The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या रामसेसच्या ममीसाठी इजिप्त सरकारने पासपोर्ट इशू केलाय

by द पोस्टमन टीम
10 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


बाकी कुठल्या गोष्टीसाठी नसेल पण आज जगात इजिप्त तेथे ४००० वर्षांपासून उभ्या असलेल्या अद्भुत आणि गूढ अशा उत्तुंग पिरॅमिडच्या रचनेसाठी, नाईल नदीच्या काठी नांदून गेलेल्या हजारो वर्षापूर्वीच्या भव्य संस्कृतीसाठी आणि जुन्या काळाच्या राजांचे मृतदेह जतन करून त्यांची जी ममी बनवली जायची त्या ममीसाठी प्रसिद्ध आहे.

इजिप्त म्हटल्यानंतर तिथे आज कुणाचे सरकार आहे, कोण राज्य करतो? नक्की कुठल्या धर्माचे लोक आज तेथे राहतात, आजच्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचे स्थान काय आहे? जागतिकीकरणात इजिप्त आज कोठे आहे, तिथे कोणते नवीन तंत्रज्ञान आहे याबद्दल लोकांना सुतराम माहिती नसते.

लोकांच्या डोळ्यासमोर आजही इजिप्त म्हणजे पिरॅमिडचा प्रदेश आणि जुया काळातील राजे, ज्यांना इजिप्शियन भाषेत फारोह म्हटले जायचे अशा फारोह लोकांच्या पिरॅमिडमध्ये जतन करून ठेवलेल्या मृतदेहांचे अवशेष इतकीच गोष्ट डोळ्यासमोर येते.

इजिप्त पिरॅमिड



आजही इजिप्तच्या वस्तू संग्रहालयातून पिरॅमिडचे उत्खनन करताना सापडलेल्या अशा फारोहच्या मृतदेहांचे अवशेष पर्यटकांना बघण्यासाठी ठेवलेले असतात. प्राचीन इजिप्शियन लिपी, शिलालेख, इजिप्शियन फारोहच्या मृतदेह जतन करून बनवलेल्या ममीचा अभ्यास करायला देश विदेशातून लाखो पर्यटक इजिप्तला भेट देत असतात.

हजारो वर्षांपूर्वी मृत झालेल्या राजांचे मृतदेह म्हणजे इजिप्शियन ममीज्. आता याच्यामधील एक मनोरंजक गोष्ट म्हणजे जेव्हा या ममी पिरॅमिडच्या तळाशी, हवाबंद थडग्यामध्ये ठेवलेल्या होत्या तेव्हा बाहेरचा उन, वारा, पाउस न लागल्यामुळे शतकानुशातके त्या मृतदेहाचे अवशेष आहे तसेच राहिले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

हे इजिप्शियन राजे मेल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर खास प्रक्रिया करून, त्या देहात सुगंधी मसाले आणि इतर दुर्मिळ रसायने भरून तो देह मखमली कपड्यात गुंडाळून पिरामिडमध्ये दफन केला जात असे. इजिप्शियन संस्कृती नंतर नंतर लयाला गेली.

ममी

इस्लामचा उदय झाल्यानंतर या भूमीवरसुद्धा मुस्लीम आक्र*मणे झाली, मुस्लीम आक्र*मकांनी पिरॅमिड फोडून कुठे खजिना मिळतो का याचा शोध घेतला, परंतु त्यांच्या हाताला फारसे काही लागले नाही असे म्हणतात. आधुनिक काळात साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला दळणवळण वाढल्यानंतर अनेक युरोपियन लोक या भूमीकडे आले. या पिरॅमिडमध्ये असलेल्या गुप्त थडग्याचा शोध लागला. तिथल्या ममी बाहेर काढण्यात आल्या, दफन पेटीवर असलेल्या चित्र विचित्र लिपीवर संशोधन सुरु झाले, इजिप्तच्या राष्ट्रीय संग्रहालयात या ममी हलवल्या गेल्या.

परंतु इतकी वर्षे पृथ्वीच्या पोटात हवाबंद थडग्यात राहिल्यामुळे कसलाही धक्का न लागलेल्या ममी बाहेर आल्यावर त्यांच्यावर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होवू लागला आणि हे मृतदेहाचे अवशेष खराब होवू लागले. अनेक वेळा या मृतदेहांचे पुढच्या पिढीपर्यंत जतन करण्यासाठी निरनिराळी टेक्निक्स वापरली गेली, देश विदेशात विकसित झालेल्या प्रणालींचा त्यासाठी उपयोग करून घेण्यात आला. आजही अशी पद्धत तिथे पाळली जाते.

इजिप्तच्या वस्तू संग्रहालयात असलेली एक प्रसिद्ध ममी म्हणजे इजिप्तचा राजा दुसरा रामसीस याची ममी. आता याचा इतिहास जर पहिला तर हा इजिप्तचा एक प्रसिद्ध फारोह, याच्या काळात इजिप्तने बरीच प्रगती केली, हा स्वत: ९० वर्षे जगला.

साधारणपणे इसवी सन पूर्व १२७९ ते १२१३ हा कालखंड ह्या दुसऱ्या रामसीसचा कालखंड मानला जातो. सुमारे ६६ वर्षे त्याने इजिप्त वर राज्य केले, त्याच्या काळात त्याने अनेक यु*द्धे जिंकली. अनेक इजिप्शियन देवी-देवतांची मंदिरे देखील त्याने आपल्या काळात बांधली.

थोडक्यात ह्या २ ऱ्या रामसीस च्या काळात इजिप्तचा उत्कर्ष झाला. हा राजा मेल्यानंतर त्याच्या मृतदेहाची सुद्धा ममी बनवण्यात आली आणि त्याला सन्मानपूर्वक पिरामिडच्या तळाला एका थडग्यात दफन करण्यात आले. त्यांनतर जेंव्हा देशावर परकीय आक्रमणे झाली तेंव्हा या मृतदेहाचे रक्षण करण्यासाठी हा मृतदेह अन्य ठिकाणी हलवला गेला होता.

Ramses II
फाईन आर्ट अमेरिका

साधारणपणे १९५० नंतर इजिप्तच्या राष्ट्र्रीय संग्रहालयात ही दुसऱ्या रामसीसची ममी लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली. १९७५ साली त्या संग्रहालयात काम करणाऱ्या एका फ्रेंच डॉक्टरच्या असे लक्षात आले की दुसऱ्या रामसीसचा जो मृतदेह आहे त्याची अवस्था खराब होत चालली आहे, हवेमुळे त्याला फंगल इन्फेक्शन लागलेले आहे.

त्यावेळी इजिप्तच्या फॉरीन एम्बसीला संपर्क साधून ही ममी फ्रांसमध्ये तिची डागडुजी करण्यासाठी पाठवून देण्यात यावी असा संदेश या राष्ट्रीय संग्रहालयाच्या वतीने पाठवण्यात आला. ममीची आवश्यक ती काळजी घेऊन आणि दुरुस्ती करून पुन्हा ती संग्रहालयात लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येईल अशी शिफारस ही त्यावेळी करण्यात आली.

त्याबाबत फ्रेंच सरकार बरोबर योग्य तो पत्रव्यवहार करून १९७६ साली ही ममी विमानामधून फ्रांसला नेण्यात आली. आता १९७६ साली फ्रांसमध्ये एक विचित्र इमिग्रेशनचा कायदा होता. जो कुणी परदेशी नागरिक मग तो जिवंत असो किंवा मृत त्याने फ्रांसच्या भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी त्याच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा असणे गरजेचे होते.

हा कायदा या ४००० वर्षापूर्वी मृत झालेल्या राजाच्या मृतदेहालासुद्धा तितकाच लागू होता. त्यामुळे मृत्युपश्चात ४००० वर्षानी या दुसऱ्या रामसीस ला इजिप्त सरकार ने पासपोर्ट इश्यू केला. मृतदेहाच्या नावाने पासपोर्ट निघण्याची ही इतिहासातील एकमेव घटना.

Pharaoh Ramesses II पासपोर्ट

पासपोर्ट घेवून ही ममी पॅरीसच्या विमानतळावर उतरली. तिथे या ममीला आदर दाखवण्यासाठी खास लष्करी पद्धतीने या ममीची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. तिथे या मृतदेहाच्या अवशेषांवर योग्य ते संस्करण करून  त्याची योग्य ती दुरुस्ती करून पुन्हा त्याला इजिप्तच्या राष्ट्रीय संग्रहालयात पाठवण्यात आले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Egyptmummy
ShareTweet
Previous Post

स्वतःचा पाय स्वतःच ‘खुकरी’ने कापणारे भारताचे गोरखा लिजेंड मेजर जनरल इयान कार्डोझो

Next Post

चलाख ब्रिटीश व्यापाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘असा’ धडा शिकवला होता.

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

चलाख ब्रिटीश व्यापाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी 'असा' धडा शिकवला होता.

असं म्हणतात की इथं मृत्यू आल्यावर जन्म मृत्युच्या फेऱ्यातून सुटका होते..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.