग प्रांतात राहणारा उईगर हा मध्य आशियाई तुर्की वंशीय मुस्लिमांचा एक गट आहे. उईगर हे कझाक, उझबेक, ताजिक, किर्गेझ आणि हुई या चीनमधील इतर मुस्लिम अल्पसंख्याकांप्रमाणे एक वेगळा वांशिक समुदाय आहे.

शिनझियांग प्रांतात उईगर मुस्लिमांचे स्वतःचे वेगळे प्रस्थ आहे. स्वतःचं सरकार आणि शासन आहे. परंतु तिबेटप्रमाणे हा भाग चीनच्या ताब्यात असून, चीनची या भागावर मजबूत पकड आहे.

बहुसंख्य उईगर वंशाचे मुस्लिम लोक चीनच्या शेजारच्या उझबेकिस्तान, किरगिस्तान आणि कझाकिस्तान या भागात वास्तव्यास आहे. तब्बल ३००० उईगर मुस्लिमांचे वास्तव्य चीनबाहेर ऑस्ट्रेलियन द्वीपकल्पावर आहे. परंतु चीन ही उईगर मुस्लिमांची मायभूमी आहे. मूळचे तुर्की असलेले हे उईगर मुस्लिम तैमुर लंगच्या वंशातले मानले जातात.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सुरुवातीपासूनच चीनमधील मुस्लिम अल्पसंख्याकांच्या विरोधात अत्यंत कडक धोरणांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी याची सुरुवात उईगर मुस्लिमांपासून केली.

चीनने गेल्या काही वर्षात मुस्लिमांवर पाळत ठेवायला सुरुवात केली आहे. मुस्लिमांवर असंख्य बंधनं लादली आहे, त्यांच्या धार्मिक आचरण पद्धतीवर बंदी घातली आहे. नमाज वर बरीच बंधनं घातली आहे. शिवाय पेहरावासंबंधित अत्यंत कडक नियम लागू केले आहे. तिथे पारंपरिक करण्यास सक्त मज्जाव करण्यात आली असून, बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे.



चीनचे सरकारी अधिकारी कुठल्याही क्षणी या मुस्लिमांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करू शकतात, त्यांच्या मालमत्तेची तपासणी करू शकतात असे आदेश चीन सरकारने दिले आहेत. एकप्रकारे चीनने त्यांच्या देशातील मुस्लिमांना नजरकैदेत ठेवले आहे.

उईगर समुदायाविषयक चीनचे धोरण हे प्रचंड आक्रमक असून चीनने त्यांची रवानगी बंदीगृहाच्या स्वरूपातील छावणीत केली आहे. तिथे त्यांच्याकडून प्रचंड शारीरिक कष्टाची कामे करून घेतली जातात आणि त्यांचे मानसिक शोषण देखील केले जात आहे.

ABC News ने केलेल्या सर्वेक्षणानुसार चीनच्या आधी शिनझियांगमध्ये १३ छळ छावण्या होत्या, आता त्यांची संख्या वाढवून २६ करण्यात आली आहे. ज्यात कित्येक उईगर मुस्लिम बंदीवासात आहे. अनेकांचा तिथे जीव ही गेला आहे. द गार्डीयन या नामवंत इंग्रजी वृत्तपत्रानुसार ऑस्ट्रेलियात असलेल्या उईघर मुस्लिमांच्या ८० टक्के नातेवाईकांना त्यांचे नातेवाईक आज कोणत्या अवस्थेत जगत आहेत, याची कल्पना देखील नाही आहे. त्यांचा त्यांच्या नातेवाईकांशी वर्षांपासून संपर्क होऊ शकलेला नाही.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

उईघर मुस्लिम, शिनझियांग आणि कम्युनिस्ट चीनचा इतिहास

शिनझियांग प्रांताच्या आधी त्याठिकाणी ‘ईस्ट टर्की’ नावाचा स्वतंत्र देश अस्तित्वात होता. १९२३ च्या आसपास सोव्हिएत संघाने हा प्रांत चीनकडून बळकावला. पण १०- १५ वर्षांच्या अस्थिर व्यवस्थेनंतर हा प्रांत पुन्हा स्वतंत्र करण्यात आला.

पुढे चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती घडून आली. माओच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन आर्मीने १९४९ च्या आसपास या प्रांतावर कब्जा केला. सोव्हिएत संघाने आपला कम्युनिस्ट मित्रदेश म्हणून चीनच्या या कृत्याला मुकसंमती दिली.

चीनने सुरुवातीपासूनच शिनझियांग संदर्भातील आपली भूमिका अत्यंत कडक ठेवली. त्यावेळी शिनझियांग प्रांतातील उईगर मुस्लिमांची एकूण संख्या ही ७६% इतकी होती, तर मूळ चिनी वंशाच्या ‘हान’ लोकांची संख्या ही केवळ ६% इतकी होती.

चीनने तिथे ‘हान’ लोकांचे विस्थापन करण्यास सुरुवात केली, सोबतच उईघर मुस्लिमांचे संततीनियमन केले. तिथे इतक्या प्रमाणात ‘हान’ लोकांचे स्थलांतर करण्यात आले की आज एकेकाळी केवळ ६% संख्या असलेली ‘हान’ लोकांची लोकसंख्या शिनझियांगच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ५०% हून जास्त झाली आहे.

जेव्हा सोव्हिएत संघाचे विघटन झाले. तेव्हा उझबेकिस्तान, किरगिस्तान इत्यादी मुस्लिम देश स्वातंत्र्य झाले. यामुळे शिनझियांगमध्ये देखील फुटीरतावादी चळवळ बळावायला सुरुवात झाली, परंतु तत्कालीन चिनी नेतृत्वाने अत्यंत कठोरपणे ही फुटीरतावादी चळवळ मोडून काढली व त्या चळवळीचे नेते भूमिगत झाले.

या फुटीरतावादी चळवळीला उईगर मुस्लिमांचे पाठबळ असल्याने चीनने त्यांच्या प्रतीचे आपले धोरण आक्रमक करायला सुरुवात केली.

सर्वात आधी त्यांनी मुस्लिमांच्या धर्म शिक्षणाला बंदी घातली, त्यांच्या पारंपरिक पेहरावावर बंदी घातली मग तिथल्या विद्यार्थ्यांत कुठल्याही प्रकारे इस्लामची शिकवण पोहचू नये यासाठी त्यांना शाळेत साम्यवादी शिक्षण द्यायला सुरुवात केली.

त्यांना चीनचा वैभवशाली इतिहास आणि संस्कृतीविषयी प्रेम वाटेल यासाठी त्यांचा इस्लामशी असलेला संबंध तोडला, तिथल्या लोकांच्या घरावर, त्यांच्या दैनंदिन व्यवहारावर २००८ पासूनच मोठे बंधन घातले.

जेव्हा शी जिनपिंग चीनचे नेते झाले तेव्हा त्यांचा महत्वकांक्षी अश्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’साठी शिनझियांग हा मध्यबिंदू होता. तेव्हापासून त्यांनी उईगर मुस्लिमांच्या बाबतीत आपलं धोरण अजून आक्र*मक केलं.

याचीच परिणिती म्हणून त्यांनी उईगर मुस्लिमांची जैविक जनगणना केली, त्यांचा डीएनए सॅम्पल्सच्या आधारावर त्यांच्या लोकसंख्येचे वर्गीकरण केले. त्या लोकांची रवानगी छावणी सदृश्य इमारतीत करण्यात आली. तिथे आज असंख्य उईगर मुस्लिम अत्यंत हालअपेष्टेचे जीवन जगत आहेत.

चीनकडून चेन क्वांगओ यांची शिनझियांगचा पार्टीप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. चेन हे अत्यंत क्रूर राज्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. आधी ते तिबेटचा कारभार बघत, त्यावेळी त्यांनी तिबेटी जनतेच्या केलेल्या दमनाची चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमात गाजली होती.

चेन हे गेली दोन वर्षे शिनझियांगमध्ये तळ ठोकून आहेत, त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे आज चीनमधील उईगर मुस्लिमांची अवस्था अजून बिकट बनली आहे.

हे सर्व जरी खरं असलं तरी चीनकडून वारंवार उईगर मुस्लिमांच्या दमनावरील बातमीचे खंडन करण्यात येते. उलट ते याला चीनला बदनाम करण्याचं अमेरिकेचं षडयंत्र म्हणून स्वतःची सुटका करून घेतात.

त्या छावणीविषयक काही प्रश्न विचारल्यास ते चिनी भाषेच्या प्रसारार्थ बनवण्यात आलेले “भाषा प्रसार केंद्र” अथवा “शिक्षण संस्थान” असल्याची बतावणी चीनकडून केली जाते.

चीन हा आज एक अत्यंत बलाढ्य अर्थशक्ती म्हणून नावारूपाला आलेला पण साम्यवादाची पोलादी झालर पांघरलेला देश आहे . चीनच्या ‘आत’ काय घडतेय ते समजण्याचे मार्ग फार थोडे आहेत.

आज चीनच्या आर्थिक महासत्तापदाला ‘वन बेल्ट वन रोड’च्या रूपाने जगभरातील देशात एक संमती मिळाली आहे. अनेक राष्ट्रांनी चीनचं अर्थव्यवस्थेतलं मांडलीकत्व स्वीकारलं आहे त्यामुळे चीनला दुखवण्याची चूक ते करत नाहीत. त्यामुळे चीनविरोधात चकार शब्द काढण्यास ते तयार नाहीत.

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत एकीकडे काश्मीरमध्ये मानव अधिकारांचे उल्लंघन होत आहे असे उघड पणे म्हणणारा मलेशिया, चीनमधील उईगर मुस्लिमांच्या अवस्थेवर मात्र ‘चीन हा बलाढ्य देश आहे, आम्ही त्यांच्याविरोधात बोलू शकत नाही’ अशी टिपण्णी करतो, यावरून चीनचे सामर्थ्य लक्षात येते. आता उईगर मुस्लिमांचं काय होणार हे येणारा काळच सांगेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: China
ShareTweet
Previous Post

मालेगाव फिल्म इंडस्ट्री उभी करणारा पडद्यामागचा नायक

Next Post

आपला लाडका ‘लक्ष्या’ आपल्यातून गेलाय यावर आजही विश्वास बसत नाही..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आपला लाडका 'लक्ष्या' आपल्यातून गेलाय यावर आजही विश्वास बसत नाही..!

या अधिकाऱ्याच्या प्रयत्नामुळे, चेन्नईत संपूर्णपणे सुकलेल्या तळ्यात परतलं पाणी...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.