The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिऱ्यांच्या ‘व्हाईट कॉलर’ धंद्यामागे आफ्रिकेतल्या एका देशाची भयानक दैन्यावस्था लपलेली आहे

by द पोस्टमन टीम
19 January 2026
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


सिएरा लिओन हा दक्षिण आफ्रिका खंडातील एक देश आहे तो सिलोन या नावाने देखील ओळखला जातो. हा देश ओळखला जातो तो तिथे सापडल्या जाणाऱ्या हिऱ्यांच्या खाणीमुळे. सिलोन देशाच्या हिऱ्यांच्या खाणी जगप्रसिद्ध आहेत.

हिरा खरं तर एक मौल्यवान रत्न म्हणून ओळखला जातो. परंतु हिऱ्याचं जे चकचकीत स्वरूप आपल्या समोर असतं तसा तो खाणीमध्ये सापडल्या नंतर कधीच नसतो. हिरा हा अत्यंत उच्च प्रतीचा कार्बन आहे. थोडक्यात कोळसा. हिरा अनादी कालापासून श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो. राजेशाही थाटाची वस्तू मानला जातो. त्याच्यासाठी बरेच रक्तरंजित संघर्ष देखील झालेत.

जमिनीच्या पोटात जवळपास पाचशे मीटर आत – भूगर्भात हिरे सापडतात. सिलोनमध्ये या खाणीत  काम करणारे हजारो लोक आहेत. मुख्यत: इथल्या स्थानिक लोकांचा व्यवसाय हा खाणीतून हिरे काढणे असाच आहे. परंतु असे असून देखील हा देश अत्यंत मागासलेल्या अवस्थेत जीवन जगतो.

इथे बस्तान बसवलेल्या परदेशी हिऱ्यांच्या कंपन्यांनी इथल्या स्थानिक लोकांना प्रचंड लुटले आहे. इथले लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून ३०० ते ४०० फुट खोल भूगर्भात उतरतात. भूगर्भातील हिरे काढण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असते. अनेकदा खोल खणता खणता पाणी लागते आणि अशा पाण्यातून कार्बन चे खडे गोळा करावे लागतात हे काम रात्रंदिवस चालत राहते.



पाण्यात सतत उभे राहून कामगारांचे हात पाय जखमी होत राहतात मात्र त्यांना या कामावरून जोपर्यंत जितके जास्त कार्बनचे खडे मिळत नाहीत तोपर्यंत विश्रांती घेण्याची मुभा नसते. खाणे, पिणे, आरोग्याच्या सुविधा अशा कुठल्याही सवलती या कामगार लोकांना दिल्या जात नाहीत. अनेक वेळा गँगरीन होऊन हाता-पायाची बोटे कापण्याची वेळ येते परंतु या कामगारांना चांगल्या आरोग्य सुविधा देखील दिल्या जात नाहीत.

हा नवीन प्रकारचा, नवीन काळातला वसाहतवाद आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

खाणीत गोळा केलेले हिरे त्यानंतर कंपनीच्या प्रयोगशाळेत जातात, त्यावर छाननी होते आणि पुढील प्रक्रियेसाठी हे हिरे कंपनीच्या Research & Development विभागाकडे पाठवले जातात. तिथून प्रक्रिया होऊन ते जगभरात वितरणासाठी पाठवले जातात पण ज्या देशात हे हिरे सापडतात तो देश आज अत्यंत दरिद्री आणि हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतो.

सायरा लिओन मधल्या हिऱ्यांचे मुख्यत: स्मगलिंग केले जाते, यावर सरकारचे फारसे नियंत्रण नाही. अनेक वेळा बहुराष्ट्रीय कंपन्या स्वत:चे गुंड पाळून हिरे लंपास करण्याच्या प्रयत्नात असतात.

१९३० साली सिलोनमध्ये पहिल्यांदा हिरे सापडल्याची खबर आली होती. त्यानंतर जगभरातील बहुराष्ट्रीय नफेखोर कंपन्यांचे लक्ष तिकडे वळले आणि त्यांनी सिलोनमध्ये कार्यालये उघडायला सुरुवात केली.

तिथल्या सरकारबरोबर संधान साधले. १९७० आणि ८० च्या दशकात सिलोनमध्ये भ्रष्टाचार आणि दुरावस्थेने  कळस गाठला. स्थानिक लोक, सरकार आणि कंपन्या यांच्यात मोठे यु*द्ध पेटले. त्यातून सिलोनमधल्या या यु*द्धाला ‘रक्ताळलेले हिरे’ असे नाव दिले गेले.

कुणीही कुठल्याही भागात उठावे आणि बंदुकीच्या जोरावर हिरे खाणीतून काढून ते कंपन्यांना विकण्यासाठी गरीब कामगार लोकांना वेठीला धरावे असा नित्यक्रम झाला. त्यातून अनेक रक्तरंजित यु*द्धे घडली जी आजतागायत चालू आहेत.

२०१७ मध्ये या सिलोनमधून जवळ जवळ २,८९,००० कॅरेट हिरे निर्यात केले गेले. खरे पाहता ज्या देशात हिरे आहेत तो देश तर सगळ्यात श्रीमंत असायला हवा पण गेल्या काही दशकात इथे गाठलेल्या स्मगलिंगने आशीर्वाद म्हणून लाभलेल्या हिऱ्याच्या खाणी शाप बनवून टाकल्या आहेत.

या हिऱ्यांच्या खाणीवर देखरेख करण्यासाठी आणि इतर सामान्य लोकांना जोरजबरदस्तीने वेठबिगार म्हणून उचलून आणण्यासाठी लहान मुलांच्या हातांमध्ये बंदुका दिल्या गेल्या आहेत. सर्व दह*शत या लहान मुलांमार्फत पसरवली जाते. त्यांना लहानपणी त्यांच्या परिवारापासून उचलून आणून त्यांना अमली पदार्थांच्या सवयी लाऊन त्यांच्याकडून अशा प्रकारचे काम तेथील स्मगलर्स करून घेतात.

तेथील लोक म्हणतात या खाणीमुळे आमच्या पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या आणि अजूनही होत आहेत. आम्ही मालक असून देखील आम्हाला या हिऱ्यांवर हक्क सांगता येत नाही आणि आम्हाला त्याच्यापासून कसला फायदा होत नाही.

तिथे जी पार्टी निवडून येते ती या हिऱ्याच्या खाणीमध्ये चाललेल्या गैरव्यवहाराची चौकशी करू म्हणून सत्तेवर येते आणि सत्तेवर आल्यावर मात्र हिऱ्याच्या कंपन्यांनी दिलेला मलिदा खाऊन खुश राहते. त्यामुळे सिलोनमधली ही हिऱ्याची कहाणी किती काळापर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत राहणार याचे उत्तर आज कुणाकडेच नाही.

२००६ मध्ये या सिलोनमधील हिऱ्याच्या खाणीवर असलेल्या यु*द्धाबाबत Blood Diamond नावाचा चित्रपट देखील येऊन गेला. तेथील सरकार, सरकारबरोबर प्रामाणिक असलेले लोक आणि हिरे चोरण्यासाठी आलेले स्मगलर्स यांच्यातील संघर्ष आणि गरीब कामगार, एकूणच देशाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिती जगासमोर आणण्यात या चित्रपटाने मोलाची मदत केली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: blood diamondssierra leone
ShareTweet
Previous Post

असे बनले जगभरात प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांचे भन्नाट लोगो…

Next Post

मंगोल : पाणी दूषित होईल म्हणून स्नान न करणारे ‘विश्वविजेते’ शूर साम्राज्य

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

मंगोल : पाणी दूषित होईल म्हणून स्नान न करणारे 'विश्वविजेते' शूर साम्राज्य

रेल्वे रुळावर होणारे हत्तींचे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने 'ही' भन्नाट आयडिया केली आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.